बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पानात वाढलेले असेल ते खाल्ल्यामुळे जीव जाणार नसेल, तर ते गऽप खावे. घरी तर खावेच, अन बाहेर गेल्यावर ताट स्वच्छ केलेच पाहिजे हा नियम लहानपणापासून अंगी बाणलेला आहे. न आवडीची वस्तू आधी औषध खाल्ल्यासारखी संपवून मग इतर सगळे संपवणे ही आयडिया लहानपणी करत असू. आजकाल आवडत नाही से काही उरलेच नाहिये. तेव्हा सगळे बरोबर संपते.

पाहुणे म्हणून कुठे गेल्यावर मला अमुक आवडत नाही अन तमुक आवडत नाही, हे स्वयंपाक तयार झाल्या *नंतर* सांगणे हे मला तरी अतीव उद्धटपणाचे वाटते.>>
आ.रा.रा.
अगदी सहमत.
हे आवडत नाही ते आवडत नाही वगैरे लहान मुलांनी म्हणने ठिक आहे. पण मोठ्यांनी पण अस म्हणुन न खाणं मला त्या होस्टचा भयंकर अपमान वाटतो. तुम्हाला जेवायला बोलावलय हेच मुळी किती महत्वाच आहे. कैरी/वरण आवडत नाही अस म्हणणं म्हणजे अशावेळी त्यांनी केलेल्या कष्टाचा अनादर करण आहे. :राग : आणि पथ्य/अ‍ॅलर्जी वगैरे ठिक आहे सुरुवातीला सांगण. आवडी निवडी विचारल्या तर जरुर सांगाव्यात. पण नाही विचारल्या तर गप गुमाट्याने खावे पानात असेल ते आणि कौतुकही करावे.

थोडेसे अवांतर

आजची इथली चर्चा वाचून लहानपणी चा एक किस्सा आठवला. एकदा मामीने चिकन बनवले होते, पण मी त्याकाळी फक्त मटण खायची, सो मामीने शक्कल लढवली अन मला बोलली की पालव्याचे मटण आहे, जरी लहान होते तरी अगदी पहिल्या घासात कळले की मामी खोटे बोलली, तिचा हेतू जरी प्रामाणिक होता की मी चिकन खायला शिकले पाहिजे, तरी मला राग आला, पण काही बोलली नाही अन सगळे चिकन मामाच्या ताटात टाकले, भाकऱ्या त्यालाच दिल्या अन उपाशी पोटी पळून गेले मावशी कडे अन तिकडे जेवले.

>>>>पानात वाढलेले असेल ते खाल्ल्यामुळे जीव जाणार नसेल, तर ते गऽप खावे. घरी तर खावेच, अन बाहेर गेल्यावर ताट स्वच्छ केलेच पाहिजे हा नियम लहानपणापासून अंगी बाणलेला आहे. न आवडीची वस्तू आधी औषध खाल्ल्यासारखी संपवून मग इतर सगळे संपवणे ही आयडिया लहानपणी करत असू. आजकाल आवडत नाही से काही उरलेच नाहिये. तेव्हा सगळे बरोबर संपते.
पाहुणे म्हणून कुठे गेल्यावर मला अमुक आवडत नाही अन तमुक आवडत नाही, हे स्वयंपाक तयार झाल्या *नंतर* सांगणे हे मला तरी अतीव उद्धटपणाचे वाटते<<<<<
+++++११११११

आरारा +१
>>दीक्षित डाएट आहे आणि त्यामुळे त्या घरी जशा दोन अडीच वाजता जेवतात तशा इथेही जेवणार.>> अशा वेळी मी माझी जेवणाची वेळ झाली सांगून जेवुन घेतले असते, आणि प्रेमळ पणे तुम्हाला भूक लागली की सांगा करुन आपली कामे करू लागलो असतो. मूर्ख लेकाचे एकेक!

Biggrin दीक्षित डाएट असेल तर दिक्षितांकडेच जेवा. यांव-ट्यांव आवडत नाही सांगणारी मंडळी असतील तर "आपापले डबे आणा, आमटी-चहा-पाणी-दारू असे द्रवपदार्थ फक्त देवू" सांगायचं बकेट लिस्टीत आहे. (सैपाक आधी, नंतर, करताना असली बातच नस्से... नखरे असतील तर डबा घेऊन या.)

शरी, काय सुंदर मेन्यु आहे हा! मला बोलवा जेवायला कधीतरी! न्याय देईन इतक्या सुंदर जेवणाला नक्की!!! Happy>>> माऊ, या नक्की!!

