माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बानु? ओह बानु ठिकाय
मी एक मिनिट जय मल्हार ची बायको झालेली नटीच डोळ्यासमोर आली माझ्या.
ती खांडकेकर ला अजिबात शोभणार नाही.

अरे पण कशाला दुसरी शनाया वगैरे. बास की आता. ती पण जाऊदे आणि राधिकाने पण हाकलून देऊदे.

नाहीतर आता शनाया स्वाभिमान जागृत झालेली, स्वतः च्या पायावर उभी राहीलेली, काहीतरी positive करतेय असं दाखवतील. रसिकाला जास्तीत जास्त बिनडोक दाखवलं.

बाइकवरून एंट्री?? रसिकाने सिरियल सोडल्या सोडल्या भुमिका evolve झाली की काय?? काय डोकं चालवतायत...देवा रे... Sad

ती राधिका त्या कपडयात आणि हेअरस्टाईल मध्ये जपानी बाई वाटते.

प्रतिमा कुळकर्णी सुद्दा आहेत का हया सिरियलमध्ये? Uhoh

बादवे, श्रेयसच्या पाठीमागे उभा असलेला तो मुलगा कोण? नानाजी आणि महाजनी च्या पाठीमागे उभे असलेले कलाकार सुद्दा नवे दिसतात. बर्याच नव्या एन्ट्र्या झालेल्या दिसतात सिरियलमध्ये.

अहो कउ, तुम्ही हा विडिओ दोनदा टाकला धाग्यावर खरा, पण आमच्याकडे एकसुद्दा उघडत नाही हो इथे. Uhoh

कारण तो screenshot आहे... >>>> ओ हो, अस आहे का? जनरली माझ टेक्निकल Knowledge कच्चच आहे. केडयासारख, त्यामुळे अस होत माझ कधी कधी. Proud

ती राधिका त्या कपडयात आणि हेअरस्टाईल मध्ये जपानी बाई वाटते.>>>>> Rofl सूलु, मलाही तसेच वाटले फोटो बघुन. Proud

बाईकवरुन कोण आलयं ? Uhoh

बादवे, श्रेयसच्या पाठीमागे उभा असलेला तो मुलगा कोण? नानाजी आणि महाजनी च्या पाठीमागे उभे असलेले कलाकार सुद्दा नवे दिसतात. बर्याच नव्या एन्ट्र्या झालेल्या दिसतात सिरियलमध्ये >> तो ALF चा staff आहे

Never watched this show but saw news popping out about Shanaya leaving this show.
Zee Marathi should consider Smita Gobdkar as new Shanaya, lol !
Smita always reminded me of her !

https://www.youtube.com/watch?v=Br1wwL_dLbA&t=1s

म्हणजे याचा अर्थ गुरु आणि राधिकाच patch-up झाल. Angry कउ ने काल पाठवलेल्या विडियोवरुन तरी असच वाटतय.

गुरुमाता सुद्दा राधेमाशी पुन्हा गोडगोड वागू लागल्या आहेत. म्हणजे समजा, राधाक्का जर इतक होऊन सुद्दा तिच्या मुलाशी patch-up करायला तयार झाली नसती, तर तिने त्या पार्टीकडे ढुन्कूनही पाहिल नसत.

ती नवीन शनाया झालेली पाठमोरी तरी इशा केसकर दिसत नाही. थोडी जाड वाटते.

डीजे ग्लॅमर आणि बिनडोकपणासाठी येस, तरी स्मिता मनाने चांगली वाटली तसं शनाया chara मनाने चांगलं नाही दाखवलं.

दुसरं म्हणजे रसिका अभिनय छान करायची, स्मिता अभिनयात मार खाते.

दुसरं म्हणजे रसिका अभिनय छान करायची, स्मिता अभिनयात मार खाते. +++११११

शनाया chara मनाने चांगलं नाही दाखवलं. ++++ शनायाचा एक चांगला गुण दाखवलेला. ती मैत्री निभावते. ती स्वतःला आवडलेला तिचा ड्रेस सहजपणे इशाला देऊन टाकते. तिचा आपल्या मित्र-मैत्रीणिन्वर वि श्वास असतो. एकदा भक्तीविरोधात तिला कुणीतरी भडकवल होत, तरीही तिने भक्तीवर विश्वास ठेवला.

असे आणखी चान्गले गुण दाखवायला हवे होते तिचे.

हो काय, मैत्री केली की निभावते अशी दाखवली आहे म्हणजे.

मी बघितलं तेव्हा राधिकाला good for nothing आणि तिच्या मुलाला नावं ठेवणे हेच बघितलं. त्या जेनीचा आणि इतरांचा अपमान पण करायची ना ऑफिसात.

अर्थात मी कमी बघून जजमेंटल होणं चूक आहे म्हणा.

एक शॉट झी 5 वर बघितला तर ती म्हणत होती, मी पैशाशिवाय जगू शकत नाही, मी झाड पूस कामं करायला जन्माला आले नाही. पण तिचं स्वकर्तृत्व अस काहीच दाखवलं नाहीये. दुसऱ्याच्या पैशावर मजा मारणे मग त्यासाठी गुरू ने तिचा अपमान केला तरी चालतो तिला.

मे बी आता रोल सुधारतील तिचा पण तो करायला रसिका नसेल.

बाय द वे ओरिजनल स्मिता आणि chara शनाया ह्यातला महत्वाचा फरक म्हणजे स्मिता सेल्फमेड पर्सन, helping nature, सतत कामात.

शनाया कामचुकार आणि ऐदी.

Lol अन्जु फार प्रेमात आहे स्मिताच्या Proud
खरी स्मिता / बिग बॉस मधली स्मिता ही शनाया सारखी नक्कीच नसेल पण त्या दोघींची पर्सनॅलिटी सॉलिड सेम आहे.
शनायाच्या त्या रोल मधे मला ती शनायापेक्षा जास्तं फिट्ट वाटते, ग्लॅमरस पण स्टुपिड, डंब golddigger असा रोल स्मिताला चांगला जमेल.
अ‍ॅक्टींग स्किल्स मला दोघींचीही नाही माहित .

नाही ग प्रेमात वगैरे. बीबीत आवडली, प्रभाव पडला एवढंच. हल्ली काही फोटोत आवडत पण नाही एवढी. कधी तिच्या वॉलवर जाऊन बघते. पण तिचं पेज वगैरे लाईक केलेलं नाहीये.

काही फोटोशुटस छान आहेत, काहीत फार नाही भावली सध्याच्या. मगाशीच बघून आले पेजवर.

Pages