Avocado ठेपला - तिखट - लोला

Submitted by लोला on 17 September, 2013 - 11:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम Avocado - पिकलेला. (हे फळ आहे)
३ चमचे क्रीम चीज
१ कप मक्याचे पीठ. इथे दिसते तसले
१-२ चमचे मिरची-आले-कोथिंबीर यांचे वाटण. आवडीनुसार कमीजास्त करु शकता.
जिरे, तीळ, ओवा यातले काहीही किंवा तीनही. वरुन लावण्यासाठी
मीठ चवीपुरते
साखर चवीपुरती
थोडे तेल.

क्रमवार पाककृती: 

-पिकलेला avocado साल काढून मॅश करुन घ्यावा.
- त्यात क्रीम चीज मिसळावे. मग मिरची-आले-कोथिंबीर वाटण घालावे.
- एकजीव करुन घ्यावे.
- मीठ साखर घालून, मक्याचे पीठ हळूहळू घालावे आणि मिसळून घ्यावे. मग हाताने मळावे.
- पीठ मळून गोळा तयार होतो. पाणी अजिबात घालायचे नाही.
- पिठाचे गोळे करुन घ्यावेत.
- प्लॅस्टिकला तेलाचा हात लावून त्यावर लाटावेत. किंवा हातावरही थापू शकता.
- मी लाटल्यावर वाटीने गोल आकार दिलाय जरा बरं दिसावं म्हणून.
- सपाट तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर ठेपला ठेवावा.
- वरुन ती़ळ, जिरे, ओवा काय हवे ते लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
- पेप्पर जेली, सावर क्रीम किंवा गेलाबाजार लोणच्याबरोबर किंवा नुसतेच खाऊ शकता.
- ही रेसिपी हेल्दी असून, विना कटकटीची आहे.
- तिखट असली तरी तुम्ही गोड मानून घ्या!
-धन्यवाद!

av1.jpgav2.jpgav3.jpgav4.jpgav5.jpgav6.jpgav8.jpgav9.jpgav91.jpgav92.jpg

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात मोठ्या वाटीच्या गोलाएवढे वीसेक ठेपले होतील.
अधिक टिपा: 

- या पिठाचे अजून बरेच कायकाय करता येईल. थालिपीठ, वडे, चिप्स इ.
- पिठात आवडीनुसार काहीही घालू शकता.
- लाटायला सोपे जावे म्हणून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.

माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! काय मस्त खमंग दिसताहेत!
मला फार आवडतं अवोकाडो. मी कुठेतरी वाचलं होतं की तळणे, शिजवणे वगैरे प्रकार केल्यावर ते कडू लागतं म्हणून आवडत असूनही काही वेगळे प्रकार ट्राय केले नव्हते. आता करेन, सह्ही आहे, धन्यवाद लोला.

सुरूवातीला पीठ पीठाचे फोटो बघून वाटले हे काय, हे तर माझी बायको पण करते.. मात्र शेवटचा तयार झाल्यानंतरचा फोटो.. अन तो खासच कलर.. सोबतीला लालचुटूक लोणचे की काय.. तुटून पडावेसे वाटतेय..

Avocado - पिकलेला. (हे फळ आहे)

>>> Lol लोला, खुलासा केलास म्हणून बरं नाहीतर Machado, Furtado सारखा कोणीतरी वाटला असता.

प्रकार मस्त आहे.

अ‍ॅवाकाडो भारतात मिळतं का? >>> हो. गोदरेज नेचर्स बास्केट, सहकारी भंडार, वेस्टसाईटचा ग्रोसरी सेक्शन वा तत्सम ठिकाणी. शिवाय खास मशरूम्स, बेसिल, ब्रोकली वगैरे विकणारे विक्रेते असतात तेथे.

avocado चे टेक्स्चर मऊ, स्मूथ, meaty असते. पिकलेला आंबा, केळं चालेल.
तसं कैरी, पेरु किसून घातला तर चालेल पण मळताना पाणी वापरावे लागेल.

धन्यवाद. सर्वांचे आभार.
आपल्या बहुमोल मताची अभिलाषी,
-लोला.

शिवाय खास मशरूम्स, बेसिल, ब्रोकली वगैरे विकणारे विक्रेते असतात तेथे.>> असं नको म्हणू मामी. या बाकी सगळ्या भाज्या आमचा भाजीवाला पण दारावर घेवून येतो.
अ‍ॅवाकाडोसाठी मात्र मला स्पेशली साउथ दिल्लीमध्ये अपस्केल मार्केटात जावं लागेल.

अरे वा एकदम कल्पक ..

(मोठ्ठा पोळा लाटून त्याचे लहान लहान ठेपले करायचे वाटतं .. ;))

(ह्यात पनीरही घातलं घरी केलेलं तर मखमली ठेपले होतील ना? ;))

Pages