मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."
इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्यांच्या वस्तीत मांसाहार्यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)
मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.
धन्यवादच.
आपण पशूंची खास पैदास वाढवतो
आपण पशूंची खास पैदास वाढवतो पशुधन शेती करून तसेच त्या पशूंना खाणाऱ्या पशूंची कत्तल करून अथवा त्यांना पळवून लाऊन (मग ते उपासमारीने मरतील). नैसर्गिक अन्न साखळी याबाबत आपण मोडली आहे.
मांसाहार व्यक्तिरिक्त इतर कुठल्या बाबतीत (दूध, पायताण, बॅग्ज वगैरेंसाठी चामडे) आपण खास पशुसंवर्धन करतो आणि किती प्रमाणात याचा पण विचार करावा लागेल. मी थोडेफार वाचले त्यातून आपण समजा मांसाहार पूर्ण बंद केला (असे करावे असे मी म्हणत नाही) आणि ते रिसोर्सेस (जमीन, पाणी वगैरे) शेतीसाठी वापरले तरी आपल्याकडे मुबलक प्रमाणात शाकाहारी अन्न उपलब्ध राहील आणि पाणी सुद्धा कमी लागेल. पण याबाबत माझा अभ्यास नाही. यासाठी हा सर्व विचार केला तर कदाचित चित्र वेगळे असु शकेल. सगळेच पूर्ण व्हेगन झाले तरी तुम्ही म्हणता तसा विपरीत परिणाम होईल कदाचित. पण सध्या आपण जेवढे पशुधन वापरतो त्यामुळे संतुलन आहे असे नाही हा मुद्दा आहे.
शाश्वत विकासाचे अभ्यासक सांगतात आपण (मुख्य करून जास्त मांसाहारी असणारे देश) मांसाहार व दुग्धाहार कमी करणे गरजेचे आहे. जिज्ञासा याबाबत सांगू शकतील नक्की काय ते.
----
या विषयावर पुढे योग्य त्या धाग्यात चर्चा करता येईल
रस्त्यावर फेकून देण्याचे कारण
रस्त्यावर फेकून देण्याचे कारण अमाप पिक आहे हे नाही आहे. मायबोलीवर गंगाधर मुटे यांचा एक धागा आहे, वांग्यांची शेती बद्दल.... फार कमी वेळांत या गोष्टी ग्राहकां पर्यंत पोहोचवाव्या लागतात.>>>>>
योग्य भाव मिळत नाही म्हणुन फेकतात. योग्य भाव मिळत नाही कारण सगळ्यांचे पिक एकत्रित आले, व्यापार्यांनी भाव द्यायला नकार दिला, योग्य भाव मिळेपर्यंत शेतकर्यांना पिक साठवुन ठेवण्याची सोय नाही.. कडधान्ये, तांदुळ, गहु फेकण्याच्या घटना कितपत घडतात?
असो. धाग्याला त्याच्याच रुळांवर राहुदे..
मीडिया अजेंडा चालवते आणि अती
मीडिया अजेंडा चालवते आणि अती शिक्षित लोक पण त्याची शिकार होतात .
विज्ञान विषय मासिकात जे दावे प्रसिद्ध केलेले असतात त्या मधील बहुसंख्य दावे हे fraud असतात.
खाद्य कंपन्या,व्यक्ती गट, इत्यादी इत्यादी स्वतःचे संशोधक पाळून आहेत ..सर्रास खोट्या बातम्या विज्ञान च्या नावाखाली पसरवल्या जातात .
काही उदाहरणे
१) मांस साठी पशू लागतात आणि त्यांची वाढ करण्यासाठी जी जमीन,पाणी वापरले जाते,.
त्या मुळे नैसर्गिक साधन संपत्ती चा विनाश होतो.
ते पशू जे अन्न पचन करतात त्या मुळे मिथेन वस्तू निसर्गात सोडला जातो .
मग उपाय काय तर कृत्रिम मांस खा.
आता माहीत पडत आहे कृत्रिम मांस निर्मिती मध्ये सर्वात जास्त प्रदूषण होत आहे.
कृत्रिम मांस चे महत्व वाढवण्यासाठी खोटे डावे करणारे विकत घेतलेले संशोधक च होते.
आता मानव ह्यांच्या प्रश्नाकडे.
रासायनिक खत,खूप पाण्याचा वापर (म्हणजे बारमाही शेती) शेणखत चा अभाव .
ह्या मुळे कित्येक हेक्टर जमीन नापीक होत आहे.
