बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बॉस इंटेरफीयर पण करत नाही, bb ने आत बोलावून दोघांना सांगितल्यावर बाहेरची माणसं विश्वास ठेवत नाहीत. खेळणी निर्जीव असतात पण थत्ते सर आणि मेघा जाम आगाऊपणा करत होते. रेशम आणि सई ने पण नीट बाहेर सांगितलं की नाही काय माहिती कारण आपल्याला ब्रिफ दाखवतात.

म.मां म्हणे ना मागच्यावेळी , कि मुद्दामच नियम नाही क्लिअर केले कारण तसेही तुम्ही ते पाळत नाही Uhoh
आजच्या एपिसोडच्या हायलाइट मधे आस्तादचा गेटप Biggrin
बाकी या लोकांचं डिव्हैअड अँड रुल किंवा आवाज चढवण्याच्या अ‍ॅग्रेशनमुळे सई-मेघा दबतायेत का ?
संभल जाओ गर्ल्स, युज युअर स्ट्राँग व्हॉइस अँड ब्रेन्स !
काल सई कॅप्टन असून कंट्रोल रेशम करत होती, हायलाइट्स वरून आज अस्ताद करतोय दादागिरी असं दिसतय मेघा कॅप्टन असताना.
जुईच्या बोलण्याच्या टोनचं अता फार हसु येतय, त्यावर ऑलरेडी डबमॅश वगैरे सुरु झालेत Happy
‘ डॉली उडी मार’ सईला सांगताना जुने लाथांचे स्कोअर सेट्ल करण्याचा राग होता खेळण्याशी खेळण्या ऐवजी !
काल बाकी पहिल्यांदाच , भूषण कित्ती क्युट दिसत होता, गोडुसा बाहुलाच Happy

इथल्या कंमेंट्स वाचून हसता हसता पुरेवाट झाली आहे . मी BB एन्जॉय करत आहे . चालबाज टीम च्या काड्यांमुळे मध्ये मध्ये खूप राग येतो . पण क्रमाने मेघा, सई, पुष्कर, ऋतुजा हे माझे fav

आज सई मुद्दाम काड्या करतेय. आणि बाहेरही पडली. आस्ताद मात्र आज डबल ढोलकी मोड सोडून बाहेर पडलाय, आणि हा बदल सुखवतोय.
रेशमचा चेहरा तिचा रियल फेस दाखवतोय असं वाटतय.
मेघाने मात्र आज शांततेच धोरण स्वीकारालाय. ती खरच मास्टरमाईंड आहे. पर्सनल स्कोर सेटलींग चा आरोप येऊ नये, पुष्कर आणि सई जवळ राहावेत, म्हणून ती टोटल अंडरप्ले करतेय.
राजेश तिकडे काचेच्या घरातून आरडाओरडा करतोय.
पुष्कर मात्र टास्क जिंकवेन असं दिसतंय...

छपरी दाजीच्या तेराव्याचा टास्क द्या, छपरी दाजीच्या फोटोला हार घाला, अगरबत्या लावा, कावळे सोडा घरी, जी टीम जास्त कावळे पकडेल ती टीम विजयी घोषित करा. जो सदस्य जास्तीत जास्त कावळे पकडून पिंडाला शिवेल तो कॅप्टनशीपच्या पदासाठी उभा राहील.

छपरी दाजीच्या तेराव्याचा टास्क द्या, छपरी दाजीच्या फोटोला हार घाला, अगरबत्या लावा, कावळे सोडा घरी, जी टीम जास्त कावळे पकडेल ती टीम विजयी घोषित करा. जो सदस्य जास्तीत जास्त कावळे पकडून पिंडाला शिवेल तो कॅप्टनशीपच्या पदासाठी उभा राहील.>>>> Rofl Biggrin Rofl

मेघा किती नाटक करतेय. मला अज्जिबात आवडत नाही ती.
बिबॉ चा ओपनिंग एपिसोड झाला तेव्हा चांगली नाचली बिचली की, आणि आज जरा चालली तर ट्रेडमिलवर तर लगेच काय झालं? Uhoh
अटेन्शन सिकिन्ग.

कन्फेशन रूम मध्ये रडतेय की मला टास्क करू द्या म्हणे. तिला सांगा कुणितरी की तिच्यावतीने अस्ताद ने बझर वाजवला आहे. रेशम बरोबर बोलली की काही लोक फेल्युअर घेऊ शकत नाहीत. मॅडनेस ओव्हरबोर्ड.

सई किती गोड आहे. छान कन्सोल केलं तिने मेघाला.

