आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरा बायको सिनेमाचे हिरो हिरॉईन! >>>> अमिताभ - जया / धर्मेंद्र - हेमा ?>>>

अशीच अजुन एखादी जोडी असेल!

सोप्पय गाणे सिनेमाचे नांव आहे गाण्यात!

किकु -आशाजी
ऋषी कपूर्/नीतु

ठोकर पे है सारा जमाना,
जो बन जाये मेरा निशाना,
मुश्किल है उसका बच जाना
क्योकी सारि कि सारि दुनिया मेरी जेब में ...

Happy

१३२२ ,हिन्दी १९७१-१९७७
अ स त अ भ अ,
म ह ग म,
ह क प अ म द ,
अ म स ह उ त अ..
अ स त अ ब अ...

क्ल्यु :
१) duet नाही

आज सोचा तो आँसू भर आये
मुद्दते हो गयी मुस्कुराये
हर कदम पर उधर मुड़ के देखा
उनकी महफ़िल से हम उठ तो आये

कोडे क्र १३२३ मराठी (२०११-२०१७)
ह व स स ज व ह
अ स म अ ड
ह अ अ स ब त म ज
व ह ग फ र र
ध ध क्ष ह स
ह ह फ फ ह य त ग

१३२३ :
ह्रदयात वाजे समथिंग सारे जग वाते हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रिमींग
हो असतो उगाच स्मायलिंग
बघता तुला मन जम्पिंग
वाटे हवे हे गोड फीलिंग
धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई
तुझेच गाणे

१३२४: हिंदी

र प र ह य प ब क ह
ख र अ व ह त स क ह

करेक्ट!
मागच्याच आठवड्यात अक्षयने दिल होत हे कोड Happy >>> हो का? मी हेच गाणं ऐकत होते आत्ता म्हणून दिल तेच.

१३२५ हिंदी
ब ब स क स क म क

स म ग ग म म
ध स ह अ क

१३२५:
बरसे बूंदियां सावन की
सावन की मनभावन की

हे आहे का?

१३२७ हिंदी
ज ज फ ख त य क ह
द अ ह ह घ ल ग न

दिखाई दिए यूँ के बेखुद किया
हमे आपसे भी जुदा कर चले

जबीं सजदा करते ही करते गई
हक़-ए-बंदगी हम अदा कर चले

बरोब्बर अक्षयजी!
स्मिता पाटिल,सुप्रिया पाठक,नसिरुद्दिन शहा आणि फारुक शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या उत्तम चित्रपटाची सर्वच गाणी अत्यंत सुमधूर,अर्थपूर्ण असल्याने चिरंतन श्रवणीय आहेत!

Pages