बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>चक्कर किंवा तत्सम कारणाने पडलेल्या मुली घरात उचलून नेणे.
'पडेल' ती कामे करतो बिचारा... Happy
>>थत्तेनी आउची पप्पी घेतली तर आउ मुडदा नाही पाडणार त्याचा..
दृष्य येत नाही डोळ्यासमोर.. पण पप्पी पर्यंत नाही थांबायच्या आऊ. आधीच ऊडवतील. Proud

>>मेघा अडेलतट्टू आहे. खेळ पण नीट खेळणार नाही, आणि क्विट पण करणार नाही.
करेक्ट!
>>तो पुष्कर काल खेळणी ऐवजी खेलनी म्हणत होता का?.... का?
वाचतानाही बरेच वेळा बोबडे बोलतो... Sad
>>हायलाइट ऑफ डे २४ : रेशम मधेच टॉय आणि अ‍ॅडल्ट टॉय मधला फरक विसरली , पप्पीच घेते म्हणून भूषणच्या पोटावरच बसली Rofl
अगदी! पण ती खेळणी अ‍ॅडल्ट आहेत वा नाहीत असा काहीच नियम बिबॉ ने दिलेला नाही. शिवाय, रे चा अ‍ॅडल्ट बाहुला सध्या अज्ञातवासात आहे.. तेव्हा everything is fair in love n war.. Happy
bikini doll idea is fundu... Wink Rutuja wud quit in 2 minutes.. Wink
पण सद्मा मधल्या श्रीदेवी मोड मध्ये कुणितरी आपल्या खेळण्याचा 'हरीप्रसाद' केलेला बघायला आवडेल.. Happy

मेघा अडेलतट्टू आहे. खेळ पण नीट खेळणार नाही, आणि क्विट पण करणार नाही.
मेडीकल असो किंवा इतर कोणत्याही कारणाने जर टास्क करायला जमत नसेल तर क्विट करणे गरजेचे आहे.
मग रेशम ने का नाही टास्क आटपता घेतला? तिलाही कळल होतं मेघाला मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत तर.

जर रेशम ला टास्क पुर्ण कराय्चा होता, हरायच नव्ह्तं तर मेघालाही तसच वाट्लं तर त्यात चुक काहीच नाही.

रे अडेलतट्टूपणा करत मेघाला हे कर ते कर सांगत होती. ती टास्क खेळत नाही कधी. फक्त दुशमनी काढते. महाउर्मट बाई.मग्रुर.

आज मेघा बदला घेईलच. I would so love to c resham getting irritated and helpless coz of megha. Lol

आस्ताद तर 'डबल ढोलकी' पद मिरवण्यातच भुषण मानतोय अजुनही. इतक त्यावरुन ऐकुन घ्यावं लागलय तरी.

मग रेशम ने का नाही टास्क आटपता घेतला? तिलाही कळल होतं मेघाला मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत तर. >> Uhoh
प्रतिस्पर्धी आहेत त्या दोघी, मेघाला प्रॉब्लेम असेल तर ते रेशमच्या पथ्यावरच पडणार ना, ती फायदाच घेणार. मेघाला मेडिकल प्रॉब्लेम आहे म्हणून रेशम ने गेम थांबवला तर तिच्यासारखी मूर्ख तिच Biggrin

>>आस्ताद तर 'डबल ढोलकी' पद मिरवण्यातच भुषण मानतोय अजुनही.
आस्ताद मिंयां तो अब ऑफिशियली ढोलकी ही लग रहे है... 'ऊपर' बजाओ रे! Biggrin

>>मग रेशम ने का नाही टास्क आटपता घेतला?
का घ्यावा? रेशमला नव्हता काही प्रॉब्लेम.... ज्याला प्रॉब्लेम होता त्याने टास्क सोडला पाहिजेल ना?
असो!.... I am not fan of Resham पण काल तिने टास्कच्या लिमिटमध्ये राहुन छान छळल मेघाला!

मेघा बदला घेइलच पण तिने तो जरा स्मार्टली घेतला पाहिजेल!

