माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गुरूच्या आईकडून पैसे मिळाले >>>> पण ती गुरुच्या आईकडून का पैसे घेईल? अस तर नाही ना, राधिकाचा राग येऊन तिने शनायाशी हात मिळवणी केली? Uhoh

तो रधिकाल धदा शिक्वायला म्हनून विविध कार्स्थान रचेल. उन्दिर मन्जर खेल कन्तिन्युज >>> हो. आणि भान्डता भान्डता राधिका गुरु पुन्हा एकदा (एकमेकान्च्या) प्रेमात पडतील. त्या केकताच्या सिरियल्समध्ये कस दाखवतात तस. मग काय, गुरुमाता खुष.

अन्जू मी का म्हणते तुल लिहयचं कै भान असून राह्यलं की नै? कैच्याकै लिहून र्हैली तू.. >>> Lol

सिरीयल मध्ये दोन भाग बघितली कधीतरी म्हणून असं झालं असावं Wink .

काल शन्या ऑफिसातली स्टेशनरी चोरुन रस्त्यावर विकत होती. Uhoh
आय मीन सिरीयसली??? डोक्यावर पडलेत का हे सिरेयलशी संबंधित सगळेच??
मुर्खांचा बाजार येड्यांची जत्रा.
मला तर शिव्याच आल्या तोंडात.

<<काल शन्या ऑफिसातली स्टेशनरी चोरुन रस्त्यावर विकत होती. Uhoh<<
हो ना, आणि ते राधिकालाच विकुन आलेल्या ५० रुपयात चायनीज आणते व ते ५० रु चे चायनीज तिघे मिळुन केड्या, आन्टी व ती तिघे मिळुन आनन्दात जेवतात.

रसिकाचे शेवटचे shots असतील म्हणून ती जास्तीतजास्त बिनडोकपणा कशी करतेय हे दाखवतायेत का. सुटली रसिका केड्याच्या तावडीतून.

नवीन शनाया आणणार आहेत असं ऐकलं, म्हणजे सिरीयल अजून वर्षभर तरी दळणार.

ही शनाया मुळात राधिका ला राधिका मसाले च्या फाईल्स विकतेच कशी? Uhoh
चाललं जायचं ना तिथून. कैच्य अकैच.

केड्या डोक्यावर पडलाय...आणि त्याला कुणी उचलतही नाहीए असं वाटतंय.....!!!!
Angry

गेले दोन आठवडे ही सिरीयल मी बघीतलीच नाही. इथे जरा अपडेट्स कळले. त्या केड्याला डोक्यावर पडलाय काय म्हणताय? त्याच्या दाढीत खूप बारीक उवा झाल्याने त्याला काहीच सुचत नाहीये, त्यातुन तुला पाहुन घेईन रे असे म्हणत शनया बाहेर पळाल्याने तो जास्त पिसाळलाय.

केड्या, आन्टी व ती तिघे मिळुन आनन्दात जेवतात. >>>> कोण हि आन्टी? Uhoh

तुला पाहुन घेईन रे >>>>> Rofl

नवीन शनाया आणणार आहेत असं ऐकलं, म्हणजे सिरीयल अजून वर्षभर तरी दळणार. >>>> पण म. टा. त लिहिल्याप्रमाणे गुरुला सत्य कळल्यावर तिला चपराक मारणार आहे, मग ती रडत निघून जाईल. म्हणजे गुरुच्या आयुष्यात कुणी तिसरीच मुलगी येईल सिरियलच दळण दळायला.

फाईल्स विकते ते कालच्याच भागात झालं ना? Uhoh
५० रूपयात ३ जण पोटभर चायनिज खाऊ शकतात? Uhoh मला वाटते राधिका सोडून तिने इतरांना पण विकलीच असेल स्टेशनरी ना? बट हाऊ चिप Sad

बिन्डोक सिरीयल
कालचा राधेमा शन्याचा ऑफिसात अपमान करते तो एपि भंकस आणि असह्य होता.
अशा चोर व्यक्तीला नोकरीवरुन काढुन टाकलं पाहिजे म्हणल्यावर शन्याने आनंदाने हो काढुन टाका म्हणुन निघुन जायला हवं ना फरशी पुसत्त बसण्यापेक्षा

आणि अ‍ॅप्रन अडकविण्याची काय शिक्षा? मला समजलं नाही ..<<
हो न.. यात काय मोठि शिक्षा!
आणि उलट तिलाच विचारते.. तुला काय शिक्षा करु आता मी सान्ग!

पान्व्ल्कर म्हणाले की शनायासारख्या मुलिंना स्वतःच्या सुखासमोर कशाचीच भ्रांत नसते. भ्रांत? हा शब्द इथे योग्य आहे? पर्वा, किंवा शुद्ध हा शब्द हवा ना? Uhoh

पानवलकर वगैरे नुसते दिलेले संवाद पाठ करतात का. अ खांडकेकर तर मराठी रेडिओ जाॅकी होता. त्याचं मराठी उत्तम आहे खरंतर. निवेदनही छानच करतो तो.
च्रप्स काहीतरी काय. पानवलकर किती साधे आहेत.

पण त्या श्न्याला फरशी पुसायचं काम आणि गुरोबाला टेबलावर बसायचं काम का म्हणून.
त्यालाही फरशी पुसायला, टेबलं पुसायला लावायचं ना.
खरंतर शन्यापेक्षाही तो जास्त गुन्हेगार आहे राधेमाचा.
पण राधेमाल शन्या च्याच मागे लागल्यात.

मी बघूची सोडली परत. लयच बोअर मारत्यात नि कैच्याकै दाखवत्यात.
त्या घटस्फ़ोटाच्या केसला कै पुढच्या वर्षीची तारीख पडलीय की कै???

बापरे! माबो वर भैताड बायका आणि गुऱ्याचा भलता मोठा फॅन दिसतोय! प्रत्येक भागाचे छान चर्वण होतंय इथं!

कदाचित मुळ भागा पेक्षा इथल्या टिप्पणी वाचून कथा तर समजतेच शिवाय धावते खुसखुशित समालोचन पण वाचायला मिळते. Happy

सिरीयल वाल्यांकडंच पाणी संपलं तर माबो वाल्यांकडून हौदाभर पाणी घेता येईल आणि किमान दोन चार वर्षे ही सिरीयल पीठ पाडत राहील.

Pages