‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी
..
‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !
..
- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
..
भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार
..
भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
..
चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__
..
गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी
..
‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे
..
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर
..
‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर
..
‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज
..
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन
..
अॅण्ड फायनली ...............
‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना
..
आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष
अग्गो बाई, मंजो च्या वॉल वरले
अग्गो बाई, मंजो च्या वॉल वरले मेसेज शेअर करून ऱ्हायले जणू?
असे फडतूस मेसेज फक्त इतर
असे फडतूस मेसेज फक्त इतर चित्रपटांच्या वेळेसच पसरवतात पण अक्षय कुमार , अजय देवगण परेश रावल अनुपम खेर सारख्या सरकारी जावई यांच्या वेळेस मात्र देशहिता साठी , राष्ट्रनिर्मिती साठी चित्रपट आवर्जून बघा असे आवाहन आयटी सेल करत असते
तद्दन सडकछाप मंटेलिटी असे मेसेज पाठवणाऱ्यांची असते
दिल्ली के मल्टीप्लेक्स पीवीआर
दिल्ली के मल्टीप्लेक्स पीवीआर डायरेक्टर्स कट में पद्मावत की सबसे ज्यादा कीमत की टिकट(प्लेटिनम सुपीरियर) 2400 रु. हैं। वहीं प्लेटिनम टिकट रेट 2200 रु. है.
http://www.haribhoomi.com/entertainment/padmavati-controversy-padmavat-m...
वर्सोवा १५००, वाशी ७००, बर्याच ठिकाणी ७०० ते ९५०.
Multiplex Association of
Multiplex Association of India has now decided not to screen Padmaavat in theaters across Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh and Goa.
गुजरातेतून मुंबईला येणार्या
गुजरातेतून मुंबईला येणार्या बस्/गाड्या/विमानं फुल होतील .
हे गोवा कुठून आलं मधीच?
हे गोवा कुठून आलं मधीच?
गुरुग्राममध्ये स्कूलबसवर
गुरुग्राममध्ये स्कूलबसवर हल्ला.
पोलीस बघ्याच्या भूमिकेत.
चित्तोडगढमध्ये बायका जोहर करण्यासाठी जमल्यात. एत्यातल्या एकीचं म्हणणं पद्मिनीचा जैहर असाचित्रपट बनवला असता, तर अख्ख्या भारतानी आनंदाने पाहिला असता.
हरयाणा सरकारचा बाबा राम रहीम
हरयाणा सरकारचा बाबा राम रहीम इन्सानच्या ( ज्याला इथले काही लोक फक्त रहीम म्हणतात) वेळचा अनुभव आहेच.
नुस्ता फालतूपणा चालू आहे.
नुस्ता फालतूपणा चालू आहे. मागे काही जण म्हणले त्याप्रमाणे काश्मीरातल्या दगडफेक्या जमावाला जो न्याय तोच या भुरट्यांना मिळायला हवा. यांच्या पण लोकांना पकडा व करा वसूल नुकसान.
पुन्हा एकदा, आपल्याकडे दंगे घडवायला खरंच काही अक्कल लागत नाही. फकस्त चार रिकामी टाळकी जमवून तुमचं याव खतरे मे, त्यांव खतरेमे ची हाळी दिली की होतेय तोडफोड...
लहान मुलांच्या बस वर दगडफेक
लहान मुलांच्या बस वर दगडफेक करणारे शूर असूच शकत नाही..
नाव पद्मावतीचे घेऊन काम खिलजी चे करणारे निर्लज्ज लोक आहे यासर्व प्रकाराला सत्ताधाऱयांचे पाठबळ लाभलं आहे म्हणून इतका धुमाकूळ या तुटपुंज्या संघटनेने घातला.
या प्रकाराला सपोर्ट करणारे राज्यसरकार आणि सगळ्यावर सोईस्करपणे मूग गिळून बसणारे केंद्र सरकार यांचा निषेध
ईथे असे बीजेपी विरोधी चित्र
ईथे असे बीजेपी विरोधी चित्र का उभे केले जातेय?
त्यांनी विरोध केला आहे का या चित्रपटाला?
मोदींनी काय म्हटलेय या प्रकरणावर? अर्थात त्यांना हे प्रकरण तितके महत्वाचे वाटते का नाही हा देखील एक मुद्दा आहे. एका फुटकळ(?) चित्रपटावरून उठलेल्या वादावर खुद्द पंतप्रधानांनी मत व्यक्त करायची गरजही नाही.
ऋन्मेष,
ऋन्मेष,
बहुतेक राज्यात सरकार bjp चे आहे की नाही?
सरकारने (सेन्सॉर बोर्डने) पास केलेला चित्रपट प्रदर्शित होऊ देण्याची जबाबदारी (निर्भय वातावरण निर्माण करायची जबाबदरो) कोणावर असते?
सरकार ने ठरवले तर एकही दुर्घटना न होता चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो,
या उलट सरकार " हा चित्रपट प्रदर्शित झाला तर आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखू शकणार नाही" असे सांगतय सुप्रीम कोर्टाला.
