Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाना नानी???
नाना नानी???
नाना नानी???
नाना नानी???
Submitted by मी_आर्या on 22 August, 2018 -
tyana kuthlya category madhye taaypaave hech kalat naahi.
नाना गेले आता सोनी मराठीवर
नाना गेले आता सोनी मराठीवर गेले त्यामुळे त्यांना बहुतेक गावाला पाठविले नानींनी..
रच्याकने सोनी मराठीवर सिरेली सुरु झाल्यात त्यावर कुठे धागे नाही निघाले अजुनी?
गुरु राधिकाचा फारच तिरस्कार
गुरु राधिकाचा फारच तिरस्कार करतो. अगदीच बेसलेस. आता ठीक आहे कि ती उद्योजिका वैगरे झालीय पण पूर्वी. तो जेव्हा तिला, 'ये हे बघ ये राधिका ' असे म्हणतो ना तेव्हा त्याच्या कानाखाली खेचावीशी वाटते.
पण राधाक्काल नाही ना वाटत
पण राधाक्काल नाही ना वाटत कानाखाली खेचावसं
तिला फक्त शनायाचा हात
तिला फक्त शनायाचा हात पिरगाळायला येतो.
<<ये हे बघ ये राधिका ' असे
<<ये हे बघ ये राधिका ' असे म्हणतो ना तेव्हा त्याच्या कानाखाली खेचावीशी वाटते.<< अगदी अगदी! सन्ताप होतोय.
आणि ती गुरुमाय पोराची सारखी भलावण करते त्याची ही चीड येते.
शिरेलीत पाणी ओतणे सुरुये. त्या गुरुमायला त्या नानी चा प्यायला काय बोलवतात... समजावतात काय!
ते गुरुपिता चिन्तित काय दाखवताय.. श्या
मला भरत यांची पोस्ट पटली.
मला भरत यांची पोस्ट पटली. मी बघितले नाहीत पण youtube वर दोन मिनिटांचे प्रोमोज असतात ते बघितले. गुरूने कसंही वागावं, सर्वांसमोर सतत अपमान करावा राधिकाचा. कितीही खालच्या पातळीला उतरावं. राधिकाने फक्त जेनी ला थांबवलं तर problem कसा. लगेच ती अनप्रोफेशनल होते.
एका कंपनीचा सी इ ओ, प्रेयसीवर हवे तेवढे पैसे उधळतो कंपनीचे, त्याची प्रेयसी एवढं नुकसान करते, कशावर तरी सही करून त्याचं काय.
मी तर म्हणते ते काही कोटींचे
मी तर म्हणते ते काही कोटींचे नुकसान केलंय गुरु शनायाने तर पाहिलं आधीच्या एलेफ नेच पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं.
आईला पाठवा गुरूकडे, काय सर्व property विकली तरी, गुरु कंपनीचं नुकसान भरून काढेल असं वाटत नाही.
रच्याकने सोनी मराठीवर सिरेली
रच्याकने सोनी मराठीवर सिरेली सुरु झाल्यात त्यावर कुठे धागे नाही निघाले अजुनी? >>> आहे, काढलाय कोणीतरी.
राधिका शनायाला फिजिकली hurt
राधिका शनायाला फिजिकली hurt करायची, त्याचं समर्थन अजिबात नाही. ते मला नाही पटायचं.
राधिकाने फक्त जेनी ला थांबवलं
राधिकाने फक्त जेनी ला थांबवलं तर problem कसा. लगेच ती अनप्रोफेशनल होते.>पृओब्लेम काही नाही. आणि राधाक्का काय गुरु काय कुणीच प्रोफेशनल नाहीत इथे.
हो कोणीच प्रोफेशनल नाहीत,
हो कोणीच प्रोफेशनल नाहीत, राधिकाचा पण अति खालच्या पातळीला जाऊन अपमान केलेला गुरूने कंपनीत पण तर आता राधिका करतेय. तेव्हा शनायासमोर, स्टाफ समोर करतोच गुरु. जे पेरले त्याने ते उगवतंय आता.
