Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31        
      
    माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
मी त्या घटस्फोटाच्या
मी त्या घटस्फोटाच्या सुनावणीच्या एपिसोडपासून नियमित पाहायला सुरुवात केलीय. >> मी पण.
भरत. अख्ख्या पोस्टला मम.
कुणीही जस्टिफाय करत नाहीये गुरुचं वागणं. मी तरी नाहीच.>> अगं या धाग्यावरच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.. ती राधिका गावंढळ आहे म्हणूनच गुरु तिला सोडून गेला. किंवा शनाया कशी मस्त राहते नि राधिका गबाळ्यासारखी राहते, बरोबरच आहे गुरुच वागणं.. वगैरे. तू करत नसलीस तरी अनेकांनी केलंय गुरुचं वागणं जस्टिफाय.
ह्म्म.
ह्म्म.
निधी म्हणाली तसं इन जनरल
निधी म्हणाली तसं इन जनरल आधीपासूनचं लिहिलंय भरत यांनी. बऱ्याच जणांनी गुरुचं अफेअर बरोबर आहे म्हणत, राधिकाला ब्लेम केलंय यासाठी पण शनायात तरी काय गुण दाखवलेत, फक्त इंग्लिश बोलता येणं आणि modern असणे हे गुण असतील तर तेवढेच आहेत.
एनीवे ह्या मालिकेला trp असल्याने दोन वर्ष पण चालवतील आणि काहीही दाखवतील.
बऱ्याच जणांनी गुरुचं अफेअर
बऱ्याच जणांनी गुरुचं अफेअर बरोबर आहे म्हणत, राधिकाला ब्लेम केलंय यासाठी पण शनायात तरी काय गुण दाखवलेत, फक्त इंग्लिश बोलता येणं आणि modern असणे हे गुण असतील तर तेवढेच आहेत.
>>> मायबोलीवर कोणालाही गुरू चे अफेयर बरोबर आहे असे म्हणलेलेलं आठवत नाही.
धारकका victim आहेच, पण शनया पण victim आहे.
प्रॉब्लेम हा आहे की धारकका ने स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम्स सार्वजनिक करून ठेवले, जो भेटेल त्याच्याशी पंचायत मांडून बसणे, सहानुभूती घेत राहणे आणि मुख्य म्हणजे चूक गुरुची असूनपन शनया ला दोषी मानून तिला त्रास देत राहणे यामुळे तिचं character डोक्यात जाऊ लागलेच होते आणि आता तर जास्तच. पण एकंदर असे दिसत आहे की काही लोकांना हे प्रकार आवडत आहेत, आणि धारकका देखील.
बाकी सस्मित यांच्या प्रतिसादाशी सहमत.
मुख्य म्हणजे चूक गुरुची
मुख्य म्हणजे चूक गुरुची असूनपन शनया ला दोषी मानून तिला त्रास देत राहणे >>> हे अगदी बरोबर. यासाठी मी विरोध केलेला, even बऱ्याच जणांनी केलेला.
पण शनायाचं charactor कसं केलंय आता. अतिशय बिनडोक. पुण्याची असून साधे मराठी शब्दही न समजणे. फक्त shopping, खादाडी करणे.
तीही राधिकाला good for nothing आणि छोट्या मुलाला नावे ठेवतेच कि.
बाकी गुरु लाच नामोहरम झालेला बघायचा आहे मला. शनायाची फक्त कीव येते मला. पण हे सिरीयल एवढी वाढवत आहेत की आता तोही इंटरेस्ट संपला माझा.
ती सगळ्यांनाच नावे ठेवते,
ती सगळ्यांनाच नावे ठेवते, गुरूला पण ☺️
बाकी अंजु आपला प्रतिसाद +1
मायबोलीवर कोणालाही गुरू चे
मायबोलीवर कोणालाही गुरू चे अफेयर बरोबर आहे असे म्हणलेलेलं आठवत नाही. >>> यासाठी पहिल्यापासून काढून वाचायला लागेल. इथे आणि अजून कुठे कुठे वाचलंय हे. जोक्स पण फिरत होते. त्यामुळे मिक्स झालं असेलही माझं. पण आता ताकद नाही आधीपासून वाचायची
 . इथेही वाचल्यासारखं वाटतं.
मला उलट शनाया तेव्हा जाम
मला उलट शनाया तेव्हा जाम आवडलेली जेव्हा गुरूने खूप मागे अफेअरचे तिच्यावर ढकलून हात वर करून मोकळा झालेला, त्या शॉट मध्ये शनायाने तिचा झालेला अपमान, हतबलता डोळ्यातून जी काही व्यक्त केलेली की बास रे बास, फार सुंदर अभिनय.
