Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला शेवटच्या दोन मध्ये पुष्कर
मला शेवटच्या दोन मध्ये पुष्कर आणि स्मिताला बघायला आवडेल आणि पुष्कर जिंकलेला आवडेल .
मी आली , मी गेली हि भाषा नक्कीच चुकीची आहे . त्यातून मी जन्मापासून मुंबईकर आहे . त्यामुळे हि भाषा मुंबईची नक्कीच नाहीये . प्रत्येक जण आपापल्या घरात जशी बोलली जाते तशीच बोलतात . मी गेले- मी आले असच पाहिजे
ऊना ला आधी बाहेर काढा . फार
ऊना ला आधी बाहेर काढा . फार वचा वचा बोलतात त्या . सई जशी रेशम शी बोलायला गेली होती तशी स्मिता पण मेघाला सांगायला गेलीच होती . ऊना ना जरा समजावं . माझी त्यांच्याशी पर्सनल दुश्मनी काही नाही . तरी त्या डूख घरून बसतात. मी आयुष्यभराकरता माफ करणार नाही म्हणतात . अरे हे काय ? मिस फिट आहेत या बिग बॉस मध्ये. खिलाडू वृत्तीने घ्यायचा असतो हा गेम . प्रत्येक जणच जिंकण्याकरता खेळतोय
आस्त्या कीती माकडासारखा दिसतो
आस्त्या कीती माकडासारखा दिसतो नई
जुईने जे केलं ते न पटन्यासारखंच आहे पण तीने हे देखिल काहीतरी विचार करुनच केलं असेल
काहीतरी प्लँन शिजतोय तिच्या डोंबल्यात
ऋतुजाने एक गोष्ट चांगली केली,
ऋतुजाने एक गोष्ट चांगली केली, रेशमला कन्विहिन्स करण्याचा प्रयत्न केला नाही. तसेही ती मानणार नव्हतीच. उलट ही स्किम तिने मांडली असती तर जुई कशी आजारी आहे आणी तिला त्रास व्हावा असे तुला वाटते वगैरे भम्पक सेंटी मारून, थोडसं हुकमी रडून-भेकून जुई आणी सगळ्यांची सहानुभुती घेतली असती वर ऋतुजाला सेव्ह केलंच नसतं. त्यापेक्षा ऋतुजाने स्वतःच जुईच्या तब्येतीच्या कारणापोटी मी स्वतःच तिला बाहेर झोपायला सांगणार नाही असा स्टँड घेऊन रेशमला नौटंकी करण्याची संधी दिली नाही. तरीही तिने फडफड केलीच.
आपला ऋतुजाला फुल्ल सपोर्ट, ती एकटी आहे जिने रेशमशी डायरेक्ट नडण्याची हिंमत केली. ती रहायला पाहिजे. जुईला हाकलाच.
पाहिला एपिसोड , मेघा कुठे
पाहिला एपिसोड , मेघा कुठे उर्मटपणे बोलली ?

उलट अगदी टाळ्या वाजवाव्या इतकी मस्तं स्पष्ट बोलली, जिला वाचवायची इच्छा नाहीये तिला मी का वाचवु ? वॉव, जियो मेघा !
सुशान्तने बाकी उगीच चान्स सोडला , केले असते हिरवे निळे केस मेघाचे, ती तयार होती, मज्जा आली असती पण नाही रडोबाला स्वतःला नॉमिनेट करून ट्रॅजेडी किंग बनायचं होतं !
अस्ताद आणि जुई बोलणी जशी भरपूर खातात तसे इथेही बिग बॉसचे फारसे लाडके नसल्याने त्यांना करायचा ‘मिशन त्याग’ टफ दिला बहुदा
मिशन त्याग मधे सर्वात मज्जा आली सईची , बिग बॉस अॅक्चुअली मेड हर डे टुडे, तिने काही आठवड्यापूर्वी पुष्क्याला फक्त भरवून मागितलं होतं, ज्याला तो तेंव्हा नाही म्हंटला होता , आज बिग बॉसने तिला बंपर लॉटरीचं प्राई़झ दिलं जणु
बाकी एपिसोड बोअर झाला, होमसिक लोकांची रडारड नुसती.
सुशान्तचे अश्रु मोजायला तर आता बादल्या आणायला हव्या !
पुष्कर बिचारा बायकोला सांगतोय
पुष्कर बिचारा बायकोला सांगतोय हा टास्क आहे हा टास्क आहे . किती गोड .
सई अजूनही लहान बाळच आहे .
पुष्कर बिचारा बायकोला सांगतोय
पुष्कर बिचारा बायकोला सांगतोय हा टास्क आहे हा टास्क आहे . किती गोड .
<<<
हो अगदीच awwww moment !
