बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदरीत हिंदीच्या मानाने मराठी बिबॉ बर्याच बाबतीत बॅकफूटवर खेळते. त्या वीकेंडच्या वार मधे घरातल्यांना तोंडावर पाडण्यासाठी म मां त्यांच्यापरीने शक्य ते प्रयत्न करतातच पण त्यासाठी बोललेल्या/केलेल्या घटनांची क्लिप दाखवणे, घराबाहेर जाणार्या लोकांना त्याच्या माघारी काय बोललं गेलंय ते दाखवून घरातल्यांशी बोलायला लावणे असले आगलावे प्रकार पण हवेत असं वाटतं.

आस्ताद स्वतःला अति शहाणा समजतो, चुकीचे वागतो तरी गिरे तो टांग उपर. रेशम पण सेम. आस्ताद सर्वात जास्त स्मोकिंग रूम मध्ये दिसतो. आवाज चांगला आहे तर का करतो असं. हे वाटत राहते.

लोक येणारच नाहीत.. अजून क्रांकि होतील..
सिगरेट वाल्याना सकाळची होत नाही घेतल्याशिवाय.

बादवे - यांना दारू पण दिली जाते.

>> मग तर राजेशला त्याचा प्रोटीन पावडरचा डबा आहे तेवढा कोटा अलाऊड असावा दारूचा. तो बरेचदा अबसेन्ट माइंडेड {एकदा तर वीकएंडचा वार (ज्यात ऋतुजाने आरडाओरडा केला) ला सुद्धा त्याला समोर काय चाललंय याच भान नव्हतं}आणि उरलेल्या वेळी नशेत दमदाटी करत असतो. सई मेघा त्याला घाबरतात कारण नशेत असताना तो कोणाच्याही अंगावर धावून जाऊ शकतो. रेशम पण फार बेवडी आहे असे ऐकून आहे.

बाकी पुष्करला काय करायचे आहे मेघाला खरंच चक्कर आली की नाही याचे? इकडे तुझ्या बुडाखाली आग लावून, तुला तोंडघशी पाडून, तुझ्या नाकावर टिच्चून स्मिताला सपोर्ट केला सगळ्यांनी (आणि याही वेळी तुला कॅप्टन होऊच दिले नाही) तिकडे लक्ष दे आधी.

शिवाय मेघाने स्मिता करू शकणार नाही म्हणून सगळे केस कलर करायचं टफ टास्क दिलेलं तेही आस्तादने मॅनिप्युलेट करून फक्त एक एक बटांवर आणलं. >>> ह्यात मेघाने आधी माघार घेतली ना मीन्स नको हे तीच म्हणाली, तिला आपण चुकीचं केलं असं वाटलं मग सगळ्यांनी असं नाही आता करता येणार करत मग एकेक बटांवर आणले अर्थात तेही चूक होतं. पूर्ण केस कलर्स करायला हवे होते. स्मिता तयार होती, इथे ह्या लोकांचे काहीतरी सुरु झालं. माझ्यामते एकदा task दिला आणि तो स्वीकारला की त्यात बदल नको होता करायला.

मागे कोणतरी "पुष्की" का आजुन काही तरी म्हंटल्या सारख वाटल.. नाव आहे का ते ? >>> पुष्करला म्हणतात पुष्की. कोणी लाडाने म्हणते कोणी चिडवत push key असं करत असं वाटतं मला.

पूर्ण केस रंगवायला वेळ लागला असता हे एक आणि मुख्य म्हणजे स्मिता पूर्ण केस रंगवायला तयार झाली होती हे लक्षात आलं त्यांच्या. त्यामुळे ती सर्व केस रंगवणारच याची खात्री झाल्यामुळे वेळ जाऊ नये म्हणून फक्त नॉमिनल २ बटा रंगवायला सांगितल्या.

रे राचा लोकं भरपूर राग करतात, फेसबुकवर काही कमेंट्स टाकताना लोकं जरा जपून टाकतात पण यूट्यूबवर काहीच शिल्लक ठेवत नाहीत या दोघांची, सगळं घर नॉमीनेट झालं तर सगळ्यात कमी वोट या दोघांनाच असतील अशी परिस्थिती आहे आता, म्हणूनच दाजीला बहुतेक सोमवार मंगळवारी घरी आणतील आणि यापुढे रे रा नॉमीनेट होणार नाहीत याची काळजी बिग बॉस घेईल असं वाटतंय, कॅप्टन भूषण कडूला एकाला सेव्ह करायला सांगितलं कारण बिग बॉसला माहीत होतं तो रेशमला सेव्ह करेल. बाकी दाजी आता खरोखर घरी यायला पाहिजे, दाजी आला की परत हाणामारी आणि दंगा सुरू होईल, नायतर उद्या हे सगळे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून मिले सूर मेरा तुम्हारा गाताना दिसतील आणि trp पार तळाला जाईल.

