तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
हीरा, अबतक छप्पन भारी हां!
हीरा,
अबतक छप्पन भारी हां!
१४६१६७२ + ३०० >>> बास?
१४६१६७२ + ३०० >>> बास?
महाशय मुद्दे शोधायला गेले
महाशय मुद्दे शोधायला गेले वाटते
बरं आहे.
गुजरातच्या चायवाल्याचे काल
गुजरातच्या चायवाल्याचे काल टीव्हीवर सांगण्यात आले. कसे तो व्याजाने पैसे देत होता. मग त्या व्याजाचे चौपट पाचपट पैसे कसे धमकावून वसूल करत होता. कित्येक जणांचे फ्लॅट , कारखाने, स्वतःच्या घशात घातले होते. कित्येक जणांचे आयुष्य उध्वस्त केले होते. ब्लॅकमेलिंग करून पैसे हडपत होता.
तब्बल २००० करोड रुपयाचे साम्राज्य त्याने या व्याजाच्या धंद्यातून उभा केले होते.
तो इतकी माया जमवतोय लोकांना इतका त्रास देतोय तर त्याच्या विरुध्द कोणी तक्रार कशी केली नाही? काय कारण आहे ? त्याच्या वर सत्ताधार्यांचा हात असल्याशिवाय इतके करणे शक्य आहे का? जर गुजरात मधे १२ वर्ष रामराज्य होते (कायदा सुव्यवस्था राखणे राज्यसरकारचे काम आहे हे उ. प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याला सुनावले होते आठवा) तर या चायवाल्याविरुध्द कारवाई इतक्या वर्षात का झाली नाही? याचा अर्थ भाज्पयांचा या चायवाल्याला समर्थन आहे. त्यांच्या समर्थनाच्या जोरावर तो हे धंदे करत होता. जर भाजपाचा समर्थन नाही आहे. तर राज्यसरकारच्या नाकाखाली तो हे धंदे राजेरोसपणे कसे चालवत होता? हे राज्यसरकारचे अपयश नाही का?
काल मोरया गणपतीच्या यात्रेला
काल मोरया गणपतीच्या यात्रेला गेलो होतो, जत्रा भरलीहोती.
लिंबीने चारपाच ओढण्या वगैरे घेतले, पाचशे रुपये झाले, माझ्याकडे २००० ची नोट होती, ती पुढे केली, आता (रस्त्यावरला फेरीवाला) दुकानदार मोड नाही म्हणून सांगेल, अन माल परत घेईल, अन माझे पैसे वाचतील असा माझा होरा होता, तो खोटा ठरला. त्या "फेरीवाल्या दुकानदाराने" हसत हसत नोटांच्या चवडी/गठ्ठ्यातुन १०० च्या पंधरा नोटा काढून माझ्या हातात कोंबल्या, अन माझा पोपट झाला....
अन एकदा उरलेले दीड हजार १०० च्या नोटांमधे सुट्टे झाल्यावर त्याचा "खुर्दा उडायला" फारसा वेळ लागला नाही.
डॉ नरेंद्र
डॉ नरेंद्र जाधव,
महाराष्ट्रातले वेल नोन ईकॉनॉमिस्ट, आर बी आय मध्ये ३१ वर्षे काम केलेले, नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्य सभा, प्लॅनिंग कमिशनचे माजी मेंबर, एज्युकेशन स्पेशॅलिस्ट,
यां ची मुलाखत, नोटबंदी विषया वर त्यांचे विचार,
https://www.youtube.com/watch?v=bKUpPbPn_eo&feature=youtu.be
बघण्यासारखी आहे. जरुर लाभ घ्यावा !!
१२ वर्षात गुजरात मधे कसे
१२ वर्षात गुजरात मधे कसे अवैध्य धंदे बिन्धास्त वाढले गेले याचे जिवंत उदाहरण तो पकडला गेलेला चायवाला आहे.
हेच मोदीच्या नेतृत्वाखाली झाले? याला म्हणतात विकास?
