माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन शनाया आवडली नाही. येते तीच बोटाभोवती किल्ल्या फिरवीत येते. सिनेमातल्या प्राण, बिंदू टाइप. शनाया मॉडर्न, भोळसट आणि उधळी आहे. घरगुती गोष्टीत तिला रस नाही. मॉल, पिझ्झा, शॉपिंग आणि पार्लर इतकंच तिचं जग. तेव्हढं तिला एखाद्या रुबाबदार माणसाकडून मिळालं की खुश होऊन तिला तो आवडू लागला इतकं सोपं तिचं आयुष्याचं समीकरण. ती वॅंप नाही. अस्सल विलन तर नाहीच नाही. आता दिग्दर्शकाला तिचं कॅरॅक्टरच बदलायचं असेल आणि कथेला वेगळंच वळण द्यायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण जुनी शनाया ही लविंग होती, आवडणारी होती. तिचा राग येत नसे. उलट तिच्या मूर्ख कृत्यांचे हसू येत असे.

हो. ही आता कपट कारस्थानं करणारी शन्या आली आहे.
आधी श्न्याने कधी कपट कारथान केलं नाही.
ती वॅंप नाही. अस्सल विलन तर नाहीच नाही.>>>>+१
तिला गुरुची साथ होती म्हणुन ती राधाक्काला गूड फॉर नथिंग म्हणायची.
खरंतर गुरुच तिला गूड फॉर नथिंग समजायचा आणि तशीच वागणुक देत होता. म्हणुन शन्याही.

नवीन शन्याला accept करणं थोडं कठीणच जाईल. जूनीवाली शन्या भुमिकेमधे चपखल बसली होती. आता फक्त comparison होणार.

नविन शनाया दाखवली का काल. काय झालं काल. राधिकाचा बदला काय म्हणून. गुरूने अपमान केला आहे ना तिचा. >>>> काल शेवटचा भाग बघितला थोडाथोडा. ती गुरुला सुद्दा बरच काही बोलली. त्या सौमित्रचे तर शनायाचा बोलणे ऐकून तिच्यावर फिदा झाल्याचे एक्स्प्रेशन दिसत होते. Uhoh

पुढच्या भागात तो केडया शनायाच बोलण ऐकून "हिच्यात केवढा confidence आलाय" अस म्हणताना दाखवलाय. Proud

https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...

"या क्षणापर्यंत शनाया फक्त माझीच आहे. कारण ही भूमिका मला माझ्याव्यतिरिक्त इतर कोणालाच करताना पाहायचं नाहीय. " हे मात्र ती छान बोलली. शी इज राइट. Happy

रसिकाने चांगलं काम करून ठेवलंय. इशा केसकर त्याजागी शोभणारपण नाही. मला बानू म्हणूनही फारशी आवडत नव्हती.

ईशा थोराड वाटत असणार त्या भूमिकेत, मी बघितला नाही एपिसोड. रसिका छोटीशी वाटायची. एनीवे रसिकाशिवाय दुसऱ्या कोणाला शनाया म्हणून think करू शकत नाही. तसंही क्वचित बघायचे, त्यामुळे आता बघेन की नाही काय माहिती.

काल बानु शन्या बाईकवरुन पडली तेव्हा रसिका सारखी / जुन्या शन्यासारखी अ‍ॅक्टींग करत होती. ते आजिबात जमलं नाही तिला.

चंपा मी हेच लिहायला आले होते.... खूप कॉपी कॅट वाटते. May be तिला आधीचे एपिसोड्स दाखवून तशीच acting करायला सांगत असतील..... शनाया सारखे मध्ये मध्ये जास्ती इन्गिश words बोलते ते पण अज्जीबात सूट होत नाही...
रविवारच्या भागात ती भैताड शनाया राधाक्काला काय काय बोलते आणी एरवी स्ट्रॉंग दाखवलेली राधाक्का सगळं का बर ऐकून ghete? अजिबातचं पटला नाही तो सीन.. उगीच नवीन शनायाची एन्ट्री ग्लॅमरस करण्यासाठी केल्यासारखा वाटल..

आणि ती गुरु मातेची अ‍ॅक्टींग करुन " ही भयताड असं काय करायली.." असं काहीतरी बडबडत होती ते तर अज्जीबातच जमले नाही तिला..... नंतरचे हसणे देखिल अगदीच कृत्रिम! आणि मुळात नागपुरात करायराय, जायली असे बोलतच नाहीत हे यांना कोण सांगणार?

