आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रात्री पाहिले कोडे.... शेवटच्या ब ब वरून लावणीच वाटली पण सापडली नाही, आठवली पण नाही
आता अचानक क च प काय, ते आठवले
ऐकलय लहानपणी... आवाज घुमणारी गाणी आवडतात ऐकायला...... खूप दिवसांनी ऐकले आज तुमच्यामुळे Happy
कशतलं आहे? मधु कांबीकरांवर चित्रित आहे का? तसा फील येतोय

१९०८ मराठी ८०-९०
अ भ ब, ध म त ह (अ क )
ह त ह, ल अ ठ (अ च झ क )
ल झ ग झ
अ अ क ह अ (अ अ क अ)
ल ख क प
ब ग न क
क क ज ह
स क क ज ह

कंसातले शब्द गाण्याचा भाग आहेत पण सोडून दिले तरी चालतील.
पहिल्या ४ ओळी पुढच्या ४ ओळींची पार्श्वभूमी आहेत.

जिद्द नावाचा सिनेमा होता. मधु कांबीकर होत्या की नाही आठवत नाही, पण फडावर नाचणारी नायिका असते आणि तिला तिच्या मुलाला या सगळ्या पा सून लांब ठेवायच असत अस अंधून आठवतय. गाण्यातल्या, कवडसा, कवडसा.... या शब्दाला असलेली चाल आणि सूर दोन्ही फार आवडतं

कारवी तुम्ही कविता करत असाल अस तुमच्या प्रतिसादावरुन वाटायच तुमचे प्रतिसादही वाचताना भारी वाटायचे. तुम्ही मुरलेल्या कवीयित्री आहात अस वाटत. Happy
मोठ्या होतात ना खूप? थोड्या शब्दात नेमकं मांडायला नाही जमत अजून.... Happy >>> चुकीचा अर्थ् लावलात तुमच्या कविता प्रतिभावंत वाटतात तुम्ही कविता करत नसाल असे वाटत नाही. अजुन असतील तर पोस्टाव्यात अशी विनंती ओके मी चाललो बाप्पांना सोडायला.

नाही हो mr.pandit, आताच लिहिल्यात, मागच्या वर्षी लिहिल्या पण आयडी अ‍ॅप्रूव्हड नव्हता म्हणून इथे नाही टाकल्या
गणपती टू गणपती, seasonal कविता, मधे काही नाही
घ्या एखाद महाकाव्य लिहायला >>>>> मोठ्या होतात ना खूप? थोड्या शब्दात नेमकं मांडायला नाही जमत अजून.... Happy

तिकडच्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला आणि अक्षयला धन्यवाद...... तिथे लिहायला अवघड वाटले....म्हणून इथे सांगतेय..

https://www.maayboli.com/node/63606 इथे पहा ताई..
कारवी ताई मी पण नव्हती वाचली..तुम्ही लिहिली त्याच्या आधीच्या वाचलेल्या..नंतर नाही..त्यामूळे कळलच नाही Sad
आत्ता वाचली ..छान लिहिता कि... Happy मग काही लिखाण का नाही करत तुम्ही ??

मी लेटलतिफ आहे मेघा. ..... इथे आली पण नाही ३-४ दिवस.... मग उशीरा टाकली Happy नेहमी लि़हीण्याइतकी सुपीक नाहीये जमीन
तो कविकल्पना खेळ, स्निग्धा....
१९०८ सोडवूया आता.........काका दटावतील...

लिहित रहा हो ताई.. Happy
ते सुपीक जमीन हा नक्की क्ल्यु असणारे ..स्निग्धाताई ओळखा बरं...

१९०९ मराठी ७०-८०
अ क र क म त
ल त फ प ह
य ब ह अ
म ल घ ज द
अ स द व द व न
ज द स ज द

तुम्हीही लिहीता की कृष्णा...
मग बरोबर ठाऊक होते.....कवी तितकेच आहेत..... मला नका तो मान देऊ.... मला माहितीये मी काय आहे
कौतुकाबद्दल आभार सगळ्यांचे.... Happy

अवांतर --- स्निग्धा, गवळण म्हणजे सुगरण (Baya weaver) आणि गांधारी म्हणजे छोटा खाटीक (bay-backed shrike) येतय नेटवर. कांदेपोहेना विचारा खात्रीसाठी.

गवळण म्हणजे सुगरण (Baya weaver) आणि गांधारी म्हणजे छोटा खाटीक >>> ही दोन्ही नावं मी पहिल्यांदाच ऐकतेय

कांदेपोहेना विचारा खात्रीसाठी.>>

तिकडे आपले पक्षी मित्र कांदेपोहेच संभ्रमीत झालेत!

तुम्हीही लिहीता की कृष्णा...>>> मी असाच हो सटीसामाशी चार ओळी लिहणारा!

मी पण वार्षिकच आहे हो.... Happy
कोड्याचे शब्द छान गुंफलेत >>>>>> मम म्हणते....

खेळ शब्दांचा मधे दिलेल्या लिन्क्स --
ससाणा / घार पण दाखवतायत गवळण--- गुगल सर्चसाठी
आणि गांधारीसाठी -- गांधारी अभयरण्यातले कुठलेही फोटो
कांदेपोहे बहुतेक सौजन्याने बोलतायत.... त्यांना नक्की माहीत असणार....... BNHS वर पण गवळण सुगरण एक म्हणतायत

१९०९ --- येतील बाबा ही इतुक्यात, मला लौकर घरी जाउ दे......... जाउ दे सजणा जाउ दे असे काही आहे का?

येतील बाबा ही इतुक्यात, मला लौकर घरी जाउ दे......... जाउ दे सजणा जाउ दे असे काही आहे का? >> शब्द मागे पुढे होताहेत, खुप जवळ आहात, आता जी लिंक लागली आहे त्यातलाच एक मणी

ते गाणे
अहो ओ सजणा दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या
.
,
,
आहे तसाच काटा तिथे राहू द्या
मला लंगडत घराकडे जाऊ द्या

असेल कोठे रुतला काटा
माझ्या तळपायाला
लाडीगोडीने तुम्ही फिरवता
पाठीवरती हात
त्याचा बोभाट होइल उद्या
मला लवकर घराकड़ जाऊ द्या
अहो... ओ.. सजणा
दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या ...
सजणा दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या ...

आर्या आंबेकर ने हे गाणं भारी म्हणलेलं कृष्णाजी द्या पुढले कोडे

कारवीताई भारी हा ते तुझं खळखळून हसणे तर एकदम खल्लास लिहलय अलंकारिक शब्दाचं वरदान दिसतंय तुम्हाला

आर्या आंबेकर ने हे गाणं भारी म्हणलेलं कृष्णाजी द्या पुढले कोडे>>>
आशाताईंचे ऐकलय का माझ्या जवळ कॅसेट आहे कसला भारी आवाज लावलाय त्यांनी!

आशाताईंच्या आवाजाला तोड आहे का मला जस्ट आठवलं म्हणून लिहलं आशाताईंनी म्हणलेलं ऐकलंय पण कॅसेट हा प्रकार बघून खूप वर्ष झाली अजूनही टेप आहेत वाटतं आम्ही युट्युब चे वारकरी तिथे ऐकलंय हे

Pages