Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरातील कामं असोत की task मेघा
घरातील कामं असोत की task मेघा जीव ओतून करते मात्र. पण एवढं जीवावर उदार पण होऊ नये तिने. तिचेच जिंकायचे चान्सेस जास्त आहेत.
पण टास्क कोणाला नीट कळलाच नाही दोन्हीकडच्यांना असं मला वाटतंय. फार गोंधळ दोन्हीकडून.
उद्या स्मिता पुष्करला लाथ का
उद्या स्मिता पुष्करला लाथ का दाखवणार आहे, बरं नाही वाटलं बघायला, इरिटेट करण्यासाठी असेल, कारण मुलं toys ना काही करू शकतात असं आहेना पण तरीही.
दिपंजाली☺️
दिपंजाली☺️
तुम्ही खतरनाक कंटेस्टंट होऊ शकता
रेशम बुली आहे. मेघा बुली नाही
रेशम बुली आहे. मेघा बुली नाही तर अरेला कारे आहे.
आऊनी मस्त बॅटरी काढून टाकली
आऊनी मस्त बॅटरी काढून टाकली
जबरदस्त.
आस्ताद बराच वेळ चांगला खेळला.
अस्ताद लॉयल आहे का आजपण
अस्ताद लॉयल आहे का आजपण थुंकून चाटणे चालुय?
>>>आस्ताद बराच वेळ चांगला
>>>आस्ताद बराच वेळ चांगला खेळला. - काय चांगला खेळला? नेहमीप्रमाणे स्वतःच्या टीमला सपोर्ट न करता वर च्रप्स्ने लिहिलेय ते करत होता.
सई मेघा वाद टास्क पुरताचं
सई मेघा वाद टास्क पुरताचं असणार, दोघी पटाईत आहेत त्यात. त्या वाद एरवी नाही कंटीन्यू करणार.
मला वाटलं कारण ऋतुजा ने
मला वाटलं कारण ऋतुजा ने दिलेलं करणे कठीण होतं आणि त्याच्या टीममधले बरेच जण होते की इथे.
हो तेही खरंच.
हो तेही खरंच.
मी लॉयल शब्द नाही वापरला
मी लॉयल शब्द नाही वापरला त्याच्याबद्दल. काही नियमात मेघाला सपोर्ट केलं आणि तो टास्क मला बघायला कठीण वाटला, जो सोडला तो असं वाटलं मला.
उनाच त्या घरात सर्वात हायेस्ट
उनाच त्या घरात सर्वात हायेस्ट पेड आहेत म्ह़णे ना?>>
आठवड्याला कोणाला किती मिळतात?
उनाला दिवसाला एक लाख मिळतात
उनाला दिवसाला एक लाख मिळतात असं इथेच वाचलेलं. खखोदेजा
आस्तिन का साप आस्ताद !
आस्तिन का साप आस्ताद !
>>आस्तिन का साप आस्ताद !
>>आस्तिन का साप आस्ताद !
आस्ताप्द !!
(No subject)
एक मोठा प्रश्न आहे मला.
एक मोठा प्रश्न आहे मला.
राजेशला कमी मते मिळाली आणि घराबाहेरजायला लागले. मला तरी असेच कारण वाटत होते की जनतेला त्यांचे प्रेमाचे चाळे आवडत नाहीयेत. रेशम ला कमी मते मिळायचे कारण हेच.
मग मांन्ज्या त्याना तसे सरळ सरळ का नाही बोलला? त्याची झोपडपट्टी बद्दल ची मते त्याला हानिकारक पडली पण दुसरे कारण सुद्धा खूप सबळ आहे. रे रा अजुन ही भ्रमात आहेत की त्यांचे प्रेम हे प्रेक्षकाना बघायला आवडत आहे.
राजेशला कमी मते मिळाली आणि
राजेशला कमी मते मिळाली आणि घराबाहेरजायला लागले. मला तरी असेच कारण वाटत होते की जनतेला त्यांचे प्रेमाचे चाळे आवडत नाहीयेत. रेशम ला कमी मते मिळायचे कारण हेच. >> हे कसं कळलं तुम्हाला?
काही बोलला नाही याचा सरळ अर्थ प्रेमाचे चाळे चॅनलनेच करायला सांगितले आहेत असा होत नाही का?