आस्तादने काल काय डबल ढोलकीपणा केला कळलं नाही.. >> बहुधा तो मेघाला सुनवत होता काल की असं करू नको तसं करू नको त्याबद्दल म्हणत असतील वर. मला तर तो काही डबल ढोलकीपणा नाही वाटला.
अ‍ॅक्चुली हा शब्द त्याच्यासाठी चुक वाटतो. कारण बि बॉ कायम त्याला विरूद्ध टिम मध्ये घालतात, मग तो मूळ स्वभावाने आपल्या मनाने जवळ असलेल्या टिम ला सपोर्ट करतो. दोन्ही कडे लॉयल्टी दाखवायचा प्रयत्न करत असता तर डबल ढोकली.
सद्य स्थितीत ज्या टिमकडून खेळतोय त्यांच्याशी लॉयल्टी असणं नक्की महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि तो ती राखत नाही, हे चूक आहे नक्कीच.

हो हो पुष्कर बोबडा आहे Lol खेलनी म्हणत होता!
मलाही वाटले की मेघाने रडीचा डाव खेळला. खेळण्याने बोलणे ,अर्ग्यू करणे नियमात नव्हतेच. शिवाय नियम सांगायला आम्हाला का नाही बोलावले वगैरे उगीच वाद करून वेळ खाल्ला. चक्कर पण बळेच वाटली तिची. उलट रेशम आवडली मला. रुल्स मधेच खेळत होती. मला भूषण चा तो पप्पीचा टोर्चर बघून हसू आलं पण डीजे म्हणते तसे पुरुषांनी तसले काही केले तर राडे होणार. घरातल्या कुणा पुरुषांची तशी हिंमत होईल असे वाटतही नाही म्हणा. बायांचा दराराच आहे तेवढा Happy
ऋतुजाने डोके चालवून बरोब्बर पोझ दिली होती आस्ताद ला ज्यात तो जास्त काळ रहाणे शक्य नव्हतेच. त्यात तो पडला बॉर्न लूजर. उठला लगेच बझर दाबायला. आऊनी पुरेपूर सतावले थत्तेंना. आता आज थत्ते आऊंना रडवणार (आऊ रडीचा डाव खेळणार?!) हे नक्की! आज खेळणार्‍यांना आता जास्त वेळ आणि आयडियाज मिळणार प्लॅन करायला. ते अ‍ॅडव्हांटेज आहे त्यांना. प्रोमो मधे पुष्कर चिडलेला दाखव्त होते.
एकूण फिटनेस चा मोठा प्रश्न च येणार टास्क्स ना. आजची टीम जिंकेल असे वाटते सई, रेशम, पुष्कर, ऋतुजा पण फिट वाटतात.

छपरी दाजी जेव्हा घरी येईल तेव्हा रेशम, आस्ताद, भूषण, सुशांत, जुई आणि स्मिता यापैक २-३ जणांना आनंदाच्या भरात हार्ट अटॅक येईल असं वाटतंय.

नियम सांगायला आम्हाला का नाही बोलावले वगैरे >> हि सर्वात मुर्ख आणि बेअक्कल अर्ग्युमेंट होती मेघाची.

प्रत्येक शाळेच्या किन्वा कॉलेजच्या वर्गात, सोसायटीत एकेक कुचके कांदे असतात. मेघा मला तशी वाटते.
आमच्या वर्गात एक चौगुले नावाची मुलगी होती, ऑफ तासाला सर्वानुमते आवाज न करता, एकेकिने पुढे येउन गाणे म्हणणे, गोष्ट सांगणे, जोक सांगणे असे करू म्हणून ठरले की ही म्हणणार मला अभ्यास करायचा आहे डिस्टर्ब होतो. किंवा जाऊन मी बाईंना सांगते.. असा पवित्रा... मेघाला बघून मला तिचीच जाम आठवण आली.

मराठी बि ग बॉस कितीतरी बरं आहे. हिंदित एखादा सिक्रेट रूम मध्ये गेला की त्याची पाठ वळताच सगळे त्याच्या बद्दल वाईट साईट बोलायला सूरू करायचे. इथे मी फक्त मेघाला बोलताना ऐकलं की एक माणूस घरातून गेल्याने घर किती बदललं आहे वगैरे, सगळे एकमेकांत मिसळू लागलेत. इ. आधी कुणी यांना बांधून घातलं होतं? Uhoh की कम्पल्शन केलं होतं एकमेकांशी बोलू नका म्हणून. राजेश ला घाबरत होते का हे लोक?

