माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aata table pusanyacha scene zala.
Atta kiti Jan quit karatil?
Serial engaging asalyamule, sarv Jan pahat rahanar.

टेबल पुसण्याचा सिन बघून सोडणार ASE bolanare .. ...बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ...
फालतू कारण देऊन बघणे चालूच ठेवणारे .....पाद्र्याला पावट्याचे निमित्त

शनाया का तयार झाली टेबलं पुसायला. आधी ती आॅफिसचं कामही करायची नाही आणि आता टेबल पुसते हे काही पटलं नाही. गुरू नोकरी सोडू शकत नाही का. तशी काही अट आहे का. ढोल ताशे आणतो तो सौमित्र ते बरोबरच आहे, तीनशे कोटीचं टेकओवर फक्त गुरूला धडा शिकवायला हे फक्त राधिकाच करू शकते.

फक्त शनाया. बाहेरचं जेेवण चालत नाही ही काय फाल्तूगिरी आहे. त्या राधिकाच्या जुन्या हापिसात तर तो आनंद दिवसभर बाहेरचं हाय कॅलरी हादडत असायचा. जे डबा आणत नाहीत त्यांच्यासाठी राधिका खानावळ चालवणार आहे का की लोणची पापड खाऊन भागवायचं. तीनशे कोटीचा पत्ता नाही आणि म्हणे बाॅससारखी वाग. काल शनायाने दरवाजा वाजवला तर राधिका म्हणाली या या, सौमित्र तिला सांगतो कुणी दरवाजा वाजवला तर कम ईन म्हणायचं Proud

मंगळ, बुध दोन दिवस बघितली सिरीयल. कंटाळा आला, अजून वर्षभर पण चालवतील. माझ्याकडून काही trp वाढवणार नाही मी.

फक्त शनाया.
>> या मूर्ख धारकका ला गुरुच नवरा बरोबर आहे.

