चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घुल पाहिली काल. तो घुल माणसाला मारून, मांस खाऊन त्यांचं रूप घेतो. पण राधिका आपटेच्या बाबतीत काय होतं कळलं नाही. तिचं रूप तो तिला ना मारता कसं घेतो. आणि असे बरेच प्रश्न पडलेत. बाकी एक बरंय तीन भागात आटोपली.>> घुल ज्याच मांस खाईल त्याच रुप घेऊ शकतो. राधिकाला तो चावतो म्हणुन तो तिचं रुप घेऊन अहमद सोबत बाहेर पडतो तर खरी राधिका बंकर मधेच राहते..

मला सर्वात मोठ्ठ पडलेलं कोडं म्हणजे राधिकाचे पप्पा जेव्हा घुलला समन करतात तेव्हा तो त्या अली सईद मधेच कस्काय घुसतो?
आणि सुरुवातीला त्या अली/अल सईदला पकडतो तेव्हा एक माणुस सब मरगए म्हणत शाल गुंडाळून चालत येतो तेव्हा त्याने त्याच्या शरीरावर घुलला समन करायच निशाण काढल असत ते कस? इथल्या बंकर मधे यायला हवा ना तो तिच्या पप्पाने समन केल्यावर..

स्पॉईलर अलर्ट .
ओके, म्हणजे मारणं जरुरीचं नाही, चावलं तरी काम होतं. मला 'तो मारून मांस खातो' असं ऐकल्यासारखं वाटलं.
मला सर्वात मोठ्ठ पडलेलं कोडं म्हणजे राधिकाचे पप्पा जेव्हा घुलला समन करतात तेव्हा तो त्या अली सईद मधेच कस्काय घुसतो?>> अली सईद मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आहे, आणि त्या बंकरमध्ये येण्याचा मार्ग म्हणजे तोच अतिरेकी बनून येणं. कारण बाकीचे बोलताना पण दाखवलेत , अली सईदला पकडणं अशक्य आहे, त्याला तेव्हाच पकडू शकतात जेव्हा तो स्वतःहून तिथे येईल. म्हणून घुल त्याचं रूप घेऊन बंकरमध्ये येतो.
सुरुवातीला त्या अली/अल सईदला पकडतो तेव्हा एक माणुस सब मरगए म्हणत शाल गुंडाळून चालत येतो तेव्हा त्याने त्याच्या शरीरावर घुलला समन करायच निशाण काढल असत ते कस? >> हे मलाही नाही कळालं.
बरं तो सगळ्या लोकांना मारतो, फक्त अहमदला नाही, कारण तो निरपराध आहे. मग राआच्या मागे लागतो, तो फक्त घाबरवण्यासाठीच कि काय ? तो फौलाद सिंग बनून काय किंवा त्या चिमणीमध्ये अहमदसोबत पळून जाताना काय ?

अली सईद मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आहे, आणि त्या बंकरमध्ये येण्याचा मार्ग म्हणजे तोच अतिरेकी बनून येणं.>> तर इथे एखादा ऑफिसर बनुन सुद्धा येता आलं असतं ना..

मग राआच्या मागे लागतो, तो फक्त घाबरवण्यासाठीच कि काय ? >> हो तिला धडा शिकवायचा असतो ना त्याला..आणि तिला जाणिवपन करुन द्यायची असते कि लोक्स कसे वाईट आहे वगैरे..

तो फौलाद सिंग बनून काय किंवा त्या चिमणीमध्ये अहमदसोबत पळून जाताना काय ?>> कळल नाही..

घुल इस्लामपूर्व अरेबिक धर्मामधे वर्णिलेला एक जीन/ राक्षस जो लोकांना त्यांचे गुन्हे दाख्वून त्यांच मांस खातो अन त्यांच रुप घेतो.

परी नावाचा सिनेमा पाहिला. खूप किळस आली. पूर्ण कसा काय पाहिला माझंच मला आश्चर्य वाटलं. हिंदीत तरी इतकी बीभत्स दृश्ये आजवर नाही पाहिली.

' सर्चिंग' नावाचा मिस्टरी इंग्लिश सिनेमा बघितला.

अ ति श य च मस्त आहे. अजिबात चुकवू नका. पूर्ण सिनेमा केवळ इंटरनेटचा अत्यंत कल्पक वापर करून बनवलाय. कास्ट अगदी चपखल आहे. शेवट काय होणार हे माहित होतं पण तिथे नेणारा प्रवास अधूनमधून धक्के देणारा आहे. आणि इतकं असूनही सिनेमा अगदी सहज घडतो. काही ठिकाणी तर उत्स्फुर्त हसू येतं. अभिनेत्यांच्या संचाबद्दल तर काय बोलावं? उत्कृष्ट!

मी स्त्री आणि नन दोन्ही चित्रपट पाहणारे .. तोवर कोणी स्पॉयलर टाकत असेल तर इग्नोअर करावं लागेल..

