मेथी पुलाव

Submitted by सशल on 10 July, 2008 - 17:19
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदूळ, धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून
कांदा
लसूण
आलं
हिरव्या मिरच्या
कोथींबीर
नारळाचं दूध/canned coconut milk
टोमॅटो
मटार दाणे
कसूरी मेथी
लवंग
दालचीनी
थोडी हळद
मीठ
आवडत असल्यास काजू
पुलाव शिजवण्यासाठी लागेल तसं पाणी

क्रमवार पाककृती: 

नारळाचं दूध घरी करायचं असेल तर तांदळाच्या दुप्पट पाणी मोजून ठेवावं .. आणि तेच पाणी वापरावं म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही .. canned वापरायचं असेल तर शक्यतो मोजून घ्यावं .. थोडक्यात संपूर्ण रेसिपी मध्ये वापरल्या जाणार्‍या पाण्याचं प्रमाण तांदळाच्या दुप्पट हवं हे ध्यानात ठेवावं ..

तर सगळ्यात आधी, कांदा, लसूण आणि आलं वाटून घ्यावं .. थोडा कांदा बारीक चिरून घ्यावा ..
ह्याननंतर अजून एक वाटण लागेल ते म्हणजे कोथींबीर, मिरच्या, चिमूटभर हळद, लवंग आणि दालचीनी ..
ही दोन्ही वाटणं तयार ठेवावीत ..
तेल गरम करून त्यात अख्ख्या लवंगा आणि दालचीनी परतून घ्यावी .. त्यात चिरलेला कांदा घालून परतावा .. मग त्यात कांदा, आलं आणि लसूण वाटण घालून व्यवस्थित परतून घ्यावं .. Next, चिरलेला टोमॅटो घालावा .. परतणं चालूच ठेवावं .. हे सगळं मिश्रण छान परतून झालं, अगदी तेल सुटेपर्यंत की मग त्यात मटार दाणे, कोथींबीरीचं वाटण, नारळाचं दूध, गरज असल्यास जास्तीचं पाणी, मीठ, कसूरी मेथी आणि तांदूळ घालून एकजीव करून उकळी आणावी .. ह्याननंतर मग झाकून ठेवून, पुलाव शिजवावा ..

आवडत असेल तर काजू तेलात fry करून वरून घालता येतील serve करताना .. मला नेवैद्य दाखवून मेथी पुलाव चा आनंद घ्यावा .. :p

वाढणी/प्रमाण: 
मला रेसिपी देताना exact measurements देता येत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व .. :)
अधिक टिपा: 

ह्या रेसिपीत, कांदा दोन प्रकारे लागतो, एकदा वाटणासाठी आणि मग नुसताच चिरून तेलात परतण्यासाठी .. तसंच लवंग, दालचीनी ही, वाटणात आणि मग अख्खी तेलात परतावी ..

ह्या पुलाव बरोबर कांदा, टोमॅटो किंवा आवडीप्रमाणे आणखी कशाचंही दह्यातलं रायतं serve करावं .. दह्यातलं रायतं हे छान complement आहे, पुलाव मसालेदार असल्यामुळे ..

माहितीचा स्रोत: 
एक कन्नड मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसूरी मेथी नसेल तर मेथीची पानं घातली बारिक चिरून तर चालेल का?
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

तांदूळ न घालताच पुलाव कसा होणार? Proud ते कधी घालायचे ते लिहिलंच नाहीये.
.
पाककृती छान आहे. मी करून बघेन आणि मग इथे प्रमाण टाकायचा प्रयत्न करेन. पण एकूण साहित्यावरून वाटतंय की साधारण मेथी मटर मलईची चव असते तशी चव लागेल का पुलावाची??
.
पूनम, मेथीची पानं धुवून कडकडीत उन्हात वाळव. हातानेच चुरता येतील इतकी वाळव म्हणजे झाली कसूरी मेथी तयार. आणि आत्ता पावसाळ्यात ऊन पडत नसेल मेथी धुतल्यावर पंख्याखाली सुकव किंवा कोरड्या किचन नॅपकिन वर ठेव. कोरडी झाली ती नुसतीच कडल्यात कुरकुरीत होईपर्यंत परत.....

मस्त लागतो हा पुलाव ! फक्त पाण्याचा अंदाज बरोबर हवा कारण नारळाचं दूध पण असतं ना.
मंजू , मेथी मलई मटर सारखी नाही, कारण हा जरा जास्त मसालेदार होतो, आणि गोडसर पण नसतो.
कसूरी मेथी + मेथीची पानं असं पण छान लागतं गं पूनम. Happy
सशल, दह्यातलं रायतं अजून कशाचं करता येईल याबरोबर, कांदा/टोमॅटो/बटाटा सोडून ?

