बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता सहज म्हणून त्या रेशम टिपणीस चे wiki पेज बघितले.... बऱ्याच हिंदी सिरीअल्स केल्यात की तिने.... तरीच इतका सुपीरियर कॉंप्लेक्स आहे
मला फक्त ती त्या जीवलगा मधली आठवतीय.... तुषार दळवी हिरो होता तिचा बहुतेक!
आणि त्या मेरे यार की शादी मधला साईडरोल!

>>काल मला मेघाचे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणे आवडले.
and that will bring her downfall.. typical overconfident personality. मी कुणालाच घाबरत नाही अशा थाटात वावरणारे लोक आणि त्यातही मूहफट म्हणजे स्वताच्या शहाणपणाच्या नादात सर्व बोलून ऊघडे करतात.. याचा फायदा ईतरांना जास्ती होत असतो. या ऊलट सई सारखी आतल्या गाठीची माणसे कुणाला ठाव लागू देत नाहीत.. अशांच्या जाळ्यात पुष्कर सारखे 'अती प्रामाणि़क' फसतात.. Happy

ऊलट काल थत्ते यांनी आऊं ना जे ऊत्तर दिले ते डिप्लोमसी चा ऊत्तम नमूना होते. काम ही साधले आणि सहानुभूती देखिल मिळवली.

रेशम चा ही तोच प्रॉब्लेम आहे.. if she can manage her attitude, she can be really hard player..

पण जिंकण्याची भूक सध्या तरी फक्त मेघा व सई मध्येच दिसते.. बाकी सगळे नुसतेच गाळलेल्या जागा भरा सारखे भासतात.

राजेश च्या नसण्यामुळे घरातले वातावरण बदलले असे तिघांना वाटत आहे.
पण त्या टिमचा प्लॅन आहे कि मेघासईचे खूप कौतुक करायचे, गोड बोलायचे न मग हळूहळू त्यांच्यात फूट पाडायची.

राजा बाबूंचा 'मेरे मेहबूब कयामत होगी' मोड आवडला...
रेशम चे राजेश ला मिस करणे आवडले... आणि मागे गाणे पण कातिल सुरू होते: सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.
<<<
Rofl
काय तो २ दिवस खोट्या दुखवट्याची गाणी लाऊन ड्रामा , आता रजेश परत आला तर भूत म्हणून किंचाळणार लोक, खरच मेलाय बहुदा Wink
बाकी सई जास्त खतरनाक आहे मेघापेक्षा हे रे.रा. गृपला माहितेय, जहरीला सुलेमानी किडा टायटल दिल होतं राजेश कि सुशान्तने तिला.

मेघाचं बोलणे दूरदूर पर्यंत स्ट्रेट फॉरवर्ड न्हवते. मी बोलण्याशिवाय राहू शकत नाही याव आणि त्याव इ. इ. बीएस करुन झाल्यावर जेव्हा रेशमने प्रेस केलं तेव्हा ओकलेली गरळ होती ती. स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचे असते तर ती ते सुरुवातीलाच ते बोलली असती. रेशम ( आणि थत्ते) श्रुड आणि शार्प आहे, मेघाला कधी थांबायचं झेपत नाही. रेशम रागावर ताबा ठेवून खेळली तर ती मेघा सई जोडीला भारी पडू शकते.
पुष्कर स्वीट बॉय आहे. त्यालाही मेघा त्याचा फायदा घेत्येय, मधे मधे करत्येय हे समजू लागलंय. काल बायकोशी बोलला त्याने तो सात जन्म सेफ (का अडकला) आहे Proud पण तो जाम जेन्युअन वाटतो.
आणि मारकी म्हैस म्हणजे आपली आऊ. नॅशनल टेलिव्हिजन वरुन नक्की नवर्‍याचं आणि यांच काय बिनसलं ते न सांगता तो कसा मेला ( हो मेलाच) हे हिडीस आणि गलिच्छ भाषेत सांगून त्याचं भांडवल करणे हे लिमिट आहे!
रेशम म्हणजे टूटा परिंदा आहे हो, मारकी म्हैस न्हवे ! Lol

रेशम म्हणजे टूटा परिंदा आहे > Lol
मेघाला बहुधा आधी गडबडायला झाले असेल रेशम च्या मदतीबाबत काय पवित्रा घ्यावा. नंतर कळले असेल की भांडे लपवण्यात काहीच पॉइन्ट नाहीये.
रेशम आहेच डॉमिनेटिंग. तिच्या टीम मधले सगळेच इशार्‍यावर नाचतायत तिच्या.
थत्ते अणि उषा मधे अधी कोण जाणार? उना काहीही पर्सनल सांगत बसल्या होत्या.