गुजरात मधेच शहा, चायवाला, इ. लोक सापडत आहे घबाड सापडत आहे. यावरून अंदाज यायला हरकत नाही कि धनाढ्यांच्या पायाशी मोदीसरकार १२ वर्ष होते.
१२ वर्षाच्या कथित विकासाच्या फुग्ग्याला "चायवाल्यारुपी" टाचणी लागली.
>>>> प्रसादक | 20 December,
>>>> प्रसादक | 20 December, 2016 - 11:44
महाशय मुद्दे शोधायला गेले वाटते खो खो बरं आहे.
<<<<
नाही हो, इतर कामे असतात अधूनमधून. :डोमा
>>>>झाडू | 20 December, 2016 - 11:11 नवीन
http://rbidocs.rbi.org.in/rdocs/ATM/PDFs/ATMPC17112016311BE3CCA94143DAAB...
इथे नक्की किती POS machines आहेत ते RBI ने दिलं आहे. वाचून face-palmआसन करावे.
नुसत्या मुंबईत ५० लाख "असतील" अशा थापा मारू नयेत.<<<<
आर बी आय चा डेटा आधीही वाचला होता आणि आताही वाचला. पूर्ण भारतात पंधरा लाख स्वाईप मशीन्स आहेत म्हणजे धमालच की?
काही समजत नाही बुवा. पुण्यातील सगळे पेट्रोल पंप्स, हॉटेल्स, सगळी मोठी दुकाने, उपाहारगृहे, केमिस्ट्स, मॉल्स, किराणा मालवाले ह्यांच्याकडे कैक आधीपासून क्रेडिट / डेबिट कार्ड्स चालतात. भारतात पंधरा लाख म्हणजे पुण्यात लोकसंख्येनुसार फार तर सात हजार मशीन्स असायला हवीत. फार फार तर दहा हजार! आता निगडीपासून हडपसर, हिंजवडीपासून वाघोली, फुरसुंगीपासून बावधन वगैरे आवाका लक्षात घेतला तर फक्त दहा हजार मशीन्स? पण डेटा आर बी आय चा आहे नाही का! हं!
आता त्या शितोळेंच्या चेकच्या मुद्यावर काय म्हणणे आहे? आमच्या इथला किराणा मालवाला चेक घेतो आणि तो बँकेत टाकायच्या आत माल देऊनही टाकतो. तो बहुधा असा एकटाच असावा देशात! बाकी सगळे चेक वटेपर्यंत थांबत असावेत. व्यवहार ठप्प! आहे काय नाही काय!
एन ई एफ टी वगैरे तर मर्यादीतच आहे असे त्यांनी सांगितलेच आहे.
शितोळेंचे म्हणणे जसेच्या तसे खरे असते तर देश बंद पडला असता. ऑलरेडी!
पण तसे दिसत नाही. आता युनायटेड स्टेट्स ऑफ कोथरुड आणि वेल्दी लेयर वगैरे म्हणून टाकले की झाले.
कॅशलेस अशी एखादी प्रणाली
कॅशलेस अशी एखादी प्रणाली भारताला तयार करणे अशक्य होते का ? अजिबात नाही.
रेल्वेची रिझर्वेशन व्यवस्था हे बोलके उदाहरण आहे. याचे काम सी एम सी ने साधारण १९८६ साली सुरु केले ( मी तेव्हा त्याच कंपनीत होतो ) त्यानंतर आजतागायत ही व्यवस्था व्यवस्थित चालू आहे. कधी कधी कनेक्शन नसते म्हणून काही ठिकाणी काम बंद असते कबूल, पण तरीही प्रचंड सख्येतल्या गाड्या, तितकेच प्रवासी हे कसे बिनबोभाट हँड्ल केले जाते.
रिझर्व केल्यानंतरही पी एन आर एन्क्वायरी वगैरे व्यवस्थित करता येते. प्रचंड गर्दी असूनही, हि व्यवस्था कशी उत्तम रित्या चालते, ते बघायला सी एस टी स्टेशनवर जा.
बोगस रिहर्वेशन, एकच बर्थ दोघांना असले प्रकार मी तरी बातम्यात बघितले नाहीत.
