माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं म्हणाल्या का राधिका मॅडम, दक्षे. Lol

संवाद कोण लिहितंय, अर्थात संवाद जसेच्या तसे चुकीचं सादर करतो तोही दोषी म्हणा.

कोणतरी राधिकेस म्हणाले : "तू अशीच वृद्धिंगत होत रहा." >> नानी होत्या त्या! लय भारी वाक्य होते ते! अडखळत बोलल्या Lol

सर्व प्रकरण फारच लाउड वाटले. ह्याच्या पेक्षा १/१००० कमी ड्रामा मध्ये सर्व परिस्थिती सुधारली असती. तो सौ मितर अगदी डोक्यात जातो. कधीही वीड वर असल्यावाणी हाय. सो इज माय.

कालचा एपिसोड पाहुन मला गुरुचे म्हणणे पटले. कि राधिका सहानुभुति मिळवुन पुधे जात आहे. त्यानि एक्ट्याच्या जीवावर प्रगति करुन दाखवली. तेव्हा नाहि कोणी ताशे वाजवले.

टायसन>>+1000.
गुरू आणि गुरुमाता दोघेही आपापल्या जागी genuine वाटले.

अहो ते गुरूचे पहिल्या पासून आहे व बरोबरही आहे. हिला प्रत्येक क्षणी ऑडियन्स कशाला लागतो. ते ढोल ताशे तर अगदीच डोक्यात गेले. अ कपल कॅन ग्रो अपार्ट व वेगवेगळे जीवन आपापले बिल्ड करू शकतात. समजा त्याची कन्स्ट्रक्षन कंपनी असती/ आयटी/ किंवा प्लास्टिक खुर्च्या बनवायची कंपनी असती तर हिने काय केले असते. असे ड्रेसेस बदलू न काँपिट न्सी येत नाही एखाद्या फील्ड मध्ये. खरे च फार घासावे लागते प्रश्न सोड्वावे लागतात. आणि ती फुल्ली प्रेग्नंट बाई तिथे बघून मलाच कसे तरी झाले मला वाटले आवाजाने हिला कळा सुरू होतात की काय.
गुरू ने डिवोर्स मागितला होता तेव्हाच दिला असता तर इतकी शोभा झाली नसती. आता डिवोर्सचे एकदम मागे पडले का? आईने खरेच गुरू क्डे राहायला जावे. त्यांना खायला तरी बरे मिळेल. राधिकाचे सर्व लाउड व पब्लिक त्याचा वैताग येतो कधीकधी.

गुरूला नेमके राधिकामध्ये काय हवे होते हेच कळेना झालेय. त्याला ती बिनडोक आणि गावंढळ वाटायची म्हणून त्याने शनाया पसंत केली. पण शनायाला तरी डोके कुठेय ती फक्त मॉडर्न, स्टायलिश आहे (तसे त्या लेखक महोदयाने तिला पोर्ट्रेट केलंय). राधिकाला गुरूने सोडले. राधिकाला नाकारले. तो नकार तिने बळे-बळेच स्वीकारला (तिला तो नकार सहजगत्या नाही पचवता आला) अगदी टिपिकल बायको प्रमाणे आपल्या उध्वस्त संसाराला शनाया जबाबदार आहे असेच गृहीत धरले. आपल्या मुलासाठी आणि उभारलेल्या घरगुती मसाले कंपनीसाठी तिने आपला मार्ग खूपच कठीण परिस्थितीतून काढला आणि आता एका डबघाईला आलेल्या कंपनीला ३०० करोड बोली लावून टेक ओव्हर केले. किती कर्तृत्वान पण गाजवला खरे तर हि अभिमानाची गोष्ट जी तिच्या गोतावळ्याला कळली ती तिच्या नवऱ्याला कळेनाशी झालीय आणि केवळ पुरुषी इगो पुढे तो हे कर्तृत्व नाकारू पाहतोय तिला तो अगदीच पाण्यात पाहतोय. त्याला राधिका फक्त मेकओव्हर करून त्याच्या पुढे हाजी हाजी करणारी एक कचकड्याची बाहुली झाली असती तर चालली असती का हेहि कळत नाही आहे. कारण तिने असे काही करून दाखवणे त्याला अपेक्षित न्हवते. त्याच्यामते तिने हे जे काही केले ते केवळ सहानुभूती मिळवून (म्हणजे हिला लोक ३०० करोड देणार ते फक्त सहानुभूती म्हणून) आणि तरीही तिला माज आलाय हा माज आता तो एक वर्षात उतरवणार आणि तिला पाय धरायला लावणार (पावसाळ्यात तुडुंब भरलेली तलाव आणि नद्या आहेत पाणीपुरवठा करायल)).