उना गळका नळ आहे. मेंदूतील स्टोरेज एरिआ आणि तोंडाचे स्नायू हा लो रेझिस्टंस पाथ आहे. काहीही प्रोसेस न करता शब्द गळत असतात.

उना गळका नळ आहे. मेंदूतील स्टोरेज एरिआ आणि तोंडाचे स्नायू हा लो रेझिस्टंस पाथ आहे. काहीही प्रोसेस न करता शब्द गळत असतात.
<<
अरे म्हणून तर आहेत त्या इथे Biggrin
महागुरु पिळगावकर म्हणे शो च्या स्लोगनला जागणार्या त्याच आहेत, दिसतं तसच असतं Proud
पडद्यावरही इव्हल सासू, इथेही साधारण तशाच !
ती पवित्र रिश्ताची त्यांची सून अर्चना, अंकिता लोखंडे जी सिरियल मधे उ.ना च्या लाथा खायची, रिअल लाइफ मधे ती फार फटकळ आणि टँट्रम साठी इनफेमस आहे, तीही हवी होती या घरात, पवित्र रिश्ताचा सासू सून मारामारीचा डाव रंगला असता Proud

आणि मारकी म्हैस म्हणजे आपली आऊ. नॅशनल टेलिव्हिजन वरुन नक्की नवर्‍याचं आणि यांच काय बिनसलं ते न सांगता तो कसा मेला ( हो मेलाच) हे हिडीस आणि गलिच्छ भाषेत सांगून त्याचं भांडवल करणे हे लिमिट आहे >> अगदीच

उनाच त्या घरात सर्वात हायेस्ट पेड आहेत म्ह़णे ना?
<<
हो, एक्स्पिरिअन्स मुळे असेल बहुदा , बाकी सगळे बर्यापैकी बी ग्रेड सेलिब्रिटी कॅटॅगरीमधे मोडतात, त्या एकट्याच ए लिस्टर आहेत .
मराठी बिग बॉसला रेकॉर्ड करायचे असेल म्हणूनही असतील त्या, सगळ्या भाषेतल्या बिग बॉस सिझनच्या वयाने सर्वात मोठ्या म्हणून.

रेशम म्हणजे टूटा परिंदा आहे हो, मारकी म्हैस न्हवे !>>> यावरुन फारतर पिसाळलेली मारकी म्हैस म्हणू...पण मारकी म्हैसच! आऊ तर त्यात प्रविण्य मिळवलेल्या आहेतच पण त्या रेशमचा तो भयानक क्रूर लूक बघून तर इच्छाधारी नागाला मारल्याचा बदला घ्यायला पेटलेल्या नागिणीची आठवण आली. Proud

पडद्यावरही इव्हल सासू, इथेही साधारण तशाच !>>> अगदी! बर्याचदा त्यांच्यातल्या टिपिकल खाष्ट सासूची झलक दिसते. विशेषतः जेव्हा त्या रे रा बद्दल अथवा इतर लोकांच्या माघारी कोणाशीतरी बोलत असतात..आणि नंतर म्हणतात, 'माला वाद नाकोय म्हणून मी आपली गप बसली..मी कुठं काय बोल्ली?' Wink

सई-मेघामधे वाद झालाच. रे टिमला हेच हवं होतं.. आय होप हे वाद टास्कपुरतेच असतील.त्या दोघीं मधे वाद झालेले मला नाही आवडणार बघायला.

'माला वाद नाकोय म्हणून मी आपली गप बसली..मी कुठं काय बोल्ली?' >> Lol अगदी.
सई-मेघामधे वाद झालाच > हो का! मग रेशम गळ्यात पडेल आता सईच्या, उगी उगी करत.

