माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी मराठी वर ग्रहण नावाची नवीन मालिका सुरु होतेय. पल्लवी जोशी आहे त्यात. मानबा सम्पतेय की काय?
>>
बहुतेक ही मालिका संपणार आहे. समिधाचे हृदयपरिवर्तन झाले आहे. इतकी वर्ष निगरगट्ट असलेल्या विलन लोकांचे अचानक हृदयपरिवर्तन होऊ लागले म्हणजे समजायचे की मालिका आता शेवटचे गचके देऊ लागली आहे.

झी मराठी वर ग्रहण नावाची नवीन मालिका सुरु होतेय. पल्लवी जोशी आहे त्यात. मानबा सम्पतेय की काय?>> सगळ्याच मालिका सम्पवल्या पाहिजेत झी ने एक एक करुन.. रात्री १० ते ११ तर अशक्य फालतूगिरी सुरु असते.. चुकून एखाद्या वेळी झी सुरु असेल त्यावेळी तर भयन्कर मनस्ताप होण्याची खात्री आहे

ही मावशी म्हणजे रोहिणी निनावे, मालिकेची दुसरी लेखिका, >>> नुसत्या लेखिका काय, सिरीयल ह्या बाईसाहेबांचीच आहे, निर्मात्या आहे त्या मानबाच्या.

ही मावशी म्हणजे रोहिणी निनावे, मालिकेची दुसरी लेखिका, >>> नुसत्या लेखिका काय, सिरीयल ह्या बाईसाहेबांचीच आहे, निर्मात्या आहे त्या मानबाच्या. >>> क्काय? अवन्तिका, दामिनी सारख्या मालिका लिहिणार्या लेखिकेकडून ही अपेक्षा नव्हती. Uhoh

झी मराठी वर ग्रहण नावाची नवीन मालिका सुरु होतेय. पल्लवी जोशी आहे त्यात. मानबा सम्पतेय की काय? >>> कधी सुरु होणार आहे? >>>> मार्चमध्ये.

https://www.loksatta.com/manoranjan-news/pallavi-joshi-to-make-a-comebac...

पावशेर्कर >>> Rofl

रविवारी झीचे आवडता आवडती अवॉर्ड्स पाहिले.
(रिरपीट टेलिकास्ट होते का?) याच मालिकेला सगळ्यात जास्त विनर्स होते. गुरु बेस्ट व्हिलन आणि शनाया बेस्ट खलनायिका. शिवाय अभिजित गुरू का कोणीतरी त्याला बेस्ट लेखक. अआणि बहुतेक ही सर्वोत्कृष्ट किंवा सर्वाधिक लोकप्रिय मालिकाही. >>>> सर्वोत्कृष्ट स्त्री व्यक्तीरेखेचा अवॉर्ड् राधिकाला मिळाला होता.

अरे वा अशी उपरती झाली तर तिने प्रतिज्ञा केली होती त्याचं काय. मी तुम्हा दोघांना माझ्या ऑफिसमध्ये टेबल पुसायला लावेन वगैरे Wink .

नको...प्ली sssss ज!!! ते जान्हवी सारखं नको बाबा..सिलेक्टिव्ह स्मृती भ्रंश......!! प्रेक्षकांना दावणीला नका बांधू म्हणावे.
काल तर जय मल्हार सिरीयलचा सिनेमा करुन दाखविला......!! म्हाळसेची आकारमानात होत गेलेली स्थित्यंतरं चांगलीच जाणवली.....! जनरली हिरॉईन एक सिनेमात एकाच साईझ ची दिसते म्हणून हे अगदीच जाणवलं!

मला पण असच वाटलं - जानू सारखं होणार, शनाया आठवणार नाही, मग संसार सुरू, दुकान-व्यवसाय सगळं गेलं तेल लावत

हा सिलेक्टिव्ह मेमरी जाणे प्रकार अति कॉमन झालाय. गोठ मध्ये सहा महिने हिरोची गेलीय, अजून आली नाही. सगळीकडे फिरतो, गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतलाय सर्वांनी तारखा मागे करून काळ ह्याच्यासाठी मागे नेलाय का हा प्रश्न विचारला fb वर तर उत्तर देत नाहीत. कोणीतरी मागे म्हणाले होते काही महिन्यापूर्वी कि गोठ पण रोहिणी निनावे लिहितात पण काही कारणाने त्याचं नाव देत नाहीत तिथे नामावलीत. काय माहीती खरं काय ते. शिल्पा नवलकर लिहायच्या तेव्हा मालिका चांगली होती.