त्या जमिनीत क्षार वाढत आहेत
गुजरात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन नापीक झालेली आहे.
ही डॉक्युमेंट्री बघितली आहे..
आणि हे सत्य च आहे.
पशु च नसतील तर शेणखत पण नसेल,कंपोस्ट खत नसेल, .
आणि जमिनीचा कसं टिकून राहण्यासाठी ह्याची गरज असतेच.
फक्त रासायनिक खत वापरली तर जमीन नापीक होईल काही वर्षानंतर..मग काही ही करा कोणतेच पीक येणार नाही
पृथ्वी वर सूक्ष्म जिवाणू ,विषाणू पासून प्रतेक प्राणी वनस्पती ह्याचे काही तरी कार्य असते .नैसर्गिक चक्र सुरू राहण्यासाठी.
अगदी सिंपल आहे.जास्त डोक वापरायची पण गरज नाही
पशुधन फक्त मांस निर्मिती साठी
पशुधन फक्त मांस निर्मिती साठी च असते .
आणि त्यांचा बाकी काही उपयोग निसर्ग चक्रासाठी नसतो का?
असा प्रश्न त्या शाहण्या vegan अती हुशार व्यक्ती ना विचारा.
कोंबडी ची विष्ठा, बकरे , शेळ्या ह्यांचे मलमुत्र, गायी,बैल, म्हैस ह्यांचे मलमुत्र .
कशासाठी वापरले जाते आणि त्याचे महत्व काय आहे हे पण विचारा.
ते vegan लोक त्या वर च जगत आहेत ह्याची जाणीव त्यांना करून ध्या
कोंकणात अलीकडे वानारांच्या
प्र. दोनदा पडला, काढून टाकला
कोंकणात अलीकडे वानारांच्या
कोंकणात अलीकडे वानरांच्या दोन जातींचा उपद्रव फारच वाढला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातल्या काही लोकांनी एक बैठक भरवून कलेक्टरला एक निवेदन देण्याचे ठरत आहे. ( सभा काल २ ऑगस्ट रोजी होती.) आफॉन्स आणि इतरही फळांचे, मांडवांचे शिवाय विशेषत: नारळ बागांचे खूप नुकसान होते आहे. कारण ती फळे वरच्यावर आकाशात तोडून खाता येतात. त्यासाठी मानवी उंचीवर उतरण्याचे कारण नसते.
नुकसान भरपाई देणे हा
नुकसान भरपाई देणे हा व्यवहारिक मार्ग आहे. वानर न ची हत्या करून त्यांची संख्या कमी करणे हा चुकीचा मार्ग आहे
मानव, शेती करूनही आपण मूळची
मानव, शेती करूनही आपण मूळची अन्नसाखळी मोडलीच आहे की! ज्या गोष्टी गवत म्हणून कुठेतरी उगवत असतील त्यांची भरमसाठ वाढ आपण केली आणि ती शेती करण्यासाठी लागणार्या जमिनीसाठी इतर न खाल्ले जाणारे कित्येक वृक्ष नष्ट करून टाकले. कुणीच धुतल्या तांदळाचे नाही. शाकाहारींचे हातही लाल ... किंवा हिरवे झाले आहेत. (आता मांसासाठी वाढवल्या जाणार्या प्राण्यांच्या भुकेच्या पूर्ततेसाठी अधिक जास्तीची शेती - हा मुद्दा मान्य आहे. पण ...). थोडक्यात काय, हंटर गॅदरर झालो, गुहेत राहू लागलो, तरच आपण खरे पर्यावरणप्रेमी असल्याचा दावा करू शकू.
आता पृथ्वी वर मानवाचे राज्य
आता पृथ्वी वर मानवाचे राज्य आहे( दुर्भाग्य आहे)
जे पशू ,पक्षित उपयोगाचे त्यांचेच अस्तित्व टिकेल ज
जे उपयोगाचे नाहीत ते माणूस नष्ट करेल.
सूक्ष्म जीव सोडून हे सूक्ष्म जीव माणसाचे बारसे जेवले आहेत.
ते पहिले माणसाला नष्ट करतील .
Covid नी झलक दाखवली आहे
गायी, म्हैसी,बैल,कुत्रा,मांजर,, डुक्कर,माकड,साप, कोंबड्या, कबुतर खूप मोठी लिस्ट आहे.
ह्यांचं उपयोग मांस साठी संपला की त्यांचे अस्तित्व संपलेच समजा.
