माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

वकील आणि बँकर्स उगाच कीस काढत बसतात आणि 6-12 महिने लावतात 1 कंपनी विकत घेण्याकरता. असे खरेच झाले तर कितीतरी सुशिक्षित लोकं बिनकामाचे होतील.

३०० करोड???? Uhoh
तिने जमवले असतील महिन्याच्या खर्चाच्या पैशातुन शिल्लक ठेउन.

हा हा काल एपि सोड होता काय? ड्यु डिलि जन्स न करता टेक ओवर पहिल्यांदाच बघि तला. ती कंपनी चालती करून परत नवर्‍यालाच देणार. महान भारतीय स्त्री आहे ती. परत तो ड्रेस काय महान !!!! रशियन आर्मी मेजर दिसत होती. मेक ओव्हर करते तर केस का नाही कापत?

अमा .. रशियन आर्मी मेजर .. Biggrin

मला तर आवडला तिचा ड्रेस.... जाड जूड पाय दिसत होते तो भाग सोडा....
परवाच्या भागात नुसतं पाणी ओतलं.... बकूळा ने फुलं देणं काय, बाबांचे डायलॉग्ज, नाना-नानी समिधाचे संवाद...उग्गाच!!

मला तर वाटलं की गुरुमाता देवळात थांबली म्हणजे गुरवाला फोन करुन कळविणार आता की राधाक्कानेच घेतलीए ईलएफ ते!
आणि ही म्हणे मारे की कुणाला कळवू नका...आणि स्वतः तर सांगत सुटली सगळ्यांना......!!

ती बकुळा किती सेंटी मारते उगाच किती ते डोळे फिरवते, ओवरअॅक्टींगचे दुकान. अशा कामवाल्या कुठे मिळतात शिरेलीत सोडून.

मला हा अटायर नवीन बऱ्यापैकी सूट होतो राधिकाला असं वाटलं. तो आधीच्या स्लीवलेस आणि ऑफिस अटायरपेक्षा. काही त्रुटी दिसतायेत पण ती मला बरी वाटली यात. चेहेरा जास्त मोठा वाटायचा एरवी तो लहान दिसला मला तरी. ८० टक्के सूट होतोय हा नवीन अटायर असं म्हणेन मी. अर्थात एकदाचं बघितलं त्यात. जास्त वावर बघितला की नीट मत मांडता येईल.

कशी गंमत आहे.. इथलेच काही आयडी इतर बिबींवर स्त्रियांचे ड्रेसिंग स्वातंत्र्य ,,बॉडी शेमिंग ,आम्ही काय घालणार ते आम्हाला तुम्ही कोण सांगणार म्हणुन तावातावानी भांडतात आणि इथे येउन राधिका, तिचे ड्रेस, जाडी यावर पानेच्या पाने लिहितात :एतेनेवः

मला चांगली वाटली राधिका ह्या ड्रेसमध्ये. आज मी ह्या मालिकेचा trp वाढवला, कंपनी ताब्यात घेणार राधिका म्हणून. तरी फक्त तो शॉट बघितला नीट बसून, बाकी कामं सुरू होती. ती आई जाम डोक्यात गेली.

उद्यापासून नको trp वाढवायला, कोणी लिहिले चांगला होता एपिसोड तर नेटवर बघेन. साडेआठची मालिका बघितली आज, पहिल्या सीनमध्ये नायिका बरी वाटली पण impressive नाही वाटली, अभिजीत गुरुच लिहितोय. कित्ती डिमांड त्याला. सु भा फार एजेड दाखवलाय.

त्या मालिकेत कट्टी बट्टी चे 2 कलाकार दिसले, गार्गी फुले आणि अभिज्ञा भावे.

Expected storyline end, Shanaya dumps Gary after Radhika insults her. And probably leaves serial.
Radhika is unable to raise 300cr. Gary helps her to bring back ALF to life.
And they ever lived happily. Ofcourse that end but expect 1 -2 more years, till trp is high.
Till then expect some insulting life of Gary and Shanaya.

मला चांगली वाटली राधिका ह्या ड्रेसमध्ये<< हो मलाही आवडली. थोडे पाय जाड दिसतात पण इट्स ओके. मध्यन्तरी जास्त जाड झाली होती., चेहरा मोठा वाटायचा. पण आता जस्ट थोडीशी बारीक झालीय... हनुवटी बाहेर आलीय. त्यामुळे छान दिसतेय.

हायला ए एल एफ टेक ओव्हर केली !! जे बात !! काय खतरनाक प्रोग्रेस आहे ! Wink
आता बघायला पाहिजे तो भाग .. म्हणजे आता लवकरच सोनियाचा दिनू येणार ! आय मिन शनायाचा गॅरी लवकरच (अजून वर्षभराने ) टेबलं पुसणार तर !!

धन्यवाद अन्जू.
बघितला नवा लूक. आक्का एयर होस्टेस दिसुन रायली ना बाप्पा.

राधिका छान दिसत होती. त्या पॅन्टपेक्षातर खूपच बरी. घटस्फोटाचं काय झालं. जेनीपण खूप छान दिसत होती. आनंदने काय केलंय केसांचं. अशी हेरस्टईल प्रसाद ओकची होती, दोघात तिसरा आता सगळं विसरा मध्ये. सौमित्र कदाचित त्याच्या राधाला प्रपोज करेल. पण भारतीय नारी राधिका सासूचं मन राखेल आणि गुरूनाथला नाथ हा माझा म्हणेल.

आर्या मस्त फोटोज.

सस्मित मम माझ्याकडून पण गुरुनाथसाठी big no.

आता घे बदला त्याचा, ती आई रडत भेकत बसली तरी strong रहा बायो राधिका तू. गुरुची गुर्मी अजूनही उतरली नाही. मी तर म्हणते आठवड्यात बदला घेऊन पहिलं कामावरून काढून टाक. नाहीतर तो हापिसात बसून उलट सुलट करेल, तुला कळणार पण नाही.
.

Pages