आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हणजे तुम्ही दोघे ईथेच लपून बसले होतात तर... प्रयत्न पण नाही केला.. Angry>>>

कावेरि, अहो गुगलच्या समुद्रात गळ टाकून बसलेलो पण ह्या गाण्याचा मासा काही लागला नाही गळाला!

म्हणजे तुम्ही दोघे ईथेच लपून बसले होतात तर... प्रयत्न पण नाही केला >> दोघे कोण ? मी तर प्रयत्न करत होते Uhoh

@ मधुसूदन, तुमचे स्वागत

कावेरी खुप दिवसांनी आली आहेस, समिधा पुढच कोड देई पर्यंत तुच दे बरं

@ मधुसूदन, तुमचे स्वागत >> pandit = madhusudan Happy
मधुसूदन पंडीत >> धन्यवाद स्निग्धाताई Happy पुढचे कोडे येईपर्यंत वामकुक्षी घेतो. Happy

pandit = madhusudan Happy>>>

नव्या नावाचे स्वागत! Happy

ओके ताई,
2666,हिंदी,जुनं
अ त ह त ह ख अ
त म ह ज अ
अ अ त ह त ह ख अ...

Happy
कृष्णाजी पुन्हा लेट.. Proud

२६६९.

हिंदी

च च क ल ह
च ब च क प
न क द न क ज
ब प क न
च ब च क प

chand chura ke kaya hu
चाँद चुरा के लाया हूँ
चल बैठें चर्च के पीछे
ना कोई देखे, ना पहचाने
बैठें पेड़ के नीचे
चाँद चुरा के लाया हूँ...

2670,hindi,1952-1960
अ ह च र अ
र न ज त म ब अ म अ...

खूप सोप्प..

2670,hindi,1952-1960 >> उत्तर
आधा है चंद्रमा, रात आधी
रह ना जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी

कोडे क्र २६७१ मराठी (जुने)
य भ ग प
म ह सा
ज अ य द

२६७१.

या भवनातील गीत पुराने
मवाळ हळवे सूर
जाऊ द्या आज येथून दूर

२६७२.

मराठी

य व व म म
न क ठ व म प

२६७२. मराठी
येई वो विठ्ठले माझे माउली ये
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे

२६७३ मराठी
म म न ग
म र त क प

२६७३ मराठी >> उत्तर
मनी माझिया नटले गोकुळ
मी राधा तू कान्हा प्रेमळ

कोडे क्र २६७४ मराठी
ग ग त स ग ग अ
य ज व न क क

२६७३.
गा गीत तू सतारी, गा गीत आसवांचे
या जीवनात वेडे, नाही कुणी कुणाचे

२६७४.
मराठी>उत्तर
मूर्तिमंत भगवंत भेटला
दे दे कंठ कोकिळे मला

Pages