Fb वर हे वाचनात आले

राधिका मसाले @ 300 करोड
..
..
..
झालं ?? हसून झालं ?
जोक्स फॉरवर्ड करून झालं ?
..
दिवसभर जोक्स आणि इमेजैस चा पाऊस पडत असताना दोन बाबी सतत जाणवत होत्या .
एक म्हणजे मराठी माणसाच्या आखूड बुद्धीची . आणि दुसरी असं कसं होऊ शकतय ??
किंवा कोणी करूच शकत नाही या अक्कल हुशीरीची .. किव येत होती ..
..
..
अधुन मधून कोणीतरी MDH च्या महाशय धरमपालजी गुलाटीची इमेज शेअर करत होता .
म्हतारा म्हणून हिणवत होता ... पण लक्षात घ्या महाशय हे भारतातील सर्वात जास्त पेमेंट घेणारे CEO आहेत .
हा मसाल्यावाला स्वतःच्या Rolls Royce मध्ये फिरतो आणि स्वतःचं चार्टर्ड विमान बाळगतो .
..
..
मुद्दा पहिला , एखाद्या छोट्या कंपनीला 300 करोड इतकं valuation मिळू शकतं ??
उत्तर आहे ... हो !
मिळू शकतं .
आणि आजच्या जमान्यात तर ते आणखीनच सोप्प आहे .. सोप्प आहे म्हणजे कष्ट करावे लागणार नाहीत हे समजू नका !
समजा तुमचा छोटा ब्रँड आहे ... तुमच्या प्रॉडक्टची टेस्ट भलतीच चांगली आहे तर एखादी भलीमोठी कंपनी तुम्हाला तेवढे पैसे देऊ शकते ( जसं Thumsup हे कोकाकोलाने विकत घेतलं / indulekha Bringha oil याला Hindustan Unilever ने विकत घेतलं ) .
किंवा
तुमची आर्थिक परिस्थिती बळकट नसताना फक्त तुमच्या प्रॉडक्ट क्वालिटी मुळे प्रचंड मोठी ऑर्डर मिळते ..
मग अशा वेळी काय करायचं असतं ???
आपल्याला मिळालेली ऑर्डर आणि ती जर पूर्ण केली तर मिळणारा नफा यांचं प्रेझेंटेशन घेऊन .... investors ला मनवायचं असतं .
जर तुमच्या आयडीयात खरोखर दम असेल तर .. लोक एका पायावर तयार होतात तुम्हाला पैसे दयायला आणि पाहिजे तेवढे .. ( Byju's Learning App ला सिंगापूरच्या सॉफ्ट बँक नावाच्या कंपनीने आणि रतन टाटांनी फंडींग केलय ) .
आणि ती ऑर्डर पूर्ण करून तुम्ही तुमच्या कंपनीला कितीही मोठ्ठ करू शकता .
हेच राधीका सुभेदार ने दाखवून दिलय !
आणि आपण बसतोय टवाळक्या करत आणि जोक्स फॉरवर्ड करत !
..
..
मुद्दा दुसरा .
भारतातला मसाला उद्योग खरंच कोटयावधीची उड्डाणे घेऊ शकतो ??
उत्तर आहे : हो .
वर उल्लेख केलेले MDH चे मालक .. त्यांचे 13 उत्पादन प्लान्ट आहेत .1000 करोड ची कंपनी . रिफ्युजी म्हणून भारतात आलेले.. आज News channel च्या Prime Time मध्ये अॅड देतात ... दम पाहिजे त्याला .
दुसरे मसाला किंग धनंजय दातार ..
दुबईत पिठाची गिरणी चालवणारा हा माणूस 36 मौल्सचा मालक बनतो .. भारतातील मसाले नेतो .. स्वतः चं .. "Peacock" नावाने मसाला ब्रँड्रीग करून जगभर विकतो . आणि साताऱ्याचा माणूस बुर्ज-खलीफा या दुबईतील सर्वात उंच बिल्डींग मध्ये स्वतःचे दोन मजले विकत घेतो .. मसाल्याच्या जिवावर .
..
आणि आपण दात विचकून फक्त हसतो .
. लक्षात घ्या .. भारत जेवढे पैसे दागिने , हिरे , तांदूळ एक्सपोर्ट करून कमावत नाही त्याच्या दहा पट मसाला निर्यात करुन कमावतो ...
..
.. भारताच्या मसाल्याची ख्याती पोहचली नसती तर .. वास्को -द- गामा कशाला आला असता ???आपल्याकडे ??
..
म्हणून मित्रांनो . लक्षात घ्या .
कोणताच धंदा आज छोटा आहे म्हणून कधीच मोठा होणार नाही असा विचार पण करू नका . अपार कष्ट ,मेहनत , प्रामाणिकता , सचोटी या ठेवल्या तर काहीच अशक्य नाही .
कारण ???
"Talent" ला मात देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे .." Hardwork "
आणि राधीका मसाले ते करताना दिसतयं ! ..
..
विचार बदलण्याची गरज आहे .
. विचार बदलून स्वतंत्रता मिळवण्यासाठी शुभेच्छा .
..
© निलेश काळे .
किल्ले धारूर . जि .बीड .
Whatsapp : 9860555247

Talent" ला मात देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे .." Hardwork "
आणि राधीका मसाले ते करताना दिसतयं ! ..>>>>>>>>>>>> बाब्बो
<<<<<<© निलेश काळे .
किल्ले धारूर . जि .बीड .>>>>>>> आख्ख्या पोस्टला शि सा न. बस कर पगले रुलायेगा क्या?????

असेल ब्वाॅ. पण राधिका ईतक्या छोट्या छोट्या गोष्टीत आणि छोट्या लोकांना धडा शिकवण्यात (शनाया) अडकली आहे की ती हे सगळं करतेय आणि तेही एवढ्या पटापट यावर विश्वास बसत नाही. तिच्या कपड्यांमधे काही जादू असावी कारण ते घालायला लागल्यापासूनच ती कोटींच्या गोष्टी करतेय. ते अपार कष्ट ती स्वत: आणि तिचे कोणीही साथीदार कधीही करताना दिसले नाहीत. मालिका बघून चुकीचा संदेश जायला नको.