तात्काळ फायदा कोणापासून होतो इतका विचार करण्या इतकीच माणसाची बुद्धी आहे.
दीर्घकाळ फायदा कसा होतो ह्याचा विचार करण्या इतका माणूस हुशार नाही.
वरील सर्व प्राणी नष्ट झाले तर
माणसाचे अस्तित्व पण नष्ट झालेच म्हणून समजा
विराट राजाची गुरे पळवून नेली
विराट राजाची गुरे पळवून नेली ह्या घटनेशी संबंधित इरावतीबाई कर्वे ह्यांनी एक अस्पष्ट शंका व्यक्त केली आहे. नुसत्या दूध तूप लोण्यासाठी फक्त राजवाड्यात खिल्लारे पाळली जात नसतील. आणि पशुधन चोरणे हे मोठ्या लढाईचा विषय ठरू शकला तो फक्त दुधातुपासाठी नसेल. दुर्गाबाईंनी सुद्धा असेच लिहिले आहे.
मागील दीड पान मांसाहार करणे
मागील दीड पान मांसाहार करणे कसे चुकीचे , या बाबत चर्चा चालली आहे,
मेल्यानो विषय धरून लिहा रे.
मांसाहार करणे चुकीचे सांगायला मस कारणे असतील पण मला मांसाहार करायचा आहे, तू मांसाहार केलास तर तर तू वाईट आणि मी शाकाहार करते म्हणजे मी सती सावित्री म्हणणारी तू कोण भवानी ?? या प्रश्नावर जरा उत्तरे द्या कृपया
<<शेती करूनही आपण मूळची
<<शेती करूनही आपण मूळची अन्नसाखळी मोडलीच आहे की! >> होय. सद्य परिस्थिती जी आहे त्याने संतुलन साधले गेले आहे असे नव्हे हा मुद्दा आहे. ग्लोबल वार्मिंग रोखण्यास व शाश्वत विकासासाठी पशुधन कमी करा म्हटले की त्यामुळे भाज्यांची / शाकाहाराची कमतरता होईल असा मुद्दा मांडला जातो. पण वस्तुस्थिती तशी नसेल.
आपण पशु मांस खातो त्यामुळे अन्नसाखळी टिकून आहे असे नसून आपण पशुधन शेती करून पैदास वाढवली हे निदर्शनास आणुन देण्यास ती अन्न साखळी आपण मोडली आहे असे लिहिले आहे. सर्वांसाठी अन्न वस्त्र निवारा आणि इतर सुविधा, लक्झरी यांची सोय करून पर्यावरण ऱ्हास कमी करून विकास शाश्वत ठेवणे याकरिता कदाचित आपल्याला पशुधन शेती कमी करावी लागेल.
प्रत्येक पशू पर्यावरणाला कसा
प्रत्येक पशू पर्यावरणाला कसा उपयोगी आहे .
गरजेचा आहे आणि त्याला कृत्रिम पर्याय नाही.
मानव ह्या वर वाचन करा.
उगाच मुद्धा रेटू नका..
एक गाय पाळण्यास रोज किती खर्च येतो हे माहीत आहे का.
खर्च पाळणारा करतो आणि प्रत्यक्ष फायदा लोक पैसे देवून घेतात
पण अप्रक्तश्य फायदा जो होतो तो लोकांना फुकट मिळतो
मानव .
तुमचा पर्यावरण म्हणजे काय हाच अभ्यास कच्चा आहे
काल एक व्हेगन इंस्टाग्रामर
काल एक व्हेगन इंस्टाग्रामर फक्त फणस आणि ड्युरिऑन वर डायट ठेवल्याने गेली.
मूळ मुद्दा व्हेज नॉनव्हेज व्हेगन सर्व जीवन पद्धती वाल्याना शरीराला योग्य पोषण मिळावे.ते मिळत नसेल तर योग्य त्या गोळ्या घेऊन मिळवावे.इतका सेन्स समाजात सर्वांत आणता आला तरी भरपूर आहे.
अमेरिकेत हे सिध्द झाले आहे .
मी अनु .
बरोबर आहे.
स्वतःची बुध्दी न वापरता कोणत्या तरी धार्मिक विचाराने प्रभावित
कोणत्या तरी fraud विज्ञान विषयी पुरावे त्या धार्मिक गुरू नी दिल्या मुळे लोक वेड्या सारखी वागतात..
आणि जीव गमावून बसतात
अगदी सोप आहे.
अगदी सोप आहे.