अवंतिकापण रो नि लिहायच्या तिथे पण शेवटी काही काळ सिलेक्टिव्ह मेमरी गेली होती नायिकेची, गोठ त्या लिहित असतील तर तिथेही आणि इथे तोच ट्रेंड वापरला तर अति धन्य.

राधिका बैंचा आक्शिटेन झाल्यानंतर काय झाले? >> सगळीकडे कळवा-कळवी. रेवती दवाखान्यात जाते तर त्यांच्या नवर्‍याला कळवायला सांगतात. गुरुला कळविल्यावर ऑफीस मध्ये खूप काम असले तरी गुरु स्टाफला कळवून मीच दवाखान्यात जाणार म्हणतो आणि जातो. त्याला बघून सगळेजण तोंड वाकडे करतात. तिकडे वैनीबाईला कळवल तर ती काही दादाला कळवायला तयार नाही कारण त्याने लगेच तिकडे जाऊन सगळी जबाबदारी उचलायला नको आहे.

आणि शन्या व इशा कोल्ड ड्रिंक्स ची खोकीच्या खोकी आणून त्यात लकी ड्रॉ लेबलवाली बॉटल शोधताहेत.! शनाया अभिनय मात्र छान करते. राधिका ला अपघात झाल्यावरची तिची रिअ‍ॅक्षन मस्त होती! किंचीत धक्का बसला....पण ओके अशी!

गुरुला कळविल्यावर ऑफीस मध्ये खूप काम असले तरी गुरु स्टाफला कळवून मीच दवाखान्यात जाणार म्हणतो आणि जातो. >>> सुधारला वाटत गुरु.

आणि शन्या व इशा कोल्ड ड्रिंक्स ची खोकीच्या खोकी आणून त्यात लकी ड्रॉ लेबलवाली बॉटल शोधताहेत.!>>>नेमकी वैनीबाईंकडे लकी बॉटल आली आहे आणि तिने ती लपवली आहे.

शनायमुळे टिकून आहे trp, नाहीतर त्या रात्रभर भिजून फुगलेल्या चण्याला( धारिका) कोण बघतंय.

मधेमधे येणार्‍या टीझरमधे पाहिलं. गुरु म्हणतोय इअतकं झालं तरी राधिकाचा तोरा (का माज कायतरी शब्द) काही उतरत नाहीये.
ही बया काय म्हणुन ह्या माणसाला परत मिळवायला बघतेय.
तो सरळ शन्यला बच्चा बच्चा करतोय घरी सगळ्यांसमोर. आता कशी म्हणे उपरती होणारे त्याला.
उपरती राधाक्काला व्हायला हवीये खरंतर.

>>>रात्रभर भिजून फुगलेल्या चण्याला( धारिका) >> आई ग... धाराक्का...फुगलेला चणा.. हा हा ..मस्त उपमा Biggrin ..
शनाया आणि गुरवाला पण द्या की एखादि उपमा...

राधाक्का खरंच भीषण दिसत होती त्या दवाखान्यात...म्हणजे असा चेहेर्‍याला समांतर कॅमेरा लावलेला...त्यामुळे तिचे डोळे अगदी मिच मिचे व मेक अप ची पुटंच्या पुटं...!! जाड, निबर सुजल्या सारखी दिसत होती...गुरु खरंच तिच्यासमोर बच्चा दिसतो.
समिधा मस्त दिसते इव्हन!
कायच्या काय पाणी टाकणे सुरु आहे...आधि रेवती मारे तावा तावाने म्हणे, " तू काहीही बोलशील आणि मी ते ऐकून घेईन असं नाही!"..आणि मग मात्र ..," मला तुझ्या शी वादच घालायचा नाहीये" करुन सुबोध ला घेऊनच गेली...का नाही बोलली त्याला काही?

शन्याचा चेहेरा चपटा दिसायला लागलाय आणी दाढीदारी गुरुने आजच्या भागात गुप्तेवर आरोप लावलाय की त्याचे आणी रेवतीचे अनैतीक संबंध आहेत. वा! वा! वा ! कोण बोलतयं बघा. गुप्तेच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने त्या गुरवाला जाम बुकलला असता. राधाक्का हे बघुन चवताळुन परत बेशुद्ध पडतात. या सिरीयलचा अती मुर्ख लेखक या मालिकेला अतीशय गलिच्छ वळणावर नेऊ पहातोय, आणी त्यामुळे मला त्याच्या आणी गुरुवाच्या दाढीत पिसवा आणी उवा सोडाव्याश्या वाटु लागल्यात.

Pages