आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०१६
कुणी प्रयत्न करतंय का?
अजून क्लू हवा?

अजुन हेच कोडे आहे ...अक्षय ,पंदितजी येत नाहि का ???
बंती पण क्ल्यु मागुन पळाले...
मीच प्रयत्न करते आता...क्ल्यु द्या काका.........

उरात होतंय धड धड लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
ह्या गाण्याला खूपच वेळ लागला

झ झ झ मुद्दाम दिलं नाही. ते शेवटला क्लू म्हणुन देणार होतो.
आधी दिलं असतं तर वाचलं त्याने/तिने लगेच सोडवलं असतं.

क्लू
तनु वेडस मनू चित्रपटाचा नायक ह्या चित्रपटाचाही नायक

रहना है तेरे दिल में
आर.माधवन्/दिया मिर्जा/सैफ अली खान

जरा जरा बहकता है,
महकता है आज तो मेरा तनबदन मैं प्यासी हूँ,
मुझे भर ले अपनी बाहों में ,
है मेरी कसम तुझ को सनम दूर कहीं ना जा,
यह दूरी कहती है पास मेरे आजा रे....

१३०५ ,हिन्दी (२०१७)
क र म अ इ स...
स द व अ म त,
र ज इ क ह ग...क प द ह ज,
न म र त र म ब..त ह इ ग म ल,
उ व ज त क क क र ज,
म च अ त ह फ ल,
क र म अ इ स ,
स द व अ म त.....

क्ल्यु :
१) पंजाबी साँग आहे..
२) सिनेमातलं नाही..
३) गायक्/संगितकार १च..

बायदवे ,आपल्या सर्वांना काय पदतात ??? Happy

१३०५ हिंदी २०१७ - उत्तर
कल राती मेनू आया इक सपना...
सपने दे विच आयी मेरे तू
रब्ब जाने एह सब किंवे हो गया....किंवे प्यार दा होया जादू
नी मैं राजा तेनू रानी मैं बनाऊंगा....तेरी हर इक गल मान लूं
उट्टो वि जे तू कल्ली कडी कित्ते रेह जाये
मैं चोरी आके तेरा हाथ फड दूं
कल राती मेनू आया इक सपना
सपने दे विच आयी मेरे तू
Supna // Enzo

बाप रे!
कारवी ताई _/\_ स्विकारा! पंजाबी गाणे ओळखल्याबद्दल!

१३०६
कसा मज टाकुनी गेला राम
रामाविण जीव व्याकुळ होतो
सुचत नाही काम

बाप रे!
कारवी ताई _/\_ स्विकारा! पंजाबी गाणे ओळखल्याबद्दल! > +११

मला वाटते १३०७ जरा बाजुला ठेवुन पुढे जावे.
जमेल तसे १३०७ सोडवावे, तो पर्यंत पुढे जावे.

तेव्हा अक्षय अथवा बंट्या अथवा कोणीही ज्यांना वाटेल त्यांनी पुढले कोडे द्यावे.

>>>हिंदी(?)>>>हा ब्रिज-भाषेचा संकेत वाटतो आहे.

>>>१५००-१५६०>>> या काळात भजन,ध्रुपद व खयाल अधीक गायिले जात. ठुमरी हा प्रकार नंतर लोकप्रिय होत गेला.
या कालखंडावरुन ही रचना,तुलसीदास/मीराबाईंची एखादी रचना असावी,असे वाटते! त्यातही १५६० पर्यंतचा काळ म्हणजे,ही रचना मीरेची असण्याची शक्यता अधीक वाटते.

स्वामी हरिदासांचे शिष्य,तानसेनही याच कालखंडातले! गायकीसाठी ओळखले जाणारे तानसेन,स्वतःच्या 'ध्रुपद'रचनांंसाठीही प्रसिद्ध होते!
याच काळात,खास 'ध्रुपद'गायनाबद्दल सुप्रसिद्ध असलेले,ग्वाल्हेरचे राजे मानसिंग तोमर यांच्या दरबारातील गायक,'बैजू बावरा' होवून गेले.

>>>जरा बाजुला ठेवुन पुढे जावे.>>>यांत,'मार्गक्रमण करीत रहावे'/'पुढे चालत रहावे',असा एखादा 'अाध्यात्मिक' संदेश असेल,तर ही रचना,ध्रुपद असण्याची अधीक शक्यता वाटते!

सत्यजीत आधीच्या पोस्टमध्ये क्लू नव्हता.

पण हे कोडे सुटेल याची मी सतत वाट बघत राहीन.
तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. शक्यता आहेच , सोडवा.

राम मिलण रो घणो उमावो, नित उठ जोऊं बाटड़ियाँ।
दरस बिना मोहि कछु न सुहावै, जक न पड़त है आँखड़ियाँ॥

तड़फत तड़फत बहु दिन बीते, पड़ी बिरह की फांसड़ियाँ।
अब तो बेग दया कर प्यारा, मैं छूं थारी दासड़ियाँ॥

नैण दुखी दरसणकूं तरसैं, नाभि न बैठें सांसड़ियाँ।
रात-दिवस हिय आरत मेरो, कब हरि राखै पासड़ियाँ॥

लगी लगन छूटणकी नाहीं, अब क्यूं कीजै आँटड़ियाँ।
मीरा के प्रभु कब र मिलोगे, पूरो मनकी आसड़ियाँ॥

—मीरा बाई

(मीराबाईंच्या रचनांमध्ये त्यांनी अनेक भाषांचा वापर केला आहे.हिन्दीसह संस्कृत,मैथली,गुजराती,पंजाबी,ब्रज,अवधी,भोजपुरी,मारवाडी,अरबी तसेच फारसी!)

१३०८.मराठी (१९७५-१९८५)
त स-क त द-ह त क अ क
म म म-म म म म म-म म

अ त त अ-न च त स-व
म-म त भ-त स-स त अ-व
त क च ह म प त म च

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया

ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक
मंगलमूर्ती तू भवतारक सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तव मम चिंता

१३०९.

मराठी

अ क अ क म म
अ स घ त क ब श
अ ग ल म क म ख
प प झ म क फ द र
ग प झ म क ग ब
अ क अ क म म

सत्यजीत मस्तच!
राम मिलणरो सोडवल्याबद्दल _/\_

१३०९ मराठी -- उत्तर
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रीतिचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

१३१० मराठी पारंपारिक
अ न प भ म म म ल
त त क झ भ ल प न
अ ज ज म द स म म घ
ह ब झ म घ भ र व ज
क्ल्यू -- १३०६ पासून सुरू असलेला मार्गच पुढे नेलाय ३३% आरक्षणाची जोड देऊन

Pages