बाय द वे ती अनप्रोफेशनल आहे असं आत्ता कोणी इथे लिहिलं नाही, मीच तो शब्द वापरला.
इतक्या कर्तबगार माणसाला
इतक्या कर्तबगार माणसाला कोणीतरी नोकरी नक्कीच दिली असती. >>>> गुरु आणि कर्तबगार?
अजनबी, राधिका आवडती की नावडती व्यक्तीरेखा, ते नाही तुम्ही सान्गितल.
राधिकाचा पण अति खालच्या
राधिकाचा पण अति खालच्या पातळीला जाऊन अपमान केलेला गुरूने कंपनीत पण तर आता राधिका करतेय >>> So What? Guru deserves it.
राधिका मसालेमध्येच नोकरी
राधिका मसालेमध्येच नोकरी करावी अशी गुरू आणि शनायाची काय मजबुरी आहे?
राधिका मालकीण आणि बॉस आहे हे कळताच दोघांनी तिथून बाहेर पडायला हवं होत़.
इतक्या कर्तबगार माणसाला कोणीतरी नोकरी नक्कीच दिली असती.
>> गुरूवर कारणे दाखवा ची नोटिस बजावली आहे. त्या नुसार त्याला ए एल एफ सोडता येणार नाही असं महाडिक सरांनी सांगितलेलं असतं, आणि त्यापुढे गुरूचं आणि शनायाचं काय होइल हे नवा मालक ठरवेल, त्या प्रमाणे मग राधिका त्यांच्यावर सूड उगवल्या शिवाय त्यांना कसं काय सोडेल राधिका मसाले मधून?
ओके. Both of them deserve it.
ओके.
Both of them deserve it.
शनायानेच कशावर तरी सही केली
शनायानेच कशावर तरी सही केली आणि आफत ओढवली आहेना, एकदा तिला सही करताना बघितलं होतं. गॅरी कशाला, मी करते ना सही. असं म्हणाली होती.
हो अन्जू बरोबर. तिथेच गोन्धळ
हो अन्जू बरोबर. तिथेच गोन्धळ झाला आहे. आणि त्या कदम ने ही गोष्ट गुरूच्या कानावर पण नाही घातली.
आणि गुरू इतका रेकलेस असूनही इतक्या मोठ्या पदावर पोहोचलाच कसा? की नंतर झालाय रेकलेस?
गंमत म्हणजे राधिकाला सतत
गंमत म्हणजे राधिकाला सतत घालून पाडून बोलणारा गुरू, शनाया ह्याला सतत खडड्यात घालते तरी बोलत नाही. मान्य राधिकाच्या काही गोष्टी न आवडणाऱ्या आहेत तरीही तो सतत राधिकाचा अपमान करत होता की, करतोही.
जुन्या काळी राधिका गुरूच्या
जुन्या काळी राधिका गुरूच्या केबिन मध्ये ऑफिस डिस्कशन चालू असताना घुसली होती जे चुकीचे आहे. गुरू ची रेअकॅशन जास्त होती पण चूक धारकका ची होती. ती त्या कंपनीची एम्प्लॉयी नव्हती असे डायरेक्ट डिस्कशन चालू असताना आत यायला.
काल जेनी स्वतःच uncomfortable होती तर तिला जाताना थांबवली आणि म्हणे जे बोलायचंय ते जेनी समोर बोल. Totally unprofessional !
धारकका कोणाला आवडत असेल असे वाटत नाही.
मला अनिता आवडते.
मला अनिता आवडते.
बाकी शनायाला लादी पुसताना, रडताना पाहून कोणाचं तरी काळीज अगदी पिळवटून निघतंय.
म्हणतात ना "सुपातले जात्यात "
गुरू ला justify करण्याची गुरू
गुरू ला justify करण्याची गुरू माय आणि च्रप्स ची चढाओढ सुरू आहे एकंदरीत
लोल.. राधिका डोक्यात जाते
लोल.. राधिका डोक्यात जाते याचा असा अर्थ घेताय का ☺️
मला गुरू आवडत नाही हो. तो आहेच बकवास,पण धारकका चे जे चाललंय ते इररितेटिंग आहे .