त्या भूषणनं किती अंडी प्यायली घटाघटा... बापरे! मागे सुशांत आंब्याचा रस आहे पिऊन टाक म्हणत त्याला सपोर्ट करत होता.
>>> सुशांत ला एकही टास्क दिला नाही.. द्यायला पाहिजे होता, रडत रडत गीव up केला असता.

राजाबाबूला आतासुद्धा मुलींची आठवण येतेय, बायकोबद्दल काही बोलला नाही तो. त्याचं बायकोबरोबर फाटलं असणार.
तो माघारी आला की परत मेघाचा कंपू सॉलिड होणार, मध्यंतरी, मेघाच्या ग्रुपमधलं कुणी इलिमिनेट झालं नाही तर, पुन्हा रा-रे गॅंग विरूद्ध सै-मे वॉर सुरू होईल.
या पोरी किती भारी पडतात रेराच्या पित्त्यांना यार! सुशांत-भूषण-रे-रा तर पाणीकम त्यांच्यापुढे..
राजाबाबू आल्यावर काही दिवस तरी मारक्या म्हशीबरोबर गुटुर्गुं आणि कंपूकडून अश्रुयुक्त स्वागत यांचा आनंद घेईल.
आजचा भाग भारी असेल, मांजा कुणाला धरतोय यावेळी पहायला मजा येईल.
माझा अंदाज आहे थत्ते किंवा जुई दोघांपैकी एक जाईल. महाबोर जुई गेली तर बरं..
बाकी, स्मिता इज अ फायटर. ती उत्तमच आहे. रेच्या अतिआहारी गेलीये हे सोडता बाकी जबरदस्त प्लेयर आहे ती.
ऋतुजाने काल कारली तोडताना जे बेकार स्पिरिट दाखवलं त्याने तिचे फॅन्स वाढले असतील.

दाजींना आज बायको आणि मुलींची आठवण येऊन हमसाहमशी रडताना दाखवलं.>> अजून बघितलं नाहीये हॅथवे च्या कृपेने पण खरंच ? हरले वाटत प्रेमाचा गेम खेळता खेळात. बायकोची आठवण येतेय ? तशी त्याची बायको सासर -माहेर सगळ्यांना सांभाळून ठेवणारी वाटते. लोक आता इंटस्टाग्राम आणि यु ट्यूब वर त्याचे आणि बायकोचे फोटो फिरवायला लागलेत आणि त्याने बायकोशी कशी गद्दारी केली वगैरे बोलायला लागले आहेत . हे सगळे पोचवलं असेल का बिग बॉस ने त्याच्या पर्यंत ? अरे चॅनेल च्या कृपेने प्रेमाच नाटक करतात ते आणि लोकांना ते खरंच वाटतंय. लोक्स त्यांना खूप शिव्या देत आहेत म्हणून बिग बॉस त्यांना सेफ करेल असं वाटत. त्यांनी भरपूर शिव्या खाल्या आहेत आता बस म्हणून Happy

ऋतुजाने काल कारली तोडताना जे बेकार स्पिरिट दाखवलं त्याने तिचे फॅन्स वाढले असतील.>>>>११११११११११११११११११११

दोन एपिसोड न बघता कालचा बघितला आणि मजा आली. मेघा पुष्करच्या जाम डोक्यात जात्येय ऐकून पुष्कर हुषार आहे यावर शिक्कामोर्तब झाले. ऋतुजाने मस्त कारली तोडली, तो पॉईंट का नाही दिला? मेघाला सई ने किचन मध्ये सफरचंद कापताना बरोबर उघडं पाडलं.
काऊच वर बसलेले असतानाही थापाडी बोलबच्चन गिरी सगळ्यांना समजून सगळे हसत होते.
मेघा बिग बॉसच्या पक्षी चॅनलच्या नजरेतून पडलेली वाटली. हे बघून परत बघायची इच्छा झाली. चॅनेलचा टीआरपी टिकवण्याचा प्लॅन माझ्यावर तरी वर्क झाला. Happy
सई आणि पुष्कर बेस्ट जोडी आहेत.
स त त टास्क आहे, मी हे करिन ते करीन , टास्क आहे हे प्रचंड अन्नोयीनग आहे. बास! ओबसेसिव्हगिरी केली तर ती ही डोक्यात जाते

