फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ चित्र ms paint वर काढता का? माणसांच्या मनःस्तिथीच्या विविध छटा चेहऱ्यावर जबराट दाखवता. फॅन झालो तुमचा.

( होय, ms paintवरच काढतो व त्यामुळेच, सरावाने माझा हात बरयापैकी बसला असूनही, फार वैविध्य आणायच्या भानग़डीत नाही पडत मी . अभिप्रायाबददल धन्यवाद! )

ब्राझिल बेल्जियम मॅच खरंच झकास झाली.
९० मिनिटांत संपली हे आणखी एक बरं झालं. Proud
रात्री जागून एकटीच बघत बसले होते. त्यामुळे आरडाओरडा करता आला नाही मात्र Lol

फ्रान्स-बेल्जियममध्ये आता माझा काटा जरासा बेल्जियमच्या दिशेला सरकला आहे.

फ्रान्स-उरुग्वे मॅचदरम्यान कमेंटेटर सांगत होता, की गॉडिन (उरुग्वेचा कॅप्टन) ग्रिझमनच्या मुलीचा गॉडफादर आहे. आज टाईम्समध्येही वाचलं, की ग्रिझमनचे उरुग्वेशी खूप जवळचे संबंध आहेत; त्यामुळे त्याने त्याचा गोल खूप सेलिब्रेट केला नाही.
असे कोणकोणते धागे असतील या ग्लोबल स्पोर्टमध्ये... असं वाटलं हे कळल्यावर.

एकाच क्लबमधून बराच काळ खेळणारे खेळाडू विश्वचषकासाठी वेगवेगळ्या राष्ट्रीय संघांतून एकमेकां विरूद्ध खेळत असले , तरीही व्यक्तिगत संबंधांमुळे असे अनेक अदृश्य धागे असणं सहज शक्य असावं !

स्पर्धेत अभूतपूर्व मजल मारून यजमान संघ शेवटी पेनल्टी शूटआऊटमधे बाहेर ! बॅड लक !! क्रोएशिया यंदा लई
फाॅर्मात !

<< यजमान संघ शेवटी पेनल्टी शूटआऊटमधे बाहेर >> -

असं उभं राहून " भांडवलशाहीचा विजय असो ! ", असं ओरडला असणार क्रोएशियाचा गोली;
झालं, रशियनानी हाणले असणार बॉल त्याच्या थोबाडाच्याच दिशेने !!
hands.jpg

भाऊकाका Lol

यावेळी पुतीन मात्रा चालली नाही Wink

भारी भाऊ.. Happy
फक्त रशियनांनी तोंडावरही नाही मारले धड शॉट्स ! चुकलेले दोन तर अगदीच भलतीकडे गेले.
क्रोएशियाचा गोली फनी आहे.

फ्रान्स आणि बेल्जियम वेगवेगळ्या सेमीज मध्ये हवे होते. दोन्ही टीम्स मस्त खेळत आहेत.

*या वेळी पुतीन मात्रा चालली नाही *- तिनदां निवडणूक जिंकून आता आजन्म राष्ट्राध्यक्ष रहायचंय त्याला; कप जिंकून लोकप्रियतेत फुटबाॅलवालयाना वरचढ होण्याचा धोका कसा घेईल पुतीन ! Wink
खरंय, परागजी . सेमितले चारही संघ गुणवान असले तरीही बेलजियन व फ्रेंच या दोन्ही संघाना अंतिम सामन्यात येण्याची संधी मिळणं अधिक उचित ठरलं असतं.

अरेरे. आमची ब्राझिल टीम हरली. मॅच मस्त झाली. टी २० मॅच पहातोय अस वाटत होत. Happy

आता कोणीही जिंकू शकेल.

भाउ मस्त कार्टून्स.

अंतिम चारही संघ युरोपियन, क्रोएशिया २०वर्षांननंर 'सेमि'मधे इ.इ. या वर्ल्डकपचीं अनेक वैशिष्ठ्ये आतां पुढे येताहेत; पण, बड्यांची मक्तेदारी मोडल्याचं खास वैशिष्ठ्य असावं या वर्ल्डकपचं. [ कदाचित, रशियात स्पर्धा असल्याने, फुटबॉलमधे हा साम्यवाद आला असावा ! Wink ]

अरे, इतकी प्रेक्षणीय सेमी फायनल झाली आणि एकही काॅमेंट नाही इथं अजून ! फ्रेंचानी 1-0 ने बेलजियमवर मात करत अंतिम फेरीत 'फेवरिट' म्हणून प्रवेश! रिअल, रिअल बॅड लक , बेल्जियम!!

पण... पण पहिला गोल झाल्यावरही फ्रेंच बचावाकडे न झुकतां आक्रमकच राहिले, हेंही त्याच्या यशामागचं एक कारण आहेच.

मस्त मॅच झाली कालची !!

हार्ड लक, बेल्जियम... काल लुकाकू जरा ढीला पडल्यासारखा वाटला.

ईथे (लंडन) खूप ऊत्साहाचे व थ्रिल वातावरण आहे..
जवळ जवळ सर्व गेम फॉलो केले आहेत.