Talent" ला मात देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे .." Hardwork "≥>>>>>>

हा PJ अगदी हावर्ड आणि हार्डवर्क च्या तोडीचा होता Happy

राधाक्काला 300 कोटी जमवता येणार नाही, गुरु तिला ते मिळून देणार नाही , सौमित्र ची मदत नाकारुन राधाक्काचा आत्महत्येचा प्रयत्न , ऑफिस मधेल सगळे राधाक्काला मदत करण्या साठी आपली घरेदारे , दागीने विकणार , गुरुचे वडील संत्र्याच्या बागा विकणार ( त्यातून 300 कोटी जमतील का हा प्रश्न विचारु नका) . मग राधाक्का रेवतीच्या मदतीने टीव्ही , फेसबुक च्या माध्यमातून 'क्राऊड फंडींग' ची स्कीम राबणार .... ......
प्रत्यक्षातली शनाया चे काम करणारी कलाकार खरोखरीची परदेशी जाणार असल्याने तिला काही काळा साठी शिरेल मधून घालवायचे आहे त्यासाठी गुरु चे मद्यपान ... त्यातून शनाया - गुरु चे भांडण .. शनाया च्या आयुष्यात दुसरा कोणी,,, शनया गुरु ला सोडून दुसर्‍या बरोबर निघून जाणे .. पुन्हा गुरु चे मद्यपान .....आता. मग डायव्होर्स ची केस पुढे चालू .. ती जरा रंगात येते तो, ... त्या बोबड्या मुलाचा अपघात .. आय सी यु.... राधाक्का - गुरु दिलजमाई ... आता सारे गोड गोड असे वाटत असतानाच ... एव्हाना प्रत्यक्षातली शनाया चे काम करणारी कलाकार आपले परदेशी शिक्षण आटोपून भारतात परत आल्याने तिला टीआर्पी साठी पुन्हा शिरेली मध्ये घेणार... पुन्हा गुरु - शनया प्रकरण खुलणार ...

कहाणी आणखी 100 इपोसोड साठी तैयार !

....... केड्या ह्या घे आयडीया .. ..

बेडकाचा फुगून फुगून बैल नाही, डायनोसॉर झालाय, एकदाची टाचणी लावा आता. २ बाया आणि एक बाप्या घेऊन किती किती वर्षे दळू शकतात , सादर प्रणाम.

अन्जूबद्दल फार गैरसमज करून घेतलाय इथे Lol

मी गुरूला टेबल पुसताना बघायचं आहे असं लिहिलंय बरेचदा. शनाया नाही, तिला आधीही लादी घरची पुसायला लावली होती राधाने.

गुरुचा माज उतरताना बघायचं आहे असा अर्थ पण उतरणार नाही त्याचा माज. त्याला नामोहरम झालेलं बघायचं आहे. एक वर्ष घालवतील, त्यामुळे दोन एपी बघितले फक्त. कालपासूनच बंद. मंगळ, बुध बघितली.

जाऊ देना अंजू, तुला जे बघावंसं वाटतंय ते बघ. कोणाचीही जबरदस्ती का हे बघायचं नाही, ते बघायचं नाही. अगदी आठ वाजता बघितलीस तरी काही बिघडत नाही, तुझा वेळ, तुझी मर्जी. बघ आणि ईथे येऊन कीस पण काढ. परत तेच, तुझा वेळ, तुझी मर्जी.

मीच सांगते नका वाढवू trp आठला बघून. मीच दोन दिवस वाढवला, म्हणून हे लिहिलं.

मीच लिहिलेलं गुरु टेबल पुसेल तेव्हा लिहारे, त्यामुळे लिहिलं सर्वांनी शनायाने पुसलं तरी. ते गुरु लक्षात नसेल राहिले बरेच जणांच्या, त्यामुळे त्यांचे सर्वांचे आभार नक्कीच. ते सांगायला आले मला. त्यांना माहितेय मी रोज बघत नाही.

नक्कीच धन्यवाद त्या सर्वांना, जे मला सांगायला आले इथे.

हेच राधीका सुभेदार ने दाखवून दिलय !
आणि आपण बसतोय टवाळक्या करत आणि जोक्स फॉरवर्ड करत !
>>> अगदी बरोबर. उद्या तिने मायक्रोसॉफ्ट किंवा अँपल जरी विकत घेतली दाखवली तरी चालेल.

राधिका कॉन्फरन्स रूम मध्ये ही तुमची उपजिविका आहे म्हणाली Uhoh
ही नोकरी म्हणजे तुमचं उपजिविकेचं साधन आहे असं म्हण्णं जास्त बरोबर आहे ना?
उपजिविका म्हणजे उदरनिर्वाह....

Pages