किती बेकार दिसतोय तो आस्ताद.. एकाच टीमशी लॉयल राहिलाय
अन मला तर वाटत नाहि इतकी मेघा बोलते असं.. सारखं आपलं काय सगळेच बोलतात किती बोलते म्हणुन.. एक कुणी बोललं कि तीच रि ओढायची.. काल ती छानच खेळली.. रेशम तिच्या पायाला त्रास होईल असेच गेम खेळत होती तिच्याबरोबर.. वॉकर वर किती चालवलं.. पण जिद्दिने का होईना खेळली ती.
आउ जे काहि करत होती ते पाहुन हसायला येत होतं.

अन मला तर वाटत नाहि इतकी मेघा बोलते असं.. >> भागो अशी का करायलिस गं? दिड तास पाहतो त्यात तिचं बोलणं सुयांसारखं टोचतं कानात Sad ते लोक तिला कसं सहन करत असतील देव जाणे दिवसभर. खूप बोलणं म्हणजे शब्द नव्हे तर त्याचा टोन, आवाजातले चढ उतार, शब्द हे सुद्धा त्रासदायक असू शकतात. आणि मेघा नक्कीच किनरं, आणि चिरकं बोलत असते.

रेशम तिच्या पायाला त्रास होईल असेच गेम खेळत होती तिच्याबरोबर.. >> तोच तर गेम आहे ना. खेळणं झालेल्या प्रतिस्पर्ध्याला या ना त्या कारणाने खेळातून क्विट करायला लावायचं. मग त्याच्या दुखर्‍या नसे वर बोट ठेवणे आलेच.

काल आउंना फुल स्कोप मिळाला होता. त्या त्यांच्या गेंगाण्या आवाजात खूप बकबक करत होत्या आणि कॅमेरा स्वतःवर आहे याची खात्री असल्याने रोल चांगला निभावत होत्या.

कालच्या आउंना बघून मला पाळणाघरात मुलांना सांभाळायला ठेवलेल्या आयाबाईंची आठवण आली. या आयाबाईंना मुलांच्यात काडीमात्र इंटरेस्ट नसतो पण पाळणाघराच्या मालकिणीसमोर त्या मुलांशी खोटंखोटं लाडेलाडे बोलतात. आउ काल सेम वाटत होत्या.

नियम सांगायला आम्हाला का नाही बोलावले वगैरे >> हि सर्वात मुर्ख आणि बेअक्कल अर्ग्युमेंट होती मेघाची. >>

>>> नाही दक्षे. मेघा हिंदी बिबॉ बघून आलीये त्यामुळे तिला लोकं कन्फेशन रूम मधून बाहेर आल्यावर कधीकधी काहीही रुल्स बिगबॉसच्या नावावर खपतात हे माहित आहे. त्यामुळेच तिचा सई-रेशमनं सांगितलेल्या नियमावर विश्वास बसत नव्हता. तिचं म्हणणं लॉजिकल होतं तसं की जर बिगबॉसला नियम सांगायचा होता तर त्यानं फक्त एकाच टीमच्या दोन सदस्यांना का बोलावलं? दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना बोलवायला हवं होतं. पण बिगबॉसनं तसं करून मुद्दाम अजून वाद घालायला स्कोप दिला.

>>दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना बोलवायला हवं होतं. पण बिगबॉसनं तसं करून मुद्दाम अजून वाद घालायला स्कोप दिला.
ते इथलं वाचतात... आणि आता त्यांना पण मेघा आणि सई ला तोडायचं आहे.. [कारण गेम ची सिक्रेट्स मेघा आधीच सर्वांना सांगत फिरत होती यावरून त्यांनी तीला सुनावले होते. पण ती ऐकतच नाय बा!] Angry

रेशम चा दिवसेंदिवस जास्तच राग येतो आहे.
पहिल्या खुर्चीच्या गेम मद्ध जुई च्या पायावर वजन ठेवले तेव्हा, नंतर जुई चक्कर येउन पडली तेव्हा पण तब्बेतिच्या कारणांवरुन रेशम ने खुप आरडाओरडा केला..माणुसकी नाही वगैरे खुप बोलली मेघा आणि सई ला..
मग काल मेघा च्या वेळेस तिने मेघा ला बाहेर काढण्यासाठी मेघा च्या तब्बेतिचाच सहारा घेतला तेव्हा माणुसकी वगैरे आठवली नाही तिला.
शिवाय मेघा थकुन पडली तेव्हा पण रेशम तिच्या अंगावर ओरडत होती.
मेघा ने निदान जुई पडली तेव्हा काळजीने टस्क सोडुन तिला काय झाले ते विचारुन तरी आली होती.