मेघाला खरच चक्कर आली का ती नाटक करत असेल जुईसारखं? खरं असेल तर मेडिकल टिम यायला हवी होती bbची. आज सई बघेना पण मेघाकडे तिला त्रास होत होता तरी.ती रे लाच सपोर्ट करत होती.

आस्तादने उचलून आत नेताना तिने जी नौटंकी केली त्यावरून तरी नाही वाट्ल मला तरी खरच चक्कर आली असेल

बिबॉ पण कसले पक्के आहेत. विळ्या भोपळ्याचं सख्य असलेल्यांच्याच जोड्या लावून दिल्यात खेळायला.
उना कुणाला बोलू का नाही देत? Uhoh भूषण सांगत होता की बटाटेवडे सकाळी सकाळी मी पण नाही खाऊ शकत, पण हा वडा चांगला आहे तर ही बाई ऐकायलाच तयार नाही.
उना म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी प्रकरण आहे. स्वयंपाक घरावर सत्ता हवी, अन्यथा तिथे फिरकणार पण नाही, भले पाव खाऊन राहिल.

आजच्या टास्कमध्ये मेघा अज्जिबात आवडली नाही
.... नाही झेपत तिथे क्विट करायच ना!
रेशमसमोर क्विट करण हा इगोचा प्रश्न बनवला तिने!
आणि मग उगाच कारणे देत बसली!
सई टास्कमध्ये पार घुसुन खेळते.... मैत्री बित्री गेली तेल लावत!
तिचे आणि पुष्करचे ते matrimoni बद्दलचे संभाषण मस्त होते..... ती पक्की लाडावलेली आहे!
उना डोक्यात जायला लागल्यात... त्या थत्तेना किती दमवले!

त्या दोघीं मधे वाद झालेले मला नाही आवडणार बघायला. >> का?? वाद कोणाही मध्ये झालेला मला आवडेल बघायला. रादर फार प्रेम बघितलं की बोर होतं बघायला हे त्यांना ही माहित असेल सो तोंडी लावायला वाद आणतील त्या स्मार्ट असतील तर!

सई आणि मेघा तरी फॉर्मॅट ची माहिती घेऊन आल्यात. त्यांनी इतरांसमोर ठरवून भांडण करावे. इकडे आस्ताद ने पण दोघींना फोडण्यासाठी स्ट्रॅटेजीज आखव्यात . मजा येईल मग जुगलबंदी बघायला. पण ते फिजिकल फाइट्स, अंगावर धावुन जाणे वगैरे बोर प्रकार वाटतो मला.
तिथे काहींना राजेश परत येणार हे माहित असल्यासारखेच बोलत होते लोक काल. "इथे गार्डन मध्ये पाऊस किती सुंदर दिसेल! पाऊस येईपर्यन्त राजेश परत आला तर बरं होईल" वगैरे म्हणाली रेशम. आस्ताद लगेच "हो हो येईल ना तो वाइल्ड कार्ड वर" असे म्हणाला.

"पाऊस येईपर्यन्त राजेश परत आला तर बरं होईल" >> Lol हे रत्न मिस केलं मग मी! तो आला की एक्दम नैनो मे बरखा म्हणजे.. एक बरसात सॉन्ग अ‍ॅक्टिव्हिटी टाका फर्मास तेव्हा. अबके सावन ऐसे बरसे...
तो पर्यंत विचार करताना रेशम दिसली की 'खाली हात शांम आई थी' हे गाणं लावा पार्श्वभूमीवर!

एपिसोड पाहिला नाही पण खेळण्यांना सतावणे टास्क होते का ?
मग सो कॉल्ड सैतानी डक्याची रेशम /आउ किंवा इतर कोणाच्या मनात बाहुलीला विद्रुप करायचे विचार नाही आले का?
फिमेल जोकर बाहुलीचे टक्कल करणे किंवा वेडेवाकडे केस कापणे, भुवया पूर्ण शेव्ह करण!
जोकरच्या कपड्यातल्या बाहुलीला बिकिनी बेब बाहुली बनवणे वगैरे!
खूप राडा झाला असता Proud

Pages