आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रुश्नाजी सॉरी..पहिली ओळपण नाही लिहिलि मि तर...

१८९८,हिन्दी,२०१२-१६
ह त ब अ र न स
त ब क व म
त ज अ ह ज त ख ह ज ज
क त ह ह अ त ह ह
म अ अ त ह ह..

क्ल्यु: आताचा टॉप सिंगर...

हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिन क्या वजूद मेरा
तुझसे जुदा गर हो जाएंगे
तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा
क्यूंकि तुम ही हो अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो

हा टॉप सिंगर हल्ली बादलीने कानात गाणी फेकतोय तेही नेम धरून

जिंदगी दो पल की
इंतजार कब तक हम करेंगे भला
तुमसे प्यार कब तक ना करेंगे भला

१९०० हिंदी
त न ज क ज ख ग
ह भ द म त ह ग

1901.मराठी (याच महिन्यात)
द र द द अ द र द द
द र द त उ क म म क
ग ब ब ब अ त न ट
र म म ल अ ग म व
म अ क क न ल प ज
अ ल अ ल

आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू
मी अवधूतचा लय मोठा पंखा आहे सॉलिड गाणी बनवतो तो
ह्यातली बाकीची गाणी पण चांगली आहेत

देवा रं देवा देवा
आरं देवा रं देवा देवा

देवा रं देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कनवाळू
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू
रेड्यासनी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नि मिळतात वळू
मग आमच्याच कपाली का न्हाई लीव्हली पायालाई विझळू
आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…
सोळयाव्या वर्षात समद्याच्या काखेत येतेय प्रेमाच गळू
अन आठवण येऊन कुणाची तरी म्हणे जीव लागे तळमळू
पाटलानं पोरगी उजवली काल आज लगीन करतंय बाळू
हे ऐकून आमच्या बी पिरमाच गांडूळ लागलंय बघ वळवळू
आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…
येशील घेऊन रूप कुणाचे
कसे सोडवशील प्रॉब्लेम भक्तांचे
दे प्रत्येकाला ज्याचे त्याचे
देवा रं देवा देवा
आता तूच सांग आम्हाला कुणाच्या मागे पळू
कुणाची आम्ही कणिक मळू
आणि गहू कुणाचे दळू
तुझ्याच कुर्पेने नारळात पाणी
अन शेणात उगतंय आळू
आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…

१९०५ हिंदी
प म क क अ ह ज ह
छ स ब क फ ब ज ह
अ स क स स ह र स
ख ह ख म द ग थ न न ह ह न न

१९०६.

हिंदी

ज र ज त ज र
य ह प क न
य प ह ह प

१९०७ मराठी
ब च ख ह ब, ब स म ह ध
न न त ख व अ अ ख अ प स ग
क क क च प अ स म ख ग ह
ब ब क च प

बाहेर चांदणे खिडकी होती बंद बिलगून सख्याला मिठीत होते धुंद
निलाजरा, निलाजरा तो खट्याळ वारा आला अन खिडकी उघडून पडदा सारून गेला
कवडसा कवडसा कवडसा चांदाचा पडला अन साजण माझा खुदकन गाली हसला
हा साजण माझा खुदकन गाली हसला
बाई बाई कवडसा चांदाचा पडला

आशा भोसले

Pages