माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपा, राधिकाचा भाऊ आणी वहिनी राधिकाकडे रहायला येतात कारण भावाने एका ठिकाणी गुंतवलेले पैसे डुबतात. मग त्यांचे रहाते घर भाड्याने देऊन ते लेडी कर्ण राधाक्काकडे रहातात. आणी गुरोबा घराचे अर्धे मालक असल्याने त्यांच्या पावशेर अंगा ( शनाया ) सकट त्याच न्यायाने आपल्या घरात रहायला येतात, कारण त्या लांब नाकीचे आई वडील लांबनाकी कडे रहायला येतात.

ती वहिनी म्हणजे भार्गवी चिरमुलेची धाकटी बहीण आहे आणी लोकेश गुप्तेची ( जुयेरेगा मधला माईचा मोठा मुलगा ) बायको आहे. नाव लक्षात नाही. मी माझे स्वतःचे केस उपटुन सिरीयल पहायचे सोडुन दिले आहे, मागे जे पाहीले त्यावरुन सांगीतले.

भार्गवी चिरमुलेची धाकटी बहीण आहे आणी लोकेश गुप्तेची ( जुयेरेगा मधला माईचा मोठा मुलगा ) बायको > नाही रश्मी. ही ती नाही.

अरेच्च्या असे आहे होय. थॅन्क्स सस्मित आणी रावि. तरी मला ती वहिनी थोडी वयाने मोठी असल्याचे जाणवत होते. पण वाटलं बरेच दिवस झालेत, त्यामुळे झाला असेल चेहेर्‍यात बदल.

लेडी कर्ण... :खोखो:..
आणि राधिका चा वार्डरोब बदला यार आता...किती त्या काकू ब्रँड साड्या..आणि काठांचे ब्लाऊज! आणि तिचा क्लोज अप तरी कितीदा दाखवतात....!! मेकप दिसे पर्यंत! आता तेच ते दळण चालूय..काही घडत नाहीए... ऑफीसमधले संवाद तर डोक्यात जातात! ती नवीन रिक्रूट नाही दाखवली इतक्यात? राधक्काची एंप्लॉयी झालेली ना?

अत्यंत भिकार म्हणजे भिकारेस्ट मालिका.
केडी इतका भुक्कड दाखवला आहे की त्याच्यासारखी माणसं जगात असतील का? असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो. दुसरी त्याची ती मुर्ख मावशी. सतत चिज खात असते, योगा शॉपिंग या व्यतिरिक्त तिला ही आयुष्यात इतर व्यवधानं नाहीत का? असा प्रश्न पडत राहतो.
गुरू सातमुर्ख एका इतक्या मोठ्या कंपनीत एम डी वगैरे असून एक बनावट टॅरो कार्ड रिडर ओळखू शकत नाही? आणि लहान मुलांसारखा राधिकाला 'घर माझं पण आहे, तुझा भाऊ इथे राहू शकतो तर मी आणि शनाया पण इथेच राहणार" असा शह देतो? Uhoh बाकी सर्व सर्व म्हणजे सोसायटी काय म्हणेल, अथर्वच्या बालमनावर काय परिणाम होतील इ. सर्व खड्ड्यात गेलं. पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये प्रायव्हसी पण एक्स्ट्रा लागते आणि ती अशी ४-५ लोकांत राहून मिळणार नाही हे गुरू ला कळत नाही? Uhoh मारे इतर वेळी हजारो रुपये उडवतो शनायावर मग त्याला एक भाड्याने फ्लॅट नाही घेता येत? Uhoh
राधिकाचा भाऊ आणि त्याची बायको तर नुसते नमुनेच नमुने.. त्याचे पैसे बुडले आणि काम गेलं म्हणून हा सहकुटुंब राधिका कडे येऊन राहिला.. म्हणतात ना 'उघड्याकडे नागडं गेलं आणि रात्रभर कुडकुडून मेलं" त्यातली गत. त्यात ती त्याची बायको तिला परिस्थितीचे काही गाम्भिर्य च नाहिये. तिचे छोटे छोटे उद्योग सुरूच.
शनाया हे पात्र सर्वात बेअक्कल.. काल तर आता तिने राधिकाच भविष्य जाणून घ्यायचं आहे म्हणून टॅरो कार्ड्स अथर्वच्या हातात देऊन आईला एक काढायला सांग म्हणून सांगितलं. आणि पडली उपडी स्वतःच्या तोंडावर.

