Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी भातुकली , घर घर हा
कोणी भातुकली , घर घर हा प्रकार खेळलाच नाही.वाईटातली वाईट डीश बळ बळ खाउ घातली असती, तरी निम्मे तिथुन उठले असते.सगळे आपले फक्त व्यायाम च करुन घेत आहेत.
आस्ताद चान्स मिळाला की लगेच सई आनि मेघा वर आरडाओरडा करतो.
अस वाटतय, आता राजेश जरी परत आला तरी, रेशम गेम नीट खेळेल.कारण एका माणसावर डींपेड राहुन गेम जिंकता येणार नाही हे तिला आता कळल असेल, असाव अशी अपेक्षा.सई कॅप्टन असुन पण पुर्ण वेळ रेशम स्ट्रेटेजी प्लॅन करत होती.
भुषण आनि मग जुई जायला हवे.बोअर करतात ते फार.
सगळी जीमला जाणारी खेळणी होती.
सगळी जीमला जाणारी खेळणी होती.. फक्त फिजिकल अॅक्टीव्हीटी केल्यामुळे चिडून क्विट करतील हा तर सगळ्यात मोठ्ठा फ्लॉ होता..
>>पण थत्ते तर काल दिसलेच
>>पण थत्ते तर काल दिसलेच नाहीत कुठे. अशाने त्यांचीच गच्छंती होईल आधी.
आऊं नी बराच वेळ थत्ते पॅसेंजर चालवून घेतली.. त्यामूळे बहुतेक ईंजिन दमल्याने साईडींग ला टाकले आहे.
राजाबाबू असतात तेव्हा रेशम चा अॅटीट्यूड (माज) जास्त असतो.. हे काही पटले नाही. ती मुळात त्याच स्वभावाची वाटते. फक्त मेघा सारखी सतत एको मोड मध्ये नसते... लगेच शेल मध्ये जाते आणि चेहेर्यावर अंगार फुललेला.
मला तरी मेघाचे ते पडणे वगैरे नाटकच वाटते. माणूस असा धाडकन पडतो तेव्हा काही वेळ तरी शुध्दीवर नसतो. असा अचानक कोलमडलेला माणूस 'मला टास्क करायचाय.. बझर दाबू नका..' वगैरे ठासून सांगतो याचा अर्थ तो संपूर्ण शुध्दीत आहे आणि मुळात त्यालाच त्याच्या तब्येतीबद्दल शंका नाहीये.. सगळे बि बॉ व लोकांच्या नजरेत फेवरेबल मते मिळवण्यासाठी चे नाटक होते असे वाटते.
बाकी सई ला अज्जीबातच ऊड्या मारता येत नाहीत की.. जुई व तीच्या ऊंचीतील फरक पाहता किमान जुईच्या दोन ऊड्यांमध्ये मध्ये हिची एक तरी व्हायला हवी होती..
अर्धी जेमतेम जमत होती.
स्मिता ने लाथ दाखवली? टिव्ही वर दाखवले त्यात तर ती 'नाहीतर लाथ घालीन' असे नुसते म्हणली पुष्कर ला.. आणि त्यावरून तो पेटला..
बाकी सई ला अज्जीबातच ऊड्या
बाकी सई ला अज्जीबातच ऊड्या मारता येत नाहीत की.. > मुद्दाम करत होती ती. तिने वेळकाढू पणा करायचा हे आधीच ठरलं होतं.
मला तरी मेघाचे ते पडणे वगैरे नाटकच वाटते. माणूस असा धाडकन पडतो तेव्हा काही वेळ तरी शुध्दीवर नसतो. असा अचानक कोलमडलेला माणूस 'मला टास्क करायचाय.. बझर दाबू नका..' वगैरे ठासून सांगतो याचा अर्थ तो संपूर्ण शुध्दीत आहे आणि मुळात त्यालाच त्याच्या तब्येतीबद्दल शंका नाहीये.. सगळे बि बॉ व लोकांच्या नजरेत फेवरेबल मते मिळवण्यासाठी चे नाटक होते असे वाटते. >> २०० %
आणि मेघा असले प्रयत्न सतत म्हणजे सततच करत असते. बदनाम हुए तो क्या नाम न हुआ पॉलिसीखाली भलं बुरं जे असेल ते करून तिला सतत प्रकाश झोतात रहायला आवडतं. मी तिथे असते तर तिच्यावर बहिष्कारच टाकला असता, इतकी डोक्यात जाते तिची भाषा आणि टोन.
