माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना...... राधाक्काला पुन्हा भोवळ आली आणि भांडण अर्ध्यावरच राहिलं.
वहिनी खूप इरिटेटींग आहे. गुरवाचे वडिल बेस्ट काम करतात. आई पण.
वहिनी , भाऊ व तो जाड्या पोरगा यांना हाकला आता सिरेलीतून.
कैच्या कैच.
इतके लोक त्या एकाच प्लॅट मधे राहतात तरी कसे काय.... गुरु - शन्या ला कपडे धुणे, जेवण, चहा- नाश्ता, भाजी- दळण आणणे, चादरी बदलणे, झाडणे- आवराआवरी-साफसफाई अशी बेसिक कामे नसतात का?

गुरु - शन्या ला कपडे धुणे, जेवण, चहा- नाश्ता, भाजी- दळण आणणे, चादरी बदलणे, झाडणे- आवराआवरी-साफसफाई अशी बेसिक कामे नसतात का?>>>>> असं कसं शक्य आहे, आंगो ? तू काहीही अपेक्षा ठेवतेस. Proud ती चपटी शन्या मागे घर झाडतांना मी पाहिली, त्याच वेळी गुरुबाळ येऊन बच्चा बच्चा करत सहानूभूती दाखवतं होत, कारण त्याच्या बच्च्याला काम पडलं हे पाहुन बहुतेक त्याचे बीपी हाय झाले असावे.

मग हे दोघे हॉटेलमधूनच चहा-पिझ्झा- नाश्ता वगैरे मागवत असतात. मागे चक्रम वहिनीने शन्याकडुन २५ हजार घेतले होते म्हणे जेवणासाठी, पण राधाक्काने तिला रंगे हात पकडल्याने इरी वहिनी जाम पेटल्यात. मी डोक्याला ताप व्हायला लागला की सिरीयल पहाणे बंद करते, पण आमचे साबु ( पक्षी :- सासरेबोवा) कधी कलर्स तर कधी झी पहात असल्याने या सिरीयली अधून मधून नजरेत येतात. मग मी मुलीला तारक मेहता बघायची मुभा देते. ती सिरीयल पुष्कळ बरी या पेक्षा.

व्हिलन म्हणजे राधिका ना?>>>> तुमच्या दृष्टीने असेल ती. माझ्या दृष्टीने भैताड शन्या आणी गुरु व ईशाच व्हिलन.

गुरुबाळ कायम का सुटाबुटात असतं म्हणे? घरी पण? आणि काल रेवती कसली गोड दिसत होती...!! शन्या ला आता काळजी पडली आहे की जर गुप्ते व रेवतीने लग्न केलं तर...मग?
"अजून किती अंत पहाल माझा...." असं म्हणाता राधाक्का काहीही गरीब - अगतीक वगैरे वाटली नाही...! जरी तो संवाद एखाद्या सहनशील, दीन स्त्री चा असावा असा (उदा. गडकर्‍यांची सिंधू!) होता तरी!

पण गुरोबा कायम दात ओठ खात तरी असतात नाहीतर विचकत तरी असतात. शन्या अगम्य हावभाव करते. इरी वहिनी पण तिला सामिल हावभाव दर्शवते. राधाक्का आता तरी सुधरा वो.

इरि वहिनी.. Biggrin
शन्या पण फार तोंडं वेडीवाकडी करते......
पण मला आता अती बोअर झाली ही सिरीयल. बास आता..राधाक्का चं दळण!
माझ्या एकदम डोक्यात जाणार्‍या गोष्टी खालील प्रमाणे - दादाचा विग, ऑफीस मधले गॉसिप, जेनीचे सारखे स sss स sss म्हणणे, गुरवाचे बच्चा बच्चा करणे, टोटल राधाक्का व तिचा नागपुरी हेल, इरी वहिनी व तिचे कृत्रिम बोलणे, अचानक दाढी मिशा साफ केलेला मनिष....
Angry

अचानक दाढी मिशा साफ केलेला मनिष....>>>>> आंगो, कोण गं हा मनीष? तुला श्रेयस म्हणायचे आहे का? कालचा आणी परवाचा भाग मी पाहीला नाही, त्यामुळे कोण कसे दिसतयं देव जाणे. फक्त काल राधाक्का संतापलेल्या पाहील्या तिथेच एपि संपला. एक झलक पाहीली होती, ज्यात राधाक्का, रेवतीला गुप्ते भाऊंशी लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करत असतात, आणी म्हणतात अगं पत्नीचा दर्जा देतायत तुला ते. आता राधाक्का अजूनही समाजाच्या दृष्टीने गुरवच्या पत्नीच आहेत, पण त्यांचा काय दर्जा आहे देव जाणे.

रश्मी..... Biggrin अगं तोच तो...श्रेयस! होसुमीयाघ मधला मनिष!
आपण सर्रास गुरवाच्या, गुरवाला म्हणतो..........खरा गुरु असता तर त्याला राग आला असता!
Rofl

Biggrin कुणीतरी आपली ही लिंक त्या नवर्‍याच्या बायकोच्या फेसबुक पेज वर चिकटवा रे. बेशुद्ध पडतील ते हे वाचुन.

मालिकेत खरा ट्विस्ट तेव्हाच येईल, जेव्हा गुरु बाळाचे आई बाबा, राधाक्काला बघायला घरी मुंबईला येतील. शन्याची आई पण आली पाहीजे. आणी सोसायटीत काय चालले आहे ते पहाण्यासाठी त्या लांब नाक वाल्या ईशाच्या आई बाबांनी पण डोकावले पाहीजे.