पुष्कर बाकी हळुहळु जामच पुढे चाल्लाय रेसमधे, भरपूर फॅन फॉलॉइंग मिळवतोय आणि आज हे जास्मिनला संबोधून बोलल्यामुळे ऑडीयन्स अजुनच फिदा झाले असणार !
जर पुष्करची ही लॉयल्टी
जर पुष्करची ही लॉयल्टी लोकांना इतकी आवडत असेल तर याच्यातच रे आणि रा ला इतक्या शिव्या का बसतायत याचे उत्तर आहे!
खरच तो खुप साधा आणि घरगुती वाटतोय.... बिलकुल स्टारडम नाही!
Boy next door!
मेघा काय उर्मट आहे..
मेघा काय उर्मट आहे..
असू दे की. रेशम काय कमी आहे का. उर्मट व उद्धट. स्वतःच्या चुकाही उद्धटासारख्या मान्य करुन हेच दाखवते की मी कशी ही वागेन, बोलेन मांजरेकर काय बोलणार नाही मला हे तिने ताडलय.
मांजरेकरांनी फेवर केलं नसतं तर एव्हाना रे-रा घराबाहेर जायल हवे होते.
मला सई, मेघा किंवा पुष्कर जिंकलेले बघायला आवडेल. जर ह्यांच आधीच रेशम्ला विनर करायच ठरलेल नसेल तर.
दोघींकडे छान स्पोर्टिंग स्पिरिट आहे. रेशम grudges धरुन ठेवते टास्क संपल्यावर पण.
रेशम, उषा सिनीओरीटीच्या
रेशम, उषा सिनीओरीटीच्या बबलमध्ये बसल्येत. हा गेमच समजला नाहीये त्या दोघींना. खिलाडू व्रुत्तीचा अभाव आहे.
मेघा पण येडी आहे का ? .
मेघा पण येडी आहे का ? . थत्ते ना म्हणते "तुम्ही ऊना करता टास्क करायला पाहिजे होत" अरे का करावं त्यांनी ?. थत्ते यानी बरोबर उत्तर दिल. बाहेरून सांगण्याकरता वेगळं पण मनातून त्यांना उना याना नॉमिनेट करायचंच होत म्हणून त्यांनी टास्क करायला नकार दिला. मेघाला ते बोलले पण परफ़ेकट "तू रेशम साठी टास्क करायला तयार झालीस का? एरवीही तू तिला नॉमिनेट केलं असतंस तसंच माझंही आहे ."
<रेशम, उषा सिनीओरीटीच्या
<रेशम, उषा सिनीओरीटीच्या बबलमध्ये बसल्येत. हा गेमच समजला नाहीये त्या दोघींना. खिलाडू व्रुत्तीचा अभाव आहे.>
अगदी खरं. या दोघींपेक्षा थत्ते किती तरी पटीने परवडले. पण उनाने पुषकरसाठी तो पेहराव वगैरे केला ते आवडलं, तशीच राहिली सर्व काळ तर किती बरं होईल. पण इगो आड येतो.
मला काल ऋतुजा ला शिक्षा केली
मला काल ऋतुजा ला शिक्षा केली पण सुशांत ला मात्र नाही केली हे पटलं नाही आणि आस्ताद ने पण स्मिता ला पटवलं नव्हतं त्याला का नाही झाली ?
उना ने काल थत्ते ना का नाही सपोर्ट केला ? तसंही ते तिलाच नॉमिनेट करणार हे १०० % होणार होतं . ते तसंच झालं आणि मग नेमकं थत्ते चा सपोर्ट मिळाला नाही .. एवीतेवी नॉमिनट व्हायची शक्यता ५०% होतीच ना ! मदत करून बघायला हवी होती थत्ते ना कदाचित त्यांनी पण मग केली असती मदत !
सै ला काल फोटो आणि खेळणं मोडल्याबद्दल जे अभिनंदन केलं ते मुद्दामून मेघा ला जळवायला केलं असं मला वाटलं .. hopfully सै हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही . आस्ताद ला हमालाच काम करायला लावलं ते मला जाम आवडलं
फक्त त्यानेच स्टोर रूम मध्ये जाऊन सामान आणायचं !!
मेघा पण येडी आहे का ? . थत्ते ना म्हणते "तुम्ही ऊना करता टास्क करायला पाहिजे होत" अरे का करावं त्यांनी ?>> तेच कि !!तिच्या लक्षात आलं अर्थात मला वाटतंय म्हणूनच जास्त विषय वाढवला नाही तिने ..
सुशांत चं रडणं पाहून आता
सुशांत चं रडणं पाहून आता कंटाळा यायला लागलाय.

थत्तेंची नात गोड आहे एकदम.