राजेश चा पण टोन असाच इकडे मला राडा नकोय.. मला नकोय म्हणजे तू कोण? स्वयंघोषित लिडर? मला दोन मिनिटं लागणार नाहीत.. काय आम्ही आम्ही गाढवाचे स्वामी?
काल मेघाने रेशमची 'चालबाजची'
काल मेघाने रेशमची 'चालबाजची' रोहिणी हट्टगन्डी केली होती.
पण टास्क खुप बोअरिन्ग होता. सई बेस्ट फेन्ड्र होउ शकते कुणाचीही. तिने पुष्करला छान मोटिव्हेट केल. फक्त तिने त्याच्याशी flirting करणे बन्द कराव.
स्मिता रे रा टिमचीच भाष बोलते. म्हणे लाथ मारीन.
आस्ताद सारख सारख का फुन्कायला जातो?
आज ताई आणि तिच्या बहीण
आज ताई आणि तिच्या बहीण भावंडांनी मधेच काड्या नाही घातल्या तर पुष्कर कॅप्टन बनेल.
>>मुद्दाम करत होती ती. तिने
>>मुद्दाम करत होती ती. तिने वेळकाढू पणा करायचा हे आधीच ठरलं होतं.
ओक्के..
खरे तर या खेळासाठी कुणीच पंच्/अंपायर नसल्याने दोन्ही बाजूने वाद व वेळ काढू पणा चालू होता.. नाहितर तासाभरातच आटोपले असते दोन्ही टीम चे. थोडक्यात काय तर नियम, सामंजस्य वगैरे ने खेळणे हे बि बॉ ला ही अपेक्ष्क्षित नाहीये.. जितके राडे जास्त तितके चांगले. दंगा करणार्या वर्गात जास्त करमणूक असते, आदर्श वर्गात नुसताच शुकशुकाट असतो.. तेव्हा घेऊ देत पंगा आणि होवू देत दंगा. नथिंग पर्सनल.
>>रोहिणी हट्टगन्डी केली होती.
>>रोहिणी हट्टगन्डी केली होती.
टायपो एकदम फीट बसतोय पण..
तर पुष्कर कॅप्टन बनेल>>
तर पुष्कर कॅप्टन बनेल>> म्हणजे सर्वानुमते तो डायरेक्ट कॅप्टन होईल असं का ?
कि पुष्कर फक्त कॅप्टन पदासाठी टीम मधून निवडला जाईल ना ? आणि दुसऱ्या टीम मधून स्मिता किंवा ऋतुजा ला चान्स देतील
आणि कप्तान होण्यासाठी एक टास्क होईल ... असच ना? का मी चुकीचं समजतेय ??
काल शेवट काय झाला ?पुश आणि रु
काल शेवट काय झाला ?पुश आणि रु शेवटपर्यंत टिकले का ? >>> हो. सईची टिम टास्क जिन्कली आणि टास्क सम्पला.
तो नसल्यामुळे रेशम चा टास्क मधे वगैरे पॉजिटिव्ह वावर वाटला मला. टफ प्लेयर आहेच ती, पण आता अरेरावी, दादागिरी चा अप्रोच नाहीये. >>>> मेघासुद्दा काल हेच म्हणत होती. काल रेशमने तिला स्वतःहून जेवण दिल आणून , हिला वाटल की रेशम सुधारली, माझ्याशी चान्गल वागतेय. पण तिला काय माहितेय कि हा रे रा टिमच्या तोडा आणि फोडा strategy भाग आहे ते.
काहीच नाही सुचत तर खेळायचा
काहीच नाही सुचत तर खेळायचा कंटाळा आलाय म्हणून त्या खेळण्यांना कपाटात बंद करुन ठेवले असते तरी १०-१५ मिनिटात क्लस्टरफोबियाने एकेक करुन सगळ्यांनी बझर दाबला असता! >>> मग हा प्रयोग आधी उनाने थत्तेवर केला असता
हा आहे आजचा टास्क.