मग अशी व्यवस्था, केशलेस ( असाच उच्चार आहे ना ? ) साठी का नाही होऊ शकली ?
क्रेडीट कार्ड सर्व्हीस देणार्या व्हीसा, अमेरिकन एक्स्प्रेस या कंपन्याही परदेशीच आहेत.
अरे रे रे.. आता सरकारी
अरे रे रे.. आता सरकारी आकड्यावर सुध्दा लोकांना विश्वास उरलेला दिसत नाही. काय अवस्था आली सरकारवर
बाय द वे, गुलाबो
बाय द वे, गुलाबो प्रतिसादामधील अर्थ न समजल्याबद्दल अभिनंदन
आर बी आय चा डेटा आधीही वाचला
आर बी आय चा डेटा आधीही वाचला होता आणि आताही वाचला. पूर्ण भारतात पंधरा लाख स्वाईप मशीन्स आहेत म्हणजे धमालच की?
काही समजत नाही बुवा. पुण्यातील सगळे पेट्रोल पंप्स, हॉटेल्स, सगळी मोठी दुकाने, उपाहारगृहे, केमिस्ट्स, मॉल्स, किराणा मालवाले ह्यांच्याकडे कैक आधीपासून क्रेडिट / डेबिट कार्ड्स चालतात. भारतात पंधरा लाख म्हणजे पुण्यात लोकसंख्येनुसार फार तर सात हजार मशीन्स असायला हवीत. फार फार तर दहा हजार! आता निगडीपासून हडपसर, हिंजवडीपासून वाघोली, फुरसुंगीपासून बावधन वगैरे आवाका लक्षात घेतला तर फक्त दहा हजार मशीन्स? पण डेटा आर बी आय चा आहे नाही का! हं!
<<
आरबीआय ऑफिशियली सांगते आहे ते चुकीचे असून तुमचे भक्तीपूर्ण "अंदाज" बरोबर आहेत, ही "टांग उपर" आहे, हो ना? "विशिष्ट वागणूकीची" हद्द असते ब्वा!
दुसरं, ते लायसन्सच्या कामात लाच द्यावी लागली का? ते सांगायचं सोडून बगल का देताहात? लाच घेतली असेल, तर तक्रार कशी करतात त्याचं मार्गदर्शन करता येईल. तेवढाच गुड गवर्नन्ससाठी हातभार. नैका?
गैरसोय कोणाची ? हा मुद्दा
गैरसोय कोणाची ? हा मुद्दा गैर लागु झालेला आहे !!
लोकांची चांगलीच सोय झालेली आहे, ज्यांना काही आतली माहिती आहे त्यांच्या साठी,
सरकारने टिप देणार्यांना भरघोस बक्षिस ठेवल्याने ७२ तासात ४००० टिप्सचे ईमेल्स आलेले आहेत.
त्यातुन खुप काही सापडण्याची शक्यता आहे. ज्या ज्या लोकांनी कोणत्याही प्रकारे आपल्या काळ्या पैश्याला सफेद करायचा प्रकार केलेला असेल तर तो आता उघड होणार !!
Government receives 4,000 emails on black money in 72 hours
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/government-re...
आता खुप मज्जा येणार आहे !!
मी पेटीएम वापराच्या नव्हे, तर
मी पेटीएम वापराच्या नव्हे, तर त्याकरता आकारल्या जाणार्या चार्जेसच्या विरोधात गेलो आहे.
आमेन.
क्रेडीट /डेबिट कार्डला अडीच टक्के, तर पेटीएमला आपल्या अकाऊंटला पैसे पाठवायला चार टक्के, ही लूट आहे असे माझे मत बनले आहे.
पेटीएमचे केवायसी करणे जिकीरीचे आहे, सहज सोपे नाही.
त्यातुन २०००० ही मॅक्सिमम लिमिट असल्याने आमच्या इकडची बहुतेक पेटीएम फॅसिलिटी दुकानदारांनी बंद केली आहे.