आणि मेघा ने रेशम - सई च्या सांगण्यावर संशय घेतला यात काय चुक आहे. तिच्या विरुद्ध ची टीम जिंकण्यासाठी कोणतीही स्ट्रॅटेजी करुच शकते मग त्यात बिबॉ ने सांगितलेल्या गोष्टी मॅनिप्युलेट करणं पण शक्य आहे. आणि आस्ताद काय भंगार माणुस आहे,तो कधीच स्वतःच्या टीम सोबत नसतो.नेहेमी टीम ला तोंडघशी पाडतो.त्याने सई कडुन काहितरी शिकायला पाहिजे.मेघा तिची मैत्रीण असुन सुद्धा काल ती मेघाच्या बाजुने नव्हती स्वतः च्या च टीम सोबत होती.

इथे मी फक्त मेघाला बोलताना ऐकलं की एक माणूस घरातून गेल्याने घर किती बदललं आहे वगैरे, सगळे एकमेकांत मिसळू लागलेत.>>> त्या टिमचे ठरले आहे कि सगळ्यांनी गोड बोलायचे. मेधा आणि सईची स्तुती करायची. त्यात मेधाची जास्त.

पण हे तुमचे मत्/अनुमान आहे.. Wink तसे असेलच कशावरून? आणि असले तरी आपल्याला फरक पडता कामा नये. ते सर्वच काय ते बघून घेतील. तुम्ही सावरून देणार/घेणार आहात का राजेश च्या बायकोला? Wink कॅमेराच्या पाठी कोण कुणाच्या कुठल्या संबंधात आहे हे तरी कुठे माहित आहे? +११११११११

तुम्ही सावरून देणार/घेणार आहात का राजेश च्या बायकोला? >>> नाही. पण हळहळ तर व्यक्त करु शकते ना.

असले तरी आपल्याला फरक पडता कामा नये+ ११११११. मान्य. शेवटी ते सेलिब्रिटी आहेत, मोठया लोकान्च्या मोठया गोष्टी.

आता हा विषय मी इथेच सम्पवते.

सई खरच लहान मुलगी वाटत होती. Happy काल तिने सदमाचा सिन reprise केला जुईबरोबर. श्रीदेवी त्या कुत्र्याच्या पिल्लाला विचारते ना, मी तुझे नाव काय ठेवू? डिट्टो तसाच सीन. Happy पण तिला जुईला फारसे irritate करता आले नाही. सुशान्तला सुद्दा नीट खेळता आले नाही. पुष्कर तर मध्ये मध्ये लहान मुलाचे बेअरिन्ग घ्यायलाच विसरत होता. Lol

उना खेळता खेळता थत्तेबद्दल कुजकट बोलत होत्या, माझा बाहूला जुना आहे, असा आहे , तसा आहे वै वै. ते घोन्गडी घेऊन स्टुलावर बसलेले थत्तेच होते का? Proud

छपरी दाजी जेव्हा घरी येईल तेव्हा रेशम, आस्ताद, भूषण, सुशांत, जुई आणि स्मिता यापैक २-३ जणांना आनंदाच्या भरात हार्ट अटॅक येईल असं वाटतंय. >>>> Rofl

काल सई-मेघा जेव्हा भान्डत होते तेव्हा आस्ताद ने रेशमला मिशन फत्ते झाल्याचा इशारा केला होता.

आस्ताद आत्ता रोडिजमधल्या रघुराम सारखा दिसायला लागलाय टक्कल केल्यावर.

सै आणि मेघा जबरदस्त प्रॅक्टिकल मुली आहेत, भांडतील भांडतील पण आपल्याला एकमेकांची गरज आहे कळल्यावर परत एकत्र येतील. त्या दोघी एव्गवेगळ्या ग्रुपमध्ये असल्यावर भांडणारच, आस्ताद्चा घंटा काही रोल नाहीये त्यात. फुकटचं फुटेज खातोय तो.
बाकी, मांज्याला ग्रिल करायला मॅटर बहुतेक उद्या मिळेल.