हा आहे आजचा टास्क.
https://www.youtube.com/watch?v=0WZn6X17voY
हिन्दीच्या मानाने तरी इथे normal वाटतोय हा टास्क. हिन्दीत तर एक स्पर्धक चक्क शेणात यथेच्छ लोळत होता. यक्स!
रच्याकने: या बाफ वरील आजवरील
रच्याकने: या बाफ वरील आजवरील एकूण प्रतीसादांचा आकडा पाहता निव्वळ एका महिन्यात १५०० + पार करणारा माबो च्या इतीहासातील हा पहिलाच धागा असावा असे वाटते. कोणे एके काळी ईथे १००० पार करायला काही बाफं ना अक्षरशः अनेक वर्षे लागली आहेतः
'देव म्हणजे काय': १०६१ पोस्टी, कालावधी तब्बल ४ वर्षे
https://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html?1213256628
एकंदरीत आमची अभिरूची बदलली आहे हेच खरे.
आस्तिन स्वताला दादा समजायला
आस्तिन स्वताला दादा समजायला लागला आहे दाजी गेल्यापासून.. काय आवाज चढवतोय...
आणि दुसऱ्या टीम मधून स्मिता
आणि दुसऱ्या टीम मधून स्मिता किंवा ऋतुजा ला चान्स देतील
आणि कप्तान होण्यासाठी एक टास्क होईल ... असच ना? का मी चुकीचं समजतेय ??>>>>बरोबर आहे तुमचं. सईच्या टीम मधून पुष्कर उभा राहील आणि मेघाच्या टीम मधून काय माहित कोण उभं राहील ते. आता दुपारी आजचा प्रोमो दाखवला त्यात मेघा कॅप्टनशिपमधून बाहेर पडल्याचं दाखवताहेत. म्हणजेच रे राच्या टीम मधलं कोणीतरी उभं राहील. आणि मग रे राची सगळी गॅंग, पुष्कर सोडून त्या दुसऱ्या उपटसुंभ उमेदवाराला कॅप्टन करायला पाहतील, म्हणून बोललो रेशमताईच्या बहीण भावंडानी काड्या नाही केल्या तर पुष्कर कॅप्टन होईल
दुसर्याने लिहीलेले स्क्रिप्ट
दुसर्याने लिहीलेले स्क्रिप्ट करायचे असल्याने मेंदू चा क्रीयेटीव्ह भाग (वापरायचा) बंद झालेला दिसतो या सर्व कलाकारांचा. टॉय प्ले मध्ये कितीतरी वेगळे व अपिलींग करता आले असते.
>>
ऊठा बशा काढणारी, व्यायाम करणारी, लींबू सरबत पिणारी, अशी खेळणी अजून स्पिलबर्ग ते रामसे पर्यंत देखिल कुणी फारशी बनवलेली नाहीत
Humm barobar
Humm barobar
>>रे राच्या टीम मधलं कोणीतरी
>>रे राच्या टीम मधलं कोणीतरी उभं राहील.
नाही हो... मेघा च्या टीम मध्ये: आस्ताद, जुई, स्मिता, थत्ते, भूषण हे होते. त्यापैकीच एक होईल दावेदार. बहुतेक सर्वात जास्ती खेळला म्हणून पुष्कर होईल कॅप्टन असे वाटते.
रच्याकने: या बाफ वरील आजवरील
रच्याकने: या बाफ वरील आजवरील एकूण प्रतीसादांचा आकडा पाहता निव्वळ एका महिन्यात १५०० + पार करणारा माबो च्या इतीहासातील हा पहिलाच धागा असावा असे वाटते. कोणे एके काळी ईथे १००० पार करायला काही बाफं ना अक्षरशः अनेक वर्षे लागली आहेतः
'देव म्हणजे काय': १०६१ पोस्टी, कालावधी तब्बल ४ वर्षे
https://www.maayboli.com/hitguj/messages/46/66670.html?1213256628
एकंदरीत आमची अभिरूची बदलली आहे हेच खरे. Wink
Submitted by योग on 11 May, 2018 - 19:20
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हा रेकॉर्ड सैराट च्या "सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)" धाग्याच्या नावावर आहे...
त्या धाग्याने १० पेक्षा कमी दिवसात हा टप्पा पार केलेला...