फार काय पथ्यपाणी असेल तर होस्टांना आधीच तसं सांगून ठेवणं हे उत्तम. वेळेवर त्यांची फजिती करण्यात काय हशील?
वर आरारा म्हणताहेत तस, पहीलं वाढप गप मुकाट्यानं खाल्लं तर करोखरीच काहीही फरक पडत नाही.

धन्यवाद ! त्या नन्तर झालेली चर्चा तर खूप चान्गली आहे.
पूरी ला बाद करून पोळी करावी का म्हणजे खारे वान्गे (मधूरा च्या रेसेपी ने, ग्रीन मसाला भरून चन्गले वा टेल ? - एक पायाची कोम्बडी :))
बाकी ह्या प।हूण्याना अ‍ॅलर्जी बिलर्जी काही नाही.. ते एक बरं !

एक जोडपे ये णार आहे जेवायला...पाहूण्याना नोन-व्हेज जास्त आवडते, पण आम्ही पडलो घास - फूस वाले.. बेत काय करावा?
हा विचार करतेयः
- आम्बा रस, पूरी (थोड्या पूर्या गरम गरम करेन, बाकी करून ठेवीन म्हणतेय)
- भरले वान्गी
- कैरी किसून तक्कू / काकडी कोशीम्बीर
- पनीर भाजी (मुगलाई )
- तोन्डली भात ग्रीन>>>> आमरस पुरी, भरली वांगी अन पनीर भाजी , एकत्र मला नाही वाटत की चांगले लागेल. त्यापेक्षा आमरस पुरी, सोबत दोन भाज्यांपेक्षा, फक्त भरली वांगी किंवा सगळ्यात बेस्ट ओला मसाला घालून केलेली काळ्या/हिरव्या वाटाण्याची थोडीशी रस्सा असलेली भाजी. अन वाटण घालून केलेले कढण
खूप छान लागते ही भाजी चवीला, अगदी मटण फिके पडते यापुढे

<<हिरव्या वाटाण्याची थोडीशी रस्सा असलेली भाजी>> म्हणजे ओला वाटाणा की रात्रभर भिजत घालून ठेवायचा तो ?

आमरस पुरी बरोबर कुर्मा एकदम छान जातो. फ्लॉवर्+ हिरवा वाटाणा+बटाटा+टोमॅटो .पातळसर असल्यामुळ डाळ /वरण करायची गरज नाही. त्याबरोबर हवी असेल तर पनीर ची भाजी किंवा उसळ . आणि जोडीला सांडगे , हिरवी चटणी/कैरीची चटणी. काकडीच्या कोशिंबीर किंवा गाजराची कोशिंबीर मुग डाळ घालुन (उसळ नसेल तरच मुग डाळ घालून) आणि शेवटी जीरा राईस.

पाहूण्याना नोन-व्हेज जास्त आवडते, पण आम्ही पडलो घास - फूस वाले.. बेत काय करावा?
<<
लहानपणापासून नॉनव्हेज खाणारे आहेत की नवमांसभक्षक?
नूव्होरिश्च (nouveau riche) च्या चालीवर नूव्होनॉन्व्हेज असलेत तर ९९ % वेळा मसाल्याची चव आवडणारे अन "लेगपीस" वाले असतात.
अशांना मस्त वाटण घाटण वाल्ञा रश्श्यातली व्हेज भाजी इज ओके. त्यात सुरण असो की बटाटे, किंवा आमटी पाटवड्या/ शेव भाजी ही चालतात.

तुम्ही खात नाही ते ठिकेय, पण पूर्ण नॉनव्हेज जेवणाचा फायदा असा असतो (भारतीय) की एक चिकन मटणाची भाजी केली की भात अन पोळ्या/भाकरीत भागते. वरण नको ना चटण्या कोशिंबिरी सुकी ओली भाजी उसळ पातळभाजी मेतकुट वडे भजी पापड कुर्ड्या नको. स्वीट असल्या नसल्यानेही फरक पडत नाही. स्वस्तात अन कमी कष्टात भारी पाहुणचार Wink

पाहूण्याना नोन-व्हेज जास्त आवडते, पण आम्ही पडलो घास - फूस वाले.. बेत काय करावा?
अन्डा करी /शेव भाजी/पाटवडी आमटी राइस, काकडी-टोमॅटो को, पोळ्या , गाजर हलवा
भरली वान्गी/तोन्डली भात/ आमरस घालुन शिरा
छोले-पुरी /दाल फ्राय् /रसमलई/राइस

