पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेवाडच्या ट्रीप ला गेलेलो तेव्हा उदयपूरच्या किल्ल्याला गेलो होतो. तिथे पूर्वीच्या काळच्या राण्यांची काही चित्रे होती. ह्या राण्या एका cart मधे बसून फिरत म्हणे. त्यांना ढकलायला दासी असत. का? तर त्यांच्या अंगांवर इतके दागिने असत की त्यांच्या वजनाने राण्यांना चालता येत नसे.

दागिने हा प्रकार मला कधीच आवड्ला नाही. स्पेशली बांगड्या पैंजण आणि नथ.

इथे सर्व लोक गफूर गफूर बोलतायत....मलिक काफुर होता न तो??? जरा प्लिज प्रकाश टाका जाणकारांनी

श्रध्दानी दिलेली लिंक बरोबर आहे पुस्तकाची.
मला रार आणि नीधप मुळेच माहित झालं पुस्तक, खूपच इंटरेस्टींग माहिती आहे , नक्की वाचा.
मी चुकून लेखक सोहनी लिहिलय , ते सोवनी आहे.

इथे सर्व लोक गफूर गफूर बोलतायत....मलिक काफुर होता न तो??? जरा प्लिज प्रकाश टाका जाणकारांनी>> अरे हो.. माझा टायपो झाला वाटत..

रच्याकने,
जिम सर्भ ची चेहरेपट्टी मला साचा बॅरन कोहेन सारखी वाटते..

<<<ऑथेंटिक वाटेल नाहीतर बॉलिवूड चे उथळ प्रॉड्क्ट>>>
ऑथेंटिक सिनेमांना पैसे मिळत नाहीत. आज नट नट्या ऑथेंटिक असाव्या असे म्हणता, उद्या म्हणाल सिनेमात दाखवतात तेहि ऑथेंटिक असावे!!
मग बाजीराव, पेशवीण बाई, खिलजी नाचतात हे खरे आहे का? मस्तानी पाठीशी मुलाला घेऊन मराठ्यांच्या कसलेल्या सैनिकांचा पराभव करते! बहुतेक झाशीची राणी नि मस्तानी यांच्यामधे सिनेमा करणार्‍यांचा गोंधळ झाला!
तो राजगुरु यांच्या बेडरूम पाशी काय करायला गेला होता? त्याने नंतर जे धंदे केले ते बघून तो काही निष्पाप होता असे वाटत नाही.

म्हणजे उगाच आपला स्पेशल मसाला घालून भाजी करतात तसा सिनेमा.
त्याशिवाय त्या सिनेमांना पैसे मिळाले असते का? नि पैसे नसतील तर सिनेमा कशाला काढायचा?

मी तर म्हणतो पुढच्या सिनेमांमधे अफजुल्खान, शिवाजी, वगैरे नाचतात असाहि सीन असेल. राम, रावण पण नाचतात. स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहेरु, गांधी एक झकास नाच करतात!! इंदिरा गांधी पण!
फक्त योग्य लोकप्रिय नट निवडायला पाहिजेत. सलमान खान अजून लोकप्रिय असेल तर, नाहीतर रणवीर कपूर आहेच. इंदिरा साठी दीपिका, नाहीतर इतर कुणी!
लै पैका!

असो, हे सर्व तुम्हाला माहित असेलच. नाहीतरी लोक सिनेमाची चर्चा करताहेत, खिलजीचे काम करणार्‍या नटावर लोक खूष, त्यांना काय माहित नाही खरा खिलजी भारतावर आक्रमण लरणारा, हिंदू धर्मावर अन्याय करणारा होता?

मी तर म्हणतो पुढच्या सिनेमांमधे अफजुल्खान, शिवाजी, वगैरे नाचतात असाहि सीन असेल>> अगदी अगदी!

भन्सालीने शिवाजीमहाराजांवर सिनेमा काढू नये, नाहीतर महाराज मावळ्यांबरोबर पोवाडा गातायत, मावळे नाचत आहेत. अफजुलखानाच्या शिबिरात कव्वाली सादर होत आहे मग खान उठून नाचत आहे, सईबाई आणि सोयराबाई जिजाबाईंसमोर हम साथ साथ है मधल्या मैया यशोदा टाईप नाच करत आहेत आणि मग जिजाबाईही त्यात सामील होत आहेत (कभी खुशी कभी गम च्या जया बच्चनसारख्या), शिवाजीमहाराज मोहिमेहून आल्यावर जिजाबाई त्यांना प्रेमाने अपने हाथोंसे बनाया हुवा गाजरका हलवा खिलवत आहेत...अशी काहीतरी कल्पना करून अंगावर भीतीचा काटा आला Sad

हा हा, अशोक सराफचे घुमर बेस्ट!>> Rofl पहिल्यांदा अशोक सराफचे घुमर पाहिल्यापासून, प्रत्येक वेळी ऐकताना त्याचाच नाच डोळ्यापुढे येतो.

Submitted by नन्द्या४३ on 7 February, 2018 - 22:06 >>>> पोष्ट पटली अन आवडली.

आधी मलाही बघायचा होता हा सिनेमा, अगदी थेअटरात जावुन, पण त्या करणी सेनेमुळे घरच्यांन्नी जावु दिले नाही अन आता ईच्छाच नाहीये

आपण जौहर म्हणतो जुन्या काळातले. पण कालच जालावर फोटो पाहिला. रशियाचे विमान सिरीआने पाडले रशिअन पायलट सेफली इजेक्ट झाला पण शत्रूच्या पक्षी सिरीअन आयसिसच्या तोंडी पकडले जाउ नये म्हणून आकाशातच
स्वतःच ग्रेनेड उडवून शहीद झाला. धिस टेक्स सीरीअस गटस.

