आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>१३०६ पासून सुरू असलेला मार्गच पुढे नेलाय ३३% आरक्षणाची जोड देऊन>>
'१३०६' हा कोड्याचा क्रमांक अपेक्षित आहे का?रामायणातील एखाद्या प्रसंगावरील रचना आहे का? तसे असेल तर क्ल्यु वरुन,राम,लक्ष्मणासोबतच सितेलाही वनवासात घेवून जाण्यास तयार झाले,असे काहितरी असावे वाटते!

क्ल्यु मध्ये,'साल १३०६' अपेक्षित असेल,तर ही रचना जनाबाईंची असण्याची अधीक शक्यता वाटते.मुक्ताईंचा काळ १३ व्या शतकाच्या शेवटचा!

की,बहिणाबाई/शांताबाई?
कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!!

अरे बापरे....इतका सूक्ष्म अर्थ नका लावू. मी काही संतसाहित्याची अभ्यासक नाहीये....
>>१३०६ पासून सुरू असलेला मार्गच पुढे नेलाय>> म्हणजे कोडे १३०६, ०७, ०८, ०९ मधे असलेला मार्ग / विषय / भाव इ.
+ >>३३% आरक्षणाची जोड देऊन >> हे रचनाकाराशी संबंधित नाहीये
रचनाकार -- गुरूंचे नाव रचनेत गुंफणारे

३३% अंबाबाईचा जोगवा!

अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासूर मर्दना लागुनी
त्रिविध तापाची कराया झाडणी भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुनी माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन

१३११ हिंदी

ज क ग व द क थ त र म
न क ह ब
च क भ त र च त क अ
त क न भ प

सोप्पे घ्या
काही द्यायची गरज नाही साल क्ल्यु..

जाने कहाँ गये वो दिन, कहते थे तेरी राह में
नज़रों को हम बिछायेंगे
चाहे कही भी तुम रहो चाहेंगे तुम को उम्रभर
तुम को ना भूल पायेंगे

कोडे क्र १३१२ हिंदी
ल न त ल क ख ह
ब ब म क न त ल ह
अ अ अ अ
अ ग क स त ब ह न ह
जा क छ ज ता ज त अ ह
ज ज

गायिका तिघी बहिनीपैकी एक
ह्या चित्रपटाच्या नावाचा एक चित्रपट अजय देवगण ने पण केलाय.

हरकत नाही आणखी एक क्लू (फुलटॉस) अजय देवगण आणि तमन्ना ने एकत्र चित्रपट कोणता केलेला

नायक नायिका त्या वेळची हीट जोडी कोणत्या तरी रावांची अर्धचंद्रराव की पुर्णचंद्रराव यांची! डिस्को संगीतकार... गायक ह्या संगीतकाराचा मामाजी!

हिम्मतवाला
किशोर जी / आशाजी

लडकी नही है तु लकडी का खंबा है..
बकबक मत कर नाक तेरा लंबा है..
आ आ इध र तु आ आ.....

है लड़की नहीं तू लकड़ी का खम्बा
बक बक मत कर नक् तेरा लम्बा है
आ इधर आ तू
आ गया कहाँ से तू बड़ा ही निकम्मा है
जा के छुप जा तू जहाँ तेरी अम्मा है

ओह..मेघा यांनी अगोदरच ओळखले

१३१३,हिन्दी (१९९९-२००५)
क क क झ झ झ प प प ,
छ छ क ब छ छ क ब,
ब म ब ब म ग ग ग प ह क क त...
ज ब र छ म अ भ ह क,
ब म ब ब म ग ग ग प ह क क त...

एकदम सोप्पे..............

सॉरी..सॉरी,मला वाटलं येईल एवढं सोप्प आहे...काहि हरकत नाही..क्ल्यु देते Happy
क्ल्यु:
१) गायिका :तीच ती ९० s ची
२) हिचा या महिण्यात मुव्ही रिलीज झालाय... पण हे गाण मात्र हिच नाहिये...
३) जिच्यावर गाण चित्रित केलय ती मराठमोळी..आत्ता कळलं असेल... Happy

सगळे असे काय गायब होत चाललेत आजकाल ........... सर्वांनी या बर.. क्रुश्नाजी,पंदितजी ,तायांनो........... Sad Sad Sad

कोणीतरी या की..................................................................................................
मी कोडी देउन ठेवेन हा...

alka yagnik ??
मराठमोळी >> माधुरी उर्मिला, सोनाली ?
हिचा या महिण्यात मुव्ही रिलीज झालाय... पण हे गाण मात्र हिच नाहिये... >>> हे काय कळल नाही

१३१३:
कंगना कंगना कंगना , झुमका झुमका झुमका , पायलिया पायलिया ,
छनक छनक के बोले , छनक छनक के बोले ,
बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल गोरे गोरे गालों पे है काल काल तिल
बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल तिल पे अटक जाये आशिकों का दिल

१३१४: हिंदी (१९७१-७७)
ज ज श श क ल न क
य प त न क प
ह ग ज म म ज
ज त म थ न ल
ह स र

खूप म्हणजे खूप्पच सोप्प

Pages