नॉमिनेशन्स पण व्यवस्थित
नॉमिनेशन्स पण व्यवस्थित मॅनिप्युलेट केली काल. सई, मेघा , पुष्कर नॉमिनेट होणे अशक्य करून ठेवले. सगळेच चॅनल च्या मर्जीने नॉमिनेट झाले असे वाटले.
चला थोडी गंमत करूया, आणि
चला थोडी गंमत करूया, आणि खालीलप्रमाणे आपल्या आवडीनिवडी आणि अंदाज कारणासह सांगूया.
१) कोण जिंकेल?
२) कोण जिंकलेले आवडेल?
३) कोण डोक्यात जाते?
४) टॉप ३-४ स्पर्धक कोण असतील?
५) बिगबॉसमधील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट?
१) कोण जिंकेल? - मेघा जिंकेल.
हा गेम खेळायचे ईतके स्पिरीट ईतर कोणाकडेच नाही. सई सुद्धा मस्त गेम खेळते, मात्र ते जे एक killer instinct मेघाकडे आहे ते तिच्याकडेही नाही.
२) कोण जिंकलेले आवडेल? - पुष्कर जिंकलेला आवडेल
त्याचा कोणी ईथे फॅन क्लब काढला तर त्यात मी पहिले नाव नोंदवेन. त्याचे लग्न झाले नसते तर तिथेही पहिला नंबर लावला असता
त्याचे चिडने, रागावणेही प्रामाणिक असते. आणि जिथे गरज असते तिथेच असते. जिंकण्यासाठीच खेळतो, पण जिंकण्यासाठी काहीपण हा अॅटीट्यूड नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाचे डावपेच खेळाच्याच स्पिरीटमध्येच ठरवतो, पॉलिटीक्सला थारा देत नाही. आस्तादचा सगळीकडचा वावर खरेच डबलढोलकी वाटतो. याचा सगळीकडचा वावर याच्या सर्वांशी चांगले वागणे स्वभावाचा भाग वाटतो.
३) कोण डोक्यात जाते? - स्मिता
माझे बॅडमिंटन खेळून झाले मी माझे रॅकेट घेऊन घरी जाणार, मला दोन डाव द्या तरच मी माझे कॉक वापरायला देणार, अच्छा तू सायकल चालवणार का, मग थांब मी मुद्दाम तुझ्या रस्त्यातच खेळते, अश्या चिडक्या मुलींच्या कॅटेगरीतील वाटते. गेम खेळायचे जराही स्पिरीट नाही. स्वत:चा खेळ ऊंचावून नाही तर रडी गेम खेळून चांगला खेळ करणार्याचा पाय कसा खाली खेचता येईल हेच बघत असते. आणि हे असे असूनही ती जी स्वत:ला कूल दाखवते ते डोक्यात जाते.
४) टॉप ३-४ स्पर्धक कोण असतील?
सई, मेघा, पुष्कर या तिघांना शेवटी पर्याय नाही.
राजेश रेशमची लवस्टोरी शेवटपर्यंत घेऊन जाणार नाहीत. एक गेला की दुसर्याचेही जास्त मनोरंजन करणार नाहीत. त्यावेळी बहुधा रेशमला आधी काढतील आणि देवदास राजेश दाखवतील. तसेही तो एकंदरीत लूक वरून रोज आंघोळ करणार्यातील वाटत नाही.
सुशांतलाही बिगबॉसची माहेरची साडी होईपर्यंत ठेवणार नाहीत.
थत्ते आणि आऊ वेळीच निवृत्त होतील.
भूषण कडून मनोरंजन काढून घेतील आणि मग शेवटच्या धूमश्चक्रीत त्याचे काही काम नसेल.
रात्रीस खेळ चाले आणि स्मिता, त्यांना आज काढा उद्या काढा काही फरक नाही.
त्यामुळे चौथे नाव घ्यायचे झाल्यास एकतर ती चिडकी स्मिता, किंवा डबलढोल आस्ताद असू शकतो. आस्तादने सध्या केस काढल्याने कॅमेर्याच फोकस आपल्या टकलावर वळवला आहे. ते त्याला फायद्याचे ठरू शकते.
५) बिगबॉसमधील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट?
नारी शक्ती सबसे भारी!
