चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ok.

‘नेफ्ली’ वरची Money heist ही मालिका मस्त आहे. जवळपास २२ भाग आहेत. मूळ Spanish चे हे इंग्लिश रुपांतर आहे. Heist म्हणजे दरोडा. ८ दरोडेखोरांचे एक टोळके तयार केले जाते. त्यांचा म्होरक्या आहे ‘प्रोफेसर’ ! दरोड्याचे ठिकाण आहे स्पेनचे नोटा छापण्याचे राष्ट्रीय मुद्रणालय. प्रोफेसर त्या टोळक्याचे व्यवस्थित ‘अभ्यास वर्ग’ घेऊन त्यांना यासाठी ‘तयार’ करतो. मग दरोडा घालून तिथल्या हजर नागरिकांना ओलीस ठेवले जाते.
त्यांच्याकडूनच कित्येक अब्ज युरोच्या नोटा छापून घेतल्या जातात. टोळक्याकडे अत्याधुनिक मशीनगन्स आहेत. ओलीसाना सोडण्याच्या बदल्यात ते त्यांच्या ‘माला’ सह पळून जायची अट पोलिसांना घालतात.

या बंदिवासाच्या काळात ओलीसांतील काहींचे अपहरणकर्त्यांवर प्रेम जडते. यालाच मानसशास्त्रात Stockholm syndrome असे नाव आहे.
उत्कंठावर्धक मांडणी. पहिला अर्धा भाग मस्त वाटला. दुसऱ्याच्या शेवटी मात्र मालिका ‘पाणी घालून’ वाढवल्यागत वाटली.
जरूर बघा.

मी काल कारवां बघुन आली..
मस्त आहे हलका फुलका.. इरफानचे टायमिंग जबरदस्त.. नक्की पाहावा असा...

रजनीकांत चा " काला" बघितला . जबरदस्त सिनेमा ...... हा पिक्चर बॅन कसा नाही झाला ह्याचे मला आश्चर्य वाटते इतका रेव्होल्यूशनरी आहे. सिम्बॉलिसमस चा मुक्त वापर केलाय , रजनीकांत च्या कार च्या नंबर पासून, मागे दिसणार्या तिरंग्याचा रंग, पार्त्रांची नावे सगळे काही पी ए रणजित ने हुशारीने मुद्दाम वापरून घेतलेली आहे. ऍमेझॉन वर आलाय . जरूर बघा .

Money heist ला काल सुरुवात केली. अजुन तरी मस्त वाटते आहे.
इथे लिहिल्या बद्दल धन्यवाद.

marvelous mrs maisel << प्राईम वर १ सिझन आहे. आवडली.

४ दिग्दर्शकांनी मिळून दोनेक तासांची चित्रमालिका बनवायचा प्रयोग अलीकडे लोकप्रिय आहे. मराठीतला अलीकडे NF वर पाहिलेला चित्रपट आहे ‘बायोस्कोप’. ४ कवींच्या कवितांवर आधारित असे हे ४ लघुपट. प्रत्येकाच्या सुरवातीस हिंदीत गुलजारांच्या आवाजातील भाष्यही छान.

दिल ए नादान, एक होता काऊ, बैल आणि मित्रा ही त्या ४ पटांची नावे. त्यांचे दिग्द. अनुक्रमे: गजेन्द्र अहिरे, विजू माने, गिरीश मोहिते आणि रवी जाधव.
प्र. भूमिका अशा:
दिल ए नादान : नीना कुलकर्णी व सुहास पळशीकर
एक होता काऊ : कौशल बद्रिके , स्पृहा
बैल : मंगेश देसाई
मित्रा : वीणा जामकर, मृण्मयी, संदीप खरे

चौघांचा आशय थोडक्यात:
दिल ए नादान : सारंगीवाल्या कलाकारांचा उतरणीचा काळ व स्मरणरंजन

एक होता काऊ : काळ्या वर्णाच्या तरुणाची होणारी अवहेलना व त्याचे गोऱ्या तरुणीवरचे सुप्त प्रेम

बैल : शेतकऱ्याच्या आत्महत्येवर त्याच्या बैलाने काढलेले वास्तवदर्शी उद्गार

मित्रा : विजय तेंडुलकरांच्या या कथेवर आधारित. समलिंगी स्त्रीची घुसमट.
सर्वच मस्त , जरूर पाहा .