त्या ऐवजी कार्ड स्वाईप मशिन बसविणे चालू झाले आहे. मात्र मशिनची किंमत हा देखिल कळीचा मुद्दा ठरू शकेल.
हे सगळे करण्या ऐवजी, नोटा छापण्याचा कारखाना ते ब्यान्का या दरम्यानचे व्यवहार सरळ मिलिटरीच्या हातात देऊन टाकले तर फार बरे होईल असे वाटते आहे.
पंधरा कोटी प्रशासनातील प्रथम ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांपैकी किती किती भ्रष्टाचारी व उंदराला मांजर साक्षी कर्मचार्यांवर शिस्तीचा बडगा उगारणार? अन तसा उगारला, तर लाल बावटे स्वस्थ बसतील काय? ते तर दबा धरुनच बसलेले आहेत की मोदी कधी ही चुक करताहेत, अन कधी युनियन्सद्वारे संप/आंदोलने/दंगली याद्वारे गदारोळ उडवुन देतोय.....
त्यातुन "दंगंलिंची" शक्यता आधीच व्यक्त केली गेली असल्याने , समजा दंगली घडल्या/घडवल्याच तरीही त्याचे खापर दंगलींबाबतच्या शक्यतेच्या मतप्रदर्शनाचा दुजोरा घेत घेत राजरोसपणे नोटाबंदीवर टाकता येईलच की..... !
तर अशी सगळी गत आहे. धरल तर चावतं सोडल तर पळतं....
मला मोदींची "दया" येते आहे. या अशा परिस्थितीवर मात करण्यास इश्वर त्यांना बळ देवो.
पक्ष बदलल्याबद्दल लिंबुचा
पक्ष बदलल्याबद्दल लिंबुचा देशद्रोही पदवीने सन्मान करण्यात येत आहे.
*Earlier* Don't use phones at
*Earlier*
Don't use phones at petrol pumps. It'll cause explosion
*Now*
Pay at petrol pumps via paytm on phone
National cause is fireproof
१२ वर्षाच्या भ्रष्टाचाराचे
१२ वर्षाच्या भ्रष्टाचाराचे प्रतिक आज गुजरातचा चायवाला बनला आहे.
१२ वर्षाच्या भ्रष्टाचाराचे प्रतिक आज गुजरातचा १३ हजार करोडचा शहा बनला आहे.
मी पेटीएम वापराच्या नव्हे, तर
मी पेटीएम वापराच्या नव्हे, तर त्याकरता आकारल्या जाणार्या चार्जेसच्या विरोधात गेलो आहे.
क्रेडीट /डेबिट कार्डला अडीच टक्के, तर पेटीएमला आपल्या अकाऊंटला पैसे पाठवायला चार टक्के, ही लूट आहे असे माझे मत बनले आहे.
<<
जर ही खरेच आलेली जाग असेल, तर हार्दिक गुडमॉर्निंग!
हेच पहिल्या दिवसापासून आरवून सांगतो आहोत आम्ही "निगेटिव्हिटीने भरलेले" लोक
>>>>आरबीआय ऑफिशियली सांगते
>>>>आरबीआय ऑफिशियली सांगते आहे ते चुकीचे असून तुमचे भक्तीपूर्ण "अंदाज" बरोबर आहेत, ही "टांग उपर" आहे, हो ना? "विशिष्ट वागणूकीची" हद्द असते ब्वा!<<<<
अहो नीट वाचा की प्रतिसाद! मी तर म्हणत आहे की आर बी आय चा डेटा आहे म्हंटल्यावर काय बोलणार? पण मनाला पटत नाही कारण भक्त म्हणवून घेण्याची घाई! दुसरे किरकोळ कारण म्हणजे जाईन तिथे कार्ड चालतंय आणि आर बी आय च्या हिशेबाने पुण्यातील कार्डांचा अंदाज फार तर दहाच हजार येतोय.
बाकी ते चेक आणि एन ई एफ टी बाबत काही वदला नाहीत ते?
