बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुष्कर आणि स्मिता दिसले कॅप्टन्सीचे दावेदार(मला ही खुन्नस पेअर आवडलीये Proud )
स्मिताका बॅडलक याही वेळी खराब नसेल तर होईल कॅप्टन , पण यावेळी पुष्करची शक्यता जास्तं.
सई मुद्दाम करत होती कारण असच ठरल होतं , न ऐकणारी हट्टी वेळकाढु बाहुली अशीच स्ट्रॅटजी होती, नाही तर ती स्ट्राँग आहे.
अस्ताद म्हणे ती उंच बाहुली खराब आहे, भंगारवाल्याला घेऊन जा Rofl
अता त्याच्या मनासारखी जोडी फुटतीये तरी जाम इन्सिक्युअर्ड आहे तो.
जुई सुध्दा जे बोलली ऐकून हहपुवा झाली, ती म्हणे (सईला) , ही असली कामचुकार बिग बॉसची आवडती प्लेअर, शनिवरी बोलणी मात्र आम्हाला खावी लागतात Biggrin

पुष्कर आणि स्मिता दोघही मला आवडतात पण पुष्कर कॅप्टन व्हायला हवा होता असं मला मनापासून वाटतं. मेघा स्वत: स्पर्धक असती तर स्वत:साठीच लढली असती. प्रत्येकजण जिंकायला आलाय इथे. आस्ताद आज फेअर होता . स्मिता उगाच बादली भरली नाही करत होती .

पुष्करने ऋतुजा चं नाव घ्यायला हवे होतं आणि आऊनी पण.

मेघा च्या overconfidence मुळे टास्क हरले ते. त्यामुळे स्मिता more deserved than her for captonship. कारण स्मिता परत लढायला तयार होती.

अभिनंदन स्मिता.

स्मिता कॅप्टनची जबाबदारी ओळखून नीट विचार करून वाग, त्या रे रा किंवा इतर कोणाचे प्यादे म्हणून नको वागूस.

अ‍ॅक्चुअली जर पप्पी जस्टीफाइड आहे तर लाथ का नाही बरं ?? Proud
स्मिता बोलायला अजुन तरी पुरून उरत नाहीये , माझ्या मनात आलेला पहिला विचार : मी लहान मुलीचा रोल प्ले करतेय, छोटी मुलं मारतात कि चिडून खेळण्याला लाथ, मी तर फक्त धमकी दिली.
अस काही स्मिताने बोलायला हव होतं किंवा सरळ ते माणुसकीची दुहाई देणार पाणी मागणार चिडक खेळणं उचलून पुलमधे फेकायला हव होतं .

डीजे खेळण्याला नाही लाथ दाखवली, ते फेअर होतं पण पुष्करला दाखवली तिने ते चूक.

हुश्श केलं एडीट, माबोकर shortcut घेऊ देत नाहीत Lol

सरळ ते माणुसकीची दुहाई देणार पाणी मागणार चिडक खेळणं उचलून पुलमधे फेकायला हव होतं >> Lol डीजेला पाठवा तिकडे. बर्‍याच आयडिया आहेत तिच्याकडे. त्या घरात मात्र कोणीच काही क्रिएटिविटी नाही दाखवली टोर्चर करण्यात .

अगदी. कोणीही काही ट्रिकी शोधायच्या भानगडीत पडलं नाही.
मला तर एक प्रश्न पडलाय...टास्कच्या पहिल्या दिवशीच बिग बॉस ने 'स्मिता व जुई बाद नाहीत' असं सांगताना कारण सांगीतलं होतं की, खेळण्याने वैतागून टास्क गिव्ह अप करायचा आहे आणि एखादी सांगीतलेली गोष्ट नाही करता आली म्हणून तुम्ही गिव्ह अप करु शकत नाही. पण दुसर्या दिवशी सगळे लहान झालेले सगळे व्यायामप्रकार करायला लावून 'तुला अमूक अमूक करायला जमत नसेल तर गिव्ह अप कर' चा नारा देत बसले होते व खेळण्यांपैकीही कोणी त्यांना तसे करता येणार नाही असं नाही समजावलं. कोणालाच कळला नसेल का तो रुल?

जुई मंद रोबोट आहे, कंपलेंट मोड ऑन असतो तिचा, फक्त बरोबर अस्ताद किंवा भूषण दादा हवा ( कोणताही दादा )

'तुला अमूक अमूक करायला जमत नसेल तर गिव्ह अप कर' >>> ते बरोबर आहे की.
स्मिता आणि जुईला त्या लोकांनी बाद केले ( बझर दाबायला सांगितला) ते "चटईला टाचणी टोचली" सारखे टंग ट्विस्टर म्हणताना चूक झाली म्हणून. ते नव्हतं बरोबर.

ते बरोबर आहे की.>>> मला तरी ते ही टंग ट्वीस्टर सारखंच वाटलं. माझी तरी अशीच समजूत होती की एखादी टास्क करताना येत नसेल तर बोलून/भांडून/चिडवून/शिवीगाळ करुन खेळण्याला वैताग आणणे अपेक्षित होतं. अथवा अवघड टास्क परत परत करायला लावून जेरीस आणणं (जे स्मिता व आस्ताद व पहिल्या दिवशी रेशम, आउ व्यवस्थित करत होते). पण जशी ती जुई सै च्या मागे लागली होती की मला पाहिजे तसं कर नाही तर बझर दाब हा मला तरी त्या टंग ट्वीस्टर सारखाच प्रकार वाटला.

रे टीमने शेवटी फोडलं पण आणि राज्य पण स्वतः कडे घेतलं.