कधीकधी काहीही रुल्स बिगबॉसच्या नावावर खपतात हे माहित आहे. >> अगं पण मामी ते करोडो लोकांच्या नजरेत उघडकिस येईल ना. आणि ममां विकेन्ड ला हजामत करतील ती निराळीच. कन्फेशन रूम मध्ये जे घडलं ते खरं खरंच सांगावं लागेल ना बाहेर येऊन. बिबॉ मुद्दाम वाद घालायला स्कोप ठेवतात हे खरंय.
आणि मेघा जरा ओव्हरस्मार्ट च आहे पण. कितीही चांगली वागू दे, चांगली खेळू दे, मी तिला कित्ती आवडून घ्यायचा प्रयत्न केला पण ती आवडतच नाही मला. तिच्या मागून येऊन सई, उना, थत्ते माझ्या बर्‍या लिस्ट मध्ये गेले Proud ही बया अजून ब्लॅक लिस्ट मध्येच आहे. Biggrin

खरंतर हिंदी सारखी कॉलर ऑफ द वीक ही सोय मराठी बिग बॉस मध्ये पण हवी. अजून धमाल येईल. लोक जाम फनी फनी प्रश्न विचारतात आणि एकमेकांना उघडं पण पाडतात. म्हणजे स्पर्धकांचे गुपित हे जनता आणि होस्ट यांना माहित असते अगोदरच, पण कॉलर ते सर्वांसमोर (बाकी स्पर्धकांसमोर) विचारतात फोन वर त्यामुळे धमाल येते अजून.

अस्ताद ला एकच काम, चक्कर किंवा तत्सम कारणाने पडलेल्या मुली घरात उचलून नेणे. Proud >>> बघ दक्षी तुला म्हणूनच घरात पाठवायचं म्हणत होतो आम्ही Wink .

>>शिवाय मेघा थकुन पडली तेव्हा पण रेशम तिच्या अंगावर ओरडत होती. मेघा ने निदान जुई पडली तेव्हा काळजीने टस्क सोडुन तिला काय झाले ते विचारुन तरी आली होती.<<

दोन्ही इंसिडंस्मध्ये प्योर नौटंकि होती, अगदी ढ्ळढळीत दिसत होती. काल मेघाने एक चूकिचा पायंडा पाडलेला आहे. उद्या सगळेच जण फटिगने पडायला लागले तर बझर वाजणारंच नाहि. काल आस्तादने तिला सीपिआर द्यायची सुरुवात करायला हवी होती; टुण्कन उडी मारुन बसली असती... Happy

बिग्बॉसने रेशम-सईला नविन नियम सांगितला नाहि, तोच नियम विस्ताराने समजावला. घरात सगळे आपापल्या क्षमतेप्रमाणे अर्थ काढतो आणि माझंच बरोबर आहे याची टिमकि वाजवत असल्याने टास्क अपेक्षेपेक्षा खुप ब्लँड होत चालले आहेत.

कालच्या एपिसोडमध्ये आउ, रेशम रॉक्ड अँड मेघा (फॉर नो अपेरंट रिझन) इज रॉकिंग द बोट...

>> काल आस्तादने तिला सीपिआर द्यायची सुरुवात करायला हवी होती; टुण्कन उडी मारुन बसली असती... Happy

मेघा चं माहित नाही पण धुरांड्या आस्ताद ने सीपीआर दिल्यावर तो स्वतः पाय वर करून पडायची शक्यता अधिक आहे. आणि मेघाला थेट विषारी वायू मिळाला असता तो वेगळाच.. Wink
>>खरंतर हिंदी सारखी कॉलर ऑफ द वीक ही सोय मराठी बिग बॉस मध्ये पण हवी.
भारी आहे हे... दक्षिणा, तू तिकडे जायची तयारी करते आहेस वाटते? Wink

नियम समजण्याच्या बाबतीत सगळेच ढ आहेत, काय वाट्टेल ते करत असतात. नीट समजून घेऊन मग नियमाप्रमाणे वागताना कुठलीच टीम दिसत नाहीत.

Pages