सिरियलमधे कुणाला काय हवंय तेच कळत नाही. डिवोर्स हवा की नाही की अजून काय? मूळ कथेच्या कल्पनेत पाणी घालून घालून सगळा चिखल साचलाय आणि हे सगळे त्यात डुंबणेच ऐंजाॅय करायला शिकलेत.
त्यापेक्षा जेवण 8 वाजताच उरकावे. आणि सुबोध भावेला पहावे. निदान ती सिरियल नवीन असताना तरी त्यात पाणी घातले जाणार नाही ही वेडी आशा.

निदान ती सिरियल नवीन असताना तरी त्यात पाणी घातले जाणार नाही ही वेडी आशा.

Submitted by मी चिन्मयी on 18 August, 2018 - 03:12
सगळ्या सिरियल्स सुरुवातीला विषयाला अनुसरून असतात, पण मुख्य पात्राचे/ पात्रीणीचे लग्न लावले गेले (सिरीयल मध्ये) कि मग सगळे पाढे पंचावन्न.
सिरीयल मध्ये नवीन काही दाखवू शकत नाहीत म्हणून मग पाणी आहेच. आता तर उत्सवी महिने सुरु होतील मग यांच्याकडे आहेत एपिसोडस च्या एपिसोडस सगळे उत्सव साजरी करायला .

गुरवाच्या आईला आवरा रे कोणीतरी. मला वाटले कि बाबा देताहेत एक ठेवून...

गुरू आणि गुरुमाता दोघेही आपापल्या जागी genuine वाटले. >>>> गुरुमातेला उगाच आपण आपल्या सुनेला करियर करु दिल त्याचा पश्चाताप होत असेल ना. काय तर म्हणे माज आला राधिकाला. Angry

आईने खरेच गुरू क्डे राहायला जावे. त्यांना खायला तरी बरे मिळेल. >>>> पण तिथे तिला खायला कोण घालेल? गुरु का शनाया? त्यान्ना काही येत का बनवायला? मग तिथे तिला hotel च्या जेवणावर भागवाव लागेल. त्यापेक्षा राधिकेच जेवण (स्पायसी असल ) तरी बर.

Submitted by अमा on 18 August, 2018 - 01:01
गुरूला नेमके राधिकामध्ये काय हवे होते हेच कळेना झालेय. त्याला ती बिनडोक आणि गावंढळ वाटायची म्हणून त्याने शनाया पसंत केली. पण शनायाला तरी डोके कुठेय ती फक्त मॉडर्न, स्टायलिश आहे (तसे त्या लेखक महोदयाने तिला पोर्ट्रेट केलंय). राधिकाला गुरूने सोडले. राधिकाला नाकारले. तो नकार तिने बळे-बळेच स्वीकारला (तिला तो नकार सहजगत्या नाही पचवता आला) अगदी टिपिकल बायको प्रमाणे आपल्या उध्वस्त संसाराला शनाया जबाबदार आहे असेच गृहीत धरले. आपल्या मुलासाठी आणि तिने उभारलेल्या घरगुती मसाले कंपनीसाठी तिने आपला मार्ग खूपच कठीण परिस्थितीतून काढला आणि आता एका डबघाईला आलेल्या कंपनीला ३०० करोड बोली लावून टेक ओव्हर केले. किती कर्तृत्वान पण गाजवला खरे तर हि अभिमानाची गोष्ट जी तिच्या गोतावळ्याला कळली ती तिच्या नवऱ्याला कळेनाशी झालीय आणि केवळ पुरुषी इगो पुढे तो हे कर्तृत्व नाकारू पाहतोय तिला तो अगदीच पाण्यात पाहतोय. त्याला राधिका फक्त मेकओव्हर करून त्याच्या पुढे हाजी हाजी करणारी एक कचकड्याची बाहुली झाली असती तर चालली असती का हेहि कळत नाही आहे. कारण तिने असे काही करून दाखवणे त्याला अपेक्षित न्हवते. त्याच्यामते तिने हे जे काही केले ते केवळ सहानुभूती मिळवून (म्हणजे हिला लोक ३०० करोड देणार ते फक्त सहानुभूती म्हणून) आणि तरीही तिला माज आलाय हा माज आता तो एक वर्षात उतरवणार आणि तिला पाय धरायला लावणार (पावसाळ्यात तुडुंब भरलेली तलाव आणि नद्या आहेत पाणीपुरवठा करायल)). >>>++++१११११११

