Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या दोन दिवसांतले टास्क
गेल्या दोन दिवसांतले टास्क म्हणजे,, "जिकडे तिकडे सोंगांचा बाजार बाजार" असं झालं होतं
बाकी, मेघा-सै जोडी तोडण्याचा
बाकी, मेघा-सै जोडी तोडण्याचा डावच इतका बोगस आहे! त्या दोघी जोडी तोडतील पण जीव तोडून टास्क्स खेळणं नाही सोडणार. आणि लोक टास्क ने एंटरटेन होतायंत, फालतू गॉसिपिंगमुळे केवळ नाही.
पुष्कर-सै-मेघा-ऋतुजा-स्मिता एवढेच फक्त गेम खेळायला आलेत वाटतं बाकीचे सहलीला आल्यासारखे वागताहेत, विशेषतः रे-सुशांत-जुई-आस्ताद.
<
एग्झॅक्ट्ली, टास्क करण्यात रे.रा टिम मधली फिजिकली स्ट्राँग आणि पटकन गिव्हप न करणारी एकटी स्मिता !
मला पण मेघा परवा नाही आवडली
मला पण मेघा परवा नाही आवडली ;पण काल त्यामानाने शांत वाटली बदला घेण्यासाठी रेशम ला त्रास नाही दिला ..
ऋतुजा साठी खरंच हॅट्स ऑफ (अर्थात आस्ताद मध्ये मध्ये तिला ब्रेक पण देत होता ) पण पायाच्या टोस आणि हाताच्या कोपरावर बॅलन्स करायचं असतं (त्याला काय म्हणतात ते नाही माहित ) पण ते करायला जॅम दम लागतो अंगात .. ते २५ आकड्यापर्यंत २ वेळा केलं आणि अजून काय काय बरंच
बाकी वरच्या अनेक पोस्ट्स बघून
धुरांड्या आस्ताद >>>

काल सै काहीतरी बोलली त्याला जे बीप वाजवून ऐकवलं नाही आपल्याला ते असलाच कायतरी असणार "तुला --- करायचं होतं म्हणून तू बझर दाबलास !"
काल शेवट काय झाला ?पुश आणि रु शेवटपर्यंत टिकले का ?
काल सै काहीतरी बोलली त्याला
काल सै काहीतरी बोलली त्याला जे बीप वाजवून ऐकवलं नाही आपल्याला ते असलाच कायतरी असणार "तुला --- करायचं होतं म्हणून तू बझर दाबलास !"

<
तो तिला रुल्स सांगत होता खेकसून म्हणुन ती म्हंटली तू जर लहान मुलाच्या कॅरॅक्टर मधे आहेस तर फुंकायला कसा जातोस ?
Btw, प्लँक होल्ड करणे म्हणतात त्या एग्झरसाइझला
प्लँक होल्ड करणे म्हणतात त्या
प्लँक होल्ड करणे म्हणतात त्या एग्झरसाइझला >>> अच्छा ! धन्स .. !! तुला माज्याकडून एक बक्षिस
ती जुई नक्की माणूस आहे की
ती जुई नक्की माणूस आहे की रोबोट ते कळत नाही. मला वाटतंय ती रोबोटच असावी, प्रत्येक क्रिया म्हणजे चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत सगळं यंत्रवत वाटतं. रोबोट जुई आणि स्मिता सोडल्या तर सगळेच धुरांडे आहेत त्या ग्रुपमध्ये. मल्टिप्लेक्स मध्ये पिक्चर नाय बघत वाटतं हे.
सगळेच धुरांडे आहेत >> (विचार
सगळेच धुरांडे आहेत >> (विचार करणारी बाहुली ) धुरांडे म्हणजे धूम्रपान करणारे ना ?मग सगळे कुठे ??