कालच्या टास्कमध्ये रेशम, उना,
कालच्या टास्कमध्ये रेशम, उना, ऋतुजा आवडल्या. मेघा डोक्यात गेली, उद्या आम्ही पण असंच करणार वगैरे नाटकं करण्यापेक्षा रे सांगतेय ते नीट केलं असतं तर स्पोर्टींग स्पिरिट दिसलं असतं. सु- भू ठरवून केल्यासारखे क्विट झाले. सै, पुष्करला आजिबात कळत नव्हतं कसं क्विट करायला लावायचं ते. कधी नव्हे ते आस्ताद सुद्धा व्यवस्थित खेळला काल. थत्ते किती कूलली खेळले काल त्याउलट मेघा चिडीचा डाव खेळत होती.
ऋतुजा कद्धीसुद्धा पॉलिटिक्स न करता आपापलं काम व्यव्स्थित करत असते.
बिग बॉस मराठीने इतक्या अनफिट
बिग बॉस मराठीने इतक्या अनफिट लोकांना घरात घेतलय मग फिजिकल स्ट्रेंथ लाग्णारी टास्क्स का देतायेत ?




आउ डायबेटीक. अस्थ्मॅटीक, थत्ते डायबेटीक, मेघाच्या पायात रॉड, स्मिताला अॅलर्जीज + स्पाँडलायटीस वगैरे.
बाकी टॉय स्टोरी अजुन खूप इंटरेस्टींग करता आली असती, फक्तं फिजिकल टॉर्चर पर्यन्त मजल, अपिअरन्स बदलण्याचा टॉर्चर कोणाच्याच डोक्यात नाही आला ?
बाकी अस्ताद आजही घरचा भेदी, इतक्यांदा म.मां नी ग्रिल करून अजुनही टिमशी लॉयल नाही.
ॠतुजानी काही फार टॉर्चर नाही केलं त्याला , तरी या येड्याने फुंकायची तल्कफ आल्याने लग्गेच फेकली विकेट आणि नंतर मेघाशीच भांडत होता.
भूषणनेही गिव्हप केलं, लुजर लोकं आहेत हे, त्यापेक्षा थत्ते म्हातारे असून छान खेळले, मेघा - जुईने फिजिकल टास्कना लिमिटेशन्स असून गिव्हप केलं नाही , स्मिता तर हरणार्यातली नाहीच, पुष्कर नाही टॉर्चर करु शकला तिला.
सगळ्या मुली जिद्दी, चिकट आणि मुलं ही अशी लुजर.. सुशान्त तर काहीतरी पर्सनल स्कोअरच सेट्ल करतो मेघा समोर आल्यावर.
कित्ती पोटात दुखतं सगळ्यांना मेघाची चिकाटी बघून, फार मज्जा येते मला !
आउंनी अॅक्टींग मधे बाजी मारली.
पण सईने काहीच टॉर्चर नाही केलं जुईला, कॅप्टन असून कंट्रोल रेशमच्या हतात, का बरं ??
पण खरी मज्जा आली रेशम आणि तिची डॉलची, रेशम म्हंटली ही डॉल पझेस्ड आहे
आज रेशमने पहिल्यांदाच टास्क ठिक करायचा प्रयत्न केला पण अॅक्टींग सॉलिड बोंब आहे, लहान मुलीच अॅक्टींग करत होती कि बेवडीचं
रेशम खेळण्याला जितक टॉर्चर करत होती, तितकच खेळणं तिला टॉर्चर बॅक करत होतं , मेघा गिव्हप करण्यातली नाही आणि रेशमही नाही, धम्माल दोघींची जोडी बघतना, आज असं वाटलं टॉप व मधे याच दोघी अस्स्णार , राडाच राडा !
आज रेशम तिच्या जागी आणि मेघा तिच्याजागी योग्यच होत्या, रेशमला माहित होतच अर्थात कोणाशी मेसप करतेय
हायलाइट ऑफ डे २४ : रेशम मधेच टॉय आणि अॅडल्ट टॉय मधला फरक विसरली , पप्पीच घेते म्हणून भूषणच्या पोटावरच बसली
मेघानी कर्रेक्ट प्रश्नं विचारला, हेच मेल मेंबरने फिमेल मेंबरला केल तर चालेल का ?