मला गुरू आवडत नाही हो. तो
मला गुरू आवडत नाही हो. तो आहेच बकवास,पण धारकका चे जे चाललंय ते इररितेटिंग आहे .>>>>>>>>>>>>+१
मला राधाक्का आवडत नाही.
पण मला गुरु शन्या गुरुमाय गुरुपिता नाना नानी रेवती समिधा जेनी आनंद पानवल्कर बकुळा मॉन्स्टर कुणी कुणीही आवडत नाही.
राधाक्का हे पात्र न आवडण्याची कारणं म्हणजे -
राधाक्का पहिल्यापासुनच बालिश खेळ खेळते. शन्याचा हात पिरगाळ, तिला मिरवणुकीत जबरदस्ती नाचव , टॉवेलला काजळ फास वैगेरे.
मागे ही मी लिहिलं होतं पुन्हा तेच लिहिते.
ज्या बाईचा इतका मोठा अपमान तिच्या नवर्याने केलाय, इतकं दुखवलंय, एका दुसर्या बाईला घरात ठेवुन हिला लहान मुलासकट घराबाहेर काढलंय, ती स्त्री असले मुर्ख चाळे करत बसणार नाही. (ही कॉमेडी सिरीयल नाही. नव्हती.)
काहीतरी सिरीयस ठोस ठरवेल.
माह्या नवरा चांगला आणि त्या शन्यानेच ह्यांना फसवलं ह्यातुन ही राधाका कधी बाहेर आली नाही.
वर सगळ्या जणी गुरुने ह्यांव अपमान केला त्यांव अपमान केला म्हणताहेत ते खरंच आहे. पण राधाकाला तोच सतत चांगला वाटत राहिला.
कधी तरी तो बदलेल. मी त्यांना परत आणेन आणि विशेष म्हणजे सतत शन्यालाच धडा शिकवेन, ते ही ढिम्म काहीही न करता सिरीयसली डोक्यात जाणारं होतं आणि आहे.
हे बिजनेस वैगेरे आताचं आहे. पण काही एपि मागे राधाका काहीही करत नव्हती. लोक जमवुन गार्हाणी सांगण्याशिवाय.
तेव्हाच ती लोकांना नावडती होऊ लागली.
आणि ती नावडती होऊ लागली म्हणजे गुरु शन्या आवडतात किंवा त्यांनी जे केलं ते बरोबर वाटतंय असा अर्थ काढत असतील लोक तर धन्यच.
<वर सगळ्या जणी गुरुने ह्यांव
<वर सगळ्या जणी गुरुने ह्यांव अपमान केला त्यांव अपमान केला म्हणताहेत ते खरंच आहे. पण राधाकाला तोच सतत चांगला वाटत राहिला.
कधी तरी तो बदलेल. मी त्यांना परत आणेन आणि विशेष म्हणजे सतत शन्यालाच धडा शिकवेन, ते ही ढिम्म काहीही न करता सिरीयसली डोक्यात जाणारं होतं आणि आहे.>
टिपिकल भारतीय बायकांची प्रतिनिधी दाखवलीय ती.
मालिकेला दिलेली ट्रीटमेंट विनोदी आहे. केडीचं खादाडपण अणि शनायाचं मराठीच अज्ञान इ.इ. -लेखक दिग्दर्शकाची कुवत.
मी त्या घटस्फोटाच्या सुनावणीच्या एपिसोडपासून नियमित पाहायला सुरुवात केलीय. आधी मध्ये सर्फिंग करताना दिसलं तर पाहायचो.