>>हा रेकॉर्ड सैराट च्या
>>हा रेकॉर्ड सैराट च्या "सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)" धाग्याच्या नावावर आहे... Happy
ओक्के.. चित्रपट व अर्थातच धागा दोन्ही पाहिलेले नाहीत..
त्या पहिल्या गेम मध्ये जेव्हा
त्या पहिल्या गेम मध्ये जेव्हा खुर्चीवरून ऊठवण्यासाठी कचरा अंगावर टाकण्यात येत होता त्या जागी एखादे झुरळ टाकले असते (अगदी मेलेले) तरी ५ मिनीटात ऊठल्या असत्या की मुली.
कुणालच कसं नाही सुचलं?
काल पुष्कर चांगला खेळला, अगदि
काल पुष्कर चांगला खेळला, अगदि जिंकु किंवा मरु या आवेशात खेळला. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत (ऑल्मोस्ट ६ तास कॅरिड द बॅट) टिकुन रहायचं म्हणजे खायचं काम नाहि. तो कॅप्टन होण्याकरता कोणाचीच हरकत नसावी.
ते सईचं त्याला घरच्यांचे फोटो दाखवुन मोटिवेट करणं अगदिच पोरकट वाटलं. (
दुसर्या अँगलनी बघितलं तर ते अतिशय ब्रुटल होतं; ग्रेहाउंड रेसिंग सारखं)...हो ते फोटो दाखवणे मलाही फनी
हो ते फोटो दाखवणे मलाही फनी वाटलं होतं
"दुगना लगान" टाइप, जसे काही अगदी घरच्यांच्या जेवण्या खाण्याचा प्रश्न याच्या व्यायामाने सुटणार आहे
अर्थात ६ तास तग धरण्याचा प्रश्न असल्याने त्याचे मोराल टिकवणे हे कळीचेच होते. सई डिड अ गूड जॉब. तिने त्याला चिअर केले, पाणी दिले, इव्हन येऊन पायाला मसाज करत होती त्यावरून आस्ताद जोरजोरात ओरडत होता. ते चालणार नाहीच असा काही नियम होता का? नसेल तर ती काहीही करू शकते की.
त्या जागी एखादे झुरळ टाकले
त्या जागी एखादे झुरळ टाकले असते (अगदी मेलेले) तरी ५ मिनीटात ऊठल्या असत्या की मुली.
>> झुरळ कुठून आणणार मालक?
एकंदरीत आमची अभिरूची बदलली
एकंदरीत आमची अभिरूची बदलली आहे हेच खरे. Wink
Submitted by योग on 11 May, 2018 - 19:20
>>>>>
आपले ठेवायचे झाकून आणी दुसर्याचे पहायचे वाकून.
हा रेकॉर्ड सैराट च्या "सैराट
हा रेकॉर्ड सैराट च्या "सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)" धाग्याच्या नावावर आहे... Happy
ओक्के.. चित्रपट व अर्थातच धागा दोन्ही पाहिलेले नाहीत..
>>> सैराट न पाहिलेला मराठी माणूस सापडलाच शेवटी ☺️
>>सैराट न पाहिलेला मराठी
>>सैराट न पाहिलेला मराठी माणूस सापडलाच शेवटी ☺️
करेक्ट! पहिला जेमतेम तास पाहून बोअर झालं.. बंद केला..
>>नसेल तर ती काहीही करू शकते
>>नसेल तर ती काहीही करू शकते की.
पुढे तेच बघायला मिळेल बहुदा...
मला तर पुष्कर हा घरातील अमोल
मला तर पुष्कर हा घरातील अमोल पालेकरच वाटतो..... भांडता सुध्दा येत नाही
आपले ठेवायचे झाकून आणी दुसर्
आपले ठेवायचे झाकून आणी दुसर्याचे पहायचे वाकून.>>>वाकून कुठे? ईथे तर तेच दाखवायला बसले आहेत ना
खेळ मांडिला ऐवजी छळ मांडिला असे नाव हवे होते. बाहूल्यांनी थकून बझर दाबले, इरिटेट होऊन नाहीच.
लहान मुले कश्या-कश्याप्रकारे इरिटेट करू शकतात असा विचार पण कोणी केलेला दिसला नाही.
Pages