आजकी ताजा खबर
मांजरेकर गुरुजींच्या स्पेशल कोचिंग नंतरही स्टुड्न्ट्ची पाटी कोरी Biggrin
मांजरेकर त्या दिवशी रे.रा ला रुममधे नेऊन समजावत होते कि सगळ्यांनी मिळून एखाद्या स्पर्धकावर असा अ‍ॅटॅक केला, त्यात ती फिमेल स्पर्धक असेल तर तिला पब्लिकची खूप सिंपथी /पॉप्युलॅरिटी मिळते आणि तुम्ही निगेटीव्ह ठरता, ते मेघा बद्दलच सांगत होते, तरीही अत्ताही\मेघाला कॉर्नर करणे बघून काही शिकवण मिळालीये असं दिसत नाही, हे लोक जितकं मेघाला सतावतील तितकं पब्लिक सपोर्ट मेघाला करणार Happy
बाकी आजचा एपिसोड काहीच खास नव्हता.
कॅप्टनशिप टास्क मधे केक दिला होता, तो एखाद्याला मिनिटात खा म्हणण्या ऐवजी एका मेंबरला त्याच्या नावडत्या मेंबरच्या चेहर्याला फासून मग खायला सांगायचा Wink
कच्ची मिर्ची , कार्ली याचा अजुन चांगला वापर करता आला असता, खायला नाही तर एखाद्याला धुरी तरी द्ययाची Proud
तरीही आज पुन्हा एकदा स्टार ऋतुजाच !
वॉव काय सरप्राइझ पॅकेज आहे ती , तशी शान्त असते , अस्तित्त्वही जाणवत नाही पण केला कि डायरेक्ट धमाकाच अगदी पार भुगाच करते समोरच्याचा , मस्तं फोडून काढलं त्या कारल्यांना सपासप. (नावडते मेंबर्स समजून ) Proud
सगळ्यांना कळलय ती लय डेंजर आहे ते !
आता सई डगमगली तरी वांधे नाहीत, ऋतुजा आहे मेघा बरोबर रे.रा. टिमला धुवायला.
आणि खरं सांगयाच तर अजुन तरी सई पुष्करची अगदीच रे.रा टिमला जाऊन मिळायची हिंमत नाहीये, पुष्करचा फार भरोसा नाही म्हणा पण मेघाशी खटके उडत अस्स्णारी सई अजुनही ताडकिन मेघाला टाकेल असं वाटत नाही , ते रेरा लोक वर वर बरे बोलतील यांच्याशी पण साथ नाही देणार यांना.
फक्त आधीच छोट्या असणार्या मिनि गृपमधे ऋतुजा मेघा विरुध्द सई पुष्कर नको तुकडे पडायला.
म.मां उद्या कोणाची शाळा घेणार पहायला हवं .
नेहेमीच्या यशस्वी लोकांबरोबर यावेळी सई -मेघा -पुष्करही शाळा असणार बहुदा.
एलिमिनेशन मधे ऋतुजा जाऊ नये, जाईल असं वाटत नाही पब्लिक सपोर्ट बघून.
सुशान्त गेला तर बरं वाटेल, जुई आवडत नाही पण खुन्नस द्ययाचे राडा घालाय्चे काम ती व्यवस्थित करतेय तोवर चालून जाईल घरात, या आठबड्यात अ‍ॅक्टीव्ह टास्क केलय तिनी आणि कॅप्टनशिप दान करून गुडविलमधे गेली आहे.

मला वाटते मेघा टॉप कन्टेन्स्टन्ट्स मध्ये जाईल कदाचित पण जिंकणार नाही.

फार आधी म्हटलेले ऋतुजा डार्क हॉर्स ठरू शकते...
हळूहळू ते खरे होतेय..
कोणाच्या नजरेत न येता तिचा प्रवास चालू आहे Happy

अवांतर - तिचे पुर्ण नाव घ्या रे. तिला ऋ किंवा रु वगैरे बोलू नका Happy

मेघा शेवटी पोचली तर फुल टू पब्लिक तिच्याबाजुने आहे, तिच्या चुका कोणालाचं दिसत नाहीत पण पुष्कर सई जरा तिच्याविरोधात गेले तर गद्दार ठरतात.

BB ने इंटरफियर नाही केलं तर पब्लिक वोट्स मेघालाच मिळणार जास्त पण शेवटी channel आणि bb टीम काय करतायेत हे महत्वाचे.