धुरांडे म्हणजे धूम्रपान
धुरांडे म्हणजे धूम्रपान करणारे ना ?मग सगळे कुठे ??>>>चालबाज ग्रुपमध्ये बोलतोय मी. म्हणजे छपरी राजेश, मारकी रेशम, धुरांड्या आस्ताद, रड्या सुशांत, भूषण सगळेच ओढतात.
अच्छा तसं होय ! मग बरोबर ए
अच्छा तसं होय ! मग बरोबर ए तुमचं !
रड्या सुशांत >>
मेघा कुठे आहे धुरांडी?
मेघा कुठे आहे धुरांडी?
मेघा कुठे आहे धुरांडी?>>>>
मेघा कुठे आहे धुरांडी?>>>> अरे रे राचा ग्रुप रे
अनसिन-अनदेखाhttps://www
अनसिन-अनदेखा
https://www.youtube.com/watch?v=Csv29yZmdqQ
https://www.youtube.com/watch?v=GHw0fypLhSs
https://www.youtube.com/watch?v=ncdXZyYHYuA
उ.ना आणि आस्ताद, जुई च्या
उ.ना आणि आस्ताद, जुई च्या फेवर मधे असलेली पहिलीच लोकं पाहिली.
रेशम, मेघा, स्मिता, सईचा कोणी उल्लेखही करत नाहिये.
https://www.youtube.com/watch?v=jdU-B2qXhog
https://www.youtube.com/watch?v=XdPjAe3yRbc
>> उना पण मस्त खेळल्या. लहान
>> उना पण मस्त खेळल्या. लहान मुलाचं बेअरींग आजिबात सोडलं नाही.
काहिही युक्तीवाद सुरू होता, तो ही खेळण्यांचा- म्हणे माझी बॅटरी संपली आहे.. असो. जर टॉय शी खेळणार्यांना फुंकण्याची परवानगी असेल तर खेळण्यांना लिंबू सरबत प्यायला मनाई नसावी.
मान्य आहे! काल सर्वांच्यात फक्त आऊ याच कॅरेक्टर मध्ये घुसून व व्यवस्थित खेळल्या.
बाकी सर्व जण बदला किंवा हरणे जिंकणे य मोड मध्ये होते.. कल्पकता व सूचकतेचा सार्वत्रिक अभाव दिसला. बहुदा नेहेमीच दुसर्याने लिहीलेले स्क्रिप्ट करायचे असल्याने मेंदू चा क्रीयेटीव्ह भाग (वापरायचा) बंद झालेला दिसतो या सर्व कलाकारांचा. टॉय प्ले मध्ये कितीतरी वेगळे व अपिलींग करता आले असते.
ऊठा बशा काढणारी, व्यायाम करणारी, लींबू सरबत पिणारी, अशी खेळणी अजून स्पिलबर्ग ते रामसे पर्यंत देखिल कुणी फारशी बनवलेली नाहीत.
ऋतूजा खरेच टिच्चून खेळली काहीही तक्रार न करता (निदान तसे दिसले तरी नाही).
भूषण घराचा कॅप्टन असूनही किती निष्प्रभ व असून नसल्या सारखा आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले. जुई चा नंबर लागणार बहुतेक या वेळेस.
बाकी सई कॅप्टन असून देखिल रेशम च सर्व ठरवत होती... एकूणात रेशम च्या डॉमिनेशन समोर सई देखिल फिकी पडली हे स्पष्ट दिसले.
स्मिता सगळ्यात 'हॉट' आहे...
पण स्वतःचे मत, विचार, स्ट्रॅटेजी अगदीच शून्य! दुर्दैव!
अरे खेळण्यांनी असे खेळतात होय
अरे खेळण्यांनी असे खेळतात होय.. खूप क्रिएटिव्ह राडे करता आले असते, मस्त पाण्यात बुडवून काढायचा आणि मग नंतर छान पुसायचा, पावडर तीट लावायची, केसांच्या झिपर्या करायच्या, उगाच काहीतरी फेव्हिकॉलनी चिकटवा चिकटवी करायची..