रश्मी Lol

तू धन्य आहेस माते, प्रणाम स्वीकार. मला वाटलंच इरिटेटिंग चा shortform असेल.

विग नाही आहे दादाचा. देवाची देणगी आहे ती भरघोस केसांची >>> किरण माने ना तो, त्याचे खरे केस आहेत ते.

ज्यात राधाक्का, रेवतीला गुप्ते भाऊंशी लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करत असतात>>> मला वाटत, जी गोष्ट राधाक्काला जमली नाही आजवर, ती गुरु साध्य करेल रेवती आणि सुबोधला टोमणे मारुन. Angry

अगं तोच तो...श्रेयस! होसुमीयाघ मधला मनिष! >>> काय फरक पडतो? दोन्हिमध्ये तो सारखाच दिसतोय आणि वागतोय.

इरि वहिनी >>> Lol

विग नाही आहे दादाचा. देवाची देणगी आहे ती भरघोस केसांची >>> किरण माने ना तो, त्याचे खरे केस आहेत ते. >>मलाही विग वाटला. हल्ली असेच होते. जरा काही चांगले पाहिले की ते खरे कि खोटे हा प्रश्न पडतो Happy

राधाक्का गुरवाला घटकस्फोट देत नाही. त्यामुळे गनायाला लग्न करता येत नाही. त्यांचे लग्न नाही म्हणून इतर लोक सतत त्यांना बोलतात. त्याचा राग म्हणून तो रेवती-सुबोधला बोलतो.
आता त्यांनी जर लग्न केले तर गुरव म्हणायला मोकळा कि... अरे आम्हाला पण लग्न करायचे आहे पण राधाक्काच लग्न करु देत नाही तर आम्ही काय करायचे?
हिला त्यांना सुखाने राहू द्यायचे नाही आणि त्यांचा त्रास होतोय म्हणून रडत बसायचे.

पण रेवतीला चिडायला काय झाले.. लफडे आहेच ना तीचेपन.

मी म्हणतो राधक्का ने गुरू ला घडस्फोट देऊन आनंद शी लग्न करावे.. ऑफिस सोडून राधिका वाहिनी ची जास्त चिंता असते त्याला. खुश राहतील दोघे, एक भिजलेला चना आणि दुसरा भटूरा!☺️

पण रेवतीला चिडायला काय झाले.. लफडे आहेच ना तीचेपन.>>>>>>> ???? च्रप्स तुम्ही ही सिरीयल नक्की बघता की इथली चर्चा वाचुन अंदाजपंचे डॉयलॉग्ज्स मारताय? Uhoh तुम्ही गुरुचे भाऊ शोभता मात्र. लफडं कशाला म्हणतात हे माहीत आहे का तुम्हाला? गुरु आणी शन्याने जे केलेय ते लफडे आहे. ते दोघे राजरोस पणे रहातात, अजून बरेच काही करतात जे रेवतीने केलेले नाहीये. रेवतीचे पात्र चांगलेच मर्यादा सांभाळुन वागतांना दाखवलेय या सिरीयल मध्ये उग्गाच काहीही लिहु नका इथे.

आणी त्या आनंदला कशाला नावे ठेवताय? तो ऑफिसमध्ये टाईमपास करतांना दाखवलाय ते चूकच आहे, पण तो राधिकाला मदत करतो कारण सुरुवातीला त्याच्या कडे घर नसतांना राधिकाने आपुलकीने त्याला मादत केलेली असते. तुम्ही बघता काय! लिहीता काय! इथे असे लिहीण्यापेक्षा त्या राजकारणाच्या धाग्यावर लिहा, तिथे बरीच हाणामारी चाललीय.

रश्मी प्लस वन. आंनद ने राधिका ची भाऊबीज केली आहे...त्यामुळे इतक्या खालच्या पायरीवर जाऊन लिहायची गरज नाही ...ते काम सिरीयल वाले करत आहेत...

लफडया बद्दल पण प्लस वन रश्मी

च्रप्सनी तिकडे रेखाच्या खूबसूरतमध्ये संजय दत्तनी छान काम केलं असं लिहिलंय.
अख्खा लेख न वाचताच?
त्यापुढे हे काहीच नाही Wink

माझ्या नवऱ्याची बायको संपत आली का? कालच 'माझ्या बायकोचा प्रियकर' असे काहीतरी गाणे कानावर पडले. माझ्या सासूचा तिसरा नवरा आणि माझ्या सासऱ्याची चौथी बायको ह्या मालिकाही लायनीत उभ्या असाव्यात.

साधना, सहि एकदम

मालिका नको संपायला

इकडे वाचायला खुप मजा येते

च्रप्सनी तिकडे रेखाच्या खूबसूरतमध्ये संजय दत्तनी छान काम केलं असं लिहिलंय.
अख्खा लेख न वाचताच?
त्यापुढे हे काहीच नाही>>>>> Lol कठिण आहे च्रप्स तुमचे. तो खुबसुरत संजयदत्त- उर्मिला मातोंडकरचा होता, स्वप्नाने जुन्या खुबसुरत बद्दल लिहीलेय.

साधना, ही सिरीयल लवकर काही संपणार नाही असे दिसतेय. होतं काय की आज बघीतलयं, पुढे काय होतयं ते बघू, असे करत करत या रटाळ बीन बुडाच्या मालिका बघीतल्या जातात, आणी त्यातुन यांचा TRP वाढतो.

च्रप्सनी तिकडे रेखाच्या खूबसूरतमध्ये संजय दत्तनी छान काम केलं असं लिहिलंय.
अख्खा लेख न वाचताच?
त्यापुढे हे काहीच नाही >>> Lol

Pages