Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच की काय?
खरंच की काय?
सुशांत-रेशम-भूषण सतत दारूच्या आठवणीत रममान असतात त्यावरून वाटलेलं नसेल दारू अलाऊड.
काल ऋतुजाच्या अन्गात सुसल्या
काल ऋतुजाच्या अन्गात सुसल्या घुसली होती का?
सई-मेघाची मैत्री तुटली. हे
सई-मेघाची मैत्री तुटली. हे पाहा.
https://www.youtube.com/watch?v=mFrsNi4v2IY
पुष्कया ने ऋतुजा चे नाव
पुष्कया ने ऋतुजा चे नाव घ्यायला पाहिजे होते +1
आऊ चे समजू शकतो, तिला कळत नाही कुठं काय बोलावे.. वय लहान आहे म्हणून ऋतुजा कप्तान नको म्हणे.. पण पुष्कर ने immature म्हणणे डीमोतीवेटिंग होते..
जर पुष्या आणि ऋतुजा आले नॉमिनेशन ला, आपला वोट ऋतुजा ला..
आऊना स्मिता अज्जिबात आवडत
आऊना स्मिता अज्जिबात आवडत नाही, ऋतुजा शी जमतं त्यामुळे थोडं आश्चर्य वाटलं मला.
मी वोटिंग नाही केलं कोणालाही, पुढे करेन का नाही आत्ता सांगता येत नाही.
मी ऋतुजाला वोट केलं आहे
मी ऋतुजाला वोट केलं आहे पहिल्यांदा आणि आतादेखिल.
यापुढेदेखिल सै, पुष्कर, ऋतुजा यापैकी कुणी नॉमिनेशनला आलं तर वोट देईन. मागच्या आठवड्यात रेशमला घालवण्यासाठी मुद्दाम सुशांत, जुईला मत दिले होते.
रेशम कंपु आवडत नसला तरी
रेशम कंपु आवडत नसला तरी स्मिता कॅप्टन झाली ते बाकी फार आवडलं, कधी पासून डिझर्व्ह करतेय ती !

कचर्याचा टास्क, चोर पोलिस सगळीकडे तिने डॉमिनेट केले होते, सई बरोबर बांधून जोडी बनवली होती तेंव्हाही छान खेळली होती.
ती कॅप्टन झाली आणि मुख्य म्हणजे रडीचा डाव खेळलेला पुष्कर कॅप्टन झाला नाही याचा आनंद झाला.
त्याने स्मिताला व्होट केल्यावर ऋतुजा बरोब्बर बोलली सईला, “हि इज बिग प्लेअर मॅन”
बाकी ती ‘डिव्हाइड अँड रुल’ पॉलिसी रेशम टिमची का बिग बॉसची समजत नाहीये.
अचानक कसे अगदी रातोरात सगळे तिला कॉर्नर करायला लागले ? सिक्रेट टास्क सारखं दिलेलं दिसतय !
रे.रा नंतर सई पुष्कर यांचं काही जमावं याचाही प्रयत्न दिसतोय बिग बॉसचा पण पुष्कर तसलं काही करणार नाही, काल सई त्याच्या
पायाला मसाज देत होती तेंव्हा बायकोची आठवण येतेय म्हणत त्याने थांबवलच तिला.
ही पेअर नाही जमली तर स्मिताला मधे आणून बिग बॉस सई पुष्कर जोडीही तोडणार !
बाकी मेघा १००% नॉमिनेट होणार, तिच्या बरोबर अजुन कोण पहायला हवं.
कदाचित तेच हव अस्ले चॅनलला, जिला इतका अतिप्रचंड पब्लिक सपोर्ट आहे, ती नॉमिनेट झाली कि व्होट्स चा पाऊस पडणार.
आजच्या एपिसोड क्लिपमधे आउ आणि सई वाद दाखवलाय , तुकडेच तुकडे गृप्सचे
अजुन तरी सई -मेघा -पुष्कर- ऋतुजा एकत्र बसलेत खरे, मांजरेकर मागच्या आठवड्यात म्हंटले होतेना पुढच्या वेळीनेहेमीचे गृप एकत्र बस्स्लेले नकोत असं काहीतरी ?