मला एक गंमत वाटली की पोतदारांना मारलं सिरियल मध्ये तर सांत्वनाच्या मिटिंग मध्ये साठे मॅडम दिसल्या.. ते पण फक्त त्याच? पोतदारांना इतर सख्खे भाऊ बहिण, मुलं बाळं बायको नसावित? Uhoh कुणिच नाही. फक्त आणि फक्त साठे मॅडम. Uhoh
ती इशा (इशाच ना? Uhoh ) तिचा तर पुरता अवतार करून ठेवला आहे. ती आदरवाईज काय करते? चुकून एका एपिसोडात कळलं की तिचे आईवडिल ऑस्ट्रेलियात असतात. मग ही इथे राहून काय करते? नोकरी का शिक्षण? त्याचा काहिच उल्लेख नाही.
तिकडे समिधा प्रेग्नंट झाली आणि नाश्त्याच्या टेबलावर तिने नाना नानींना सांगितलं. ते खुश झाल्यावर म्हणाली की मी आई व्हायचं की नाही हा निर्णय मी अजूनी घेतलेला नाही. मग बोंबलायला आधी प्रेग्नंट आहे म्हणून सांगायचंच कशाला? Uhoh मग घरातलं कुण्णी कुण्णी तिला कन्व्हिन्स करू शकत नाही. नानी राधिकाला सांगतात तु समिधाशी बोल म्हणून मग राधिका (सर्वेसर्वा) आपली सर्व कामं, टेन्शन बाजूस ठेवून समिधाला गाठते आणि २-४ वाक्य हिकडची तिकडची बोलते आणि समिधाला एकदम साक्षात्कार होतो. आणि ती आई होण्याचा निर्णय घेते. Proud
कठिणे.. Proud

मालिकेचा लेखक म्हणजे तो अभिजीत गुरु खरच डोक्यावर पडलाय. स्वतःच्या पोटा पाणाची सोय होण्यासाठी त्याने मालिका अशा वळणावर नेलीय की त्या कलाकारांना पण कळत नसेल. राधाक्का साड्या बदलेना, शन्या कपडे बदलेना, वहिनी स्वभाव बदलेना आणी मालिकेचे दळण बदलेना.

खु क खु संपली ना मग त्या मालिकेची जागा कोण घेणार , म्हणून झी सगळ्या मालिकांमधे चुरस लावून देत असावी Lol

आय्यो मला वाटलं की काहीतरी happenning झालं का, धमाका वगैरे. एवढ्या पोस्टी बघून>>> Rofl

बाकी रोजचच दळण चालू आहे हे दक्षिणाच्या पोस्ट वरुन समजल. रच्याकाने पोतदार कोण?

पोतदार कोण? >>>>> पोतदार आणि साठे मॅडम कोण? नवीन एन्ट्र्या आहेत का?

राधाक्का साड्या बदलेना, शन्या कपडे बदलेना, वहिनी स्वभाव बदलेना आणी मालिकेचे दळण बदलेना. >>> आणि गुरु काही सुधरेना.

झी मराठी वर ग्रहण नावाची नवीन मालिका सुरु होतेय. पल्लवी जोशी आहे त्यात. मानबा सम्पतेय की काय?

मला एक गंमत वाटली की पोतदारांना मारलं सिरियल मध्ये तर सांत्वनाच्या मिटिंग मध्ये साठे मॅडम दिसल्या.. ते पण फक्त त्याच? पोतदारांना इतर सख्खे भाऊ बहिण, मुलं बाळं बायको नसावित? Uhoh कुणिच नाही. फक्त आणि फक्त साठे मॅडम. Uhoh >> ही कोण नविन लोक ?

नानी राधिकाला सांगतात तु समिधाशी बोल म्हणून मग राधिका (सर्वेसर्वा) आपली सर्व कामं, टेन्शन बाजूस ठेवून समिधाला गाठते आणि २-४ वाक्य हिकडची तिकडची बोलते आणि समिधाला एकदम साक्षात्कार होतो. आणि ती आई होण्याचा निर्णय घेते. Proud
कठिणे.. Proud >>> खरचं कठिण आहे . एरवी समिधा , राधिकाला घालून पाडून बोलते . आता बरं तिच ऐकुन घेते .