मांज्या जर तू हा धागा वाचत
मांज्या जर तू हा धागा वाचत असशील तर मला विचारायचं आहे की, छपरी राजेश वनवास न करता डायरेक्ट अज्ञातवासात कसा गेला. त्याला आधी बायकोसोबत वनवासात पाठवा नंतर अज्ञातवासात पाठवा.हे नाय जमलं तर राजेशच्या बायकोला वाईल्ड कार्ड एन्ट्री देऊन बिग बॉसच्या घरी बोलवा.
मांज्या
मांज्या
(No subject)
सुशांत चा क्लोजप आला की
सुशांत चा क्लोजप आला की समजतंच आता भोकाड पसरणार म्हणून. हल्ली तर एक टॉवेल घेऊनच बसलेला असतो!फार विनोदी झालाय तो


परवा एक लिहायचं राहिलंच. रेशम राजेश च्या वस्तू आवरत होती स्टोर रूम मधे ठेवायला. आस्तादने लक्षुमण गिरी करून ती बॅग आणि इतर वस्तू उचलून तिकडे न्यायला तिला मदत केली. पण राजेश चा प्रोटीन पावडर चा डबा मात्र जणु काही तो त्याचा अस्थि कलश असल्यागत रडत रडत ती स्वतःच घेउन गेली. असलं हसायला आलं मला
काल मला मेघाचे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणे आवडले. रेशम नेही ते बर्यापैकी स्पोर्टींगली घेतले असे वाटले. नंतर तिने सईला दिलेली कॉम्प्लिमेन्ट आणि मिठी वगैरे मारलेली पाहून नवल वाटले. असेल काहीतरी स्ट्रॅटेजी. अर्थात इनडायरेक्टली तिला तू स्वार्थी नाहीस म्हणणे = मेघाला स्वार्थी ठरवणे हे आलेच.
अनिल-उषा चा रँप वॉक आणि नंतरचे एकमेकाला नॉमिनेशन पण मस्त मजेशीर होते. सईने अॅज युज्वल टास्क मधे तो बरोबर करून आणि वर योग्य ते इमोशन्स वगैरे दाखवून १००% मार्क मिळवले. फॅमिली गर्ल, लॉयल फ्रेंड, सेल्फलेस वगैरे टायटल्स मिळवली ती वेगळीच. बाकी सगळे यथा तथा च वाटले.
नंतर जेव्हा सई, मेघा, पुष्कर राजेश गेल्यामुळे घरातले वातावरण बदलले असं म्हणाले तेव्हा राजेश ची रिअॅक्शन नाही दाखवली. बाकी त्याचे ते मेरे महबूब इनायत वगैरे टिप्कल ड्रामा
आज काहीतरी जोकर चा मेकप वगैरे टास्कदिसते आहे.
मैत्रेयी आज बिबॉ चे घर
मैत्रेयी आज बिबॉ चे घर पाळणाघर होणारे बहुधा.
पुष्कर कधीही त्या ग्रुपमध्ये
पुष्कर कधीही त्या ग्रुपमध्ये जाऊ शकतो, काल मेघाची तक्रार मारकी म्हैस, जुई बसल्या होत्या त्यांच्याकडे जाऊन करत होता, नंतर जुई कॅप्टनशीपच्या हक्काने मेघाला सांगायला उठली तशी मारकी म्हैस बोलली "बस ते त्यांचं बघून घेतील, तू कशाला मध्ये पडतेस". आता तसं पाहायला गेलं तर हा चांगला चान्स होता मेघा पुष्करमध्ये भांडण लावायला पण शेवटी मारकी मारकी म्हैसच ती, मेंदू गुडघ्यात, लक्ष चरण्यात आणि याच्या त्याच्याकडे रागाने बघण्यात.
कोन मार्की म्हैस?
कोन मार्की म्हैस?
कोन मार्की म्हैस?>>>>रेशम
कोन मार्की म्हैस?>>>>रेशम
हळू हळू घरातील रीलेशन्स चे
हळू हळू घरातील रीलेशन्स चे डायनॅमिक्स बदलत आहेत.. सई आणि मेघा ला तोडायचे डाव सुरू झाले आहेत. खरे तर या दोघींना तोडू शकणारा एक बेस्ट मनुष्य म्हणजे- पुष्कर. कारण तो दोघींनाही जवळचा वाटतो. रेशम गँग ने जर पुष्कर ला मॅनिप्युलेट केले तर त्यांचा नक्कीच फायदा होईल. मला वाटते आस्ताद ने ही जबाब्दारी घ्यायला हवी. तो करू शकेल..
थत्ते आणी आऊ यांच्यात ऊंदीर मांजर खेळ सुरूच आहे. काल थत्ते नी पुन्हा एक्दा मस्त गुगली टाकली होती आऊ ना झाडावर चढवून.. तेव्हा आऊं च्या चेहेर्यावर आनंद अगदी मावेनासा झाला होता. दोघांनी एकेमेकांना सेफ करण्याची संधी होती.. पण आऊं चा ईगो परत आडवा आला. आणि आता दोघेही नॉमिनेट झालेत.