इमॅजिन उद्या जर अस्तादने जर ऋतुजाची पप्पी घेतली, आकाश पाताळ एक होईल, धरणीकंप होईल, ऋतुजाच्या ओर्डण्याने धरती पोटात घेइल अस्तादला आणि जर थत्तेनी आउची पप्पी घेतली तर आउ मुडदा नाही पाडणार त्याचा ???
बघु उद्या काय होतय, आय होप टिम मेघा फाइट्स बॅक विथ बँग !
थत्तेनी आउची पप्पी घेतली तर
थत्तेनी आउची पप्पी घेतली तर आउ मुडदा नाही पाडणार त्याचा ???>>>>>
पडले मी खुर्चीतुन.
डिजे, खतरनाक लिहीलयस,
डिजे, खतरनाक लिहीलयस, आस्तादला धरणी पोटात घेईल...
स्वतः स्मोकिंग झोन मधे ऊभं राहून मेघावर ओरडत होता.लुझर.
मेघाबद्दल सहमत.रेशम आणि ती दोघी एकमेकींचा अंत पहात होत्या.रे ला हेच हवं होतं की मेघाने बझर दाबावा जे तिने अजिबात केलं नाही. ज्जे बात !
रेशम टास्क संपल्यावर पण ग्रजेस धरून ठेवते हे तिने परत एकदा प्रुव केलं.
ऋतुजा मस्त वाटली मला काल
ऋतुजा मस्त वाटली मला काल
थत्तेनी आउची पप्पी घेतली तर आउ मुडदा नाही पाडणार त्याचा ??? >>>>
आऊ इतक्या डोक्यात जातात ना .
आऊ इतक्या डोक्यात जातात ना . आजोबा मुद्दामून आपटले म्हणतात कालचा एपिसोड फारच बोअर झाला . उद्या खेळणी झालेले लहान मुलं आणि लहान मूल खेळणी म्हणजे उद्या पण बोअर.धडके रुल्स यांना माहिती नाहीत
मेघा रडीचा डाव खेळली काल....
मेघा रडीचा डाव खेळली काल.... मेडीकल असो किंवा इतर कोणत्याही कारणाने जर टास्क करायला जमत नसेल तर क्विट करणे गरजेचे आहे.... फाइट वगैरे काही नाही उलट रेशम समोर हरलेलीच वाटत होती ती!
बाकी फायनल ५ वगैरे अंदाज आत्ताच बांधण्यात फारसा काही अर्थ नाही.... इथे दिवसादिवसाला equations बदलतायत.... अजुन wild card entry व्हायच्या आहेत
त्यावरुन आठवले ती सई काल पुष्करला तिला कसा मुलगा पाहिजेल वगैरे जे काही सांगत होती त्यावरुन तो नवीन येणारा शिव ठाकरे आणि सईचे जुळणार असे दिसतेय!
हे back to back दोन दिवस पार्ट्या बदलून तोच खेळ खेळणे जरा प्रेडीक्टेबल होत आहे
तो पुष्कर काल खेळणी ऐवजी खेलनी म्हणत होता का?.... का?
लूझर न वाटता टास्क सोडता येणे हे एक अत्यंत आवश्यक स्कील वाटायला लागलय या स्पर्धकांसाठी!
उद्या जर आस्तादने रुतुजाची
उद्या जर आस्तादने रुतुजाची पप्पी घेतली तर>>>>>>>ती त्याच टक्कलच फोडुन काढेल.
उद्याच्या झलकेत रडकी-चिडकी,
उद्याच्या झलकेत रडकी-चिडकी, महामंद जुई आणि मारक्या बैलाप्रमाणे अंगावर धाऊन येणारा आस्ताद यांची आरडाओरड पाहिली. जुईला हाकला ही मागणी पुन्हा करावीशी वाटली. स्मिता मस्त खेळते आहे.
आसन्नविरहिनी रेशम सुतकातून बाहेर आल्यासारखी दिसते.
मेघा अडेलतट्टू आहे. खेळ पण
मेघा अडेलतट्टू आहे. खेळ पण नीट खेळणार नाही, आणि क्विट पण करणार नाही.
अस्ताद ला एकच काम, चक्कर किंवा तत्सम कारणाने पडलेल्या मुली घरात उचलून नेणे.
Pages