आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाय द वे कांदा व लसूण हे राक्षसांचे अनुक्रमे मूत्र व मल असते असे उत्तर भारतीय कथेकरी सांगत असतात.

बकवास ,मूर्खपणा, ह्या पलीकडे ह्याला कचऱ्याची पण किंमत नाही

@ वावे
लिहिलं आहे की.
grey लंगूर ही पूर्वीपासून आहे. तिकडे त्यांना वांडर म्हणतात. नवी जात सीमेवरच्या कर्णाटकी टापूतून उत्तरेकडे येते आहे.आकाराने थोडी लहान असते. तिचे शास्त्रीय नाव माहीत नाही.

वावे,

सिंधुदुर्गात पण ह्या वानरांचा प्रचंड उपद्रव होतो. केळीच्या बागा, कोवळे नारळ फळ, हे वानर दररोजच उध्वस्त करतात. यातले जेवढे ते खातात त्यापेक्षा अधिक मोडून तोडून टाकतात. शिवाय घरांची कौले, बागायतीमधील इतर झाडे सुद्धा या वानरांच्या दमदार हालचाली मुळे मोडकळीस येतात.

गो नि दांडेकरांच्या 'शितु' मधेही वानरांच्या उपद्रवाचा प्रसंग आहे.

स्वान्तसुखाय, सहमत.
" यातले जेवढे ते खातात त्यापेक्षा अधिक मोडून तोडून टाकतात. शिवाय घरांची कौले, बागायतीमधील इतर झाडे सुद्धा या वानरांच्या दमदार हालचाली मुळे मोडकळीस येतात."
अगदी.

अलीकडे वानरांच्या दोन जातींचा उपद्रव कोकणात विशेष वाढला आहे आणि त्याबाबतीत सविस्तर माहिती हीरांना असावी असं हीरांच्या पोस्टवरून वाटलं म्हणून विचारलं. त्याप्रमाणे माहिती मिळाली. धन्यवाद Happy

होय हीरा,

त्याला भरीस भर म्हणून आता सिंधुदुर्गात हत्ती सुद्धा येतात ..दोडामार्ग तालुक्यात ह्या हत्तींच्या धुमकुळामुळे वित्तहानी व जिवीत हानी सुद्धा झाली आहे.

ही २०११ सालची बातमी आहे. त्यात अनेक उपायांचा उल्लेख दिसतोय. उदाहरणार्थ वानरांना आवडणारे खाद्य जंगलातच भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणे, वानरांना पकडणे इत्यादी. यातले कुठले उपाय अवलंबले गेले का?

वानर.
हे कळप बनवून राहतात,माणसाच्या जास्त जवळ येत नाहीत..
जशी माकड माणसाच्या जवळ येतात.
वानर ना माणसाळ त येत नाही..
ते मुख्य पने झाडाची फळं खातात.
फळ झाडांचे नुकसान करतात.
कौलारू घर असतील तर त्यांच्या उड्या मारण्या मुळे ती तुटतात .
माणसावर सहसा हल्ला करत नाहीत.
हे एकत्र असतात कळपात .
त्यांना पकडुन दुसऱ्या ठिकाणी सोडणे हाच एक उपाय आहे

जसे मिळाले तसे पुढे पाठवले:

सस्नेह नमस्कार;
शेती ,बागायत , भाजीपाला यांच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या आणि वानर , माकडे यांच्या रोजच्या त्रासामुळे त्रस्त झालेले आणि *वानर माकडे यांचा कायमचा बंदोबस्त हवा. नुकसानभरपाई नको** ही एकच मागणी आहे अशा सर्व शेतकर्‍यांची /नागरिकांची सभा *बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हॉल, जयस्तंभ, रत्नागिरी येथे सकाळी 10 वाजता* आयोजित केली आहे.

अशी सभा आयोजित करावी असा अनेक जणांचा आग्रह होता .त्यानुसार सभा आयोजित केली आहे. सभेत वानर माकड यांचा कायमचा बंदोबस्त , सुरक्षित आणि भयमुक्त शेती याच्या उपाययोजनाबाबत चर्चा, पुढील दिशा आणि कृती याबाबत निर्णय होईल. . सरकारला वानर माकडे प्रश्न गंभीर नाही असे वाटते. त्याचे गांभीर्य सरकारला कळावे यासाठी आणि ज्यांना हा प्रश्न सुटला पाहिजे असे वाटते त्यांनी मीटिंग साठी उपस्थित रहावे.

**एक दिवस स्वतःच्या प्रश्नासाठी, शेती बागायती वाचविण्यासाठी देऊया**

*टीप:आपली उपस्थिती कळवावी.*

*आपला*
अविनाश काळे,गोळप,
रत्नागिरी.
मो. 9422372212
----------------------------------------------------------------
ह्या बैठकीतून काय निष्पन्न झाले त्याची माहिती अजून हाती आलेली नाही. अशी निवेदने व meetings पूर्वीही घेतल्या गेलेल्या आहेत, पण प्रश्न सुटलेला नाही.