पण राधिका अशी अशी आहे, त्यामुळे गुरूचं वागणं जस्टिफाय केलं जाणं खटकतं. आता केबिनमध्ये विनापरवानगी घुसण्याचा प्रकार शनायानेही केलेला. एंगेजमेंटनंतर घराच्या इंटेरियरचं शॉपिंग करायला, तिला गुरूलाच घेऊन जायचं होतं. मध्येच ती दुसरी एक शनायाला स्पर्धक आलेली तेव्हा गुरू तिच्यासाठी मोबाइल घ्यायला जातो, ऑफिसचं काम टाळून शनायासोबत अनेकदा फिरतो या आणि अशा अनेक गोष्टींत प्रोफेशनलिझ्म नाही हे आपल्याला चालतं. पण गुरूवर सूड घ्यायला शेवटी एकदाची तयार झालेल्या राधिकाने त्याचा स्टाफसमोर अपमान केलेला चालत नाही, कारण ती अनप्रोफेशनल आहे.(हे मालिकेबद्दल आहे, असं म्हणण्यापेक्षा त्याबद्दल आपण कसा विचार करतो, त्याबद्दल आहे. अवांतर होऊ शकतं, म्हणून फार ताणणार नाही)
आता गुरूची आई त्याला घरी घेऊन येणार आहे, तेव्हा मज्जा येईल.
घटस्फोटाचा खटला बॅक बर्नरवरून काढून फ्रीजमध्ये ठेवलाय. हेही दिग्दर्शक, लेखक आणि वाहिनीवाल्यांच्या मर्जिनुसारच. किंवा प्रेक्षकांना काय आवडतंय याच्या त्यांच्या आकलनानुसार.
राधिका गुरूला धडा शिकवतेय हे लोकांना आवडतंय, असं त्यांना वाटत असेल.
एक फ्रँकली सांगू का हा केड्या
एक फ्रँकली सांगू का हा केड्या का खेड्या आहे ना त्याला श्रीमंती काय असते किंवा गरिबी अथवा पैसे नसल्यावर लोक नेमके कसे वागतात याचा जराही गंध किंवा अभ्यास, निरीक्षण नाही. आता बघा ना तो शनायाला हॉटेलात बोलावतो आणि कॉफी दोघे हाफ हाफ पिऊया किंवा ब्रेडला पिझ्झा समजूया वैगरे बोलतो.ती शनाया टूथपेस्ट पिळून ब्रश करायला बघत होती. काय हा लेखन दळिद्रीपण, हल्ली चाळीत/ झोपडीत राहणारी लोक सुद्धा गरिबीत टूथपेस्ट / एक वेळेचा चहा नाश्ता अफोर्ड करू शकतात. अरे त्यांच्याकडे पैसे नाहीत हे दाखवायला या अशा शुल्लक गोष्टी दाखवण्यापेक्षा शनाया शॉपिंग करू शकत नाही, लाईट बिल भरू शकत नाही, घराचे हफ्ते किंवा भाडे भरू शकत नाही हे बोल्ड करून दाखवू शकतात ना. पण नाही केड्या ची धाव कॉफी/पिझ्झा आणि टूथपेस्ट पर्यंत.
राधिका गुरूला धडा शिकवतेय हे
राधिका गुरूला धडा शिकवतेय हे लोकांना आवडतंय, असं त्यांना वाटत असेल.>>>>> अर्थात्च आवडतंय प्रेक्षकांना.
<<<<< राधिका अशी अशी आहे, त्यामुळे गुरूचं वागणं जस्टिफाय केलं जाणं>>>>>> कुणीही जस्टिफाय करत नाहीये गुरुचं वागणं. मी तरी नाहीच.
राधिका गुरूला धडा शिकवतेय हे
राधिका गुरूला धडा शिकवतेय हे लोकांना आवडतंय, असं त्यांना वाटत असेल.>>>>> अर्थात्च आवडतंय प्रेक्षकांना.
<<<<< राधिका अशी अशी आहे, त्यामुळे गुरूचं वागणं जस्टिफाय केलं जाणं>>>>>> कुणीही जस्टिफाय करत नाहीये गुरुचं वागणं. मी तरी नाहीच.
नवीन Submitted by सस्मित on 23 August, 2018 - 02:59 >>>>>> हो मला हि गुरोबाचे वागणे अजिबात आवड्त नाहि.
होय, सस्मित.
होय, सस्मित.
Pages