अरे समजुन घ्या बानुला. रसिका गेली आता.
रसिका रसिका होती इशा इशा आहे. प्रत्येकाची अभिनयाची वेगळी कुवत वेगळी स्टाइल.
आता अनिता मालिका सोडणार आणि तिच्या जागी म्हाळसाकाकु येणार Lol

धाक्का चालतंच राहिल. चालतंच राहिल. चालतंच राहिल. चालतंच राहिल. चालतंच राहिल.>>

अथर्व मोठा होईल आईच्याच कंपनीचा सीईओ मग त्याचे लग्न होईल अमलावतीच्या मुली थोबत.. मग त्याचा किस्सा बापाच्या सवाई... मग आई त्याला लाथ मारून हाकलेल मग सुनेच्या नावाने अजून किती तरी हज्जार कोटीची कंपनी विकत घेईल... पुढे सुनेचा किस्सा त्याच मार्गावर पुढे...
मग राधाक्काचे नांव इतिहासात कोरले जाईल...
इथे धागा क्रमांक मानदुबा तिसरी पिढी-- १००००० वैगेरे असे काही तरी असेल!

कृष्णा, ते मी म्हाळ्सा सतत चालताना दाखवायचे महालातुन त्या अर्थाने लिहिलं होतं. Lol
पण तुम्ही ही योग्यच लिहिलंय Happy

अरे समजुन घ्या बानुला. रसिका गेली आता.
रसिका रसिका होती इशा इशा आहे. प्रत्येकाची अभिनयाची वेगळी कुवत वेगळी स्टाइल.>> अगं पण ईशाने आपली स्टाईल दाखवावी. रसिकाची काॅपी करु नये.

मला रसिका आवडायची. शनाया नाही.
पण मला शनाया आवडत नाहीच पण ईशाही अजिबातच आवडत नाही. त्यामुळे इथून पुढे बघेन की नाही माहित नाही.

नवीन शनाया आल्यापासून आज पहिला एपिसोड..
रसिका खूप natural असायची. एकदम चुलबुली आणि उत्साही..
ईशा ओढूनताणून वागतेय..

रसिका खूप natural असायची. एकदम चुलबुली आणि उत्साही..
ईशा ओढूनताणून वागतेय>> ५ मि वर पाहू नाही शकले आज... मालिकेचा गाभाच हललाय..

शांतपणे निरोप द्यायला हवा होता मालिकेला शनाया नवीन न आणता, ती सोडून गेली आई बाबांकडे आणि नवीन शिकायला US ला गेली तिथून.

इथे राधिकाने पण हद्दपार करायचे गुरूला मग मालिका संपवायची होती.

राधिका, गुरू, शनाया तिन्ही chara करणारे कलाकार ती ती भूमिका उत्तम करत असल्याने, नवीन रिप्लेसमेंट कोणाचीही खरं म्हणजे योग्य नव्हतं.

अंजू...अगदी खरं बोललीस... तोच खरं म्हणजे लॉजीकल एंड झाला असता..... मालीकाही थोडक्यात संपली असती तर गोडी राहिली असती ..
पण टी आर पी च्या गणिताने सगळे बदलले व आता नवी शनाया आणून किमान सहा महिन्यांची निश्चिंती केलीय.
अती बोअर करतेय ईशा......तिचा बदललेला अ‍ॅटिट्युड, तर्‍हेवाईक वागणे..सगळेच नापसंत!
कुणीतरी तिचा 'बोलविता धनी' आणणारेत आता बहुतेक................................

मालिकेचं बजेटसुद्धा गंडलेलं दिसतंय.. ऑफिसचा पण सेट आहे..
आधी कुठल्यातरी फ्लॅटमध्ये होतं ऑफिस आता स्टुडिओमध्येच टेबल खुर्च्या मांडल्यासारखं वाटतंय

हो ना.......ऑफीस का बदललं पण... ? राधाक्का एक डायलॉग फक्त म्हणताना दाखविलेय....," कसं वाटलं नवं ऑफीस ? छान आहे नं?".....अरे!
आधी ३०० क्रोअर्स कुठून आणले...? आणि आता नवीन ऑफीस..? तिसरंच? मधेच राधिका मसाले नी घेतलेलं की 'ड्रीम ऑफीस'...!!!
काहीही............................................................
आणि त्या ऑफीसात कचर्‍याच्या बाद्ल्या / डस्ट्बीन्स का मधे मधे मांडल्या आहेत?

आणि त्या ऑफीसात कचर्‍याच्या बाद्ल्या / डस्ट्बीन्स का मधे मधे मांडल्या आहेत?>>>>>मलाही अगदी असच वाटल सुरवातीला.... Lol
पण त्या chair आहेत ....पर्वा राधिका आणि शन्या त्यावर बसलेले बघितले .......... Biggrin Lol

Pages