सई आणि मेघा या मागच्या BB चे
सई आणि मेघा या मागच्या BB चे एपिसोड बघून गेम समजावुन घेऊन आल्या आहेत... त्यांना माहिती आहे कसे खेळायचे इथे...
ऋतुजा मला वाटतंय कासवाच्या चालीने पुढे जात आहे.. मागच्या वीकएंडच्या एपिसोड मधील "हे सिनिअर, यांचा आदर्श आम्ही घ्यायचा " या ऍक्ट पासून तिने स्वतःचे फॅन फॉलोइंग नक्की वाढवलेत...
>>खूप क्रिएटिव्ह राडे करता
>>खूप क्रिएटिव्ह राडे करता आले असते,
मग काय..... नुसते 'जिम'वेडे सगळे..... व्यायामप्रकार करवून घेतायत!
काहीच नाही सुचत तर खेळायचा कंटाळा आलाय म्हणून त्या खेळण्यांना कपाटात बंद करुन ठेवले असते तरी १०-१५ मिनिटात क्लस्टरफोबियाने एकेक करुन सगळ्यांनी बझर दाबला असता!
मेघा पहिल्यांदाच थोडी
मेघा पहिल्यांदाच थोडी काँफिडंस गेल्या सारखी दिसली कालच्या खेळानंतर..
अभीच मौका है बि बॉ: दाजी ना परत आणा आणि आम्हाला 'टिप टिप बरसा पानी' बघायला मिळू देत जरा..
पुढील भागांसाठी बि बॉ ला जरा चांगले (मनोरंजन, ड्रामा, खेळ ई. सर्व वॅल्यू असलेले) टास्क सुचवा बरे.. खरे तर बि बॉ मार्केटींग टीम ने असे काहितरी केले पाहिजे.. लोकांकडून त्यांच्या फेवेरेट स्पर्धकासाठी टास्क मागून घ्यायचे , एकट्याचे किंवा जोडीचे वगैरे.
अजुनही माझे लाडके पुष्कर,
अजुनही माझे लाडके पुष्कर, स्मिता. पण स्मिताने लाथ दाखवणं कित्ती चीप होतं. खेळण्याला नाही दाखवली, पुष्करला दाखवली, अगदी वाईट, राग ह्याबद्दल.
ऋतुजा आणि पुष्करला सेफ करायला हवं नेक्स्ट विक आणि ह्या विकमधे ऋतुजा जायला नको. रा येईल आता मिरवत, परत बोअर लवस्टोरी सुरु. पब्लिक बोंब मारतंय तरी काही नाही.
ऋतुजा खरंच ग्रेट. स्मिता नेहेमीच उत्तम खेळून वागण्यामुळे पब्लिकचं कौतुक गमावते.
दाजी कधी येणार?
दाजी कधी येणार?
दाजी कधी येणार?>>>कधीच नकोयत
दाजी कधी येणार?>>>कधीच नकोयत यायला
आणि इतक्या लवकर तर मुळीच नको 
दाजी कधी येणार? >>> खरेतर
दाजी कधी येणार? >>> खरेतर फक्त विकांताला येवुन लगेच बाहेर जायला हवे त्याने
बिबॉच्या घरात मेघानंतर जर कुणी डोक्यात जाणारे असेल तर तो हा आहे,
खरेच त्याच्याशिवाय रेशम बरी वाटतेय.
मेघा खुप विचीत्र आहे, काल किती अती केले तीने,
सईचं काल काय चाललेलं, लिंबू
सईचं काल काय चाललेलं, लिंबू पाणी दे, मसाज कर.
त्या मेघा आस्ताद चा oc नडला, स्मिता दोन तास अजून किल्ला लढवायला तयार होती. आम्ही हरवूच म्हणे त्या आधी.