छपरी दाजीच्या तेराव्याचा टास्क द्या, छपरी दाजीच्या फोटोला हार घाला, अगरबत्या लावा, कावळे सोडा घरी, जी टीम जास्त कावळे पकडेल ती टीम विजयी घोषित करा. जो सदस्य जास्तीत जास्त कावळे पकडून पिंडाला शिवेल तो कॅप्टनशीपच्या पदासाठी उभा राहील.>> कितीही आपल्याला राजेशचा राग आला असेल तरी अशी कॉमेंट करण मायबोलीकरांना शोभत नाही Angry

काहीही करून अथवा न करुनही अटेंशन घ्यायला भारी जमतं मेघाबायला. फुल्ल ऑन नौटंकी! कालच्या एपिसोडमधून लक्षात आलेली गोष्ट, मे, सै, पु, उना, ऋ या ग्रूपमधील मेघाला एकटीलाच पलीकडच्या ग्रूपमधे टाकलं होतं. त्यातून तिला टास्क करायचा होता त्या मारक्या म्हशीसोबत. त्यामुळे अगदीच बिथरली होती ती व ग्रूपच्या कंफर्ट झोनमधून बाहेर आल्यावर काय होवू शकतं ते तरी कळलं असेल तिला.
<<रेशम बरोबर बोलली की काही लोक फेल्युअर घेऊ शकत नाहीत. >>> या बयेला तरी कुठे येतो फेल्युअर घ्यायला. Wink

काल पुष्कर आणि सई मॅट्रिमोनीची चर्चा करत होते ती फार फनी होती. पुष्कर अगदी एखादी मध्यमवर्गीय मावशी देईल असे सल्ले देत होता सई ला. उगीच जास्त चूजी असू नये, तुझं वय आता २८ आहे म्हणजे आता लवकर होऊन जायला पाहिजे, उगीच लुक्स च्या मागे लागू नकोस, सगळेच कसे मिळेल वगैरे Rofl

Hats off to पुष्कर सर आणि ऋतुजा mam , अभिनंदन. कॅप्टन सई mam फार बेकार खेळल्या. मेघा mam स्पिरीट बेस्ट पण ओवरconfidence, आम्ही जिंकूच हा नडला. मेघा mam बेस्ट खेळल्या आणि जुई mam, स्मिता mam बेस्ट. स्मिता mam अजूनही खेळायला तयार होत्या.

स्मिता mam नी लाथ दाखवणं अतिशय चूक होतं. अगदी mannerless. पण task स्मिता mam पण नेहेमी जिद्दीने खेळतात आणि छान करतात.

बिग बॉस फेसबुक पेज वरच्या कॉपी केल्यात, तिथे मी एकेरी नाही लिहित. सर mam लिहिते. इथे एकेरी नावाने लिहिते.

इथे परत तेच लिहायला कंटाळा आला म्हणून कॉपी Lol

तिथे लिहिणारे काहीजण फार असभ्य शब्द वापरून लिहितात त्यामुळे मी असं लिहिते. अर्थात मी सगळं वाचत नाही, मला जे लिहायचं ते लिहिते आणि मोकळी होते.

इथे कोणी अक्षय चौधरी पाटील आहेत का कारण मी वरची तिथली पोस्ट कॉपी केलीय, तिथे मला अंजू ? असं विचारलंय तर हो पण मी तिथे नाही उत्तर देत. कारण हा माबो आयडी आहे.

माझ्याही १-२ पोस्ट्स इन्स्टाग्रॅमवर कोणीतरी जशाच्या तशा कट पेस्ट केल्यायेत.

माझी पोस्ट कॉपी नाही केली कोणी, माझ्या पोस्टवर मी अंजू आहे का असा प्रश्न विचारला आहे, तर फेसबुकवर मी माझ्या नावाने लिहिते पूर्ण, समिधा सदानंद केळकर ह्या. मला अंजू म्हणून इथले आणि माहेरचे काहीजण ओळखतात. त्यामुळे प्रश्नकर्ता ओळखीचा नसल्याने माबो कर किंवा माबो वाचक असावा.