McMafia पाहिला. नेफ्लि वर कि प्राईम वर ते लक्षात नाही. मालिकेच्या मानाने चांगला . पण मसाला आहे. थरार चांगला आहे.
रशियातून परागंदा होऊन ब्रिटन मध्ये स्थायिक झालेली फॅमिली. त्यांची संपत्ती आणि बिझनेस माफियाने हडपलेला असतो. मोठ्या भावाच्या मुलाला रशियातला इतिहास आवडत नसतो. तो मनाने ब्रिटीश आणि सुसंस्कृत. वडील मात्र आग्रहाने घरी रशियन बोलणारे. त्यांचा धाकट्या भावावर जीव असतो. कुटुंबावर विशेष प्रेम करणारे असतात.
मुलगा इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून नावारूपाला आलेला असतो. मात्र त्याच्या काकाचा रशियात माफियाचा धंदा होता ही माहिती प्रसारमाध्यमांना कळाल्याने त्याच्या कंपनीतल्या गुंतवणुकीवर वाईट परिणाम होत असतो. यावर उपाय म्हणून एखादा मोठा गुंतवणूकदा तो शोधत असतो.
काकाचे मित्र सगळे दोन नंबरवाले असल्याने त्याला ते नको असतात. त्याला कायदेशीर कटकट नको असते. पण व्हाईट कॉलर धंदेवाईक त्याच्यावर अपमानास्पद अटी घालत असतात. अगदी कंपनीचे नाव बदलण्यापर्यंत..

यावर मार्ग कसा निघतो. काकाच्या इस्त्रायलमधल्या मित्राची मदत होते का, पुढे त्याच्या करीयरला कुठले वळण लागते, त्याच्या कुटुंबावर हल्ले का होऊ लागतात आणि कुटुंबावर प्रेम असलेल्या वडिलांची घालमेल थांबवण्यासाठी तो काय करतो अशा प्रश्नांची उत्तरे या आठ भागाच्या मालिकेत मिळतील. नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईतल्या डॉनच्या हातखंडा भूमिकेत आहे.

ब्रिजमोहन गुप्ता अमर रहे

ब्रजमोहन गुप्ता बायकोच्या कजागपणामुळे आणि आर्थिक परिस्थितीने डबघाईला आलेला दिल्लीतला एक व्यापारी. त्याचे एक प्रेमपात्र पण आहे. घेतलेलं कर्ज फेडू न शकल्याने आणि एकंदरीतच जिवावर बेतलेले असल्याने वाट फुटेल तिकडे धावताना अचानक त्याला लॉटरी लागल्याप्रमाणे पैसे दिसतात. त्यासाठी तो आपली ओळख मिटवतो. आपल्या जागी दुस-याचा मृत्यू झाल्याची बतावणी करतो आणि गर्लफ्रेंडला घेऊन मिळालेल्या पैशांवर हवे तसे आयुष्य उपभोगायचे अशा त्याच्या कल्पना प्रत्यक्षात येतात का ?
पैसे मिळाल्यानंतर त्याला कसे अनुभव येत जातात ? त्याच्यात आणि तो गेल्यानंतर त्याच्या बायकोत कोणते बदल होतात , ज्या गर्लफ्रेण्डच्या जिवावर पुढचे आयुष्य काढायचे मनसुबे तो आखत असतो ती तशी साथ देण्यासाठी योग्य होती का .. पुढे काय होते अशा प्रश्नांची उत्तरे या सिनेमात मिळून जातील.
ब्लॅकमेल नंतर ब्लॅक ह्युमर चे हे एक उत्तम उदाहरण पाहण्यात आले.

गेल्या आठवड्यात 'दि इमिटेशन गेम' (अखेर) पाहिला.
खूप आवडला. बे.कम्बरबॅच अप्रतिम काम करतो. महायुद्धाच्या पोटात अशी आणखी किती कथानकं लपलेली असतील!
अॅलन ट्युरिंगचा शेवट ज्या प्रकारे झाला ते पाहून पोटात तुटतं.
आत्ता आपण हे पोस्ट करतोय ते पण त्याच्याच जीवावर असं वाटायला लागतं.