गुलाबो हा मुद्दा (तुम्हाला माहीत नसेल पण ज्यांना आठवत असेल त्यांना आठवेल) मी माझा प्रतिसाद संपादीत करून अॅड केलेला होता. त्यातून सोळाशे पस्तीस सुट्टे मिळाले ज्यातून वडा सांबार, चहा, बिसलरीही केले. हे लिहिले असते तर शोकसभेत बोलणार कशावर?
काही जाग वगैरे आली नाही..
काही जाग वगैरे आली नाही.. फिरकी घेतात ते
एक वेळ मोदींना जाग येऊ शकते पण लिंबूभाऊंना अजिबात जाग येणार नाही. कारण ते झोपत नाही तर झोपेचे सोंग घेतात.
>>>>मी पेटीएम वापराच्या
>>>>मी पेटीएम वापराच्या नव्हे, तर त्याकरता आकारल्या जाणार्या चार्जेसच्या विरोधात गेलो आहे.
क्रेडीट /डेबिट कार्डला अडीच टक्के, तर पेटीएमला आपल्या अकाऊंटला पैसे पाठवायला चार टक्के, ही लूट आहे असे माझे मत बनले आहे.<<<<
लिंबू,
१. पेटीएमचा मुख्य वापर खरेदीदरम्यान होतो.
२. आपल्याच मोबाईल बटव्यातून आपल्याच बँक अकाऊंटला पैसे पाठवताना हा चार्ज लागतो. पण तसे पैसे पाठवण्याची वेळ कितीदा येते? दोन माणसांमध्ये देवाणघेवाण असेल तर चेक दिला जातोच की?
३. आणि समजा खरेदी व्यवहारात चार्ज लागला पण त्या बदल्यात व्यवहार बेहिशोबी राहिले नाहीत तर मी तरी द्यायला तयार आहे तो चार्ज!
हेच नरेंद्र जाधव, सध्याचे
हेच नरेंद्र जाधव, सध्याचे राज्यसभेचे "नॉमिनेटेड" मेंबर. बरोबर ना?
>>
While Ramesh and many others missed it, a bonhomie between Jadhav and the saffron establishment began last year, when RSS affiliated magazines Organiser and Panchjanya came out with an issue on the birth anniversary of Ambedkar. Krishna Gopal, the RSS joint general secretary who liaise with the BJP, got Jadhav to write for both magazines.
Soon after, Modi named Jadhav to a high-powered committee constituted to commemorate Ambedkar's 125th birth anniversary.
The bonding to such an extent that RSS chief Mohan Bhagwat launched four of Jadhav's Hindi books on Ambedkar last August. Jadhav has enough credentials to deserve a seat in the Upper House.
Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/51971653.cms
<<
पाळीव विचारवंत असा एक संघिष्टांचा लाडका शब्दप्रयोग आहे.
२. आपल्याच मोबाईल बटव्यातून
२. आपल्याच मोबाईल बटव्यातून आपल्याच बँक अकाऊंटला पैसे पाठवताना हा चार्ज लागतो. पण तसे पैसे पाठवण्याची वेळ कितीदा येते? दोन माणसांमध्ये देवाणघेवाण असेल तर चेक दिला जातोच की?
<<
भजगोविंदं मूढमते!
अहो साहेब, दुकानदाराला जेव्हा तुम्ही पेटीएमने पैसे देता, व पेटीएमवर २००० पेक्षा ट्रँजेक्शन जास्त करता येत नाही, तेव्हा तो दुकानदार त्याच्या होलसेलरला पेमेंट कसे करेल? अन चेक द्यायचा तर पैसे अकाउंटला हवेत. पेटीएममधल्या पैशाचा चेक कसा देणार?
झापडं काढायचं काय घ्याल हो साहेब?
पेटीएम चीन चे प्रोडक्ट आहे.
पेटीएम चीन चे प्रोडक्ट आहे. याकडे काही लोक मुद्दामून दुर्लक्ष करत आहे.
बाकी ते चेक आणि एन ई एफ टी
बाकी ते चेक आणि एन ई एफ टी बाबत काही वदला नाहीत ते?