Sc च्या निकाल नंतर चित्रपटगृहना अभय देण्या ऐवजी, गुंडांचा बाबूलबुवा उभा करून (संदर्भ सकाळी टाकलेली लिंक आणि मराठीत केलेल्या कंमेंट्स) मालक चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत अशी व्यवस्था करतेय.
जो हिंसाचार चालू आहे तो केवळ 100%bjp सरकार असलेल्या राज्यात चालू आहे (हरियाणा, गुजरात, राजस्थान, UP , MP, आणि जिकडे पूर्ण प्रभाव आहे ते जम्मू) बाकीच्या राज्यात (बिहार, महाराष्ट्र)तिकडे फारसा जोर नाही हा योगायोग समजायचं का?
मागे मी म्हंटले तशी bjp ची अवस्था धरले तर चावते अशी झाली आहे,
चित्रपट पूर्ण पणे प्रदर्शित करून ते राजपुताना दुखवू इच्छित नाहीत, आणि पूर्णपणे थांबवून जगात हसे करून घायचे नाही.
त्यामुळे हे पोलीस संरक्षणात दंगल घडवली जात आहे.
या सगळ्या साठी कोणाला जबाबदार ठरवावे बरे?
ऑनलाइन पेपर मधले रिपोर्ट वाच, जास्त डिटेल माहिती मिळेल.
बाळ रूनमेश तुला बातम्या
बाळ रूनमेश तुला बातम्या वाचायला आधी पण सांगितलेले..
वाचता येत नसेल तर फुटकळ प्रश्न विचारत बसू नकोस
हो सरकारची जबाबदारी आहे हे
हो सरकारची जबाबदारी आहे हे मान्य.
राज्यांबाबत मला वाटते की जिथे पद्मावतीवरून भावना दुखावल्या जाणार्या जाती आहेत त्या राज्यातच समस्या आहे. बीजेपीचा संबंध असेलच असे नाही. अर्थात असे राज्य आहे का जिथे नॉन बीजेपी सरकार आहे, जिथे लोकं पेटलीही आहेत, पण त्या नॉन बीजेपी सरकारने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत?
हे तिकीट दर पेड प्रिव्हूचे
हे तिकीट दर पेड प्रिव्हूचे आहेत का? का रिलीज नंतरच्या शोज चे?
>>दिल्ली के मल्टीप्लेक्स
>>दिल्ली के मल्टीप्लेक्स पीवीआर डायरेक्टर्स कट में पद्मावत की सबसे ज्यादा कीमत की टिकट(प्लेटिनम सुपीरियर) 2400 रु. हैं। वहीं प्लेटिनम टिकट रेट 2200 रु. है.<<
आय्ला, तिकिटाबरोबर समोसे/चहा/सोडा फ्री आहे काय? आमच्या गावांतहि तिकिटं एव्ह्ढी महाग नाहित; रेग्युलर $१७ आणि ३डि $१९....
हे तिकीट दर पेड प्रिव्हूचे
हे तिकीट दर पेड प्रिव्हूचे आहेत का? का रिलीज नंतरच्या शोज चे? >>> रिलीजनंतरच्या शोज चे. आजच्या शोचे एक हजार आणि आसपास दर आहेत मुंबईत बऱ्याच ठिकाणी. काल टीव्हीवर सतत ही news दाखवत होते.
पद्मावत कसा वाटलाचा एकच कॉमन
पद्मावत कसा वाटलाचा एकच कॉमन धागा काढायला हवा अता , नाहीतर अजुन ढिग भर घागे निघणार रिव्ह्युज साठी !
हो ना , 1500 चे तिकीट काढले
हो ना , 1500 चे तिकीट काढले तर रिव्ह्यू लिहून फ्लॉन्ट करायला नको का ?
हा घ्या धागा फक्त पद्मावतच्या
हा घ्या धागा फक्त पद्मावतच्या रिव्ह्युज साठी :
https://www.maayboli.com/node/65111
काय तो जोहर व्हायचा होता तो
काय तो जोहर व्हायचा होता तो झाला का नाही?
मराठी असल्याने जोहार मायबाप जोहर हे नाट्यसंगीत फक्त माहित, जरा त्वेषाने म्हणतात ते गाणं . इकडे पण सगळं त्वेष पूर्ण चालू आहे.
त्या निमित्ताने वेगवेगळ्या गायकांनी म्हटलेलं जोहार मायबाप ऐकून घेतलं.
तिकडे कॉग्रेसचा गुजरातमधला
तिकडे कॉग्रेसचा गुजरातमधला पोस्टर बॉय हार्दिक पटेलने तर आता गुजरात सरकारला धमकी दिली आहे की जर पद्मावती रिलीज केलात तर परिणामांना तयार राहा. ( म्हणजे आम्ही हिंसाचार करू पण त्याची जबाबदारी तुमची असेल, आमची नाही.)
