चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sully संदर्भात एक शंका आहे. वास्तवात जेव्हा विमान नदीवर उतरवतात तेव्हा ते बुडण्या आधी किती वेळ पाण्यावर राहू शकते?

Sully हा सिनेमा खरंच सुरेख आहे. एकदा मी चॅनल बदलता बदलता लागला, सुरूवात होती, खिळून पहात राहिले.

दुसऱ्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी जे दोन मोठे खटले भरले त्यांत न्यूरेमबर्ग व टोक्यो या दोघांचा समावेश आहे. त्यातील दुसऱ्यावर आधारित Tokyo Trial जरूर बघावी.
ही जाल -मालिका आहे. जपानी सत्ताधाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांचे मंडळ स्थापले जाते. त्यात पश्चिमीच्या जोडीने चीन, भारत व फिलिपीनो न्यायाधीशांचाही समावेश असतो. भारतीय न्या.ची भूमिका केलीय इरफानने . एकदम सुंदर !

वरवर जरी हे मंडळ निःपक्षपाती भासवले असले तरी त्यावर असलेला पश्चिमी पगडा दिसतोच. त्यातील रशियन जनरल हा कायम रशियनमध्येच बोलतो व त्याच्याबरोबर एक दुभाषी दिलेली आहे.मस्त मालिका व प्रभावी चित्रीकरण. Netflix.

बघावी लागेल सिरीज..

मी आज अँटमॅन अँड वास्प पाहुन आली..
मज्जा आली हाहा..

Sympathy for Lady Vengeance नावाचा पार्क चॅन वूक चा अप्रतिम थ्रिलर पाहिला. न केलेल्या गुन्ह्यामध्ये फसव्लेल्या एका तरुणीला १३ वर्ष जेल मध्ये काढावे लागतात. जेल मधून सुटल्यावर ती खर्या खुन्याचा शोध कसा घेते ह्याची ही कहाणी. रिव्हेंज स्टोरी बनवावी तर अशी , शेवटचा अर्धा तास तर अंगावर काटा आणणारा आहे . काहीतरी हटके बघण्याची इच्छा असेल तर जरूर बघा.

अभिनय देव - इर्फान खानचा ब्लॅकमेल पाहिला (टाटा स्काय प्रिमियरवर दिसतोय सध्या). मला ब्लॅक कॉमेडी रुचत-पचत नाहीत, एवढं कळलं.

प्राईम वर एखादा मूव्ही पाहिला की फेसबुकवर ते पाठलाग करतात. ब्लॅकमेल पाहून सोडून देण्याचा सिनेमा आहे. ब्लॅक ह्युमर आहे. खिळवून ठेवतो. इर्फान पठाणने अंडराअ‍ॅक्टींगचं अजून एक उत्तम उदाहरण दाखवले आहे. इतरही सर्वच कलाकारांची कामे उत्तम आहेत. हा पाहील्याने मुंबई सेंट्रल पाहीला. आता ऑक्टोबरची जाहीरात येतेय पिच्छा करत. ज्या सिनेमाबद्दल काहीच माहीती नाही तो पाहण्याचे धाडस होत नाही. मुंबई सेंट्रल चांगला आहे असे ऐकूनही एव्हढा काही खास वाटला नाही. हिमाचलची पार्श्वभूमी हा वेगळेपणा आहे. संथ शैली आहे. बाकी कथा अनेकदा मसाला सिनेमातून येऊन गेली आहे. हा मसाला नाही. समस्या मनापासून मांडण्याचा प्रयत्न वाटला. पण नाही पाहिला तरी चालण्यासारखा.

बाकीचे टुकार हॉलीवूड अ‍ॅक्शन मूवीज आहेत. दीड तास वाया जाईल असे वाटते. सुपरहिरो तर नकोच वाटतात.

इर्फान पठाणने अंडराअ‍ॅक्टींगचं अजून एक उत्तम उदाहरण दाखवले आहे. >>>>
पठाण नाही हो, खान Lol

खान . हो हो. Lol
कुरळे केस असल्यामुळे इकडचं तिकडे होतं बरेचदा.

Sympathy for Lady Vengeance नावाचा पार्क चॅन वूक चा अप्रतिम थ्रिलर पाहिला. न केलेल्या गुन्ह्यामध्ये फसव्लेल्या एका तरुणीला १३ वर्ष जेल मध्ये काढावे लागतात. जेल मधून सुटल्यावर ती खर्या खुन्याचा शोध कसा घेते ह्याची ही कहाणी. रिव्हेंज स्टोरी बनवावी तर अशी , शेवटचा अर्धा तास तर अंगावर काटा आणणारा आहे . काहीतरी हटके बघण्याची इच्छा असेल तर जरूर बघा.>> तुम्ही Conviction चित्रपट पन बघाच मग..

Conviction हा चित्रपट अतिव सुंदर आहे.. दोन भावा बहिणींमधली कथा आहे. फॉस्टर केअर मधे वाढलेल्या अन एकमेकांवर निरातिशय प्प्रेम असलेल्या भावा बहिणीची कहानी आहे ही.. न केलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली सतत वादग्रस्त असलेल्या आणि पोलिंसांमधे अप्रिय असलेल्या त्या भावाला अटक करुन आत टाकतात. त्याच्यावर गुन्हा सिद्ध करुन त्याला दोषी ठरवतात.पण तो निर्दोष आहे हे साबित करण्यासाठी त्या बहिणीने केलेला प्रवास यात दाखवला आहे.. खुप खुप सुंदर चित्रपट

Sympathy for Lady Vengeance
Kuthe baghyla milel?>> टोरंट जिंदाबाद !

MI-6 Fallout :
अरे कुठे नेउन ठेवला Ethan Hunt माझा Sad .