ऋतुजाचे फॅन्स वाढले असतील >>> +१ . मला पण आवडली, या आठवड्यात तिचे स्पिरिट बघून. टफ, फिजिकली डिमांडिंग टास्क्स मधे आता लोक तिला वचकून राहतील.
काल मेघा सगळ्यांच्या नावाने बोटे मोडत होती. तिला कॅप्टन व्हायचं होतं. सतत मी गिव्ह अप नाही केलं/ करणार चा धोशा. ते फेक वाटायला लागलेय आता. पुष्कर ने बरोबर तिला एक्सपोज केले - सॉर्ट ऑफ. एका पॉइन्ट ला सगळे एक जात अंगणात उभे राहून मेघाला शिव्या देत होते. एकूण बरीच इक्वेशन्स बदललीयत.
काल मला स्मिता पण आवडली. ती कॅप्टनशिप साठी स्वतः बद्दल बोलली तेव्हा आणि आधी मेघाला सांगताना की ती नव्हे तर जुईच का कॅपटनशिप ला उभी रहावी तेव्हाही तिचे बोलणे एकदम शांत, तरीही शी स्मार्टली मेड अ पॉइन्ट. एरव्ही डंब पणा दाखवणे ही तिची स्ट्रॅटेजी आहे की काय असे वाटून गेले!
रेशम पण सरप्रायजिंगली एकदम वेगळीच वाटत आहे सध्या. राजेशसोबत असतानाचा दिलखेचक मुखवटा उतरल्यासारखा वाटला! एक चेहरेपे कई चेहरे लगा लेते है लोग Happy
राज्या परत आल्यावर पुन्हा तेवढी केमिस्ट्री जुळते की काय ते पहावे लागेल. .
थत्तेंनी काहीच लक्षवेधी न केल्यामुळे एलिमिनेट होऊ शकतात आता केव्हाही.

स्मिता खेळायला तयार होती पण मेघा आणि आस्तादचा oc नडला आम्ही हरवूच त्यांना काही तासात. हे पब्लिकला पटत नाही. मला काय लिहायचं ते मी लिहिते तिथे.

पुष्करच्या बायकोने मी लिहिते त्या पेजवर स्मिता inhuman आहे काढून टाका लिहिलं, लाथ दाखवल्यावर. जस्मिन ब्रह्मभट नाव तिचे.

दुसऱ्या दिवशी काल तिच्याच नवऱ्याने दुसरं नाव ऋतुजा चं न घेता स्मिताचं घेतलं.

पुष्कर आणि आऊने खरं म्हणजे ऋतुजाचं नाव घ्यायला हवं होतं.

दुसऱ्या दिवशी काल तिच्याच नवऱ्याने दुसरं नाव ऋतुजा चं न घेता स्मिताचं घेतलं.>>>हो, त्यावर ती इमॅच्युर आहे म्हणे. त्यामुळे ती जाम चिडली आहे. तोच राग कारल्यावर निघाला. कारले कापायला सांगितले होते तिने चेंदामेंदा करून टाकले.

पुष्करने स्मिताचं नाव नव्हतं घ्यायला पाहिजे. ऋतुजाचं घ्यायला हवं होतं हे खरंय. पण मग ऋतुजाला समर्थक मिळाले असते का? मला वाटतं नाही. रेशम अजून तिच्यावर दात धरुनच आहे. त्यामुळे तिचे प्यादे पण. ऋतुजा ॲंग्री यंग गर्ल आहे, तिने आपला स्वतःचा वेगळा(सुसल्या म्हणून तिला न ओळखणाऱ्यांचा) प्रेक्षकवर्ग तयार केला आहे, तिला सगळे वचकून राहणार यापुढे. ट्विटरवर सुशांत/जुई सगळ्यात नावडते कॅरेक्टर्स आहेत.

ॲक्च्युअली आउंना कळलंच नसावं की एकाच ग्रुपमधल्या दोघांची नावे घेतली तर चालतात की नाही.
ऋतुजा चिडली पुष्करवर केवळ, आउंवर आजिबात नाही. तिची आणि आउंची मस्त गट्टी जमली आहे. दोघी एकमेकींबद्दल कधी बिचिंग करत नाहीत.
आणि रेशमचा ग्रुप अशी काय गहन चर्चा करतो म्हणे, आपले विषय जुळतात, आपण गॉसिप नाही करत वगैरे बोलून ग्रुप पाडण्याचं समर्थन करत असतात.
बादवे, राजाबाबूला आज आणू नये, उद्या किंवा सोमवारी आणावं. तेवढेच दोन दिवस बरी रेशम बघायला मिळेल.

Pages