Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं म्हणे . त्याच लक्ष मोबाईल मध्ये तर मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि मिक्सर मध्ये घालून त्याचे तुकडे तुकडे केले . >>>>> नोकियाचा जुना फोन असेल. >> असेल काय माहिती . पण लक्ष वेधून घेण्यासाठी एवढं ?
राजेश खोलीत ठारच वेडा होणार.
राजेश खोलीत ठारच वेडा होणार. पण तो बाहेर जायला मागत नाहीये, त्याला त्या घरातच जायचंय रेशमला भेटायला. >> पैसे कमवायला जायचंय त्याला बिग बॉस च्या घरात . अजून पैसे कमवायची हौस नाही फिटली . त्यात जे कोण कोण त्याच्या विरुद्ध बोललेलं त्याने पाहिलं त्याचा पण बदला घ्यायचा असेल . त्या एका खोलीत दिवसभर . वाचायला पुस्तक नाही . मोबाईल नाही . बघायला फ़ॅमिलीचे फोटो नाहीत. चार पावलं फिरायला जागा नाही . दिवसभर आपलं टीव्ही वर बघत बसायचा खेळ . मग काय होणार ? वेडच व्हायला होणार
हे बऱ्यापैकी विषयांतर होतंय पण लिहिल्याशिवाय राहवत नाहीये म्हणून लिहिते . सावरकरांची अंदमानची कोठडी याच्या पेक्षाही लहान होती . जमिनीवर झोपायला लागत होत .बेड्यांमध्ये रहात होते . कोलू ओढायला लागत होता . नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम करत होते आणि बेचव अन्न खायला मिळत होत. कुठलही वेळ घालवायचं साधन नाही आणि तरीही अशा स्थितीत कशी काय काढली असतील त्यांनी १०/११ वर्ष त्या काळकोठडीत शिक्षा म्हणून. थोडी थोडकी नाहीत अकरा वर्ष ?
मेघा , मेघा आणि फक्त मेघा जी
मेघा , मेघा आणि फक्त मेघा जी डोकं वापरून खेळतेय , भूषण सुद्धा बर्यापैकी हुषार वाटायला लागलाय !
सई मेघाला सो कॉल्ड समजुतीचे शब्द सांगत होती अशी वागु नकोस अँड ऑल, मेघानी सईला तिने सांगितलं कि अगं वेडे ते मला नाही तुला टार्गेट करतायेत, जे सईला तिच्या नावाची मडकी फुटली तेंव्हाच प्रुव्ह झालं होतं पण आज परत एकदा प्रुव्ह झालं जेंव्हा सगळ्यांनी मान्य केल कि त्यांना मेघापेक्षा त्यांना सई जास्तं डेंजर वाटते.
त्यात सईबाई नागमण्याबद्दल निगेटिव बोलल्या म्हणजे नागिण डंख मारणारच ही बेसावध असताना, मला आता इच्छाधारी नागिण आणि नागाची गोष्ट डोळ्यासमोर यायला लागली आहे, बिग बॉसच्या सिक्रेट रुमच्या फटीतून राजेश सपटत सटकला, रेशमचीही नागिण झाली आणि मग बिग बॉसच्या घरात “कितने दिनोंके बाद है आयी सजना रात मिलनकी”
कळेल सईला लवकरच रेशमचा डंख पण अत्ता तरी हा गृप तुटण्या इतकी भांडणं नाही वाटतेत मला तरी, सगळं होऊन मेघा पुष्करच्या बाजुने थत्तेंशी भांडलीच ,कशाला भांडली ती पुष्करसाठी असं वाटल खर तर जेंव्हा तो तिला सध्या मुळीच सपोर्ट करत नाहीये , ही पुष्करसाठी तोंडानी अंडी तोडतेय, थत्तेंशी भांडतेय , कशाला हे सगळं असं वाटलं पण आयॅम शुअर मेघाला आहे तो गृप तोडायचा नाहीये, एकटी पडणं नाही झेपणार तिला , शिवाय तिला स्वतःलही थत्तेंचा राग आला होता म्हणूनही असेल कदाचित.
सईला तर काहीच प्रॉब्लेम नव्हता गाढवाची गाढवी म्हणवून घ्यायला, ती मस्तं लाजत होती, अगदीच ब्लशिंग मोड मधे.