बहुतेकींङ्लंड वि फ्रांस असेल.. आणि त्यात पेनल्टी च्या बळावर ईं जिंकेल असा अंदाज आहे. ईं ने त्यांचा बचाव मात्र बराच सुधारयला हवा फ्रां विरुध्द. नाहितर अवघड जाईल.

<< हार्ड लक, बेल्जियम... काल लुकाकू जरा ढीला पडल्यासारखा वाटला.>> खरंय. लुकाकूला मैदानावर शोधावं लागत होतं. त्याला एका नेमक्या पासमुळे एक छान संधी गोलसमोर मिळाली होती, तीही त्याने दवडली ! Sad
दोन्ही संघांचे गोली मात्र अभेद्य वाटत होते; दोन्ही संघ सुंदर आक्रमण करत असूनही स्कोअर १-०च झाला , त्याचं कारण हेंच असावं. फ्रेंचांचा बचाव, विशेषतः 'मार्कींग', बेल्जियन्सपेक्षां सरस वाटलं.
थायलंडमधल्या सुखरूप गुहेबाहेर पडलेल्या फुटबॉलप्रेमी मुलाना तत्परतेने वर्ल्डकपची फायनल बघायला फिफाचं आमंत्रण ! What an apt and nice gesture !!!

फ्रान्सच्या संघाने खूप छान खेळ केला. बापेने गोल मारला नाही तरी काही मूव्हस अप्रतिम आणि अतिवेगवान होत्या. हझार्ड्ला आणि लुकाकूला जखडून ठेवले होते. शेवटी लुकाकूला एक सम्धी मिळाली होती. सोडली. बेल्जियम जिंकेल अस कधी वाटलच नाही.

<< असे कोणकोणते धागे असतील या ग्लोबल स्पोर्टमध्ये..>> -

एकदांच सोड रे पुढे ! प्रॉमिस, तुमच्या गोलमधे नाही ,
गोलवरून हाणतो शॉट ! माझी सासू बसलीय तिथेच मागे !!secret.jpg

इंग्लंड १ - क्रोएशिया २ ( हुश्शः इंग्लंड हरले एकदाचे. ) Lol
अंतिम सामना: फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया

भाऊ, कुठून शोधून काढता आयडिया Biggrin

आज पेप्रात वाचलं की बेल्जियमच्या कोचनं लुकाकूची नेहमीची यशस्वी जागा (आणि भूमिका) या मॅचमध्ये जराशी बदलली.

काल क्रोएशियाचा दुसरा गोल झाल्यावर आख्ख्या टीमचा ढीग कसला त्या एका फोटोग्राफरवर कोसळला Lol तो बिचारा कॅमेरा वाचवण्याची खटपट करत हसत होता.

कालचा ट्रिपिअरचा फ्री-किक गोल भारी होता.

मला वाटतं -
१] इंग्लंडने पहिला गोल मारला व क्रोएशियन सुन्न झाले होते, त्याच वेळीं आक्रमण तीव्र करुन इंग्लंडने आघाडी वाढवणं आवश्यक होतं; क्रोएशिअन्स सांवरून त्याना लय सांपडल्यावर उलट इंग्लंडवरच दबाव वाढत गेला;
२] तौलनिक दॄष्ट्या, इंग्लंडकडे चांगल्या खेळाडूंचा भरणा अधिक होता; त्यांचा योग्य वापर त्यानी केला नाही किंवा 'टू मेनी कूक्स स्पॉइल द ब्रॉथ ', असंही झालं असावं;
३] सामन्यातले झालेले तिन्ही गोल व वांचवले गेलेले सर्व गोलही प्रेक्षणीयच होते; कुणीही हरलं असतं, तरी कौतुकास व सहानुभूतीस पात्र ठरलं असतं !

<< कालचा ट्रिपिअरचा फ्री-किक गोल भारी होता.>> - १००% सहमत ! -

माझा 'सेल' खरेदीचा अनुभव आहे तो ! फ्री किकवर त्यानी एक गोल दिला,तेंव्हांच
कळलं मला कीं दोन तरी महागडे गोल मारणारच ते इंग्लंडच्या गळ्यात !!
sale.jpg

<<फायनल मध्ये कोण कोण फ्रान्सच्या बाजूने ? >> या प्रश्नावर माझी मोठी गोची झालीय्; मला फ्रान्सची टीम खूप आवडली आहे. पण स्पर्धा सुरू होण्या आधी, ९ जूनला , मी सहज एक अंदाज इथं फेकला होता << क्रोएशिया किंवा नायजेरिया कांहीं तरी उलथापालथ करण्याची एक दूरची शक्यता !>> . केवळ सहज उच्चारलेला माझा हा शब्द खालीं पडूं नये म्हणून, क्रोएशियाने सगळं कसब पणाला लावून एवढी मोठी मजल मारलीय. आत्तांच इंग्लंडला त्यानीही " चले जाव !" केल्याने माझी त्यांच्याबद्दलची आपुलकीही वाढली आहेच. शिवाय, हा विश्वचषक तर अनपेक्षित निकालानी खचाखच भरलेला. त्यामुळे, फ्रान्स आवडत असूनही, मला क्रोएशियाच्या बाजूने उभं रहाण्याशिवाय गत्यंतर नाही ! Wink

Pages