<<
त्याचाही डेटा दिला, तर पुन्हा अशीच टांग उपरवाली केअरफुली वर्डेड पोस्ट येईल, जिच्यातून भ्रम असा उत्पन्न होईल की दिलेला विदा खोटा आहे!
भजगोविंदं!
>>>>भजगोविंदं मूढमते! अहो
>>>>भजगोविंदं मूढमते!
अहो साहेब, दुकानदाराला जेव्हा तुम्ही पेटीएमने पैसे देता, व पेटीएमवर २००० पेक्षा ट्रँजेक्शन जास्त करता येत नाही, तेव्हा तो दुकानदार त्याच्या होलसेलरला पेमेंट कसे करेल? अन चेक द्यायचा तर पैसे अकाउंटला हवेत. पेटीएममधल्या पैशाचा चेक कसा देणार?
झापडं काढायचं काय घ्याल हो साहेब?<<<<
नाही बरोबर आहे तुमचं! तरीच कोणीही पे टी एम घेतलेले नाही. सगळ्यांच्या डोक्यावर होलसेलर्स बसलेले आहेत. खरेदी विक्री, धंदे हे सगळे बंद आहे. सगळीकडे शुकशुकाट आहे. पे टी एम चा सेल ८० टक्क्यांनी घसरलाय. रिटेलर आणि होलसेलर्समध्ये दंगली होत आहेत. कोणालाही पडणार्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर फक्त नोटबंदी विरोधकांकडेच मिळु शकतंय. सगळे रिटेलर, होलसेलर हे तुम्हाला विचारून आर्थिक व्यवहार करू लागलेले आहेत. तुम्हाला एक नवीनच क्षेत्र व्यवसायासाठी उघडे झालेले आहे.
घ्या, कढली झापडं!
>>>>त्याचाही डेटा दिला, तर
>>>>त्याचाही डेटा दिला, तर पुन्हा अशीच टांग उपरवाली केअरफुली वर्डेड पोस्ट येईल, जिच्यातून भ्रम असा उत्पन्न होईल की दिलेला विदा खोटा आहे!
भजगोविंदं!<<<<
डेटा नाही होत मागत मी! शितोळे म्हणतात की अश्या सगळ्या प्रणालींना मर्यादा असल्यामुळे त्यांचा उपयोग नाही. त्याचं काय? त्यांनी सांगितलं की ते खरं ह्याला काय म्हणायचं असतं? इथे १३० कोटींमध्ये सगळ्याच गोष्टींना मर्यादाच असणार. म्हणून एकदम २५०० लाख कोटीचा आरोप फ्रेम करून मिरवायचे?
बेफिकीर साहेब, पेटिएम सुरू
बेफिकीर साहेब,
पेटिएम सुरू करून बंद करणारे किरकोळ विक्रेते किती, त्याचा जरा खुल्या डोळ्यांनी अन मनाने शोध घ्या. मग अशा पोस्टी लिहा.
>>
सगळे रिटेलर, होलसेलर हे तुम्हाला विचारून आर्थिक व्यवहार करू लागलेले आहेत. तुम्हाला एक नवीनच क्षेत्र व्यवसायासाठी उघडे झालेले आहे.
<<
मला व्यवसाय कसा मिळेल त्याची काळजी करू नका, माझ्या कर्तृत्वाने भरपूर कमवून आरामात खायला मी समर्थ आहे.
नेहेमी व्यक्तिगत प्रतिसाद म्हणून बोंब मारणारे तुम्ही हे असे बोलून मुद्दाम उचकवण्याची सुरुवात करता, ते कुणाच्या लक्षात येत नाही असे तुम्हाला वाटते का?
बेफि, अवांतर भांडण होऊन धागा
बेफि,
अवांतर भांडण होऊन धागा वाहता करण्याचा तुमचा प्रयत्न फेल जावा म्हणून तुम्हाला यापुढे इथे उत्तर देणार नाही. हवे असल्यास विपूत बोलावे.
धन्यवाद!
भारताला बिग बॉस चे घर बनवले
भारताला बिग बॉस चे घर बनवले आहे आणि रोज नव नविन टास्क करायला जनतेला लावले जात आहे.
Pages