पुष्कर ला गाढव म्हणजे गाढवाचा
पुष्कर ला गाढव म्हणजे गाढवाचा अपमान !
फक्त मेघा योग्य खेळतेय, सई आणि पुष्कर गंडलेत आता.. शिव्यांचा भडिमार सोशल मीडिया वर त्यांना.
मेघा अलरेदी विनर वाटतेय.
थत्ते फार खालच्या पातळीवर
थत्ते फार खालच्या पातळीवर जाऊन बोलले पुष्करला. पुष्कर नेहमी एक मैत्रीण म्हणून सई शी बोलत असतो, आजपर्यंत त्याने पातळी कधीच सोडली नाही. त्याचं फॅमिली वर प्रेम आहे आपल्या, हे दिसत असतं. आऊनी मात्र त्याला नीट शब्दात सांगितलं पण थत्ते too much.
अंजु... पुष्कर आणि सई याना
अंजु... पुष्कर आणि सई याना वाटत आहे आता त्यांना कोणाचीच गरज नाही. हे खरंच गाढव प्रमाणे आह.. थत्ते बराबर बोलले मला असं वाटत.
पुष्कया माझ्या मनातून उतरला जेंव्हा त्याने मेघा बद्धल बितचिंग केली आणि काल ऋतुजा ला immature म्हणून तिचं नाव न घेता स्मिता च घेतले.
पुष्कर अँड सई are nothing without मेघा !
पुष्करला आतापर्यंत स्वतःचं
पुष्करला आतापर्यंत स्वतःचं कसलंच व्यक्तिमत्व नाही मिळालेय घरात. सै व मेघाच्या आड आडूनच खेळलाय तो आतापर्यंत. इथूनपुढे जरी त्याला स्वतःचे स्थान निर्माण करायचे झाले तरी रेराच्या ग्रुपमध्ये त्याची गत स्मिता-जुई-सुशांत-भुषण शिवाय वेगळी होणार नाही.
थत्ते मेघाला पण फार खालचे
थत्ते मेघाला पण फार खालचे बोलले पाताळयंत्री वगैरे.
थत्ते पुष्करला नुसतं गाढव म्हणाले असते तर ठीक होतं, बाकीचे मला नाही आवडलं आणि पटलं.
हो सोशल मीडियावर तरी पब्लिक
सोशल मीडियावर तरी पब्लिक पूर्णपणे मेघाच्या बाजूने आहेत हे दिसतंय, ती जिंकण्याचे चान्सेस खूप आहेत.
थत्ते बरेचदा बरोबर बोलतात .
थत्ते बरेचदा बरोबर बोलतात . ते खर आणि अति स्पष्टपणे बोलतात म्हणून बऱ्याच जणांना ते आवडत नाहीत . त्यातून त्यांचा अवतार बघून अगदी पहिल्यापासून ते बऱ्याच जणांच्या डोक्यात जातात म्हणून ते काहीही बोलले तरी आवडत नाहीच
अवतार वगैरे म्हणून नाही,
अवतार वगैरे म्हणून नाही, थत्ते फार आधीपासून डोक्यात जातात माझ्या, लहानपणापासून. रंग बदलतात ते सहज. गगनभेदी वगैरे अॅड यायच्या मटामधे रोज, कोण वाचतं हे असा मला प्रश्नही पडायचा, तेव्हा पांढरे कपडे असायचे फोटोत. त्यांच्याबद्दल जास्त निगेटीव्ह वाचलंय. हा भाषेवर प्रभुत्व चांगलं आहे मात्र.
थत्ते मुद्दाम विकेन्डला
थत्ते मुद्दाम विकेन्डला काहितरी कॉन्ट्र्रोव्हर्शियल बोलतातच मग नतर घरातले चिडले की सारवासारवी करतात... फार आतल्या गाठिचे आहेत.