LPG च वापर जेवण बनवण्यासाठी १००% झाल्या मुळे .
डोंगरातील झाडांची तोड कमी झाली आहे.
गेल्या तीनचार वर्ष पासून उन्हाळ्यात पण राहून राहून पावूस पडतो त्या मुळे गवत आणि झाडे ह्यांची चांगली वाढ होत आहे.( अशीच स्थिती राहिली तर वर्षा वण महाराष्ट्रात निर्माण होतील)
पाळीव प्राणी खूप कमी झाल्या मुळे शेतातील बांध,डोंगरात,मोकळ्या जागेत गवत खूप शिल्लक राहते.
त्या मुळे काही प्राण्यांची संख्या वाढली आहे .

नाही हो. उज्ज्वला योजना वाल्या बायकांना या किंमतीत एलपीजी परवडत नाही. त्यामुळे त्या नवा सिलिंडर घेत नाहीत. किंवा गॅसचा वापर कमी ठेवतात.

वाघ बिबळे अन्नासाठी माणसांच्या वस्तीत येण्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. या वानरांना पकडून (केळी देतो म्हणून सांगून) बिबट्यांच्या एरियात सोडून द्यावे. प्रॉब्लेम सॉल्व्ह्ड.

माझी घरामागे चार मोठी बाभळी ची झाडे आहेत.
एक वर्षा आड ती खडसाविच लागतात( म्हणजे काट्या
तोडून त्या झाडाचा आकार कमी करणे).
ते काम नाही केले तर झाडाचा बोजा वाढून ते पावसात वादळाने पडू शकते
. त्या काट्या ज्या सरपणा साठी लोक विकत घेता आता फुकट पण कोणी घेवून जात नाही
अक्षाराह ते कुजून वाया जाते .
एका कुटुंबाचे सहा सात महिन्या चे जेवण ना सहित पाणी गरम करण्या इतके ते असते

२०११ सालची बातमी आहे. त्यात अनेक उपायांचा उल्लेख दिसतोय. उदाहरणार्थ वानरांना आवडणारे खाद्य जंगलातच भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणे, वानरांना पकडणे इत्यादी. यातले कुठले उपाय अवलंबले गेले का>>>>>

माझ्या गावात वानर व माकड दोन्ही आहेत. त्यांना पर्यटकांनी भिकारी बनवले.. त्यांनी कौतुकाने यांना खायला घातले आणि पुढची पिढी जण्गलातुन अन्न शोधुन खाणे विसरली. माकडांना आयते खायला दिले तर त्यांच्या येणार्‍या पिढीवर काय परिणाम होतो हे लिहिलेले बोर्ड आंबोली घाटात जागोजागी लावलेले आहेत पण पर्यटक तिकडे दुर्लक्ष करतात आणि माकडाना खाऊ घालतात. आता माकडे एकटा दुकटा माणुस दिसला तर थेट हातातुन जे असेल ते हिसकाऊन घेतात. सहा महिन्यांपुर्वी घाटात बाईकवरुन येणार्‍या जोड्प्यावर उडी मारुन मागे बसलेल्या बाईच्या हातातली पिशवी माकडाने हिसकाऊन घेण्याच्या प्रयत्नात ती बाई खाली पडुन तिचे दोन्ही गुढगे फुटले. गेले सहा महिने ती हॉस्पिटलात आहे.

ही माकडे घाटात होती ती लॉकडाऊनमध्ये गावात आली आणि आता गावातच स्थिरावली. कळप करुन राहतात. दर आठवड्यात एकदातरी माझ्या घरावर तिन मोठे वानर येऊन बसतात (त्यातल्या एकाचा हात व शेपुट तुटलेली आहे.) त्यांनी मारलेल्या उड्यांमुळे कौले खाली पडुन फुटतात. पेरु, तुतीच्या झाडाची पाने ओरबाडतात, फांद्या तोडतात, भाज्या लावलेल्या मिळाल्या तर उचकटुन टाकतात. शेतात एका वेळेस २५-३० काळतोंडी वानरे येतात, उस, मका, चवळी खातात, उचकटुन टाकतात. त्यांचा एकुण अवतार पाहता त्यांच्यासमोर जायचे धाडस कोणी करत नाहीत.

घाटात लाल तोंडी केडली आणि काळतोंडे वानर दोन्ही आहेत. शिक्षण व काम नसलेली तरुण मुले जशी नाक्यांवर निरुपद्रवी दंगा करत वेळ घालवतात तशी यांची मुले घाटरस्त्यावर दंगा करतात. गाडी येताना बघितली की ती अगदी जवळ येईपर्यंत जागचे हलायचे नाही, शेवटच्या क्षणी उडी मारुन घोळक्यात जायचे, मग घोळकाही ओरडुन स्वागत करतो हा खेळ मी नेहमी पाहते. Happy

जंगले समृद्ध राहिली नाहित म्हणुन वन्य जीव बाहेर पडले, जंगले समृद्ध न राहण्यामागे माणसाचाच हात आहे हे माहित आहे म्हणुन मी गप्प बसते. अर्थात मी करु तर काहीच शकणार नाही पण निदान यांचा राग तरी करत नाही, परिस्थितीचे गुलाम सगळेच आहेत.

