माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण राधिकाचं असं वागणं जगावेगळं आहे का? (नवर्‍याऐवजी दुसर्‍या बाईला दोष देणं हे)

लोक म्हणजे कोण? कोणात्या आणि किती लोकांना राधिकाबद्दल सहानुभूती न वाटता तिचा राग येतोय?
इथे तुमच्या प्रश्नालाच किती होकारार्थी उत्तरं मिळालीत ते बघा.

सीरियल फालतू आहे आणि पात्रं फालतू रंगवलीत हे मान्य. हे कळत असेल, तर तुम्हांला लेखक दिग्दर्शकांचा राग यायला हवा. राधिकाचा नाही.

मालिकेची हाताळणी चुकलीय. कोणीतरी म्हटलं तसं आधी विनोदी करायचा प्रयत्न होता. आता एका (राधिकाच्या) बाजूने सिरियस झालीय. शनाया अजूनही बिन्डोकच दाखवलीय.

भरतजी - मी राधिका या पात्राबद्धल बोलतोय, ते काम करणाऱ्या अभिनेत्री बद्धल नाही. ते पात्र इररितेटिंग झालंय.

आपण चर्चा नेहमी पात्रांबद्धल करतो, पडद्यामागच्या लोकांबद्धल कशाला.
आता शनया बिनडोक आहे मग आपण असे कुठं म्हणतोय की लेखक दिग्दर्शक नीट काम करत नाहींयत.
सेम विथ ग्यारी - लोकांना ग्यारी चा राग येतो ना की लेखक दिग्दर्शक चा ☺️

मी कुठे अभिनेत्रीबद्दल बोलतोय?
तो गॅरी चुकीचं वागतानाच दाखवलाय. त्याचा राग येणं अपेक्षितच आहे.

गुरु आणि राधिका दोघेही सामान्य बॅकग्राउंडचे. नागपूरहून मुंबईला आले. इथे आल्यावर गुरूची प्रगती झाली . तो बदलला (असावा ) पण राधिका तशीच राहिली. घरगुती, नागपुरी, मोकळीढाकळी, इ.इ. म्हणून तो शनायाच्या मागे लागला असं दाखवताहेत.

मुळात दोघांचा प्रेमविवाह होता. म्हणजे हीच राधिका त्याला आवडत होती. मग स्वतः बदलला म्हणून त्याला ती आवडेनाशी झाली. त्याने तिला बदलायचा काही प्रयत्न केला का?

राधिकाच्या पात्रात नक्की काय इरिटेटिंग आहे? जिच्या नवर्‍याचं अफेअर आहे, अशा बाईने नक्की कसं वागावं, असं तुम्हांला वाटतं?
आपला संसार वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केले, असं ती म्हणतेय. यात संसारत घुसलेल्या शनायाच्याच ती मागे लागणार.

तिला खरं तर राधिकाचा रागच येतो आहे..पण नवर्‍याच्या धाकामुळे बोलता येत नाही!
टिपीकल सासू....!!!! >>>>>>++++११११ तरीच म्हटल कुठली सासू एवढी गुडी गुडी असूच कशी असेल? गुरुने राधिकेचा तीन वेळा विश्वासघात केला तेव्हा तिला साधा Doubt कसा नाही आला की राधिकाच चुकीच काही वागत असेल ,तिच्यात काही उणीव असेल म्हणून माझा मुलगा सारखा सारखा शनायाकडे जात असेल. कदाचित आता ती ह्या angle ने (गुरुच्या राधिकेविरोधात तिला सतत भडकावण्यामुळे) विचार करायला लागेल. ( खरतर राधिकावर असा आरोप करणे पुर्णतया चुकीचे आहे. )

उद्या गुरुमातेला असही वाटेल की उगाच राधिकाला करियर करु दिल. मोठ्ठी बिझनेसवुमन झाली म्हणून तिला एवढा माज आला etc. पण हिच गुरुची आई जेव्हा पहिल्यान्दा राधिकेकडे आली होती तेव्हा म्हणाली होती की, प्रत्येक स्त्रीने स्वतःच काहीतरी कराव. तिला घटस्फोट घ्यायला हिच सान्गत होती. विसरली वाटत सगळ मुलावरच्या आन्धळया प्रेमात! Angry

गुरुमाता टिपीकल सासूच आहे. मागे एक एपिसोड बघितला होता ज्यात ती शनायाच्या पदराला पिन अप करण्याच्या निमित्ताने मुद्दामहून तिला पिन जोरात टोचली, शनायाने आउच केल, तेव्हा ही म्हणते कशी, " अशी कशी ग तू नाजूक बाई! हे तर काहीच नाही. हयापेक्षा मी राधिकाला किती छळल होत. तिने कधी हू की चू केल नाही." एकप्रकारे सुनेला छळण कस योग्य हेच पटवून देत होती ती. हि सिरियल आजपर्यन्त अश्याच नकारात्मक गोष्टीन्ना प्रोत्साहन देत आलीये.

