खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू

Submitted by संयोजक on 25 August, 2017 - 22:05

खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा क्लु,
बहुतेकांच्या स्वयंपाकघरात, रोजच्या वापरात ही असतेच **
आयत्या वेळी नाही सापडली तर बोंबाबोंब, वैताग, वेळेची नासाडी वगैरे वगैरे.

रवी?
सुरी?

सस्मित, Lol
ते बघूनच म्हटलं इकडे पण बोलवावं. Happy

३ अक्षरी ना..... फुंकणी

कोणी पुढे खेळणार तर देऊन ठेवते आणि जाते --
४ अक्षरी (विशेषनाम) किंवा ५ अक्षरी (प्रकाराचे नाव)
घरात विशिष्ट ठिकाणीच असतो;
२४ * ३६५ ड्युटीवर

विजेवर चालणारे नाही,
हल्ली नसते हे शहरी घरात,
काही घरात सद्ध्या असेल; काही घरात अजून १५ दिवसांनी दिसेल

हो
वस्तू पुल्लिंगी आहे
वस्तूचे ४ अक्षरी विशेषनाम, हे मुंबई उपनगरतल्या एका शाळेचे नावही आहे.

Pages