कॉग्रेसचा दुसरा पोस्टर बॉय आणि आमदार अलपेश ठाकोरनेही पद्मावत प्रदर्शित करायला विरोध केला आहे. म्हणजे यांचं सरकार गुजरातेत आलं असतं तर यांनी कोर्टालाही जुमानलं नसतं की काय!
'हिंसाचाराची जबाबदारी फक्त सरकारची, हिंसाचार करणार्याची नाही' हे हार्दिकचे सूत्र राहुल गांधींनाही मान्य असावे कारण गुरगावमधील स्कुलबस घटनेबाबत ट्विट केलं आहे त्यात कर्णी सेना, राजपूत यांचा उल्लेखच नाही. म्हणजे राहुल कर्णी सेना व इतर राजपूत संघटनांचं नाव घ्यायला घाबरतात की त्यांना पाठीशी घालताहेत की कर्णी सेनेचा दोष नाही ही काँग्रेसची अधिकृत भूमीका समजायची? असोच.
हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर
हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांचा निषेध.
सत्तेत काँग्रेस असो की भाजप, देशातल्या कोणत्याही बर्यावाईट, लहानमोठ्या प्रसंगी कायदा सुव्यवस्था टिकवण्याची आणि समाजाला योग्य दिशा दाखवण्याची अपेक्षा भाजप समर्थक सत्ताधारी भाजप सोडून काँग्रेसकडूनच करतात, हे वाचून फार बरं वाटलं. धन्यवाद!
काल दिवसभरात हरयाणा आणि गुजरातमधल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती असं वृत्तवाहिन्यांवर सांगितलं जात होतं. असं करायला पोलिसांना राहुल गांधींनीच सांगितलं असावं.
जगातले सगळ्यात प्रभावशाली
जगातले सगळ्यात प्रभावशाली नेते , देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून देशातली ६०० करोड जनता नोटाबंदी, जीएसटीसारख्या कठोर निर्णयांत सरकारच्या पाठीशी उभी राहते; तिथे पद्मावत सारख्या क्षुल्लक चित्रपटावरून शांतता बिघडू नये म्हणून आदर्णीय मोदीजींनी आवाहन केलं असतं, तर आंदोलक चुटकीसरशी ताळ्यावर आले असते.
भक्तांची आता कीव येऊ लागली
भक्तांची आता कीव येऊ लागली आहे
4ही राज्यात भाजपाची सत्ता तरी काँग्रेस ला दोष? सत्ता चालवत येत नसेल तर देश सोडून निघून अंदमानात जावे.
प्रदर्शित करू नका म्हणाला आहे हिंसाचार करा असे नाही अंधभक्तांनी डोळे तपासून घ्यावे. या उलट भाजपाच्या नेत्यांची भाषा जास्त उग्र आणि हिंसात्मक आहे पण त्याकडे भक्तांनी दुर्लक्ष केले सहाजिकच आहे म्हणा. आयटी सेल वरून जसे आदेश येतील तसे लिहायला भाग पडते
पाकिस्तानाचा व्हिसा आणि तिकिट
पाकिस्तानाचा व्हिसा आणि तिकिट कसे मिळवायचे?
कट्टरवादी पाकिस्तानी सेन्सर बोर्ड ने एक ही कट ना करता चित्रपटाला सर्टिफिकेट दिले आहे . आपल्या पेक्षा यांचे सेन्सर बोर्ड चांगले म्हणावे लागेल. खिलजी ला सैतान म्हणून दाखवले तरी त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही आपण मात्र पद्मावतीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीची ची कंबर दिसली म्हणून तोडफोड करत आहे.
मुंबईत ५० करणी सेना समर्थक
मुंबईत ५० करणी सेना समर्थक लोकांना अटक केलीय अजूनपर्यंत त्यामुळे शांततेत चाललय. मुंबई पोलीसांनी सिनेमाघरांना पूर्ण संरक्षण द्यायचं कबूल केलं होतं आणि खरच दिलय पण.
पुणे पण शांततेत.
पंचकुलावाले रामरहीम मुळे इतके घाबरलेत पण शिकले काहीच नाहीत. तिथे सिनेमा रिलिज होत नाहीय.
घूमरबद्दल नक्की आक्षेप काय
घूमरबद्दल नक्की आक्षेप काय आहे? आदर्णीय मोदीजी आणि आदर्णीय नेत्यानाहूजी यांच्या मनोरंजनासाठी केलेल्या कार्यक्रमात या सिनेमातल्याच घूमर गाण्यावर नृत्य सादर केलं गेलं असं वाचलं.
खट्टर काहीच कामाचा नाही
खट्टर काहीच कामाचा नाही
नायक चित्रपट मधला अमरीश पुरी आहे
घूमरबद्दल नक्की आक्षेप काय
घूमरबद्दल नक्की आक्षेप काय आहे?
<
दीपिकाची कंबर , पाठ , राणीचे नाचणे इ. आक्षेप होते म्हणे जे बदल्लय भन्सालीने.
आता आली का पंचाईत , नक्की कशाला विरोध करावा समजेना झाल्याने जाळपोळ , तोडफोड वगैरे गुंडगिरी करत मोकाट सुटलेत.
Pages