माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
पोह्यात दाणे घालूच नका. न
पोह्यात दाणे घालूच नका. न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी.
पोह्यांना वाफ आणतो त्यावेळेला
पोह्यांना वाफ आणतो त्यावेळेला त्यात दाणे असतील तर ते क्रिस्पी राहणारच नाहीच. तळ्लेले/भाजलेले कुठलेही. अगदी साबांचे देखील. सर्वींग बोलमधे पोहे काढून, त्यावर को व खो शिवरुन, लिंबूरस पिळुन झाला की मग तळ्लेले/भाजलेले दाणे त्यावर टाकले तर ते क्रिस्पी राहू शकतील.
अंजली_१२, नवर्याच्या एका
अंजली_१२,
नवर्याच्या एका कमेंटचा इतका काय तो लोड घ्यायचा.... आमच्यात असेच करतात असे सांगायचे मग विषय बाद.
नाहितर त्यालाच सांगा करायला, ... नाहितर जिथे कुठे क्रिस्पी शेंगदाणे असलेले पोहे मिळतील तिथून त्यालाच मागवायला सांगा..
(ह. घ्या.)
शुगोल, पोह्यांची मिसळ
शुगोल, पोह्यांची मिसळ केल्यासारखं वाटलं
नवर्याच्या एका कमेंटचा इतका
नवर्याच्या एका कमेंटचा इतका काय तो लोड घ्यायचा.... आमच्यात असेच करतात असे सांगायचे >>>> +१
पूर्वा अरूंधतीताई सिंडरेला
पूर्वा अरूंधतीताई सिंडरेला सायो आता एकेकदा तुमची पद्धत वापरून पाहते.
धन्यवाद.
पोहे म्हणजे कांदेपोहे ना? मी ड्राय रोस्टेड दाणेच घालते.>>> फोडणीतच घालतेस का सायो?
पोह्यात दाणे घालूच नका>>> इ तो नही हो सकता बहेना
भयंकर दाणेप्रिय माणूस आहे. एक पोहा यामागे २ दाणे लागणारा 
र्वींग बोलमधे पोहे काढून, त्यावर को व खो शिवरुन, लिंबूरस पिळुन झाला की मग तळ्लेले/भाजलेले दाणे त्यावर टाकले तर ते क्रिस्पी राहू शकतील.>>>>> मस्तच आयडिया.
साबांना विचारा. चिरंजिवांच्या जिभेला त्यांच्या हाताची सवय असेल अजूनही>>>> मोलाचा सल्ला हां..
नवर्याच्या एका कमेंटचा इतका काय तो लोड घ्यायचा.... आमच्यात असेच करतात असे सांगायचे. इतके दिवस तेच करतेय गं असेच असतात पोहे सांगून वेळ मारून नेतेय.
पण म्हटले खरंच काही चुकतंय का ते पाहावं इथल्या एक्सपर्टना विचारून 
मी फोडणीतच घालते. पण पोह्यांत
मी फोडणीतच घालते. पण पोह्यांत कांदा, बटाटा, कोबी, वरून शेव इतक्या सगळ्यात ते दाणे कुरकुरीत आहेत की मऊ ह्याकडे लक्षही जात नाही.
आमच्याकडे फोडणीचे पोहे किंवा
आमच्याकडे फोडणीचे पोहे किंवा तत्सम पदार्थ खाणार्यांत ३ गट आहेत : पोह्यांमधील दाणे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, खोबरे वगैरे भयंकर आवडणारा गट. हे अजिबात न आवडणारा गट. हे पदार्थ आवडत असूनही ते चावता न येणारा / पथ्याचे नसणारा गट.
खाणार्या व्यक्तींमध्ये कोणत्या गटाच्या सदस्यांचे प्राबल्य अधिक आहे ह्यावरून त्या पदार्थात कोणकोणते जिन्नस घालायचे किंवा वगळायचे हे ठरत असते.
त्यामुळे वरून हवे ते जिन्नस (खास करून तळलेले दाणे) शिवरण्याचा ऑप्शन मला आवडला!
शेंगदाणे अगोदर चांगले तळुन
शेंगदाणे अगोदर चांगले तळुन वेगळे ठेवावे.पोह्याची वाफ वैगरे काढुन झाली की,अगदि शेवटी सर्व करते वेळी टाकावे. कसे कडक लागत नाही ते बघ.
एक पोहा यामागे २ दाणे
एक पोहा यामागे २ दाणे लागणारा>>>बापरे....मग पोहे करुन बाजूला तळलेल्या दाण्यांची वाटीच ठेव ना
मग ते दाणे घालुन पोहे नाहि
मग ते दाणे घालुन पोहे नाहि तर पोहे घालुन दाणे़ झाले
अकु! आमच्याकडे असे ३ गट. जालेत.
कुरकुरीत आहेत की मऊ ह्याकडे
कुरकुरीत आहेत की मऊ ह्याकडे लक्षही जात नाही. <<< एवढ्या सगळ्यांत ते नसले तरी कळेल असं वाटत नाही
अरे शब्दशः नाही लोकहो आता
अरे शब्दशः नाही लोकहो

आता ऊद्या पोहेदिन म्हणजे विकांत
घरी ब्राउन ब्रेड आहे.. उद्या
घरी ब्राउन ब्रेड आहे.. उद्या सुट्टी ला ब्रेड चा चुरा करायचा आहे..