रेवती ला दुसर्या लग्नाला प्रोत्साहन देणारी राधिका स्वतः काहीबाही कारनं देते घटस्फोटाला >>> रेवतीने दुसर लग्न का कराव हयाची सुद्दा फालतू कारणे देत होती ही. लग्न झालेल्या बाईलाच समाजात स्थान असत, नवर्याशिवाय बाईला आधार नसतो etc.

राधिकाच्या पात्रात नक्की काय इरिटेटिंग आहे?
>>> भरतजी - खूप इररितेटिंग आहे. मागचे काही प्रतिसाद वाचा, प्रत्येकजण लिहितोय न आवडणाऱ्या गोष्टी.

भरतजी - मी राधिका या पात्राबद्धल बोलतोय, ते काम करणाऱ्या अभिनेत्री बद्धल नाही. ते पात्र इररितेटिंग झालंय.>>>>> चर्प्स, अहो या आधी कितीतरी वेळा तुम्ही राधिकाला रात्रभर भिजवून फुगलेला चणा म्हणायचा, ते काय होते नक्की मग

मलातर हल्ली जुनी अन बदललेली राधिका दोन्ही जस्टीफाईड वाटतात

VB - मी चणा त्या पात्राला म्हणायचो.काही जणांना आवडले पण होते ते.. लोल...
आता ग्यारी ला पिसवा असलेला दाढीवाला, शनायला चपटी , बिनडोक, दात बाहेर असलेला ससा असे पण कित्येक लोकांनी म्हटलेच आहे की.
त्याला कोणाचा आक्षेप नव्हता ☺️
राधिका विरुद्ध ऐकून घेत नाही तुम्ही काही लोक.

बॉडी शेमिंग नको म्हणून मी बंद केले ते चणा म्हणणे.

आणि VB - तुम्ही याच धाग्यावरच्या पहिल्या दोन - तीन पानांवरचे प्रतिसाद वाचा - तुमचेही काही आहेत प्रतिसाद त्यात ☺️

VB - मी चणा त्या पात्राला म्हणायचो.काही जणांना आवडले पण होते ते.. लोल...
आता ग्यारी ला पिसवा असलेला दाढीवाला, शनायला चपटी , बिनडोक, दात बाहेर असलेला ससा असे पण कित्येक लोकांनी म्हटलेच आहे की.
त्याला कोणाचा आक्षेप नव्हता ☺️
राधिका विरुद्ध ऐकून घेत नाही तुम्ही काही लोक.

बॉडी शेमिंग नको म्हणून मी बंद केले ते चणा म्हणणे.>>>> बरोबर अन हो, मी आक्षेप नाही घेतला की राधिका माझी आवडती आहे असेही नाही, फक्त ते चणा एखाद्या व्यक्तीला न म्हणता पात्राला कसे म्हटले ते जरा विचित्र वाटले.

आणि VB - तुम्ही याच धाग्यावरच्या पहिल्या दोन - तीन पानांवरचे प्रतिसाद वाचा - तुमचेही काही आहेत प्रतिसाद त्यात>>> चर्प्स मला तरी आठवत नाहीये की मी कुणाला त्यांच्या दिसण्यावरून काही बोलली आहे.

<<<<रेवतीने दुसर लग्न का कराव हयाची सुद्दा फालतू कारणे देत होती ही. लग्न झालेल्या बाईलाच समाजात स्थान असत, नवर्याशिवाय बाईला आधार नसतो etc.>>>>>>>>

हो हेच टी नेहमी असा चुकीचे जुनाट विचार मांडत आलीये.. ते त्या पात्राचे विचार म्हंटल तरी ते बरोबर आहेत असा वेळोवेळी लोक म्हंटले आहेत .. म्हणजे तो त्या सीरिअल चा स्टेन्ड आहे..