गुरूला नेमके राधिकामध्ये काय हवे होते हेच कळेना झालेय >>>> त्याला राधिकाने बायकोसारख न वागता प्रेयसीसारख वागाव अस वाटत. आता पहिल्या एपिसोडमध्येच राधिका वागलीच ना प्रेयसी सारखी. त्याला स्वतःहून मिठी मारली होती तिने. आणखी काय हवय हयाला? Angry

काय मूर्ख लोक आहेत राधिकाचे मित्र परिवार आणि तिचा तो भाऊ. राधिका आणि सासू चे बोलणं बंद दरवाज्या बाहेरून ऐकून राहीले.
किती म्हणजे किती घुसावे एखाद्याच्या पर्सनल लाईफ मध्ये.. श्या....

काल तर निव्वळ टाईमपास केला....
गुरवाने माफी मागण्याचे नाटक केले.... शनाया मॉप इकडून तिकडे नाचवित होती...... कैच्या कैच... ना धड विनोद निर्मीती...ना धड राधिकाचे सूड नाट्य......

आनंद आणि धारकका ची चरबी वाढत चाललीय.
10 मिन लेट तर हा आनंद असा ओरडतो जसा काय...
आणि धारकका ने तर अतीच केलंय, जेनी बाहेर जात असताना तिला जबरदस्ती आत थांबायला लावून माफीनामा ऐकायला लावला.
Irritating झालेत...

राधाक्काला पर्सनल स्पेस वैगेरे अक्कल नव्हतीच कधी. सगळंच जगजाहीर करायचं.
जेनी स्वतःहुन बाहेर जात होती तर तिला थांबवलं.

गुरुनाथ राधिकाचा अपमान करे तेव्हा आजूबाजूला कोणीच नसे का?
गुलमोहरमध्ये लेटेस्ट तमाशा सगळ्यांदेखतच केलेला. मग माफीही सगळ्यांदेखत मागावी.
तो आईसमोर रडून तिला दगिने आणि जमीन विकून पैसे द्यायला भाग पाडतोय, त्याला सहानुभूती मिळवण्याच्या युक्त्या म्हणत नाहीत का?
सहानुभूती मिळवण्यासाठी बोली भाषेत बोलावं किंवा जे बोली भाषेत बोलतात, त्यांना सहानुभूती मिळते हे लॉजिक नवीन होतं.
मालिका बंडल खहेच, पण माझ्याकडून थोडा मसाला.
राधिका मसालेमध्येच नोकरी करावी अशी गुरू आणि शनायाची काय मजबुरी आहे?
राधिका मालकीण आणि बॉस आहे हे कळताच दोघांनी तिथून बाहेर पडायला हवं होत़.
इतक्या कर्तबगार माणसाला कोणीतरी नोकरी नक्कीच दिली असती.

राधिका मसालेमध्येच नोकरी करावी अशी गुरू आणि शनायाची काय मजबुरी आहे?>>>>>>> हा तर मुर्खपणाचा कळस आहे. काय ती शन्या लादी पुसतेय. गुरु टेबलावर बसलाय. कसलं भयताड आहे सगळंच

अगं सस्मित...त्यांचे काही स्टेक्स आहेत ना ए एफ एल चे.....शनायाने काही घोटाळा केलेला...तर ते पैसे परत केल्या शिवाय त्यांना राधिका रिलीव्ह करणार नाही म्हणे! (असा माझा अंदाज आहे!.................. केड्याचं लॉजीक दुसरंही असू शकतं!!)

आवडती व्यक्तीरेखा फ्रॉम मा न बा
बावळट, मूर्ख, शनाया
पूर्वीची वाईट पण आता चांगली वागणारी समिधा
क्युट कपल श्री आणि सौ गुप्ते
आडमुठी, कुसकी वहिनी,
लईच गॉड जेनी,
पानवलकर
आणि अथर्व ची बॅलन्स टीचर.

नावडती व्यक्तिरेखा फ्रॉम मा न बा
घमेंडी गुरोबा
महापकाव गुरुमाता,
राधाक्काचा सदा होतकरू भाऊ
सौ. मित्र
केड्या आणि मावशी
पत्रकार पोपटलाल चे आजोबा

Pages