मात्र त्याचं यंत्र तयार होतानाच्या काळात क्लबमध्ये त्याची जी 'युरेका' मोमेण्ट येते ती अगदी नेमकी मला कळली नाही.... म्हणजे क्लबमधल्या त्या मुलीच्या बोलण्याने त्याला आपल्या कामाचा पुढचा धागा नेमका कसा सापडतो, दोन्हीत तो कशी लिंक लावतो, ते पुरतं समजलं नाही.
मग म्हटलं आपण काही ट्युरिंग नाही, त्याच्यात आणि आपल्यात फरक राहणारच Proud

आपण पत्राची सुरूवात जशी एका मायन्याने करतो तसे सगळे संदेश एका मायन्याने सुरू होत असतात. हे ती संदेश उतरवून घेणारी मुलगी बोलताना लक्षात येते. उदाहरणार्थ जर प्रत्येक संदेश गुड मॉर्निंग ने सुरू होत असेल तर त्या दिवशीचे संदेश कसे कोड केले आहेत ते गुड मॉर्निंगचा कोड डिकोड केल्यावर समजेल आणि त्या दिवशीचे सर्व संदेश त्याच दिवशी डिकोड करता येतील. जर्मन लोक दर दिवशी संदेशाचा कोड बदलत होते आणि तो काँप्युटर इतका पॉवरफुल नव्हता की सर्व permutations combinations काही तासांत डिकोड करून बघता येतील. मात्र संदेशाच्या सुरुवात आणि शेवटाला असणाऱ्या कॉमन शब्दांमुळे ते काम सोपे झाले!
सिनेमा सुंदर आहे!

नेटफ्लिक्सवर बायोस्कोप हा मराठी सिनेमा आलाय. चार दिग्दर्शकांच्या चार कथा. मी पहिल्या दोन पाहिल्या. दुसरी मध्ये कुशल बद्रिके, स्प्रुहा जोशी यांनी छान काम केलेय.

रविवारी टी.व्ही. वर समुद्र नावाचा मराठी सिनेमा होता. मी काम करत अस्ताना मधून मधून डोकावत होते. सोनाली कुल्कर्णी आणि सचित पाटील , मोहन आगाशे होते. कलावंतीणीचा क्रांतीकारक असलेला मित्र रँड चा खून करतो अशी काहीशी स्टोरीलाईन आहे. बघायला काही फार आवडला नाही. पण गाणी मात्र फारच सुरेख होती. त्यात्ल एक गाण ऐकुन तर `कट्यार काळजात' मधल्या सूर निरागस हो (शेवटच) खूपच आठवण आली. यातल्या संगीतकार आणि पार्श्वगायनाबद्दल काही माहिती मिळू शकेल का.

हो, जिद्न्यासा, ते कळलं; पण ती मुलगी सांगत असते, की जर्मनांकडून येणार्‍या मेसेजेसची वाक्यं त्यांच्या गर्लफ्रेंड्सच्या नावांच्या आद्याक्षरांपासून सुरू होतात, काहीतरी सी-सी-आय-एल अशा प्रकारचा त्यातून शब्द तयार होतो की असंच काहीतरी ती जाताजाता बोलते, त्याचं आणि ट्युरिंगच्या कामाचं कनेक्शन कसं लागतं ते कळलं नाही.
असो.

लले, जर तुला माहीत असेल की संदेशाची सुरुवात GOOD MORNING अशीच असणार आहे आणि आलेल्या संदेशात पहिले शब्द HPPE NPSOJOH असे असतील तर तुला हे कळेल की encode करणार्‍याने प्रत्येक अक्षराचे पुढील अक्षर वापरून संदेश पाठवलाय. मग तेच लॉजीक वापरून सगळा संदेश decode करता येइल की तुला.

‘ सतरंगी रे’ चित्रपट पाहिला. ४ तरुण अभियांत्रिकी शिकणारे. पण खरी आवड संगीतात करिअर करण्याची. पण पालकांचा हट्ट हा की त्यांनी खूप अभ्यास करून परदेशात उच्च शिक्षण, छान नोकऱ्या वा व्यवसाय करावा.
त्या हट्टा पायी तरुणांना नमते घ्यावे लागते. मग त्यातला एक आयटीत नोकरीस लागतो. पण मनातून खूप अस्वस्थ. त्याचे स्वप्न एकच की त्या चौघांनी मिळून वाद्यवृंद कार्यक्रम करावे. पण आता कोणाचीच साथ नसल्याने तो निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो.