सई येडी आता ऋतुजाबद्दलही बोलली , ऋतुजाने जबरी डोकं वापरून अॅटीट्युड फोडली होती कारली , जेलस झाली का सई ??
पुष्कर आज ऋतुजाला सॉरी म्हंटला तरी तो काहीतरी वेगळच मनात ठेऊन खेळतोय, तो कोणाचा फार सख्खा नाही, अगदी सईलाही तो साथ देइलच अशी खात्री वाटत नाहीये त्याचे जेस्चर्स बघून, फक्तं सध्या त्याला सई मेघा आउ ऋतुजा या हमखास साथ देणार्या २२ ते ७२ एज गृपच्या मैत्रीणी मिळाल्यायेत , त्याला त्यांची गरज आहे हे नक्की !
आज पहिल्यांदाच आउ जेन्युइन वाटल्या जेंव्हा त्या पुष्करला सांगत होत्या कि सई पासून थोडं डिस्टन्स ठेव जर राजेश रेशम सारख लोकांनी तुझ्या बद्दल बोलु नये असं वाटत असेल तर.
शेवटीही पुन्हा ऋतुजा- पुष्कर- सई -मेघा हेच पुन्हा चौकडी करून बस्स्ले होते थत्त्यांबद्दल बिचिंग करत, गृप असा पटकन तुटणार नाही जेंव्हा काही कॉमन शत्रु आणि अस्ताद सारखा हेटर समोरच्या गृपमधे आहे.
भा
भा
पुष्कीचे गोंधळलेले हावभाव प्रचंड जेन्युअन वाटतात पण. पापभिरू पण बावळट न वाटता क्युट वाटतात. आज आस्ताद बोलताना एकदम आवडला. त्याला काही तरी वेगळं सांगायचं होतं आणि तो ते व्यवस्थित शब्दबद्ध करत होता. भूषणपण मुद्देसूद बोलत होता.
कन्फेशन रूम प्रकार बोर झाला. प्राणीही फार लांबला. कोण कोण डेंजर झोनात आहे?
आज पहिल्यांदाच आउ जेन्युइन
आज पहिल्यांदाच आउ जेन्युइन वाटल्या जेंव्हा त्या पुष्करला सांगत होत्या कि सई पासून थोडं डिस्टन्स ठेव जर राजेश रेशम सारख लोकांनी तुझ्या बद्दल बोलु नये असं वाटत असेल तर.>> खरय ,
मेघाची तडफड होत होती सईला रेशमचा ग्रुप गन्डवतोय बघुन पण तिनेही सइला जरा गोडिगुलाबित सान्गायला पहिजे होत एक्दम तुला काही कळत नाही, वेडि आहेस टाइप कस कोण एकुन घेइल कितिही मैत्री असली तरी अगदी बालमैत्रिणि नाही आहात.
आस्तादने इथे मान्यच केल की तो आस्तिन का साप आहे हे , पुष्कर जाम वैतागला होता थत्तेच्या कॉमेन्टवर पण बोलला काहिच नाही उलट मेघानेच झापल त्याना. थत्ते सुधा माणुस बघुन बोलतात राजेश समोर मुग गिळुन बसले होते की तिथे झाली का हिम्मत म्हणे घरातला न्युक्लिअस होता तो डोबल न्युक्लिअस .