स्त्री राजकुमार रावच्या चाहत्यांना अजिबात निराश न करणारा सिनेमा. सर्वच कलाकारांनी जान आणलीय. उत्तर भारतातलं एखादं छोटंसं शहर अगदी जिवंत केलंय. सिनेमाच्या कथानकाबद्दल काही लिहीत नाही. ट्रेलर मुळे सर्वांना अंदाज आहेच. गावाकडे भूताच्या गोष्टी सांगतात त्या वेळी डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते आणि इतके दिवस बॉलीवूड मधले रूपेरी भूत यात कमालीचा फरक होता. थोडक्यात ही वास्तववादी भूतकथा म्हणायला पाहीजे. पण ट्रीटमेंट अगदी भन्नाट दिलीय. सतत हास्याचे फवारे उडत राहतात. राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी दोघांच्याही एण्ट्रीला शिट्ट्या पडल्या हा अनुभव नवीन होता....

' सर्चिंग' नावाचा मिस्टरी इंग्लिश सिनेमा बघितला.>> लिस्टित टाकून ठेवते मामी..

धन्यवाद नाचणी सत्व (लिहायला पन कसस वाटतय पण असो Happy ) .

या धाग्यावर सिनेमाबद्दल जास्त लिहू नये तरीही एक गोष्ट नमूद कराविशी वाटली.
दिग्दर्शक अमित कौशिक चा हा पहिला सिनेमा आहे हे खरं वाटत नाही. फेमिनिस्ट मेसेज आहे पण अजिबात प्रचारकी किंवा लाऊड नाही. रूढ अर्थाने भयपट नाही. भय अगदी गावातल्या गल्ल्यंमधेही वाटू शकतं. अगदी १००% देशी भूतकथा. पण भूतकथेपेक्षा बरंच काही.

सविता दामोदर परांजपे चा शेवट फारच पोपट केला आहे. गाणी मात्र छानच.
तोरडमल कन्येचा कायिक अभिनय ही जमेची बाजू. शब्दांपेक्षा ती देहबोलीतून अधिक छान व्यक्त होते.

काल सर्चिंग सिनेमाचा प्रिव्ह्यू वाचला तेव्हाच तो बघावासा वाटला होता.

स्त्री सिनेमाचाही प्रिव्ह्यू चांगला आलाय.

थेट्रात जाऊन काय काय बघायचं! Sad आणि दरवेळी ट्रॅफिकच्या खाती तास-दीड तास Sad

(स्पॉईलर नाहीत बिनधास्त वाचा)
सदा परांजपे पाहिला.आवडला.हार्ड कोअर हॉरर फॅन्स ना थोडा 'हे काय इतकीच गोष्ट' असं वाटेल. पण हा हॉरर पेक्षा जास्त इमोशनल थ्रिलर आहे.
सर्वांचे वॉर्डरोब आवडले.तृप्ती तोरडमल च्या साड्या आणि दागिने सुंदर.अभिनय पण आवडला(ती या भुभु टैप्स रोल मध्ये टाईपकास्ट झाली नाही म्हणजे मिळवलं.)ओरिजिनल सदा परांजपे ड्रेसिंग स्टाईल मुख्य जुन्या पिक्चर ची नीतू सिंग इंस्पायर्ड.सुबोध भावे ची बहीण पण फ्रेश.तिचेही कपडे आवडले.राकेश बापट सारखा उमदा माणूस इतकी वर्षे काय करत होता तुम बिन मध्ये एक तासात मेल्यावर माहीत नाही.त्याला आता चांगले पिक्चर मिळुदेत.डॉ झालेले घारे गृहस्थही आवडले.सविता प्रभुणे ला अजून थोडा मोठा रोल चालला असता.
गाणी अप्रतिम.

राकेश बापट सारखा उमदा माणूस इतकी वर्षे काय करत होता तुम बिन मध्ये एक तासात मेल्यावर माहीत नाही.

सदा परांजपे. >>>>>>> Rofl

टीसीजीएन पाहिला, वन टाईम वॉच आहे. महत्त्वाच्या, कन्टेम्पररी विषयावरचा सिनेमा म्हणून ठीक आहे. त्यापेक्षा टीव्ही मालिका जास्त चांगली झाली असती. याच सिनेमाच्या परिक्षणाचा एक बीबी आलाय, त्यावर बाकी फीडबॅक लिहिलाय Happy

रेस ३ पाहतोय! चवीचवीने! एखादा सिनेमा किती भिकार असावा अरे! Lol खिल्ली उडवत, मस्त टीपी करत पाहतोय त्यामुळे मजा येतेय. काल 'उसको दिल नही डेल दिखाओ' या शतकातल्या सर्वोत्तम जबरदस्त पंच असलेल्या वाक्यानंतर २ मिनिटं बेशुद्ध पडलो होतो Wink

राकेश बापटचा मधे एक मराठी पिकचर आलेला की, आनि नच बलिये मधे पण होता तो. >>> हो मध्ये मराठी चित्रपट आला होता, सिरीयल सात फेरे मध्ये पण होता. रजनी कांत सिरीयलचा हिरो बदलला तेव्हा हाच हिरो म्हणून आला.

आधी राकेश बापट नावाने मग राकेश वसिष्ठ नावाने यायचा, आता परत राकेश बापट नाव लावतो बहुतेक.

Pages