मेघा एकटी पडली. तिने इम्युनिटीसाठी थोडं जास्त केलं असेलही. पण कोणत्याही क्षणी तिने फायटिंग स्पिरिट सोडलं नाही आणि सई आणि पुष्करशी गद्दारीही केली नाही.

तिच्याशी झोक्यावर बसलेले असताना सई आणि पुष्की बोलले नाहीत आणि सगळे मिळून मेघावर हसत होते तेव्हा तिची खरंच दया आली. सईला ती मॅनिप्युलेट होतेय इतकेही कळले नाही.

सईमध्ये सुद्धा जरा जरा लूजर अतित्यूड यायला सुरुवात झाली. "नाही मिळाली इम्युनिटी तर काय एवढं वगैरे".
पुष्करचा ठरवून कात्रज केला. रे टीम त्याला त्याला कॅप्टन होऊ देणार नाही हे माहीतच होतं.

दाजींना आज बायको आणि मुलींची आठवण येऊन हमसाहमशी रडताना दाखवलं. आता का बरं रेशमची आठवण येत नाहीये सो कॉल्ड दाजींना?

आणि मध्ये मध्ये दाजी स्मिता आणि अस्तादवर कमेंट करत होते. स्पेशली आस्तादला.. थांब मी बाहेर आलो की बघतो तुझ्याकडे वगैरे. तेव्हा ते स्वतःच्याच कंपूतले लोक आहेत हे विसरले का ते? मला खरंच राजेश अनेकदा इनटॉक्सिकेटेड वाटतो.

आस्तादने आजही मुद्दाम पुष्करच्या बाजूने खेळतोय असं दाखवून समोरच्या टीमला तुलनेने सोपी चॅलेंजेस दिली हेमावैम. शिवाय मेघाने स्मिता करू शकणार नाही म्हणून सगळे केस कलर करायचं टफ टास्क दिलेलं तेही आस्तादने मॅनिप्युलेट करून फक्त एक एक बटांवर आणलं.

मला हे पॉलिटिक्स आणि ग्रुपईझम बघायला आवडलं नसलं तरी बिबॉ बहुतेक असाच गेम असावा. पण उद्या मेघा नॉमिनेशन मध्ये आली तर मी तिला वोट देणार हे नक्की.

पण उद्या मेघा नॉमिनेशन मध्ये आली तर मी तिला वोट देणार हे नक्की.
>>Mi pan nakkich deiin vote.

वाचवण्यापेक्षा काढायला वोट हवे होते, ज्याला काढायचं आहे त्याला वोट करा.. पाऊस पडला असता वोट्स चा.. रेशम, राजेश, जुई वर.

सईमध्ये सुद्धा जरा जरा लूजर अतित्यूड यायला सुरुवात झाली. "नाही मिळाली इम्युनिटी तर काय एवढं वगैरे".>>> तुम्ही ज्या कंपूबरोबर राहता त्याच्या विचारांचा परीणाम होतोच तुमच्या विचारांवर. टास्कच्या निमित्ताने का होईना, ती अत्यंत अनुभवी व मॅनिप्युलेटीव्ह लोकांमधे आहे. त्या मा म्ह नी टास्कदरम्यान बोलता बोलता भरलेले विचार (त्या मेघाला कॉन्फिडन्स नाहीये की आपण नॉमिनेट झालो तर आपल्याला व्होट्स मिळून आपण वाचू की नाही, त्यामुळे ती टास्कसाठी काहिही करते. वै. इति रेशम) पक्के रुजलेत सध्या तिच्यात. त्यामुळेच 'नाही मिळाली इम्युनिटी तर काय एवढं' असं म्हणू शकते ती आता. लवकर त्या कंपूतून बाहेर नाही आली तर वाया जाईल. स्मिता सारखी.

पियुं, आस्तादने सोपी challenges दिली असतील तर दोष कोणाचा, पुष्कर ने निवडले त्याला, तो नाही गेला सांगायला निवड म्हणून. त्याने बादली नीट भरली. स्मिता कटकट करत होती, नाही भरली तर नडला की तिला.

मेघा च्या मागे सई पुष्करला चांगले सांगत होती की, मेघाच्या बाजूने बोलत होती. मेघाला स्वतःला कॅप्टन व्हायचं होतं आणि कोणी भाव दिला नाही म्हणून चीडचीड होत होती तिची त्यात ती सईला वाटेल तसं बोलली. मेघा पण सर्वांनी आपले ऐकावं असं करते पण तिला भाव नाही देत जास्त कोणी. ते विचारी आहेत. त्यांना मान्य नाही स्मिता आणि जुई सारखी प्यादी होणे.

च्रप्स.. खरंच पाऊस पडला असता.

अजब अगदी अगदी. तुम्ही म्हणताय त्यातला शब्दन शब्द खराय. मलाही ती वाया जाईल अशी भीती वाटली.

आज एपिसोड संपता संपता पुष्की तिला काय म्हणत होता? ती त्याचं सांत्वन करत होती तेव्हा? बिबॉ ने लाईट्स घालवले तेव्हा?

पुष्कर लाईट गेले तेव्हा अगदी आठवत नाही पण मेघाने नाटक केलं चक्कर येण्याचं म्हणत होता, सई नाही खरी आली असं म्हणत होती.

मलापण मेघा नाटक करत नव्हती असं वाटतं, ज्येनुईन वाटली मला.

फायटिंग स्पिरीट मेघात solid आहे आणि तिचे जिंकणे चान्सेस जास्त आहेत. पुष्कर मध्ये आता आलंय ते स्पिरीट. स्मिता मध्ये आहे पण ती वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ नाही. ऋतुजा मध्ये पण येतंय हळूहळू. पब्लिक सपोर्ट मेघाला उत्तम आहे.

Pages