स्वतः कडे लक्ष वेधून घेण्याचा
स्वतः कडे लक्ष वेधून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. फार कोणी भाव देत नाही त्यांना, प्रेक्षकही नाही देत विशेष.
एक काल कन्फर्मड झालं की जुई
एक काल कन्फर्मड झालं की जुई अजूनही प्रसाद लिमये बरोबर रिलेशनशीपमधे आहे, तिनेच सांगितलं. तो सध्या नकळत सारे घडले मधे काम करतो.
स्वतःकडे लक्ष वेधून घेतात हे
स्वतःकडे लक्ष वेधून घेतात हे अगदी सुरवातीलाच त्यांनी कबूल केलाय . त्या करता मी वाटेल ते करतो किव्वा काहीही करण्याची तयारी आहे . हे अगदी सुरवातीच्या भागातच त्यांनी सांगितलं . खर तर स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न बरेच लोक करत असतात. फक्त त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि यांचा मार्ग वेगळा . म्हणून हे काही तरी विचित्र अवतार करून घेतात. पण ते हे सगळं लक्ष वेधण्यासाठी आहे हे ते स्वतःहून कबूल करतात आणि मी " चक्रम " आहे असं जाहीरपणे कबुल हि करतात . असं जाहीरपणे बोलून दाखवण्याला सुद्धा गटस लागतात जे त्यांच्या कडे आहेत आणि म्हणूनच ते इतरांपेक्षा प्रामाणिक वाटतात. जे मी स्वतः चक्रम आहे हे उघड पणे सांगतात तो मनुष्य आतल्या गाठीचा कसा म्हणता येईल ? जी माणसं त्यांची मत स्वतःकडेच ठेवतात बोलून दाखवत नाहीत त्यांना आतल्या गाठीचे म्हणतात ना ? उलट यांच तर जे आहे ते स्पष्ट .खेळात अशी सारावा सारावी करावीच लागते . ते काही खर जीवन नाही गेम आहे हा . उषा नाडकर्णी पण तशाच आहेत . जे काही आहे ते स्पष्ट पण त्यांचा बोलण्याचा टोन वेगळा यांचा वेगळा आणि उना सारखे पाठीमागून गॉसिप करत नाहीत
Megha hushar ahe. Ti kal
Megha hushar ahe. Ti kal saila mhanali ki tya group madhali lok Tula target kartaet ani tuzya lakshat yet nahiye. Re ra group cha plan meghachya lakshat alay.
सई आणि पुष्कर मेघाबरोबर
सई आणि पुष्कर मेघाबरोबर चुकीचं वागले असं मला तरी वाटतंय, विचार पटत नाही म्हणून तुम्ही तिला लांब ठेवताय हे मान्य आहे पण कालपर्यंत ज्या माणसांचा चेहरा बघणं तुम्हाला पसंद न्हवतं त्यांच्या ग्रुपमध्ये बसून मेघाचे वाभाडे काढायला नाही पाहिजे होतं, सई आणि पुष्कर हे स्मिता जुई सारखेच प्यादी होणार बहुतेक त्या ग्रुपची. आणि बिग बॉसचा इतिहास सांगतोय ज्या स्पर्धकाला कॉर्नर करतात तोच फायनल जिंकतो.
मेघा डे वन पासून जिंकेल असं
मेघा डे वन पासून जिंकेल असं वाटत होत निदान मला तरी . ती पूर्ण गेम समजून आली आहे . गेम जिंकायचाच अशा इर्षेने आली आहे . काही एका लिमिट पर्यंत मित्रांची साथ देणार नंतर स्वतःच अस्तिव टिकवायची वेळ आली की कोण मित्र ? सई आणि पुष्कर पण हळू हळू त्याच वाटेने चालले आहेत . सईने सुरवातीला कैमरासमोर गिव्ह अप केलं होत पण आता ती म्हणतेय मला शेवटपर्यंत टिकायचचय . आता जिंकायचं हि ईच्छा तिच्या मध्ये पण जागृत झालेय त्यामुळे खेळासाठी काहीही
गॉड सेव्ह प्रसाद !