<खरेच त्याच्याशिवाय रेशम बरी
<खरेच त्याच्याशिवाय रेशम बरी वाटतेय.>
अगदी अगदी..
दाजी कधी येणार? >> नाही आला
दाजी कधी येणार? >>
नाही आला तरी चालेल
रा नसल्याने रे जरा नरमली आहे
रा नसल्याने रे जरा नरमली आहे असे वाटतेय.
काल उना ला नमस्कार टिंग टाँग टिंग टाँग करताना पाहून मी जे काही हसलेय, त्याचं नाव तेच
मेघा किती ओव्हर बोलते... वाईट लोकांशी पंगा घेतलाय वगैरे.... मी कुणाचा हिशोब ठेवत नाही वगैरे
ही असली वक्तव्य अर्धवट शिक्षण झालेले लोक जे विविध मंडळं वगैरे चालवतात, सिग्नल तोडतात आणि चौकाचौकात तंबाखू खाऊन थुंकत उभी राहतात त्यांच्या तोंडी शोभतात.
दाजींना मिस करून राह्यले का
दाजींना मिस करून राह्यले का पब्लिक? बसू देत की त्याला अजून काही आठवडे तरी
तो नसल्यामुळे रेशम चा टास्क मधे वगैरे पॉजिटिव्ह वावर वाटला मला. टफ प्लेयर आहेच ती, पण आता अरेरावी, दादागिरी चा अप्रोच नाहीये. मला या आठवड्यात रेशम आवडली.
या आठवड्यात मेघा अनॉयिंग वाटली जाम. टास्क तर धड करण्याची कपॅसिटी नाही, नुस्तंच ऑब्सेशन आणि अटेन्शन सीकिंग. सईनेही तसे वेळ काढणे, क्विट करणे हे केले पण समहाऊ सईचा नाही राग आला मला. आस्ताद ला आरड्याओरड्यात पण पुरून उरली. पुष्कर ला चियर अप केले. जुई चं वँ वँ रडगाणं चालूच होतं.
पण एकूण नुस्ते तास भर व्यायामच बघायचे म्हणजे बोर च झाले. टॉय टास्क मधे मजा नाही आली.
पुष्कर आणि ऋतुजाने बाजी मारली! त्यात पुष्कर थकला रडला वगैरे तरी, पण ऋतुजा ग्रेटच!!
ओवरऑल डायनामिक्स बदलतायत हे खरे. थत्ते , उना ने आता काहीतरी केले पाहिजे टिकायचे असल्यास. उना तरी गॉसिप करत असते. पण थत्ते तर काल दिसलेच नाहीत कुठे. अशाने त्यांचीच गच्छंती होईल आधी.
रा आला रे आला की दुप्पट
रा आला रे आला की दुप्पट माजोरडेपणा करेल रे, सर्व वचपा काढेल. थोड्या वेळासाठी रा ला ठेऊन बाहेर काढायला हवं, तिथे बसून त्याचा माज काही उतरला नाहीये, मजा चाललीय मस्त.
तो नसल्यामुळे रेशम चा टास्क
तो नसल्यामुळे रेशम चा टास्क मधे वगैरे पॉजिटिव्ह वावर वाटला मला. टफ प्लेयर आहेच ती, पण आता अरेरावी, दादागिरी चा अप्रोच नाहीये. मला या आठवड्यात रेशम आवडली.
या आठवड्यात मेघा अनॉयिंग वाटली जाम. टास्क तर धड करण्याची कपॅसिटी नाही, नुस्तंच ऑब्सेशन आणि अटेन्शन >>>> हो ना, तिला टास्कसाठी रडताना पाहुन मलाच कसे तरी झाले.
अन झाला असेल तीला त्रास पण ती ओव्हरअॅक्टींग करतेय असे वाटत होते
पण एकूण नुस्ते तास भर
पण एकूण नुस्ते तास भर व्यायामच बघायचे म्हणजे बोर च झाले. >> +११११
Pages