खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
सोद्न (द -ला - न जोडुन)>> हा
सोद्न (द -ला - न जोडुन)>> हा शब्द सोडणं असा असायला हवाय ना पण. तो तीन अक्षरी होईल. >>> हो का? मला सोद्न असाच माहितीये हा शब्द..
अंगुस्तान
अंगुस्तान
येस बरोबर
येस बरोबर
पुढचा क्ल्यु
पुढचा क्ल्यु
एक भांड्याचा प्रकार, तीन अक्षरी
वाडगा?
वाडगा?
लंगडी/लगडी
लंगडी/लगडी
तपेलं
तपेलं
तपेलं>>>
तपेलं>>>
अगदी जवळचं याच्या ...rhyme होणारं म्हणा ना
पातेल?
पातेल?
पातेल?>>>
पातेल?>>>
नाही पण दोन अक्षरं समान आहेत
पतेली
पतेली / पतेलं?
घमेलं
घमेलं, सुपलं, ताटलं
xतेलं आता ओळखा
xतेलं
आता ओळखा
सतेलं
सतेलं
हातेलं. हेही कधी ऐकलं नाही
हातेलं. हेही कधी ऐकलं नाही आणि सतेलंही.
सतेलं>>> बरोबर
सतेलं>>>
बरोबर
फोटु?
फोटु?
सतेलं म्हणजे तपेल्यासारखेच
सतेलं म्हणजे तपेल्यासारखेच छोटे भांडे. जुन्या काळी वापरायचे.
' नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी' या जुन्या गाजलेल्या गाण्यात (शांता शेळकेंचे बहुतेक) हा आहे शब्द. आज मुंबइतील पावसामुळे हे गाणे आठवले आणि हा शब्दही!
अमितव, तुम्ही द्या पुढचा क्ल्यु!
इंदिरा संताची आहे.
इंदिरा संताची आहे.
तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून ?
बरोबर, इंदिरा संतांचीच आहे
बरोबर, इंदिरा संतांचीच आहे
अनेक वर्ष वापरत असलेला कपडा.
अनेक वर्ष वापरत असलेला कपडा. बहुतेकदा स्त्रीयांच्या पातळ/ लुगडयाला म्हणत असावेत.
जुनेर?
जुनेर?
येस. त्याच कवितेत पुढे आहे
येस. त्याच कवितेत पुढे आहे म्हणून ते आठवलं.
मलाही त्या कवितेमुळेच आठवले
मलाही त्या कवितेमुळेच आठवले
पुढचा क्ल्यू : एका प्रकारचे भांडे. पितळेचे अथवा तांब्याचे असते बहुतेक वेळा.
Gaduu
Gaduu
तपेली
तपेली, गुंड, गडू
Taambya
Taambya
तीन अक्षरी. आंघोळीसाठीही
तीन अक्षरी. आंघोळीसाठीही वापरायचे.
घंगाळ
घंगाळ
बरोबर!
बरोबर!
Pages