खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
नाही
नाही
चकोल्या
चकोल्या
नाही
नाही
ह्याच्या नावात आमटी आहे
ह्याच्या नावात आमटी आहे. आता ओळखेल पट्कन.
भाताचा प्रकार आहे का?
भाताचा प्रकार आहे का?
बिशी बॅळी भात इक्विव्हॅलंट?
डाळिंब्या
डाळिंब्या
नाही. अस्सल मराठी मातीतला आहे
नाही. अस्सल मराठी मातीतला आहे हा पदार्थ
कटाची आमटी?
कटाची आमटी?
वरणफळ
वरणफळ
तीनच अक्षरी आहे ना?
तीनच अक्षरी आहे ना?
भाकरी
भाकरी
हो का मग नुसतंच वरण
हो का
मग नुसतंच वरण
हो की तीनाक्षरीच, विसरलो.
हो की तीनाक्षरीच, विसरलो.
ह्याच्या नावात आमटी आहे तीन
ह्याच्या नावात आमटी आहे तीन अक्षरीच आहे . सगळ्यांचा आवडता आहे करायला तसा सोपा जमलं तर नाहीतर खुप कठीण
सरिवा बरोबर आत्ता दिसली
सरिवा बरोबर आत्ता दिसली तुमची पोस्ट . द्या क्लु
पुरण
पुरण
कळण / कढण
कळण / कढण
भाकरी कसं काय ममो?
भाकरी कसं काय ममो?
भाकरी??
भाकरी??
भा + करी
भा + करी
भाकरीत करी आहे
भाकरीत करी आहे
आमटी म्हणजे करी?
आमटी म्हणजे करी?
नावात करी भाकरी, असं आहे का?
सोपा प्रश्र आहे.तीन अक्षरी
सोपा प्रश्र आहे.तीन अक्षरी तिखट पदार्थ.एक प्रकारची शिक्षा
धपाटा
धपाटा
सस्मित बरोबर,क्लू द्या पुढचा
सस्मित बरोबर,क्लू द्या पुढचा
तिखट पदार्थ. तीन अक्षरी.
तिखट पदार्थ. तीन अक्षरी. भाज्या घालुन करा. न घालता करा. ह्यात बाप्पाच्या मम्मीचं नाव आहे.
उपमा
उपमा
बरोबर भरत
बरोबर भरत
हा पदार्थ तुम्हाला छान जमतो,
हा पदार्थ तुम्हाला छान जमतो, अगदी तुमची स्पेशालिटी आहे, असं कोणाला म्हटलं, तर ती लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट ठरेल. तरी ती कोणीतरी कोणालातरी दिल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय.
चार अक्षरं.
हा पदार्थ या धाग्यावर प्रश्नांत आला नसला तरी उत्तरांत आलाय
शिकरण
शिकरण
Pages