मेघा साठी खराखुरा डॉक्टर आलेला दाखवलाय, त्यामुळे ड्रामा केला असेल असं नाही वाटत.
जुईच्या चकरेची स्टोरी फेक असल्याने नाही आले डॉक्टर.
बाकी टॉइज स्टोरी टास्क काही जमल नाही कोणत्याच टिमला.
टॉइज काय फक्त वर्काउट करतात ?? Biggrin
खेळण्यांना सतावायचं तर थिंक लाइक किड्ज , ते फक्त उ.नां न एकट्यानी केलं.
बाकीचे नुसतेच रिव्हेंज टास्क्स, खुर्ची सम्राटचच वेगळं रुप दाखवत होते.
ज्यांना मेघाचं टास्क करणं ऑब्सेस्ड वाटलं असेल तर पुष्करही रडीचा डाव खेळला, टॉइजना आज पाणी का दिलं ?खेळणी कुठे पाणी पितात ? काल नव्हते देत पाणी.
जाऊन बझर दाबायचा होता त्याने जर इतके वेळा तहान् लागून अ‍ॅक्टीव्हिटी होत नवह्ती तर पण अश्रु येइ पर्यन्त रडत टास्क करत होता.
लिंबुपाणी ,मसाज वगैरे परवानगी दिली तिथेच तो आउट झाला होता.
तरीही पुष्करही मेघासारखाच टफ आहे.
आज मेघाने काहीच टॉर्चर केलं नाही आज रेशमला, काही न करताच रेशमने गिव्हप केले.
सईला चिटर फाउल कॅरॅक्टर कशाला दिलं होतं ? ती स्ट्राँग आहे खरं तर.
बाकी नुसतीच फ्रेंडशिप तोडून नक्की काय साधणारेत ?
रेशम टिम पैकी कोणीतरी त्यांना पॉप्युलॅरीटी मधेही मात दिली पाहिजे .
अजुनही टास्कमधे पटकन गिव्हप करण्यात अस्ताद-सुशान्त—भूषण-रेशम सगळेच पटकन तयार.
स्मिता टफ आहे एकटी.
इथे झालय असं कि या आठवड्यात उलट मेघाने भरपूर सिंपथी मिळवून अजुनच पॉप्युलॅरीटी मिळवली, फॅन्स पूर आल्यासारखे वाढलेत तिचे, चर्चाही !
पुष्कर सुध्दा अजिबात आवडत नाही ना रेशम टिमला ? त्यानेही भरपूर फुटेज खाल्लय आणि पॉप्युलॅरीटी वाढलीये त्याचीही.
रेशम टिमची नावडती ऋतुजाही पॉप्युलर झाली आहे टफ फाइट दिल्याने, तिने पुष्करपेक्षा चांगलं आणि तक्रार न करता टास्क केलं .
आजची खरी स्टार ॠतुजा !
जोपर्यन्त सई मेघा एकामेकींना नॉमिनेट करून एलिमिनेट होत नाहीत तोवर त्यांना डिव्हाइड अँड रुल चा फायदा नाही.
बघु काय होतय पुढे.

पुष्करने कधीच गिव्हअप केले असते पण त्या मेघाने सकाळीसकाळी उगाच त्याला चॅलेंज केल.... त्यात तो "मी बोलणार नाही करुन दाखवणार" वगैरे बोलून बसला..... त्यामुळे त्याला गत्यंतरच नव्हते टास्क कंप्लीट करण्याशिवाय!

अगदी खरंय..
ऋतुजा इतकी टफ असेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण ती खरोखर जबरदस्त आहे. मुख्य म्हणजे ती डोक्याने विचार करणारी आहे, उगाच सै किंवा मेघाच्या मागे मागे करणारी नाही. त्याउलट स्मिता, इतकी भारी प्लेयर ठरू शकते ती, पण स्वतःच्या डोक्याने वागत नाही. जुई बद्दल बोलण्यात पॉइंटच नाही. अगदीच बेक्कार.
कालच्या टास्कमध्ये आस्तादने पण लिमिट्स बाळगून पण ऋतुजाला चांगलंच तंगवलं..
<अजुनही टास्कमधे पटकन गिव्हप करण्यात अस्ताद-सुशान्त—भूषण-रेशम सगळेच पटकन तयार.>
सुशांत तर एकदमच फाल्तू.
रेच्या ग्रुपमधून बाहेर पडल्याशिवाय आस्ताद, स्मिताला भविष्य नाही. उना पण मस्त खेळल्या. लहान मुलाचं बेअरींग आजिबात सोडलं नाही.
मेघा या आठवड्यात आवडली नाही.
बाकी, मेघा-सै जोडी तोडण्याचा डावच इतका बोगस आहे! त्या दोघी जोडी तोडतील पण जीव तोडून टास्क्स खेळणं नाही सोडणार. आणि लोक टास्क ने एंटरटेन होतायंत, फालतू गॉसिपिंगमुळे केवळ नाही.
पुष्कर-सै-मेघा-ऋतुजा-स्मिता एवढेच फक्त गेम खेळायला आलेत वाटतं बाकीचे सहलीला आल्यासारखे वागताहेत, विशेषतः रे-सुशांत-जुई-आस्ताद.

सईने स्वत: जरी टास्क लवकर सोडला असला तरी ज्या पद्धतीने ती पुष्करला मोटीव्हेट करत होती, त्याची काळजी घेत होती ते आवडले..... ते पाणी वगैरे देणे नियमात होते का नाही हा वेगळा मुद्दा..... आणि ते म्हणाले सुद्धा की हे जर अलाउड नसेल तर बिग बॉस डिसक्वालिफाय करतील आमच्या टीमला!

सई आणि मेघा एकमेकांच्या विरोधात गेल्या तर रे आणि गॅंगवरचा उरलासुरला फोकस पण निघून जाईल असे वाटतेय (किमान राजेश परत येइपर्यंत)

Pages