तेला ऐवजी फक्त तुपाची फोडणी दिली तर चांगले लागेल काय??
आनंदी, तुपाची फोडणी नाही
आनंदी, तुपाची फोडणी नाही चांगली लागत. अगदी घरचं साजूक तूप वापरलं तरी तुपाचा म्हणून जो एक विशिष्ट स्वाद येतो तो ब्रेडबरोबर आवडत नाही. म्हणजे मला तरी अजिबात आवडला नव्हता.
manjud +1
manjud +1
ओके मंजूडी..
ओके मंजूडी..
काल शंकरपाळ्या बेक करण्याचा
काल शंकरपाळ्या बेक करण्याचा प्रयत्न केला
.अर्थातच फसला .
मावेत हाय पॉवर वर भाजण्याचा प्रयत्न केला.
जे काही बनलेलं ते नवर्याने कूकीज म्हनून ( भुकेपोटी ) खाल्लं
अजून पावकिलो भिजवलेलं पीठ पडलं आहे .
जाणकार याबाबतीत काही मदत करू शकतील का?
नाहीच काही जमलं तर नान कटाई ,dark chocolate घालून कूकीज नाहीतर आपल्या तळणाच्या शंकर्पाळ्या .... हाय काय नी नाय काय
पोहे करायच्या आधी कढईत थोडे
पोहे करायच्या आधी कढईत थोडे जास्त (फोडणीपेक्षा) तेल घालुन दाणे तळुन घ्यावेत आणि बाजुला ठेवावेत. नंतर पोहे परतुन घेतल्यावर सगळ्यात शेवटी हे तळलेले दाणे मिसळुन वाढावेत. कुरकुरीत राहतात.
) मी ते नव्हते मान्य करणार पण त्यात एक फायदा असा होता की मला स्वतःला दाणे आवडत नाहीत सो शेवटी मिसळायचे असल्याने मला माझे दाणे वेचायचे कष्ट वाचवता येणार होते. 
आमचा नवरा पण असेच एक्दा म्हणालेला मला लग्नानंतर की दाणे शिजल्यासारखे लागताहेत. मला कळेनाच की पोहे शिजलेत तर दाणे पण शिजणारच ना? मग सांबांनीच एक्दा असे करुन दाखवले मला.
पारंपारिक सुनप्रथेप्रमाणे (
जे काही बनलेलं ते नवर्याने
जे काही बनलेलं ते नवर्याने कूकीज म्हनून ( भुकेपोटी ) खाल्लं
अजून पावकिलो भिजवलेलं पीठ पडलं आहे .
उरलेल्याच्या पण कुकीज करुन टाका .. खाणारे तोंड आहेच घरात.
ह्म्म्म्म्म साधनाताई , आता
पण कोणी सांगेल का बेक्ड शंकरपाळ्या कशा करतात ?
पारंपारिक सुनप्रथेप्रमाणे (
पारंपारिक सुनप्रथेप्रमाणे ( ) मी ते नव्हते मान्य करणार पण त्यात एक फायदा असा होता की मला स्वतःला दाणे आवडत नाहीत सो शेवटी मिसळायचे असल्याने मला माझे दाणे वेचायचे कष्ट वाचवता येणार होते. >>>>>>
भारीच
दाण्यांच लग्न झालं?
दाण्यांच लग्न झालं?
मी घरी केलेला केक कितीही हलका
मी घरी केलेला केक कितीही हलका व चांगला झाला असला असे बाकीच्यांनी सांगितले, तरी मला तो चवीला थोडा वेगळा वाटतो बाजारच्या केकपे़क्षा. त्यातल्या बे. पा व अंड्यांचा वास येतोच मला. तो कसा टाळायचा/घालवायचा?
हुर्रे एक उपाय... खारे दाणे
हुर्रे एक उपाय... खारे दाणे घातले या वेळी पोहे होत आल्यावर. हे प्रकरण पसंत पडलं.
मी घरी अनारस्याचे पीठ केले
मी घरी अनारस्याचे पीठ केले आहे. काल त्यातले अनारसे तळायला घेतले, तर ते तेलात टाकल्यावर हसतायत. मी काय करु?? प्लीज मला मदत करा.
मी इथे एक टिप वाचली होती की
मी इथे एक टिप वाचली होती की कांदा तळून (फोडणीला करतो त्याप्रमाणे) मग फ्रीज करावा मी त्याप्रमाणे 3 कांदे फ्राय करून फ्रीज केले पण 3र्या दिवशी ते काळे दिसायला लागले. आमच्याकडे लोडशेडिंग नाही, फ्रीज सुरूच होता मग माकाचु?
सुका पावटा रात्री भिजत घालून,
सुका पावटा रात्री भिजत घालून, सकाळी कुकरमधे शिजवुन घेतला. कांदा , लसुन , मसाला घालुन भाजी केली. पण कडु लागते? पावटा कडु असतो का
मृणाल, अनारश्याच्या पीठात
मृणाल, अनारश्याच्या पीठात थोडं पिकलं केळं मिक्स करुन मग तळुन बघ.
सुका पावटा रात्री भिजत घालून,
सुका पावटा रात्री भिजत घालून, सकाळी कुकरमधे शिजवुन घेतला. कांदा , लसुन , मसाला घालुन भाजी केली. पण कडु लागते? पावटा कडु असतो का >>> पाणी बदललं होतं का?
Pages