म्हणजे ओला वाटाणा की रात्रभर भिजत घालून ठेवायचा तो ?>>> रात्रभर भिजत घातलेला

यात मुख्य म्हणजे मसाला, मसाल्यामुळे मटणाची चव येते, तीच गत कढणाची, मसाला योग्य प्रमाणात असेल अन नीट शिजला न तर कळणार देखील नाही की कढण आहे, कटाची आमटी की मटणाची आमटी. एकदा नक्की करून बघा, अप्रतिम चव असते. आमच्या ऑफिसमध्ये खास करून आणायला सांगतात बरेच जण मला ही भाजी. तशी मसूर भाजी पण नीट केली की मटनासारखी लागते पण काळा वाटाणा बेस्ट, गावठी असेल तर अजून छान

आमच्या ऑफिसमध्ये खास करून आणायला सांगतात बरेच जण मला ही भाजी. >> धागा काढुन सविस्तर क्रुती लिहा प्लिज

पाहुणे येणार असतील तर नॉन व्हेज जेवण बरे पडते व्हेज पेक्षा. नॉन व्हेज मध्ये मटण/चिकन भाजी अन रस्सा , सोबत भात, भाकरी/चपाती/इडली , कोशिंबीर बास जास्त काही करायची गरज नाही पण व्हेज मध्ये खूप घाट घालावा लागतो, अन इतके सारे करून मोस्टली खाणारे खुश नसतात कारण घासपुस दिले मांस नाही

व्हेज मटण करा Wink
https://www.maayboli.com/node/36994
पण आमरसाबरोबर नाही जाणार. आमरसाबरोबर उकडलेला बटाटा भाजीच बेस्ट. सोबत थोडं तळण

एखाद्या दिवशी व्हेज जेवण खाल्ले तर काय बिघडते?? नॉनव्हेज चवीच्या जवळ जाणारी ओपश्न्स का शोधावीत?? व्हेज मधले काहीनाकाही आवडत असनार ना..

पण पूर्ण नॉनव्हेज जेवणाचा फायदा असा असतो (भारतीय) की एक चिकन मटणाची भाजी केली की भात अन पोळ्या/भाकरीत भागते. >>>>> नाही हो! पाहुण्यांसाठी चिकन मटण केले तरी त्यात २ प्रकार असतात.एकच प्रकार केला तर फिश फ्राय असते. नावाला का होईना कोशिंबीर असतेच.डाळीची आमटी आंणि सोलकढी असते. फक्त मासे असतील तर त्यात २-३ व्हरायट्या असतात.त्यावेळी भाजीही असते (शाकाहारी).पण माशांऐवजी चिकन/मटण परवडते.

एखाद्या दिवशी व्हेज जेवण खाल्ले तर काय बिघडते?>>>> अजिबातच बिघडत नाही.उलट पाहुण्यांचे टेन्शन घेऊन मेन्यू ठरवण्यापेक्षा आपल्या वकुबानुसार(करण्याच्या) ठरवावा असं मलातरी वाटतं.

इथली लोकं कॅंम्पिंगला जाताना (दोन रात्री) काय घेऊन जातात? सध्या तरी ग्रील चिकन , पीबीजे, चिकन डाॅग्ज इ. सुचतंय. कदाचित उपम्याचं फोडणी घालून सुकं नेता येईल आणि तिथे गरम पाणी घालता येईल.
आणखी काही सोपं कमी कटकटीचं सुचतंय का?

ग्रिल्ड चिकन वापरून रॅप्स, कॅसिडिया वगैरे करता येईल, आपल्या पद्धतीचे जेवण हवे असेल तर खिचडी, पिठले भात, भरीत, बटाट्याचा रस्सा, शेवभाजी असे बरेच ऑप्शन्स आहेत. नेहमीचे यशस्वी पास्ता, मॅगी, भेळ वगैरे आहेच.

मॅगी ने वेका !! कॅम्पिंगला जाताना बाहेर खुप गरम असेल तर जास्ती तयार केलेले घेऊन जाऊ नकोस खराब होऊ शकते. त्यापेक्षा थोड्या ड्राय गोष्टी नेणे चांगले.

ग्रॅनोला बार्स, चिवडा, चिप्स वगैरे गोष्टी चांगल्या पडतात. जरा गम्मत करायची असेल आणि सोय असेल तर तर मस्त शेकोटी करून त्याच्यावर चिकन वगैरे भाजता येईल.

Pages