त्यानंतर मला वाटलेलं त्या अपमानातून काहीतरी शिकून strong होईल तिचे charactor आणि काहीतरी करून दाखवेल shopping आणि खादाडीच्या पलीकडे जाऊन. पण कसलं काय केड्याने तिला पार बिनडोक करून ठेवलं.
खरं म्हणजे तोच turn होता. पण
खरं म्हणजे तोच turn होता. पण मालिका संपेल ना. नाहीतर शनायाने पण स्वतः चं अस्तित्व ह्याला सोडून वेगळं दाखवायला हवं होतं आणि राधिकाने पण अर्थात राधिकाने दाखवलं भले दुसऱ्यांची मदत घेत पण गुरूची न घेता.
ह्यांना मालिका वाढवायची आहे कशीही त्यामुळे काहीही कशीही ह्यापुढे वाढवतील.
ह्यांना मालिका वाढवायची आहे
ह्यांना मालिका वाढवायची आहे कशीही त्यामुळे काहीही कशीही ह्यापुढे वाढवतील.>>>>> १००% अनुमोदन. पाऊसही खुप असल्याने पाण्याची कमतरता नाही.
मुळातच चूक एकट्या गुरुचीच
मुळातच चूक एकट्या गुरुचीच नाही ना, शनायाही दोषी आहेच.
बाकी अन्जूताईच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत.
शनखया कशाची आणि कोणाची
शनाया कशाची आणि कोणाची व्हिक्टिम आहे ते समजून घ्यायला उत्सुक.
राधिकाची व्हिक्टिम म्हणावं तर राधिका व्हिक्टिम असंही म्हटलंय.
मग शनायापण गुरूची व्हिक्टिम का?
कशी बरं?
शनाया as a chara ऐदी, पैसे
शनाया as a chara ऐदी, पैसे उडवणे. सौमित्र श्रीमंत दिसला म्हणून गुरूला सोडून त्याच्याबरोबर US ला पण जायला निघालेली अशीच तर दिसली.
तिला परिस्थितीचं गांभीर्य तर अजिबात नाही, मेड चोरी करून पळाली, कशावर सह्या केल्यात म्हणून गुरू गोत्यात आलाय.
तिच्या मोठ्या चुका गुरू सहज माफ करतो, आधी राधिका गुरूच्या करायची तशा पण राधिकाच्या चुकांसाठी मात्र गुरूने टोकाचा अपमान केला तिचा.
चुका म्हणायचं की चूक अनेक असतील तर, confused.
पण तो चोरीचा एपिसोड दाखविलाच
पण तो चोरीचा एपिसोड दाखविलाच नाही...?
आपल्यालाच दु: स्वप्न वगैरे पडलेलं की काय?
आणि डायव्होर्स चं पण काम थंड बस्त्यात गेलं.....तारीख पडलीय का?
हो मी लिहीलं होतं की राधिकाचा
हो मी लिहीलं होतं की राधिकाचा अाधीचा अवतार बघता गुरू शनायाकडे गेला त्यात नवल नाही पण ईथे मला असं म्हणायचं होतं की राधिकाने डोळे ऊघडे ठऊन जगाकडे बघितलं नाही, नव-यावर आंधळा विश्वास ठेवला, गुरूने केलेला अपमान गिळत राहिली आणि गुरू परत येणारच नाही याची खात्री झाल्यावरच ती पुढचा विचार करायला लागली. गुरूनेही कधी तिला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्या अपेक्षा स्पष्टपणे सांगितल्या नाहीत. खरंतर त्याला बायकांबद्दल आदरच नाही. शनाया जर राधिकासारखी यशस्वी झाली असती तर त्याला तेही सहन झालं नसतं. तो टोटल MCP आहे. ज्यांनी आधी खूप तरल मालिका दिगदर्शित केल्या आहेत त्या प्रतिमा जोशींना या मालिकेत कसे काम करवत असेल की त्यांनी कालाय तस्मै नम: म्हटले असेल.
लिहीताना आणि बोलताना माझी ब-याच वेळा स्मिता गोंदकर होते.
पण तो चोरीचा एपिसोड दाखविलाच
पण तो चोरीचा एपिसोड दाखविलाच नाही...? >>> दाखवला असावा. प्रोमोत होतं.
पण शनायाचं character कसं
पण शनायाचं character कसं केलंय आता. अतिशय बिनडोक. पुण्याची असून साधे मराठी शब्दही न समजणे. फक्त shopping, खादाडी करणे. >>>> अगदी अगदी. जेव्हा पहिल्या एपिसोडमध्ये शनाया म्हणायची ना की, "या जगात खर प्रेम वैम अस काही नसत, माणस फक्त स्वतःवरच प्रेम करतात." त्यावेळी मला वाटल तिच character स्मार्ट, लोभी, पैश्यासाठी हपापलेली, स्वार्थी, कनिन्ग वै वै अस निगेटिव दाखवतील. पण कसल काय, तिला विनोदी, बावळट, खादाड, अतिआळशी, shopping करणे अस बनवलय .