मग पालकांचे डोळे उघडणे वगैरे.
शेवटी चौघांचा वाद्यवृंद कार्यक्रम होताना चित्रपट संपतो.
आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर भूषण प्रधान, अमृता यांचा अभिनय छान.

'भावेश जोशी' पाहिला. सर्प्रायजिंगली , चांगला वाटला सिनेमा. तो इतका वाईट पडला होता, की रिव्ह्युज पण आले नव्हते रीलीज झाल्यानंतर. असो, तर भावेश जोशी नावाचा एक साधासुधा पत्रकार असतो, तो एक पाण्याचं स्कॅम उघड करतो म्हणून मारला जातो. त्याचा अमेरिकेत राहणारा, सो कॉल्ड सेटल्ड मित्र असतो आपला हर्षवर्धन कपूर. तो कसा बदला घेतो याची कथा म्हणजे हा सिनेमा. कॉमन मॅनच्या लढ्याबद्दल अनेक सिनेमे आले आहेत, त्यामुळे हा खास नोटिस झाला नसावा, शिवाय टेकिंग सतत डार्क, अंधारात आहे आणि स्कॅम नक्की काय आणि कसा आहे हे खूप उशीरा समजतं, त्यामुळे जरा गोंधळायला होतं. पण कथा चांगली आहे, काही गिमिक्स जमलेत, अपयश वास्तव दाखवलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हर्ष आवडला. अनिल कपूरचे फक्त केस आहेत त्याच्याकडे, बाकी पर्सनॅलिटी वेगळी आहे, मस्त आहे. चेहरा जरा रडका आहे, पण काम चांगलं केलंय. टीव्हीवर पाहिला, त्यामुळे परत टेलिकास्ट होईलच. चान्स मिळाला तर जरूर पहा, पण पहिल्यापासून. मधूनच पाहिला, तर काहीही समजणार नाही!

'द मार्शियन' पाहिला. भयंकरच मस्त सिनेमा आहे. आधी वाटलं होतं की 'कास्ट अवे' सारखा आहे, पण टेक्नॉलॉजीचा जबरा वापर करून घेतला आहे. ओव्हर सिम्प्लिफाइडही वाटू शकतो, पण मला त्यातलं 'स्पिरिट' आणि सकारात्मकता फार आवडली. ह्युमन इमोशन्सचा यथायोग्य वापरही तो फील गुड फॅक्टर कायम ठेवतो.

काल कारवां पाहिला, आवडला.
डुलकर सलमान, मिथिला पालकर आणि इरफान खान. इरफानचे पात्र अशक्य भारी दाखवलंय त्याने कामही तसेच केलंय.

अमला (मि पा ची आई), बीना (मि पा ची आज्जी), सरफरोश मधले आमिर खान वडील (इथेही डु स चे वडील) अशा लहान मोठ्या सर्वच भुमिकेत असलेल्या सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत.

त्याहूनही कमी लांबीच्या छोट्या भुमिकेमधे सारंग साठ्ये, निपुण धर्माधिकारी अशी भाडिपाची माणसे दिसल्यावर आता अमेय पण दिसतो का काय असे झाले पण नाही दिसला. त्यामुळे हुश्श झालं (त्याने हिंदीत इतक्या लहान सहान भुमिका करूही नयेत)

आपलीमराठी वर अनवट नावाचा थ्रिलर सिनेमा आलाय. तो सुरू केलाय पाहायला. गजेंद्र अहिरेचा आहे. होप सो चांगला असेल.

त्याचा अमेरिकेत राहणारा, सो कॉल्ड सेटल्ड मित्र असतो आपला हर्षवर्धन कपूर
>>>अमेरिकेत राहणारा??? तुम्ही नीट नाही पहिला बहुतेक.

बादवे - भावेश जोशी चांगला आहे. आणि भावेश चे काम करणाऱ्या ऍक्टर ने जबरदस्त अभिनय केला आहे.

अनवट मला तरी आवडला, मराठीत भयपट होतात तरी कुठे चांगले असे.. गजेंद्र अहिरे नेहमीच निसर्ग सौंदर्य मस्त दाखवतात. सुंबरान पण मस्त होता.

Pages