मेथी कडकडीत करण्यासाठी, मी धुवुन कागदावर पसरवुन वाळवते आणि कोरडी झाल्यावर कागदातच बांधुन फ्रिज म्ध्ये ठेवते. दोन-चार दिवसातच अगदी कडकडीत होते. अशिच कोथीबिर आणि पुदिना पण वाळवते. मग कधी दह्यात, डोस्याच्या पिठात, भजात वापरते. कोथीबीर आणि पुदिना दह्यात मिस्क केला की खुप छान दिसते आणि लागतेही.

कसुरी मेथी आणि आपण वापरतो ती मेथी वेगळी असे मी कुठेतरी वाचलेले.... जाणकारांनी माहिती द्यावी.

एक प्रश्न - तांदुळ कधी घालावेत?? जेव्हा नारळाचे दुध वगैरे घालुन उकळवतो तेव्हाच घालुन सगळे एकत्र शिजवावे??
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

सगळे घालून झाले व तेल सुटले की शेवटी तांदूळ घालायचे.
पुदीना दह्यात मिक्स करताना आधी वाळवून कुस्करूनच घ्यायचा का ? अजून काय घालायचे त्यात ?

फ्रिजमध्ये ठेऊन दिला की पाने कडकडीत होतात. ती तशीच ठेउन द्यायची. वापरताना हवी तेवढी पाने घेउन टाकताना हातानी चुरडुन टाकायची इतकी कडकडीत होतात की मस्त बारिक पुड होते.. दह्यात खुपच सुंदर दिसते.

एकदा असेच एका मोठ्या (म्हणजे महागड्या ) हॉटेलात गेलेलो. तिथे एका पराठ्याबरोबर कर्ड विथ हर्ब्स होते. मागवले. पाहते तर तेच... कर्ड विथ कुस्करलेला पुदिना आणि कोथींबिर.......इतके हसलो आम्ही.....

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

अश्विनी, ह्या पुलावाबरोबर रशियन सॅलड छान लागेल. मी आत्ताच लिहिलंय बघ इथे.

ही ही ही .. तांदळाचं राहूनच गेलं .. Happy एडिट करते ..

अल्पना, मी इतर भाताच्या रेसिपीमधे कोमट पाण्यात मॅगीची कोकोनट मिल्क पावडर मिसळून वापरली आहे . चांगली लागते चव.

ताजी मेथी (आणि तांदूळ) घालून पुलाव केला. Happy छान लागतो ताज्या मेथीनेही.

सोबत ' Trader Joe' चे sea salt and pepper chips (तांदळाचे असतात, पापडासारखे लागतात.) आणि सोलकढी.
mepu.jpgmepu2.jpg

लोलाच्या मेपुचा फोटो मस्त!!

मी जेव्हा जेव्हा केलाय तेव्हा तेव्हा ताजी मेथीच घातली आहे आणि नो नारळाचं दूध Happy
आमच्या घरी एकदम हिट्ट झालाय हा पुलाव... मसालेदार लागतो, पण त्याबरोबर नेहमीच दहीवडे केले आहेत, त्यामुळे एकदमच हिट्ट!!

मी कसुरी मेथी अन मॅगीची कोकोनट मिल्क पावडर घालून केला हा पुलाव. सगळ्यांनी आवडीने खाल्ला. डब्यात सुद्धा नेला मुलांनी एक दिवस.

सशल, येत्या शनिवारॉ करायचा विचार आहे. वर जे कोथिंबिरीचं वाटण आहे त्यात घालायची लवंग, दालचिनी कच्चीच घालायची की जरा तेलात परतून?

ताजी मेथी + कसुरी मेथी + मॅगीच्या कोकोनट पावडरने नारळाचं दुध घालून काल केला. खूप आवडला घरात.

मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी चिरलेली मेथी, १/२ वाटी नारळाचं दुध घेतलं होतं. (आमच्याकडे नारळाचं दुध घातलेला पदार्थ आवडेल की नाही याची शंका होती. पुढच्यावेळी नारळाचं दुध अजून थोडं जास्त घेईन)

या पध्दतीने केलेला मेथी पुलाव फार आवडतो.
आज बागेतली ताजी मेथी तोडून लगेहाथ हा पुलाव केला आणि यावेळी आठवणीने फोटो काढला. सशल, रेसिपीकरीता थॅन्क्यु Happy

17349626_1501651599846023_6106166304142700857_o.jpg

Pages