मेघाने अॅग्रेशन कमि करायला हव आणि तोन्डावर पण ताबा ठेवायला हवा नाहितर तिचाच ग्रुप हरवुन बसेल ती मलाही सारख नॉमिनेशन नकोच मलाच जिन्कायचय टाइप गोष्टि एकुन वाटल की सारख काय गेम गेम ! गेम डोक्यात हवा
कालचा प्राण्याचा गेम बेताचा
कालचा प्राण्याचा गेम बेताचा होता . आज कोण बाहेर जाणार आहे त्याची उत्सुकता आहे .मेघा आजकल डोक्यात जायला लागलेय . एकंदरच पुष्कर / मेघा / सई ग्रुपचं भवितव्य काही बरोबर नाही . त्यातले फुटले तर मेघा च जिंकून येण कठीण होणार आहे
कालच्या गेम मध्ये "थत्ते आऊंच्या वाईटावर आहेत "असं आऊंचं म्हणणं आहे आणि आऊ स्वतः काय आहेत ? एक नंबरची तोंडाळ बाई . सई बरोबर बोलली. मांजरेकर म्हणतात तुम्ही सगळे खूप छान खेळलात स्पोर्टींगली . जोकच आहे . माझ्या मते थत्तेंनी स्वतःहून बाहेर पडावं . कशाला ते ऐकून घेतात सगळ्यांचं ? . म्हातारडा आणि काय काय ? नाहीतरी थोडे आठवडे राहिले तर त्यांची जेवणाखाण्याची पण पंचाईत होईल . कोणी बनवणार नाही त्यांच्या साठी . बेस्ट वे जे काही आहे ते स्पष्ट पणे तोंडावर बोलावं आणि मला तुम्ही काढलत तरी हरकत नाही असं इतरांना सांगावं .गुळमुळीत गुळमुळीत हसतात ते. एवढं काय गुळमुळीत ? एवढी पैशाची आवशकता आहे का ? सगळे त्यांना म्हणतात नॅशनल टेलिव्हिजन वरून बघतात तुम्ही असं बोलायला नको होत . मग तुम्ही त्यांना म्हातारडा म्हणता आणि काय काय अपशब्द वापरता ते लोक बघत नाहीत का टीव्हीवर ? . आऊ म्हणतात तुम्ही मला जलील करता सगळ्या टेलिव्हिजन समोर मग उना सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या विरुद्ध गॉसिप करतात ते बघत नाहीत का नॅशनल टीव्ही वरून लोक ? आऊ माझ्या पहिल्यापासून डोक्यात जातात . तिला कितीतरी प्राण्याच्या उपमा लांडगा /साप सूट होत्या पण तिच नाव शेवटपर्यंत कोणी घेतलं नाही ? का ? बिग बोस ने सांगितलं होत कि काय ?
पुष्कर सईबद्द्ल जरा अतिच सावध
पुष्कर सईबद्द्ल जरा अतिच सावध पवित्रा घेतोय.... एकदा तुझ्याकडून तसे काही नाहीये हे बोलून दाखवलस ना? मग निभाव ना नीट मैत्री? सारख सारख काय बोलून दाखवतोयस की असे काही नाही म्हणून! का तुझाच तुझ्यावर विश्वास नाहीय?
आणि या सगळ्यात सईचा विनाकारण पचका होतोय.... असो.... She deserve someone better than Pushkar for sure!
>>गॉड सेव्ह प्रसाद !
>>गॉड सेव्ह प्रसाद !
या गेममध्ये मलापण आवडत नाहीये जुई... पण या सगळ्या मुलीत मराठी मध्यममार्गी कुटुंबांचा विचार करता ती परफेक्ट मॅरेज मटेरीयल मुलगी आहे!
आय हाय मार डाला रे...!
आय हाय मार डाला रे...!

कातिल..
अरे हिला कुणितरी सांगा.. दर शनीवारी 'अशी' समोर आली तर आमचा पण राजाबाबू होईल..
'रंगीला' मोड ऑनः बहुत गरमी है रे.. एसी थोडा ईधर कर.
अरे हिला कुणितरी सांगा.. दर
अरे हिला कुणितरी सांगा.. दर शनीवारी 'अशी' समोर आली तर आमचा पण राजाबाबू होईल>>>>> त्रासलेला चेहरा असतो पहावं तेव्हा
मेघा भयंकर ईन्सिक्युअर्ड झाली
मेघा भयंकर ईन्सिक्युअर्ड झाली आहे.. केवळ म्हणून आपले चार मित्र टिकवण्यासाठी थत्तें ना पुष्कर च्या कॉमेंट बद्दल बोलली. अन्यथा स्वतःला कायम ढगात पाहणार्या तीला काहीच फरक पडत नाही..
कालची आस्ताद ची मेघा वि. ची कॉमेट म्हणजे ठासून भरलेला दारूगोळा होता.. आणि त्याचा अचूक स्फोट होणारे.. परफेक्ट पकडलयः मेघा एकटी भित्री आहे.. अगदीच फाल्तू. she needs a pack with her to hunt.
