आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे द्या ना पुढचे........नवीन द्या वाटल्यास.......मेघा. कंटाळली असेल वाट बघून, पंडितजी विसर्जनाला गेलेत....

@अक्षय -- अलंकारिक शब्दाचं वरदान दिसतंय तुम्हाला >>>>>> वरदान नाही, शाळेतले संस्कार.... अवांतर वाचन आणि बाहेरच्या परीक्षा, खूप फायदा झाला. इंग्रजी वाचन मात्र अजूनही चौफेर नाही. डिक्शनरीशिवाय नाही करता येत... आणि होत्या त्या वाचनातही खंड पडलाय..

उत्कर्ष मंदिर, मालाड

@ पंडितजी -- मिनु१६ नीड हेल्प चा प्रतिसाद एडिट करावा लागेल........शब्द राहिलेत बहुतेक....अर्थ वेगळा होतोय.... उगाच स्मयल्या पडतील

वरदान नाही, शाळेतले संस्कार.... अवांतर वाचन आणि बाहेरच्या परीक्षा, खूप फायदा झाला >> आहे त्याचा कंटाळा म्हणून बाहेरच्या परीक्षा दिल्या नाहीत हे पंडितजी पण तुमच्यासारखेच छुपे रुस्तम निघालेत भारी कविता करतात. मी आपला एकटाच कॉलर वर करून बागडत होतो आता धुवून खाली केलीय Lol
कोडे क्र १९१० मराठी (१९६५-१९७०)
म म अ क द द घ
अ अ क फ प त

मेघा. कंटाळली असेल वाट बघून,>>>
असेच दिसतेय आजकाल फक्त Uhoh करुन जाते दिवसातून एकदा.
कंटाळली बहुतेक इथल्या गाण्याना..

पंडितजी छुपे रुस्तम खरेच...... अशा झक्क लिहिल्यात कविता जशा पंडिताईनजी on the way आहेत Happy

Happy कॉलर धुतलीत ना, आता स्टार्च--कडक करा...... प्रत्येकाची एक खासियत असतेच ....
तुम्ही, राहुल, वरचेवर व्यक्त होता, वयामुळे आणि समाज माध्यमावर लिहीत रहाण्याच्या उर्मीमुळे; आमचं आपलं कधीतरी...
असं कोणी कोणामुळे झाकलं जात नाही.... कितीही येवोत जावोत... फक्त स्वतःला चोख आणि घासून-पुसून चमकत ठेवायचं + उत्तम तेच जगाला द्यायचं, हे काम आपलं

समाज माध्यमावर लिहीत रहाण्याच्या उर्मीमुळे >>> याची कधी कधी नव्हे नेहमीच भिती वाटते, त्यामुळे फार जवळची काही माणसं सोडली तर मला व्यक्तच होता येत नाही Sad

क्लू १९१०
संगीतकाराच्या नावातच आनंद
गायिका गोड गळ्याची गाण कोकिळा
गीतकार नक्की माहीत नाही पण तेच असावेत ज्यांनी ह्या चित्रपटातील बाकीची गीते लिहली आहेत

१९१०.

मागते मन एक काही दैव दुसरे घडविते
उमलण्या आधीच कैसे फूल पायी तुडविते

१९११.

मराठी सोप्पे

ह श ग त ग प
श क श प न त अ

हे शिवशंकर गिरिजा तनया गणनायका प्रभुवरा
शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा

कोडे क्र १९१२ मराठी
क त ह क त र
न ग न ग न स

१९१२.

कधी तू हसावे कधी तू रुसावे
नको ग नको ग नको साजणी

१९१३.

मराठी

न प म न प ट
ज ग प
न प म न प ट

जशा पंडिताईनजी on the way आहेत Happy>>>
हो पण रस्ता खुsssssssssप् लांबचा आहे यायला अजुन वेळ लागेल Happy
निड फॊर हेल्प्प् आता नाही एडीट करता येणार त्यांनी घेतला योग अर्थ्

१९१५- हिन्दि २००१-२००५
ब न क स अ द न र स त ब -२
ब न क स अ द न र स त ब -२
य इ व त य ब ह क य प क ह ल स
क ख य द ह क द य ज ह
य म ब ह ज भ य द ह
ज स द ज क ज क ज क

प्रेमाचा त्रिकोण पण चित्रपट सहन करावा लागतो
पन्जाब दा पुतर चा भाऊ लिड रोल मधे तर
दुसर्या नायकाचे वडिल नुकतेच वारलेत
नायिकेचा पहिला चित्रपट २००० मध्ये हिट झालेला अक्षय ने त्यातिल सगळि गाणी दिलित

हमराज
बरदाश्त नही कर सकता अब दूर नही रह सकता तेरे बिन..
ये इश्क विश्क तो यार बडा है कमाल ये पैदा करता है लाखो सवाल
कही ख्वाब ये दिखाता है कही दर्द ये जगाता है
ये मुश्किल बढाता है ये जन्नत दिखाता है
जन्नत से दूर जाये कहा जाये कहा जाये कहा....

Pages