दक्षुने मर्मावर बोट ठेवलयं. Proud साठे मॅडम या गुरवाच्या कंपनीच्या ४ डायरेक्टर्स पैकी एक आहेत. आणी सिरीयल मधून बाहेर पडलेले ( सिरीयलमध्ये वर बाप्पाकडे गेलेले ) पोद्दार हे साठेबाईंचे भाऊ होते. त्यांनीच राधिकाला मोठी ऑर्डर दिलेली असते साठे बाईंच्या ओळखीमुळे.

आता पोद्दार तर गेले, मग राधिका केव्हा आणी कशी मोठी होणार? >> कळायचं की त्यांनी राधिका ला वारसदार केलंय धंन्द्यामध्ये !!

ती वहिनी म्हणजे भार्गवी चिरमुलेची धाकटी बहीण आहे आणी लोकेश गुप्तेची ( जुयेरेगा मधला माईचा मोठा मुलगा ) बायको आहे. नाव लक्षात नाही.>>
ही ती नव्हे! ही चित्रा खरे...माझी मैत्रिण आहे. तिच्यासाठी म्हणून काही दिवस ही मालिका पहिली. पण लगेच सोडूनही दिली. चित्रा चिंटू भाग १ मधे पप्पू ची आई होती.

एरवी समिधा , राधिकाला घालून पाडून बोलते . आता बरं तिच ऐकुन घेते . >> नाही नाही तिच्यात आता चांगले बदल घडू लागलेत. आई होणाराय ना. माया उफाळून यायलिये, चुका कळायल्यात.
आधी हापिसात गुरू आणि शन्याला मदत करत होती, आता आनंद आणि ते पावशेर्कर आणि तो श्रेयस यांना मदत करत्तेय.
पानवल्कर शुश्श! आठवलं नाव एकदाचं.

राधिकाचा भाऊ कसला बंडल आहे. अरे बायको नाही मदत करत तुझ्या हाताला मेहंदी आहे का. तू जा ना मदत करायला.

आँ? Uhoh पोतदारांच्या धंद्यात राधिका वारसदार? खरं की काय? >>नाही ग, इतकं सगळं अतार्किक दाखवलं आहे त्यात माझी थोडी भर....

हा धागा वर दिसतोय, म्हणून इथेच लिहितोय. रविवारी झीचे आवडता आवडती अवॉर्ड्स पाहिले.
(रिरपीट टेलिकास्ट होते का?) याच मालिकेला सगळ्यात जास्त विनर्स होते. गुरु बेस्ट व्हिलन आणि शनाया बेस्ट खलनायिका. शिवाय अभिजित गुरू का कोणीतरी त्याला बेस्ट लेखक. अआणि बहुतेक ही सर्वोत्कृष्ट किंवा सर्वाधिक लोकप्रिय मालिकाही.

सूत्रसंचालकांकरवी (संजय मोने, अतुल परचुरे) सगळ्या मालिकांचे व्यवस्थित वाभाडे काढले गेले. राजा कोण तर प्रेक्षक (नायक नायिका, लेखक दिग्दर्शक सगळे बदलतात, बदलत नाही तो प्रेक्षक)
म्हणजे आपण काय दर्जाचं काम करतोय, हे वाहिनीला माहीत आहे. चांगलं देण्याची क्षमता आहे. पण प्रेक्षकांनाच जर हेच आवडतंय, तर आम्ही कशाला घाम गाळायला हवाय?

आता मालिकेला शिव्या देण्याचा, अगं अगं म्हशी कार्यक्रम पुढे चालू द्या.

केडीची मावशी ? नवीन पात्र इंट्रोड्यूस केलाय ?>>>>>> हो, त्या केड्या दाढ्याला स्वतःचे प्वाट भरण्यासाठी आधीच उल्लु असलेल्या गुरोबा आणी त्याचे पावशेरांग यांना उल्लु बनवुन पैसा उकळायचाय. मग केड्या दाढ्या ने कुठुन तरी त्याची मावशी पैदा करुन तिला टॅरो रीडर बनवलयं. मग तो या मावशीला या दोघा हळकुंडांना त्यांचे थातुर मातुर भविष्य सांगायला लावुन प्रत्येक वेळी १० ते २० हजार उकळतांना दाखवलाय. बहुतेक ती मावशी त्या कॉमेडी एक्सप्रेस मधली मीरा मोडक आहे की काय देव जाणे, मिमो नाव असते तिचे त्या सिरीयल मध्ये.

झी मराठी वर ग्रहण नावाची नवीन मालिका सुरु होतेय. पल्लवी जोशी आहे त्यात. मानबा सम्पतेय की काय? >>> कधी सुरु होणार आहे?

Pages