हंट च्या नेहमीच्या tricks and plans गायब आहेत.नुसता इकडे तिकडे धावत असतो. पहिल्या धुमश्चक्री नंतर काहीतरी धमाकेदार बघायला मिळेल अशी आशा वाटते पण त्या मानाने पूर्ण plot फारच फुसका वाटला. Emotional element फार आहे.

पण बाकी वेगवान घटना चित्रपट बघताना कंटाळा आणत नाहीत. Ilsa and Julia are back . Ilsa मजा आणते. Benji आणि Luther नेहमी प्रमाणे साथ देतात. विनोदी संवाद crispy आहेत.
शेवट मात्र तद्दन bollywoody आहे. आणि तो agent Walker आपल्या अंगद बेदी सारखा दिसतो Happy

Ethan आता म्हातारा झालाय , बर्याच ठिकाणी चेहर्यावर वय दिसते. पण त्याला बघत बघत आमची पण वय वाढली की Happy . शेवटी वय मानण्यावर असते ना

परवाच एम नाईट श्यामलनचे 'अनब्रेकेबल' आणि 'स्प्लिट' लागोपाठ पाहिले. चांगले वाटले पण one time watch वाटतात. एकमेकांशी तसे रिलेटेड नाहीयेत पण तरीही सिक्वेलस आहेत. आता 2019 मध्ये येणाऱ्या 'ग्लास'मध्ये दोन्ही फिल्ममधले पात्र एकत्र येणार आहेत, त्यामुळेच दोन्ही पाहिले.
त्यातही 'स्प्लिट' जास्त चांगला वाटला. माझा फेवरीट सायकोलॉजिकल टॉपिक, मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर आधारित कथा आहे. James McAvoyचे काम खरंच अप्रतिम आहे! त्याच्याचसाठी 'ग्लास' पण बघायचाय.

स्प्लिट पटत नाही, सुपरहिरो पेरसोनलिटी येते काय, गोळी काय लागत नाही.. नाईट श्यामलन काहीही बनवायला लागलाय

'पुष्पक विमान' छान चित्रपट आहे. पूर्ण चित्रपटभर मोहन जोशींची देहबोली अप्रतिम आहे. त्यांचे या चित्रपटातले काम मला फार आवडले. सुबोध भावे, गौरी महाजन यांचे आणि बाकीच्यांचीही कामे मस्त झाली आहेत. वातावरण निर्मिती चांगली आहे. शौनक अभिषेकींनी गायलेले ‘नको वेळ काढू आता धीर नाही' जबरदस्त. अधूनमधून येणारे गाथेतले अभंग/ओव्या प्रसंगात चपखल बसतात.

प्राईमवर भिकारी म्हणून चित्रपट आहे. मराठी. झपाटलेला बाहुला हिरो आहे त्यात. सुरु केला, सुरुवातच भयंकर गाण्याने झाली, ढकलत ढकलत बघितला १०-१५ मिनिटं , पूर्ण बघण्याची हिम्मत नाही झाली. कोणी पहिला असल्यास सांगा चांगला आहे का, बघण्यासारखा असेल तर बघेन.

नेटफलिक्सवर गुडगाव पाहिला. रागिणी खन्ना होती म्हणून लक्ष गेले व बघितला व आवडला. सगळ्यांचीच कामे चांगली झालीत. अक्षय ओबेरॉयने लाईट डोळ्यात थंडपणा कमालीचा दाखवलाय. पंकज त्रिवेदीचे सतत घुसमटल्यासारखे असणे खूप परिणामकारक वटलेय. आधी केलेली पापे सतत पाठलाग करतात त्याचा.

अपहरण करणारा गुंड परिस्थितीमुळे गुंड होतो, त्यामुळे त्याला आपल्या आईची काळजी वाटते, त्याचे बरेवाईट झाले तर आई मोडेल ह्या भीतीने तो स्वतःच मोडून पडतो. पण विकी जन्मजात वाईट प्रवृत्तीचा आहे, आपल्या कृत्याच्या परिणामांची चिंता त्याला सतावत नाही. बापाचा उल्लेख नावाने करतो, दत्तक बहिणीला बहीण मानत नाही, काकाचा खून करतो.

चित्रपटात संवाद खूप कमी आहेत. जे आहेत त्यात रागिणीलाच जास्त असावेत.

पंकज त्रिवेदीचे सतत घुसमटल्यासारखे असणे खूप परिणामकारक वटलेय. आधी केलेली पापे सतत पाठलाग करतात त्याचा.>> पंकज त्रिपाठी म्हणायचय का तुला? फार गुणी कलाकार आहे तो.. माझा आवडता...

फन्ने खान पाहिला . चित्रपट संपल्यानंतर वाटलं , काय म्हणून बनवला असेल हा? पूर्ण चित्रपटात काहीच घडलं नाही असं वाटलं .
बॉडी शेमिन्ग , कास्टीन्ग काउच , सेलेब्रटीच चकचकाटामागचं एकाकी आयुश्य अशा बर्याच गोष्टींना स्पर्ष केल्यासारखा वाटतो , पण निष्पन्न काही नाही .
रा.रा एरवी आवडतो पण ईथे त्याला फार काही काम नाही . ऐश्वर्या राय फारशी आवडत नाही .
अनिल कपूर मात्र आवडला . फार सहज काम करतो तो.
मात्र सगळ्यात मोठ सरप्राईज आपला गिकु आहे . वेगळाच गेटप आणि बेअरिन्ग.

फन्ने खान ल कलाकार बनायच असतं . तो आपल्या मुलीच नावं लता ठेवतो . तिने फार मोठी गायिका व्हावी अशी त्याची ईच्छा असते .

Pages