खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
झालय ते माहित नव्हतं? >> हो
झालय ते माहित नव्हतं? >> हो माहित नव्हतं, काल ४ पेजेस पर्यन्त वाचलं जसा खेळ सुरु झाला, आज सकाळी उठून बघते तर पेजेस २० वर पोचले होते !! म्हणून मला माहित नव्हतं...
कुरुडी , प्रशचिन्हं चिकून
कुरुडी , प्रशचिन्हं चुकून पडलं , मलाही माहित नव्हतं
कुरूडी क्लू?
कुरूडी क्लू?
कुरुडी , प्रशचिन्हं चुकून
कुरुडी , प्रशचिन्हं चुकून पडलं , मलाही माहित नव्हतं >> मग जाउदे आता हा, नवीन दे
बरंम माझ्याकडून आता,
बरंम माझ्याकडून आता,
XXX XXX
यात झाडाचा एक भाग येतो, दुसरा शब्द 'त्रासदायक'
अजून एखादी हिंट द्या ना.
अजून एखादी हिंट द्या ना.
खमंग पदार्थ आहे,
खमंग पदार्थ आहे, कोशिंबिरीच्या कॅटॅगरी मधला
कसलंतरी भरीत?
कसलंतरी भरीत?
कसलंतरी भरीत? >> नाही
कसलंतरी भरीत? >> नाही
क्लु द्या अजुन
क्लु द्या अजुन
दुसरा शब्द भाजण्याला
दुसरा शब्द भाजण्याला समानार्थी
जरा उग्र वासा चा पदार्थ
काही तरीचा चटका
काही तरीचा चटका
मुळ्याचा चटका ?
मुळ्याचा चटका ?
मुळ्याचा ?
मुळ्याचा ?
मुळ्याचा चटका ? >> बरोबर !
मुळ्याचा चटका ? >> बरोबर !
आता पुढचा क्लू सांगा
XXX एक मराठी कवी.
XXX
एक मराठी कवी.
Amit,
Amit,
Padarth sweet ki spicy ?
गोड
गोड
पुण्यामुंबईत तरी अगदी मिट्ट गोड असतो. पण बाकी ठिकाणी हे भलत्याच गोष्टीला म्हणतात, त्यामुळे गोड असेलच याची खात्री नाही.
गणपतीला आवडतो का काय माहित नाही... पण त्याला सगळे जणं अर्पण करतात म्हणजे आवडत असणार!
Modak
Modak
आनंद मोडक यांच्या वरून वाटतं
आनंद मोडक यांच्या वरून वाटतं मोदक
नाही.
नाही.
पियुष
पियुष
(रामदास) फुटाणे?
(रामदास) फुटाणे?
बरोब्बर सशल
बरोब्बर सशल
अरे फुटाणे कुठे गोड असतात ?
अरे फुटाणे कुठे गोड असतात ?
हा हे बरोबर असेल संशल.
हा हे बरोबर असेल सशल.
साखरफुटाणे असतात त्यांना
साखरफुटाणे असतात त्यांना मुंबई भागात फुटाणेचं म्हणतात.
ओह ... आम्हाला माहिती असलेले
ओह ... आम्हाला माहिती असलेले फुटाणे एकतर खारवलेले असतात किंवा साधे . आणि साखरफुटाण्यांमध्ये खरा फुटाणा कधी पाहिलाच नाहीये
साखर फुटाणे म्हणजे फुटाणे..
साखर फुटाणे म्हणजे फुटाणे...लिहिलं ना म्हणून की इतर ठिकाणी भलत्याच पदार्थाला म्हणतात.
गणपतीत डोंबिवलीचे
गणपतीत डोंबिवलीचे कुलकर्ण्याकडले वेलची दाणे मिस करतो इकडे. अन्जु तुम्ही खाउन घ्या
Pages