आपण जौहर म्हणतो जुन्या काळातले. >>>>>>> जौहर करणे योग्यच होते असे मला वाटते. वर काही प्रतिसादात लिहिले आहे की बलात्काराने आयुष्य संपत नाही म्हणून जौहरचे उदात्तीकरण करणे योग्य नाही वगैरे .... पण जर आयुष्यभर बलात्कारच होणार याची भिती असेल तर.... तर ते संपवणे योग्य नाही का?
अर्थात एखादी स्त्री काय विचार करते हे मी पुरुष म्हणून नेमके सांगू शकत नाही, कारण ही भिती ही किळस मी कधी अनुभवली नाही. पण मी जिथून विचार करतोय मला त्या परिस्थितीत जौहर हा योग्य मार्ग वाटला.

अशोक सराफचं घुमर येउन झाले काही महिने, फेसबुक वर व्हायरल झालं होतं.
इथे बर्याच लोकांनी अत्ता पाहिले वाटतय

वा, वा. मराठी सिनेमात हिंदी सिनेमांसारखे नाचणे नि हिंदी गाणी. मराठी सिनेमा मराठी भाषेप्रमाणेच समृद्ध झाला!
किति दिवस लावण्या नि तमाशातले नाच बघणार!
आता सुपरमॅन, बॅटमॅन, थोर, हल्क यांच्या सिनेमांच्या कॉप्या करा! नाहीतर स्टार ट्रेक, स्टार वार्स वगैरेच्या. पैसे मिळतात त्यांना.

काही नवीन तर मराठी लेखक, कवी यांना येतच नाही. ज्या कुणाला जमते त्यांचे सिनेमे एकतर बहुतेकांना समजत नाहीत, किंवा अस्सल मराठमोळ्या बाण्याने त्यांच्यावर फक्त टीका, तेहि चोरून सिनेमे पाहून, पैसे देऊन बघतच नाहीत.

https://www.youtube.com/watch?v=9aoUpCXY7uk

आज हे बिन्ते दिल गाणे पाहिले... आई ग्ग.. आचरटपणात ते खलीबली परवडले. तो अरिजित गाण्यात आतिफ बनायला बघत होता, आणि रणवीर सिंग आदाकारीत शक्ती कपूर बनायला बघत होता.. सिरीअसली.. अश्या इमेजमध्ये वावरला आहे तो चित्रपटात? आणि हा खिलजी क्रूर वाटलाय? की करणी सेनेचा विरोध मावळावा म्हणून त्याचे सीन पुन्हा शूट करून खिलजी आचरट बनवलाय? दिपिकासाठी बघायचा होता.. पण आता अवघड वाटतेय

मुव्ही कुठेही इन्टेसीफाय होत नाही, शाहिद आणी दिपिकाची केमेस्त्रि अजिबात जमली नाहिये, शेवटचा जोहर सिन खरतर अन्गावर यायला हवा पण बॅन्डवाल्यासारख्या सगळ्या एकाच प्रकारच्या साड्या नेसुन चैकात रन्गित-तालिम केल्यासारख्या फेर्‍या मारतात, दिलेल्या टेप वर उभ्या राहतात... सगळच आखिव-रेखिव , अल्लादिन खिलजी मात्र फर्मास जम्वला आहे रणविरने , तो क्रुर पेक्षा विक्रुत जास्त वाटतो .
दिपिका ऑन अ‍ॅन्ड ऑफ पद्मावती वाटते, बोजड नथण्या आणी कपड्यात अवघडुन वावरत राहते, जोहरच्या सिन मधे दिलेला लान्ब डायलॉग बोलुन टाकते चेहर्‍यावर शुन्य भाव, नवरा गेल्याची बातमी एकली तरी तिच्यात काहिही हलत नाही जस काही एक्पेटेडच न्युज आलिये.

नवरा गेल्याची बातमी एकली तरी तिच्यात काहिही हलत नाही जस काही एक्पेटेडच न्युज आलिये.>>>>
ती तिला एक्सपिकटेडच असते,
केसारिया बाणा परिधान करून राजपूत जेव्हा युद्धाला उतरतात तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करू असे ठरवूनच जातात.
रादर उद्या तो परत येणार नाही हे तिला माहीत असते ,म्हणून तो रात्रीचा ओढणीवर छाप उमटवायचा सीन आहे.

हे एक वाक्य सोडता बाकीच्या प्रतिसादाला +1 Happy

बेकार वाटला.
कंटाळा आला शेवटी! करा एकदाचा जोहार आणि संपवा हा त्रास असं झालं. काय काय त्या रजपूतांचे उसूल! असले मूर्खासारखे उसूल असले की हेच होणार!
इतक्यात प्राईमवर आलाय हे समजल्यावर तर फारच वाईट वाटलं. Lol

नवरा गेल्याची बातमी एकली तरी तिच्यात काहिही हलत नाही जस काही एक्पेटेडच न्युज आलिये.>>>>
ती तिला एक्सपिकटेडच असते,
केसारिया बाणा परिधान करून राजपूत जेव्हा युद्धाला उतरतात तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करू असे ठरवूनच जातात.
रादर उद्या तो परत येणार नाही हे तिला माहीत असते ,म्हणून तो रात्रीचा ओढणीवर छाप उमटवायचा सीन आहे.
<<<
+१

Pages