थत्तें ना हे लोकं सुनावतात तेव्हा चार बोटे स्वतःकडे आहेत हे विसरतात... total hypocratic mass..
आणि म्हणूनच स्मिता आवडते: कधीच पातळी सोडत नाही बोलण्यात वा वागण्यात.. नसेल तिला अजून स्वतःची जाण व ओळख. पण तीचा वावर खूपच आवडतो- well behaved and balanced.
बिबॉ तिला विजयी घोषीत करून टाका बरे.. मग आम्ही जाऊ तीच्याकडे पार्टीला.
अनिल थत्ते आज बाहेर पडले
अनिल थत्ते आज बाहेर पडले म्हणे . बर झालं . छान झालं
आता त्यांनी बाहेर येऊन सगळ्यांची चांगली काढावी या आरती सारखी .
आता उषा ताई पण बाहेर पडाव्यात
मेघा गेमसाठी कुठल्याही थराला
मेघा गेमसाठी कुठल्याही थराला जाईल हे मी मागेच इथेही आणि बीबी फेसबुक पेजवर पण लिहीलंय पण पाताळयंत्री वगैरे वाटली नाही अजुन तरी. तीही स्वतः कबुल करतेच की, तिचाही मीपणा सुरु असतो. मी अशी मी तशी, ते अतिच वाटतं. मी तिलाही नावं ठेवते. इथेही आणि फेसबुक पेजवरही, तिचं पटलं नाही तर लिहीते. मला फक्त पुष्कर आणि स्मिता आवडतात मनापासून पण त्याचं काही आवडलं नाही तरी मी लिहीते सगळीकडे.
रेशम नव्हती या विक मधे नाहीतर
रेशम नव्हती या विक मधे नाहीतर, थत्ते यांच्या आधी ती गेली असती तर आवडलं असतं. पण बीबी रे रा ला मुद्दामून ठेवतायेत. एनी वे आत्ता ती सेफ आहे त्यामुळे थत्ते गेले तर मला आवडेल.
अजूनतरी मेघाच जिंकेल असं
अजूनतरी मेघाच जिंकेल असं वाटतंय, बिग बॉसने काही झोल केला नाही तर. मला ती फार आवडत नसली तरी प्रचंड पब्लिक तिच्या बाजुने आहे.
त्यामुळे पुष्करला स्मिताने दाखवलेली लाथ असो वा थत्ते गाढ्वीच्या पाठीमागे लागलेला गाढव म्हणालेला असो. दोघेही बरोबर असं वाटतंय काही जणांना. मला दोन्ही पटलं नाही.
Watched today's episode
Watched today's episode teaser, Mr.Manjrekar lecturing all about importance of "play for just yourself"!
Lol , Isn't Megha saying the same thing from Day 1 ???
Glad Mr.Majrelar could learn something from her, finally
मला स्वतःला पहिल्या आठवड्यात
मला स्वतःला पहिल्या आठवड्यात थत्ते आवडलेच नव्हते पण हळू हळू उषा नाडकर्णी डोक्यात जायला लागली . एके नंबरची महा वस्ताद आणि खोटारडी बाई . थत्ते च्या विरुद्ध /आणखीन कोणाकोणाच्या विरुद्ध इतरांना घोळात घेऊन घेऊन गॉसिप करत होती आणि सगळं बोलून च्या बोलून वरती मी कुठे असं बोलले? मी कधीच असं बोललेच नाही / असं वागले नाही हा खोटारडे पणा
तो राजेश 'मला जाऊ दया ना घरी,
तो राजेश 'मला जाऊ दया ना घरी, आता वाजले कि (माझे ) बारा' ह्या मोडमध्ये. परवा मला माझ्या घरी जायच म्हणत होता आणि काल बिग बॉसच्या घरी परत जायचय अस म्हणतोय.
पण राजेशची दया आली. हया अश्या परिस्थितीत कुणीही वेडा होऊ शकतो.
मेघाने का कुणी जुईला रागाने लान्डगा म्हटल तेव्हा जुई अशी रागाने बघत होती तिच्याकडे.