गॉड सेव्ह प्रसाद !
मेघाने सुरवातीच्या भागात
मेघाने सुरवातीच्या भागात सांगितलंच होत . मला माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष काहीही झालं तरी लागतच लागत . अटेन्शन करता काहीही . . एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं म्हणे . त्याच लक्ष मोबाईल मध्ये तर मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि मिक्सर मध्ये घालून त्याचे तुकडे तुकडे केले . अटेन्शन करता काहीही . कुठल्याही थराला आणि लोक फक्त थत्ते ना नाव ठेवतात .
कालचा एपिसोड महाबोगस होता..
कालचा एपिसोड महाबोगस होता..
भूषणचा एक डाव भटाचा मधला सीन अतीसुंदर. ते वगळता काहीच विशेष नाही.
रे कंपूला आता कळलं असेल, सै
रे कंपूला आता कळलं असेल, सै आणि मेघा कितीही भांडले तरी त्यांच्या ग्रुपच्या विरोधात नक्की एकत्र येतील.
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं म्हणे . त्याच लक्ष मोबाईल मध्ये तर मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि मिक्सर मध्ये घालून त्याचे तुकडे तुकडे केले . >>>>> नोकियाचा जुना फोन असेल
पुष्कर मनातून उतरत चाललाय. तो
पुष्कर मनातून उतरत चाललाय. तो सदैव अनकंफर्टेबल असतो. आणि हल्ली खूपच चिडचिड करतोय.
भूषण कडू नं काल मला दोनदा अतिशय आनंद दिला.
एकतर त्यानं जी काही ती टायरमध्ये घुसायची आणि मग चवड्यावर बसून चालायची चपळ आणि लवलवती अॅक्शन केली त्यावर मी फिदा.
दुसरं म्हणजे सई ला कावळा का म्हणावे यावर त्यानं जे विवेचन दिलं आणि रेशमचं नागिण आणि तिचा नागमणी याचा संदर्भ दिला ते त्याच्या हुशारीचं आणि चतुरस्त्र असण्याचं लक्षण आहे. सिंपली इंप्रेस्स्ड बाय भूषण.
इतरांनीही विविध प्राण्यांचे जे विविध गुण सदस्यांना कसे चपखल बसतात ते सांगताना छान वेगवेगळे विचार सांगितले. प्रत्येकजण कसा वेगळा पैलू दाखवत होता ते बघून मजा आली.
फक्त अस्ताद अतिशय निगेटिव बोलतो सई आणि मेघाबद्दल. त्याच्या मनात या दोघींबद्दल किती द्वेष आहे हे काल पुन्हा एकदा कळलं.
मला तो खेळ आवडला. तसंही या आठवड्यात कोणाची फार शाळा घेण्याची गरज नव्हती त्यामुळे दोन खेळ घेतले गेले. तेवढाच बदल.
काल मंमांनी छान कंडक्ट केलं. त्यांचा ड्रेसही मला आवडला. रेशमला कोणीतरी नविन कानातले भेट द्या बरं. दर शनिवारी तेच तेच कानातले घालते.
राजेश खोलीत ठारच वेडा होणार. पण तो बाहेर जायला मागत नाहीये, त्याला त्या घरातच जायचंय रेशमला भेटायला.
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं
एकदा नवऱ्याचं लक्ष नव्हतं म्हणे . त्याच लक्ष मोबाईल मध्ये तर मी त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि मिक्सर मध्ये घालून त्याचे तुकडे तुकडे केले . >>>>> नोकियाचा जुना फोन असेल >>>>>>>>>>>>>>>>>>
अहो, नोकियाचा फोन मिक्सरमध्ये घालून फिरवला, तर मिक्सर मोडेल!
- 'काठेवाडी म्हशीला एस्टीचा धक्का लागला तर एस्टी मोडेल!'च्या चालीवर
(No subject)
फोटो कसा टाकायचा इथे
Pages