रासायनिक खताचे लगेच परिणाम होतात आणि उत्पादन वाढते.
कोणतीही वनस्पती तेव्हाच वाढते आणि फुलते जेव्हा मातीचा दर्जा योग्य असतो.
मतिविना शेती होवू शकते ही सध्या अफवा आहे पण ती फक्त अफवाच आहे.
वरच्या धरातील मातीच वनस्पती वाढी साठी योग्य असते.
पृथ्वी च्या खालच्या स्तरातील माती योग्य नसते..
पशु ,पक्षी, ह्यांची विष्ठा ,आणि मल मूत्र च वरच्या धरतील मातीचा कस टिकवून ठेवतात.
तो टिकवून ठेवला नाही तर जमीन नापीक होते.
हे फक्त एक कारण आहे.
अशी अनेक कारण आहेत .निसर्ग चक्र खूप किचकट आहे.
वनस्पती ची माती धरून ठेवतात, झीज होवून देत नाहीत .त्यांचा पाला पाचोळा च जमीन सुपीक बनवता त .
हे चक्र आहे.
नैसर्गिक गोष्टी ला कृत्रिम गोष्टी पर्याय कधीच होवू शकत नाहीत
कृत्रिम गोष्टींना खूप मर्यादा आहेत
प्रोटीन supplement, vitamins supplements.
ह्यांचं दर्जा नैसर्गिक सोर्स पेक्षा खूप low दर्जा चा असतो.
अवांतर.
अवांतर.
एक पेशिय, सुश्म जिवाणू पासूनच बहु पेशीय माणसा सारखे प्राणी निर्माण झाले..
माणसाचा गर्व, सर्व ज्ञानी असण्याचा विश्वास.
हे सूक्ष्म जीव च तोडणार आहेत..
विनाशाच्या मार्ग वर तेच घेवून जाणार आहेत..
Circle पूर्ण..जेथून निर्मिती तिथेच विनाश
मी हिंदू धर्म हा सर्व श्रेष्ठ
मी हिंदू धर्म हा सर्व श्रेष्ठ धर्म समजत होतो.
वास्तू कला,राज धर्म,जीवनाचे सत्य, विविध नाती, अवकाश शास्त्र, वैदिक शास्त्र, अगदी कामशास्त्र पण.
गणित शास्त्र, अगदी सर्व च शास्त्रावर ग्रंथ असणारा एकमेव धर्म .
जिथे एक स्त्री आणि पाच पती हे पण मान्य आहे.
जिथे पतिव्रता ही कल्पना पण मान्य आहे.
पण लसूण खाऊ नका,कांदा खाऊ नका, मांस खाऊ नका असे बुध्दीची दिवाळखोरी हिंदू धर्माचे नालायक आताचे रक्षक दाखवतात .
तेव्हा हिंदू धर्माचा अभिमन बिलकुल वाटत नाही.
लसूण आणि कांद्या नी ह्यांचं कोणता धर्म भ्रष्ट होतो.
लसूण आणि कांदा शरीरास उपयोगी च आहे .
त्या मुळे कोणती जीवित हत्या होते.
Pure vegan लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत आहेत.
मानव, मुद्दा लक्षात आला आणि
मानव, मुद्दा लक्षात आला आणि पटला
पटला तर .
पटला तर .
सर्व ग्राउंड रिॲलिटी च संदर्भ देवून मानव ह्यांचं मुद्धा का पटला .
ह्याचे स्पष्टीकरण. ध्या ...
हवेत गोळीबार नको
मानव पृथ्वीवर fraud संशोधक जे
मानव पृथ्वीवर fraud संशोधक जे कोणत्या तरी कंपनी साठी काम करतात .
त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आहेत .
हे मी सिद्ध करू शकतो
Hemant, मला क्षमा करा. माझी
Hemant, मला क्षमा करा. माझी एवढी पात्रता नाही. _/\_
@हेमंत , पण वक्त सिनेमात "कौन
@हेमंत , पण वक्त सिनेमात "कौन आया के निगाहोंमें .. " हे गाणं तर मीना शौरी ने गायलेलं नाही. ते आशाने गायलं आहे.
हीरा, कोकणात अलीकडे (दोन
हीरा, कोकणात अलीकडे (दोन प्रकारच्या) वानरांचा उपद्रव वाढला आहे म्हणजे गेल्या किती वर्षांपासून? कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातच की उर्वरित कोकणातसुद्धा?