उनान्ना कुठल्याही प्राण्याची उपमा दयायची हिम्मत कुणाहीजवळ नाहिये. सगळयान्नी त्यान्ना गाय म्हटले. थत्ते त्यान्ना कोकिळा म्हणाले.
बाकी उना इतरान्च्या भानगडीत का पडतायत? सई-पुष्करच काय चालूये, कोण कोणाच्या मान्डीवर बसलय, कोणी कसे कपडे घातलेय वै वै.
थत्तेन्नी रे रा ला गाढव- गाढवीण म्हणायला हव होत.
रंग बदलतात ते सहज >>>>
रंग बदलतात ते सहज >>>> म्हणूनच काल कोणीतरी त्यान्ना 'सरडा' म्हटल.
एकतर त्यानं जी काही ती टायरमध्ये घुसायची आणि मग चवड्यावर बसून चालायची चपळ आणि लवलवती अॅक्शन केली त्यावर मी फिदा. >>>> +१११११११११ विनित नन्न्तर तोच खरा एन्टरटेनिन्ग आहे घरात.
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं म्हणे . त्याच लक्ष मोबाईल मध्ये तर मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि मिक्सर मध्ये घालून त्याचे तुकडे तुकडे केले . >>>> हे असे प्रकार फक्त चित्रपटातच पाहिले होते. प्रत्यक्षात अस कोणी करेल अस वाटल नव्हत मला. सणकी आहे मेघा.
मला स्वतःला पहिल्या आठवड्यात
मला स्वतःला पहिल्या आठवड्यात थत्ते आवडलेच नव्हते पण हळू हळू उषा नाडकर्णी डोक्यात जायला लागली . एके नंबरची महा वस्ताद आणि खोटारडी बाई . थत्ते च्या विरुद्ध /आणखीन कोणाकोणाच्या विरुद्ध इतरांना घोळात घेऊन घेऊन गॉसिप करत होती आणि सगळं बोलून च्या बोलून वरती मी कुठे असं बोलले? मी कधीच असं बोललेच नाही / असं वागले नाही हा खोटारडे पणा >>>> नैतर काय. वरती आपल हयान्च एकच पालूपद चालू- मी कधीच खोटे बोलत नाही/वागत नाही.
बिग बॉसच्या सिक्रेट रुमच्या फटीतून राजेश सपटत सटकला, रेशमचीही नागिण झाली आणि मग बिग बॉसच्या घरात “कितने दिनोंके बाद है आयी सजना रात मिलनकी” Rofl >>>>
बादवे, काल थत्ते नीट कपडे घालून आले होते त्यामुळे बरे दिसत होते.
अरे हिला कुणितरी सांगा.. दर
अरे हिला कुणितरी सांगा.. दर शनीवारी 'अशी' समोर आली तर आमचा पण राजाबाबू होईल.. Wink
'रंगीला' मोड ऑनः बहुत गरमी है रे.. एसी थोडा ईधर कर. >> योग. बस काय ?
>>'रंगीला' मोड ऑनः बहुत गरमी
>>'रंगीला' मोड ऑनः बहुत गरमी है रे.. एसी थोडा ईधर कर. >> योग. बस काय ? Lol
काय करणार.. ईथे जसं असतं तसच दिसतं.
थत्ते गेले- अरेरे? बघायचय अजून एपिसोड.. काही वेळाने होईल ईथे युके मध्ये रिलीज.. शेवटी मांजा ना आऊ च प्रीय.. पण आस्ताद ने काल त्यांना 'म्हैस' म्हटले. गट्स आहेत बा! एक्दम चपखल.. कारणे देताना पण पुणेरी शालजोडीतले दीले...
आता पुढील आठवडाभर आस्ताद चा ऊध्दार करत राहतील.
ऋतूजा ला साळींदर पेक्षा 'मगर' फिट बसेल.. एरवी घुम्यासारखी असते पण एकदा फिरलं की नुसता घुसळा आणि हैदोस!
>>बिग बॉसच्या सिक्रेट रुमच्या फटीतून राजेश सपटत सटकला, रेशमचीही नागिण झाली आणि मग बिग बॉसच्या घरात “कितने दिनोंके बाद है आयी सजना रात मिलनकी” Rofl >>>> Ro

Pushkar ajibat avast nahiye.