सुशांत राव ना रडण्यात काल पुष्कर ने देखिल टफ फाईट दिली..!
बहुतेक या वेळी आपण बाहेर जाणार याचा आनंद जुई च्या चेहेर्यावर दिसला.. खूष झाली होती.
राजा बाबूंचा 'मेरे मेहबूब कयामत होगी' मोड आवडला...
रेशम चे राजेश ला मिस करणे आवडले... आणि मागे गाणे पण कातिल सुरू होते: सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.
काही गोष्टी मात्र स्पष्ट झाल्या आहेतः

१. सुशांत ला अज्जीबातच रहायचं नाहीये तिथे..
२. आपण ईथे राहण्यास तेव्हडे मानसिक सक्षम नाही हे जुईला कळून चुकले आहे, तीने तसे कबूल केले
३. This wasn't my idea of spending time in Big Boss - ईती रेशम.I think she was hoping for romantic gate away instead
4. एकवेळ राज आणि ऊध्दव एकत्र येतील पण थत्ते आणि आऊ यांत ती शक्यता अज्जीबात नाही... त्यामूळे दोघे शेवटपर्यंत एकमेकाला नॉमिनेट करत बसतील..
एक मान्य करावे लागेल- एकूणात बि बॉ च्या घरात पुरूषांपेक्षा स्त्रीया जास्ती स्ट्राँग ठरल्या आहेत, सर्वार्थाने.
तेव्हा एखादा स्ट्राँग यंग मॅन घरात येणे आता आवश्यक आहे.
रेशम भोकांड पसरवतांना अजिबात
रेशम भोकांड पसरवतांना अजिबात चांगली दिसत नाही
मला वाटते आस्ताद ने ही
मला वाटते आस्ताद ने ही जबाब्दारी घ्यायला हवी. तो करू शकेल..>>> आस्त्या ने ऑलरेडी घेतली की जबाबदारी...'मला फक्त अर्धा दिवस दे' म्हणत...जणू काही दाजींच्या खूनाचा बदलाच घेणारेत आता..
अरे काय चाल्लंय काय! नाही वाटत तो सफल होईल.. सई व मेघा जास्तीत जास्त १ आठवडा भांडून परत येतील एकत्र आणि तसं नाही झालं तरी फार फरक पडणार नाही. दोघींच्यातही इंडिव्हिज्यूअल स्पोर्टिंग स्पिरीट आहे. तो पुश्क्या मात्र तिकडच्या ग्रूपमध्ये गेल्यास चांगला असूनही त्याचं ब्रेनलेस माकड होईल, स्मिता सारखं.
एक मान्य करावे लागेल- एकूणात
एक मान्य करावे लागेल- एकूणात बि बॉ च्या घरात पुरूषांपेक्षा स्त्रीया जास्ती स्ट्राँग ठरल्या आहेत, सर्वार्थाने.
तेव्हा एखादा स्ट्राँग यंग मॅन घरात येणे आता आवश्यक आहे.>>+१११
I want to see megha, pushkar,
I want to see megha, pushkar, sai and smita in one group!
काल मला मेघाचे स्ट्रेट
काल मला मेघाचे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणे आवडले. रेशम नेही ते बर्यापैकी स्पोर्टींगली घेतले असे वाटले. >>>> इथे मला वाटले की रेशम ने मेघा ला उचकवले खरे बोलायला, आधी मेघा ने ड्रामा केलाच की मला नाही जमणार, तो माझा स्वभाव नाही वगैरे वगैरे अन रेशमला ही माहीत होतेच की मेघा तिला सेफ नाही करणार म्हणून तिने मेघाला किल्ली दिली अन मेघाला खरे बोलावे लागले.
या बिग बॉस च्या घरात मलातरी सगळ्यात जास्त चीड मेघाचीच येते, सई , पुष्कर ठीक आहेत.
बाकी, पुष्कर जेव्हा सई ची कामे करताना सारखे बायकोला सांगत होता की हा फक्त टास्क आहे अन नंतर सईला सांगितले की आम्हा दोघांचा विश्वास आहे एकमेकांवर, ते खूप आवडले
यान्चा कुठलाही टास्क इझी
यान्चा कुठलाही टास्क इझी व्हर्जन वाटतोय, याधिच्या टेलिफोन टास्क मधे बिग बॉस काय म्हणाले हे सान्गायचच नव्हत पब्लिकला आणी लोक मॅनिल्प्युलेट करायची मग, अर्ध रेशन द्यायला लावलेल, कुणाच्या आयब्रो ब्लिच केल्या वैगरे
आत्ताच एक माधुरीच्या बकेट
आत्ताच एक माधुरीच्या बकेट लिस्ट पिक्चर मधले गाणं पाहिलं.. त्यात रेशम आहे.
Pages