(हे अवांतर नाही. वर हीरा यांनी लिहिलंय वानरांबद्दल म्हणून विचारतेय!)
ओ नवीन सर
ओ नवीन सर
तुम्ही प्रत्येक ठिकाणी मत देण्याची आवश्यकता आहे का?
हे अवांतर नाही. >>
हे अवांतर नाही. >>

बाकी मानव +१.
मा पृ , सहमत आहे. जंगले
मा पृ , सहमत आहे. जंगले कापून तिथे मका लावणे, मग तो गुरांना खाऊ घालणे यापेक्षा तिथे माणूस खाऊ शकेल असे पीक घेणे पर्यावरण पूरक आहे. या आणी अशा कारणाने जाणीवपूर्वक शाकाहारी वा व्हीगन जीवन जे स्वीकारतात त्यांच्या बद्दल आदर आहेच.
बाय द वे कांदा व लसूण हे राक्षसांचे अनुक्रमे मूत्र व मल असते असे उत्तर भारतीय कथेकरी सांगत असतात.
पृ , सहमत आहे. जंगले कापून
पृ , सहमत आहे. जंगले कापून तिथे मका लावणे, मग तो गुरांना खाऊ घालणे यापेक्षा तिथे माणूस खाऊ शकेल असे पीक घेणे पर्यावरण पूरक आहे. या आणी अशा कारणाने जाणीवपूर्वक शाकाहारी वा व्हीगन जीवन जे स्वीकारतात त्यांच्या बद्दल आदर आहेच.
तुम्ही लोक नक्की पृथ्वी वासी आहात की पृथ्वी पासून १०० प्रकाश वर्ष दूर असलेल्या ग्रहावरून आलेला आहात.
पाळीव प्राणी काय खातात हे पण माहीत नाही.
माणसाला जे अन्न लागते त्याचे टाकावू पार्ट प्राणी खातात.
.
निसर्ग निर्माता माणूस नाही अती प्रचंड हुशार असा निसर्ग आहे.
साखर ऊसापासून बनते उसाची पान पाळीव प्राणी खातात.
ज्वारी चे दाने माणूस खातो त्याचे बाकी झाड प्राणी खातात.
मैदा किंवा गव्हाचे पीठ माणूस खातो त्याच्या सलि ज्या असतात ते प्राणी खातात
तेलबिया पासून बनलेले तेल माणूस वापरतो आणि चोथा प्राणी खातात
केळे माणूस खातो kelachi साल प्राणी खातात.
आंबे माणूस खातो त्याच्या sali प्राणी खातात
प्राण्यांना वेगळे पीक घ्यावे लागत नाही.
अमेरिका हा अती स्वार्थी देश आहे भ्रम पसरवण्यात एक नंबर.
लोकसंख्या कमी आणि विशाल भूमी त्याच्या कडे आहे.
ते अमेरिकन प्राण्यान साठी वेगळी पीक घेतात .विनाकारण ..
ते जगात भ्रम पसरवतात आणि आपली शिक्षित पिढी मान डोलवत असते
@ वा वे
@ वा वे
Semnopithecus entellus. Grey langur ही वानरांची जात प्राचीनकालापासून कोंकणात आणि पूर्वेच्या भारतीय द्वीपकल्पात वावरते आहे. गणदेवी दमणपासून ते थेट कसरगोड पर्यंत तर मला प्रत्यक्ष माहीत आहे. जेव्हा कोकणातून exodus सुरू झाला, घरे शेती ओस पडू लागली तेव्हा हे वानर रानांतून मोकळेपणाने वसतीत उतरले. आयती बागायत त्यांना मिळाली. नासधूस सुरू झाली. नंतर अलीकडे (तीस चाळीस वर्षांपूर्वी) फलोद्यान वगैरे योजना निघाल्यावर महाराष्ट्रात,कोकणातही मोठ्या प्रमाणावर नव्याने ( कदाचित मुंबईतल्या गिरणी संपाचा परिणाम म्हणून?)बागायती सुरू झाली. आणि वानरांचे खाद्य, पैदास आणि उपद्रव वाढला. आज तो नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या एका दोन वर्षांत एक वेगळी जात ह्या प्रदेशात दिसू लागली आहे. बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. कोकणातले v blog पाहिले तरी खूप माहिती मिळते.
वेगळी जात म्हणजे कोणती? लाल
वेगळी जात म्हणजे कोणती? लाल तोंडाची का? नेमक्या कुठल्या भागांमध्ये ही जात दिसू लागली आहे?
Pages