Pushkar ajibat avadat nahiye. Meghach jinkayla yogya vatate. Ti Resham barobar chhan khalili. Mala ti patalyantri ajibat nahi vatat.
>>प्रत्यक्षात अस कोणी करेल अस
>>प्रत्यक्षात अस कोणी करेल अस वाटल नव्हत मला. सणकी आहे मेघा.<<
सहमत. परिस्थितीनुसार खोट्या कहाण्या रचुन समोरच्याच्या गळी उतर्वायचा प्रयत्न असतो तिचा. पण अशा गोष्टी फार काळ लपुन रहात नाहित, बिंग फुटतंच योग्य वेळ आल्यावर. तीचा असाच अॅटिट्युड राहिला तर जेम्तेम फायनल पर्यंत जाईल पण जिंकणार नाहि. बिग्बॉसमध्ये नौटंकि करणारे टिकत नाहित.
थत्तेंच्या स्वभावाला औषध नाहि. आज बाहेर गेले असतील तर आउ सुस्कारा सोडेल...
आतापर्यंत नौटंकी न केलेले
आतापर्यंत नौटंकी न केलेले म्हटले तर फक्त ऋतुजा आणि भूषणच आहेत बिबॉमध्ये.
मेघाची नौटंकि थोडी वरच्या
मेघाची नौटंकि थोडी वरच्या लेवलवरची आहे, मस्तकात जाणारी. तिला स्वतःचा फॅनबेस नसल्याने ती सतत इन्सिक्युर असते. इन्सिक्युर असल्याने फुटेजसाठी काय वाट्टेल ते करायला जाते आणि त्याचं रुपांतर शेवटी नौटंकित होतं.
रेशम मात्र ट्रांस्फॉर्म होताना दिसत आहे. राजेश आल्यावरहि तिने घरात स्वतःचा आब (नो फुलिंग अराउंड) राखुन ठेवला तर ती स्पर्धेत टिकुन राहिल...
सुजा, उ ना बद्दल लिहिलेलं
सुजा, उ ना बद्दल लिहिलेलं बरोबर आहे. मला पण नाही आवडत हे सर्व, फक्त काल त्यांनी पुष्करला योग्य शब्दात सांगितलं.
मेघा काही कॉर्नर होतेय असे
मेघा काही कॉर्नर होतेय असे नाही वाटले मला. ती स्वतःच्या वागण्याने क्रिटिसाइज होतेय असेच वाटले. अर्थात हेही खरेच की सगळा ड्रामा, स्ट्रॅटेजी, हे सर्व ती स्वतःच्या जिंकण्यासाठीच खेळत आहे अल्टिमेटली.
सई , पुष्कर दोघेही खेळातल्या डावपेचात बच्चे आहेत असे वटते. दोघेही कन्फ्युज्ड आहेत सध्या. पण ऑपोजिट ग्रुप सुद्धा इतकाही हुषार आणि स्ट्रॅटेजिक मॅनिप्युलेशन करण्याच्या क्षमतेचा नाहीये की ते एवढे सगळे ठरवून घडवतील. हे जे साई -मेघा वाद वगैरे होतेय ते त्या फ्लो मधे होतेय.
ऋतुजा मला आवडत आहे सध्या. डिग्निफाइड आणि स्मार्ट!! तिने नवर्याबद्दल च्या अपेक्षा सांग म्हटल्यावर पण सई सारखे गोरा, गुड लुकिंग हवा असे काही न म्हणता 'इन्टेलिजन्ट' हे आधी म्हटले. खूपच रिलेट झाले ते. सुशांत चे रडणे बंद का झालेय ? : डोमा: त्याने किती करमणूक होत होती!
राजेश चे वाईट वाटले पहिल्यांदाच. त्या रूम मधे असे कोणाशी न बोलता चालता रहायचे( खरेच तसे होत असेल तर) म्हणजे खरीच भयाण शिक्षा आहे.
तिला स्वतःचा फॅनबेस नसल्याने
तिला स्वतःचा फॅनबेस नसल्याने ती सतत इन्सिक्युर असते
>>> तिला माहीत नाहीय ना की सर्वात जास्त फॅन्स तिचे झालेत बाहेर. ट्विटर वर फॅन क्लब पण तयार झालाय.
Pages