एनीवे ह्या मालिकेला trp असल्याने दोन वर्ष पण चालवतील आणि काहीही दाखवतील. >>> ++++११११११ शनायाला प्रेगनन्ट दाखवतील. पुढे जाऊन मालिका लीप घेईल. हि सिरियल केकता कपूरच्या सिरियल्सना मागे टाकणार वाटत.
केकता च्या वरताण बहुतेक.
बरं पुणे मुंबई काही फार अंतर
बरं पुणे मुंबई काही फार अंतर नाही. आई बाबा कधी आले नाहीत, लेक काय करते बघायला. एकटी मुलगी घर सोडून रहात असते तेव्हा पालकांना कित्ती काळजी असते, लक्ष ठेऊन असतात.
ह्यापुढे वाढवायची असेल सिरीयल तर अचानक टपकतीलही.
(No subject)
वा वा छान, अभिनंदन.
वा वा छान, अभिनंदन.
दोघीही छान गातात आणि आदिती
दोघीही छान गातात आणि आदिती trained dancer आहे. ह्या भैताड सिरियलमधून बाहेर पडल्या तर future bright hai...
मानबा मधून शनाया बाहेर पडतेय
मानबा मधून शनाया बाहेर पडतेय. तिची नवीन रिप्लेसमेंट येतेय अशी कन्फर्म न्यूज आहे .
रसिका पुढील शिक्षणासाठी मालिका सोडतेय
बरं आहे, इथे तिला करायला
बरं आहे, इथे तिला करायला काहीच नाही ठेवलं. तिचं charactor एवढं dumb करून ठेवलंय. ती पण कंटाळली असेल. इथे आता लादी पोछा करत रहाणार आणि थोडे पैसे कुठून मिळाले, गुरूची आई किंवा गाडी विकून तर ते लगेच shopping मध्ये उडवणार, बर्गर पिझ्झा खात रहाणार हेच दाखवणार.
अमेरिकेत काही शिकायला मिळत असेल तर पुढच्या करियर साठी छानच. शुभेच्छा रसिकाला.
रिप्लेसमेंट येण्याऐवजी
रिप्लेसमेंट येण्याऐवजी शनायाने गॅरीला डंप केलं असं दाखवलं पाहिजे. मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकशी सुसंगतही आहे.
रसिकाचा अभिनय चांगला आहे. कन्व्हिन्सिंग. ती रंगवत असलेलं पात्र कितीही अचाट असलं तरी.
रिप्लेसमेंट येण्याऐवजी
रिप्लेसमेंट येण्याऐवजी शनायाने गॅरीला डंप केलं असं दाखवलं पाहिजे. मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकशी सुसंगतही आहे. >>> अगदी अगदी. त्याला राधिकाने पण हाकलायचं आयुष्यातून. मागेही मी लिहीलेलं तेच आत्ता लिहिते, अजूनही माज, गुर्मी, राधिकाच्या वाईटावर असलेला गुरु सुधारलेला दाखवू नका. पटणार नाही. अनेकदा राधिकाने चान्स देऊन पालथ्या घड्यावर पाणी आहे.
ह्यात अभिनय सर्वांनीच चांगला केलाय, रसिकाने पण. रसिका अतिशय टॅलेंटेड आहे. अमेरीकेत जाऊन काही कोर्स करणार असेल तर करीयरसाठी उत्तम.
आता श्न्या गुरूला द्म्प
आता श्न्या गुरूला द्म्प करेल, मग गुरूला दुस्रा काही उद्योग न्सेल मग तो रधिकाल धदा शिक्वायला म्हनून विविध कार्स्थान रचेल. उन्दिर मन्जर खेल कन्तिन्युज
काल ऐ ने घरी अन्ल्यावर म्हन्त होता की मला खूप अक्कले म्हनून
अनि रधिकाच्या केबिन मध्ये प्न जौन कैतरी बोल्ला की मी ही ज्गा माझी आहे म्हनून. आनि मी ती पर्त मिल्व्नारच.
शन्या गेली की तेच कामे अजून काय. आपन तेच ब्घ्त बसाय्च्म
तिआर्पी छान अहे म्हनून कय्पन दख्नव्नार
एके काळी मी असेच लिहायचो. आता
एके काळी मी असेच लिहायचो. आता गम्मत वाटते.
दक्षे
दक्षे
गुरूची आई किंवा गाडी विकून >
गुरूची आई किंवा गाडी विकून >>> इथे मला गुरूच्या आईकडून पैसे मिळाले तर असं म्हणायचं आहे. परत मीच वाचताना चुकीचं वाटलं वाक्य पण आता एडीट करता येणार नाही, म्हणून इथे लिहितेय.
Pages