>>>>>>राधिकाच्या पात्रात नक्की काय इरिटेटिंग आहे? जिच्या नवर्‍याचं अफेअर आहे, अशा बाईने नक्की कसं वागावं, असं तुम्हांला वाटतं?
आपला संसार वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केले, असं ती म्हणतेय. यात संसारत घुसलेल्या शनायाच्याच ती मागे लागणार.>>>>>>>>>>
नवरा तिला पहिल्यापासून च घालून पडून बोलतोय..
नवरा सुधारू शकतो .. परत येऊ शकतो या साठी प्रयत्न .. त्याला फसवलं असेल असा वाटणे ठीक..
पण त्याची काहीच चूक नाही ती मुलगीच खराब हे टिपिकल ८० - ९० च्या मुव्ही मधले ट्रेंड आहेत..
गावाकडे पण आता अशा बायका नाही राहिल्या .. नवर्याला सर्वस्व मानणार्या
झोडपातील अशी वागणूक दिली तर ..
त्याच अफेअर तर सोडाच तो वागणूक पण किती दुय्यम देत होता तिला आणि अजूनही देतो ..
सेंटर असलेलं पात्रच इतकं बिनडोक मागासलेल्या विचारांचं आहे.. आणि मुख्य प्रॉब्लेम हा की त्या पात्राचे विचार च कसे बरोबर हे चॅनेल दाखवत आहे..

अर्रर्र....शन्या गेली तर सिरियल कशी टिकेल? राधिकाच्या नवर्याची (होणारी) बायकोच नसेल तर राधिका कुणाच्या नावाने खडे फोडणार?? आणि ती जाणार म्हणून गॅरॅ खेकसायला लागलाय का तिच्यावर? So much confusion... Uhoh

Lol अरेरे शन्या.

आवरा मानबा आता. एकेक जातील नाहीतर.

Lol

तसंही तिचं बिचारीचं chara फार बिनडोक करून ठेवलेलं, ती पण कंटाळली असेल तेच तेच करायला.

मालिकेतलं पात्र आणि ते रंगवणारा अभिनेता यांना एकच समजणं खूप कॉमन आहे. याच धाग्यावरचा एक प्रतिसाद आठवतोय.
अनिताला विचारलेलं की सेटवर अभिजित कोणाबरोबर अधिक असतो/बोलतो.

राधिका सतत गुरूला कटकटीचं वाटेल असं वागत असते, त्यामुळेच सेटवर अभिजित अनितापेक्षा रसिकाशी जास्त बोलतो, असा समज प्रतिसादकाने करून घेतला होता.

ईथे सिरियलमधल्या पात्रांबद्दलच चर्चा होणे अपेक्षित आहे आणि बर्याच अंशी तशीच चर्चा होते. बोल लावले जातात किंवा कौतुक केलं जातं ते पात्रांचंच. कुणीतरी ते पर्सनली घेऊन त्याबाबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. जशी ती सिरियल मनोरंजनासाठी आहे, त्यातल्या घटनांवर, पात्रांवर कमेंट्स करुन मनोरंजन करण्यासाठीच हा धागा आहे. त्यात काही गैर वाटत नाही. सिरियलच्या बाहेर अॅक्टर्स म्हणून वा माणूस म्हणून ते सगळे लोक चांगलेच आहेत की.

काल घेतली बाई राधिकाने एकदाची ए एल एफ ताब्यात.
दक्षी, अन्जु आता तयार रहा, ग टे.पु. चा शीन पाह्य्ला. Lol

आणि असा लिलाव करतात का कंपनी चा ????

३०० क्रोअर्स कुठून आणणार पण ही? >>>>> मलाही आणि (तिच्या) शेजारच्या आनंदलाही हाच प्रश्न पडला

३०० क्रोअर्स कुठून आणणार पण ही? साठे बाई देणारेत का? की सौमित्र? >>> जाऊद्या हो आपण काळजी नको करायला, सिरीयल इतक्या illogical असतात एरवी. संपणार असेल तर सहज आणेल, ताणायची असेल वर्षभर तर फेल होईल मिशन. मी म्हणते होऊदे दे हो manage सर्व नीट. गुरूने टेबल पुसुदे, div होऊदे आणि शिरेल संपूदे.

हाहा. अगदीच काॅमेडी चालू आहे. तीनशे करोड म्हणजे तीनवर किती शून्य हे तरी माहित आहे का राधिकाला. त्या घटस्फोटाचं काय झालं. झाला की नाही.

Pages