खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
नाही.
नाही.
भरत बरोबर
भरत बरोबर
दुसरा विषय आला. हा पण धागा
दुसरा विषय आला. हा पण धागा चालवायचाय का?
संयोजक?
हो हरकत नाही. कुठल्या
हो हरकत नाही. कुठल्या पानावर काय विषय आहे हे लक्षात ठेवा फक्त.
सच्छिद्र, अगदी जाळीदार म्हणता
सच्छिद्र, अगदी जाळीदार म्हणता येईल अशी मिठाई. तीन अक्षरी.
घीवर / घेवर
घीवर / घेवर
बरोबर. याची दोन उत्तरं आहेत.
बरोबर. याची दोन उत्तरं आहेत. दुसरं पण ओळखता येतंय का पहा. त्यासाठी दक्षिणेकडे जावं लागेल.
दुसरे पण ३ अक्षरी का?
दुसरे पण ३ अक्षरी का?
हो आणि नाही. म्हणजे तीन
हो आणि नाही. म्हणजे तीन अक्षरांनी बोध होईल. ३+२ अक्षरांनी खात्री होईल.
म्हैसूर पाक
म्हैसूर पाक
बरोबर.
बरोबर.
हिच्या नावात एक नाव आणि एक
पदार्थाच्या नावात एक नाव आणि एक प्रोफेशन.
५ अक्शरी XX XXX
बंगाली पदार्थ
बंगाली पदार्थ
मोहन भोग? पण प्रोफेशन नाही
मोहन भोग? पण प्रोफेशन नाही
अरे वा! मस्त्च रंगला खेळ.
अरे वा! मस्त्च रंगला खेळ.
मोहन नाही मोहनला आराधणारी
मोहन नाही मोहनला आराधणारी
राधा बल्लवी.
राधा बल्लवी.
गूगल केलं - मला माहीत नव्हता पदार्थ.
राधाबल्लवी का?
राधाबल्लवी का?
मी ते राधावल्लभी असं वाचलेलं/ऐकलेलं मागे कधीतरी
बंगाली ब आणि व ची उलटापालट करतात.
स्वाती आंबोळे बरोबर.
स्वाती आंबोळे बरोबर.
--पी-
--पी-
लोण्याच्या गोळ्याशिवाय याला सद्गती लाभत नाही.
थालीपीठ
थालीपीठ
थालिपीठ
थालिपीठ
बरोबर, द्या पुढचा शब्द.
बरोबर, द्या पुढचा शब्द.
जरा वेगळ्या प्रकारचे देतोय:
जरा वेगळ्या प्रकारचे देतोय:
हा खाऊ, उलटा पाडा आणि दोन्ही बाजुंना लावा (२, २)
अनारसा? दोन्ही बाजुंना खसखस
अनारसा?
दोन्ही बाजुंना खसखस
हिंट:
हिंट:
कॉमा नंतरच्या सूचना शब्दश: अंमलात आणा, कोड्यातील शंब्दावरच.
अनारसा नाही.
अनारसा नाही.
एक बदल: उत्तर दोन अक्षरी दोन शब्द आहे.
वडापाव
वडापाव
पाव भाजी
पाव भाजी
बरोबर
बरोबर
उलटा पाडा > डापा
आणि म्हणजे "व" दोन्ही बाजुंना लावा = व डापा व
Pages