दोन आठवड्यांपुर्वी सावंतवाडीनजिकच्या गावात आलेल्या एका हत्तिचा विडिओ इकडे व्हायरल झालेला. दिवसा शेतात फिरत असलेल्या हत्तीचा बंदोबस्त करा ही मागणी असलेल्या बातमीसोबत हा विडिओ होता. मी विडिओ पाहिला. हत्तीण होती कारण सोबत इवलुसे पिल्लु होते आईच्या सावलीत लपलेले. आई मागेपुढे होत होती तसे ते पिल्लुही मागेपुढे होत होते. तिलाच खायला नाही तर त्याला कुठुन मिळणार? जीव गलबलला तो विडिओ पाहुन. काय स्थिती केलीय आपण प्राण्यांची? ते बिचारे पिल्लु कसे शिकणार स्वतःचे संरक्षण करायला? माणसापासुन कोण संरक्षण करणार त्याचे? सगळेच भयण्कर आहे. पृथ्वीवरुन माणुस नष्ट होईल तेव्हा त्याला आधी या सगळ्या पापांची किंमत मोजावी लागेल आणि मगच त्याची सुटका होईल.

ह्या बैठकीतून काय निष्पन्न झाले त्याची माहिती अजून हाती आलेली नाही. अशी निवेदने व meetings पूर्वीही घेतल्या गेलेल्या आहेत, पण प्रश्न सुटलेला नाही.

Submitted by हीरा on 2 August, 2023 - 21:35

सविस्तर आणि माहितीपूर्ण पोस्टसाठी धन्यवाद हीरा. अधिक माहिती मिळाल्यास इथे अपडेट करालच.

LPG च वापर जेवण बनवण्यासाठी १००% झाल्या मुळे .>>>>

कुठुन बातम्या वाचतात देव जाणे.. लोकांना नाही परवडत गॅस. सगळ्यांकडे आहे पण रेशन करुन वापरतात.

इतकी घमासान चर्चा ? मला वाटलेले आरोग्यविषयक प्रबोधन करणारा धागा आहे म्हणून मी लांब राहिलो होतो Proud

सुधा मूर्तींच्या सवयीचा जातीवादी असण्याशी संबंध बराच ओढून ताणून वाटतो. सुधा मूर्तींची एक कादंबरी नुकतीच वाचली त्यात सुद्धा व्हेज नॉन व्हेज बद्दल असले काय काय बरेच आहे. पण त्यात खरा धक्कादायक कंटेंट वेगळा आहे. लक्षात घ्या हे पात्र एक सुशिक्षित परदेशात स्थायिक झालेले पात्र आहे. तर, ह्या बाईंना आपलं नवरा जन्माने नेटिव्ह अमेरिकन आहे हे समजते. हे बिचाऱ्या नवऱ्याला सुद्धा आधी माहीत नसते. तो अगदी सज्जन गुणी असाच असतो. बाईंची प्रतिक्रिया :

"(हा तर )पंजाबी नाही तर रेड इंडीयन आहे. रेड इंडियन म्हटल्याबरोबर डोक्यावर पिसांचे किरीट घालून तोंडाला रंग लावून नाचणारी माणसे तिच्या डोळ्यासमोर आली. आपला नवरा सुद्धा त्यांच्यापैकी एक ? तिचे अंग शहारले. हा मांसाहारी आहे काय ? नरभक्षक असावा काय ? अशा माणसासोबत आपले लग्न झाले ? तिला घाम फुटला"

हिरा यांनी लिहिल्याप्रमाणे कोकणात वांदरे काही ठिकाणी खूप नुकसान करतात, माझं माहेर संगमेश्वर तालुक्यात आहे, मी लहान असल्यापासून त्रास बघितला आहे पण हल्ली काही वर्षे तर प्रचंड, आमच्या घराची कौले फोडली, नाचत रहायचे, आमच्या कौलारू घरावर पत्रे घालावे लागले, बाकी शेती बागायती नुकसान तर करतातच, आमच्याकडे फार नाही आता. सासरी देवगड तालुक्यात हा त्रास फार ऐकू येत नाही, आमच्या गावात तरी नाही तेवढा.

बिबट्या हल्ली दोन्हीकडे आहेत.

साधना, उत्तम प्रतिसाद. आणि केडली हा शब्द आठवता आठवत नव्हता तो तुमच्या प्रतिसादात सापडला. ही केडली. वलाटीत, घाटात असायची ती आता खालाटीत, तळ कोकणातही दिसतात.

माझ्या गावात तरी चुलीवर स्वयंपाक करणारे एक पण घर नाही.

पाणी गरम करण्यासाठी लोकांनी सौर ऊर्जा वापरण्यास सुरुवात केली आहे
मी ते तर सांगत आहे बाभळीच्या काट्या (, त्याला आमच्या
कडे पेटा म्हणतात) फुकट दिल्या तरी कोणी घेवून जात नाही.

Pages