तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
(No subject)
तो जानेवारी १४ चा काळ...
तो जानेवारी १४ चा काळ... तेंव्हा भाजपा डिमोनेट च्या विरोधात होता
आता हे इमेल मधून आले. अरे रे
आता हे इमेल मधून आले.
अरे रे रे.. समोर बोलाय्ची हिंमत नसणारे क्लोजगृप मधे जाऊन बोलत आहे. हेच वाटते संस्कार
तेव्हाच्या आणि आत्ताच्या
तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीतील फरक सांगू का? शोधा पाहू! हिंट : उत्तर अगदी सोपं आहे
भक्तांचे खरे चेहरे हेच. वरील
भक्तांचे खरे चेहरे हेच.
वरील ईमेल मधे स्पष्ट होते की हे लोक इतरांना मुद्दामुन उचकवतात. लिंबूभाउ तर कबूल करतात की ते झोपेचे सोंग घेतात त्यांच्या सगळ्या पोस्टी इतरांना त्रास देण्यासाठी आणि उचकवण्यासाठीच असतात.
अशा गोष्टींसाठीच एकाला अॅडमिन ने स्पष्ट वॉर्निंग दिली होती बहुदा दुसर्याला सुध्दा मिळेल.
>>>>लेकिन सरकार का यह फैसला
>>>>लेकिन सरकार का यह फैसला विदेशी बैंकों में अमेरिकी डालर, जर्मन ड्यूश मार्क और फ्रांसिसी फ्रांक आदि करेंसियों के रूप में जमा भारतीयों के कालेधन में से एक पाई भी वापस नहीं ला सकेगा। इससे साफ है कि सरकार का विदेशों में जमा भारतीयों के कालेधन को वापस लाने का कोई इरादा नहीं है और वह केवल चुनावी स्टंट कर रही है।’ <<<<
आता हे वाचा:
ह्या धाग्याच्या पन्नासाव्या पानावर मी मयेकरांना दिलेल्या प्रतिसादातील हा भागः
>>>>(c) whether the Government has noticed that a large amount of black money stashed abroad has been withdrawn by account holders;
ह्या प्रश्नाला सरकारचे उत्तर:
(c) No such information is available with the Government. <<<<
परदेशात काळा पैसा आहे हेच माहीत नाही इतक्या हुषार सरकारला. त्यांचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान स्वतः अर्थतज्ञ असताना! मग भाजपने वर उच्चारलेली वाक्ये चुकीची कशी बुवा?
UNSTARRED QUESTION
UNSTARRED QUESTION NO: 1068
ANSWERED ON: 28.11.2014
बेफी स्वतःचे हसे का करून घेत आहात २८ नोव्हेबर २०१४ साली मोदी सरकार होते. त्यांनीच हे उत्तर दिले आहे.
जरा उत्तर देताना रेफ्रंस वाचत जावा
अर्थमंत्री जेटली आनि पंतप्रधान मोदी होते. जर निवडणुकित किती काळे धन बाहेर आहे याचा आकडा जर जाहीर सभेत सांगू शकत होते तर लोकसभेत का नाही सांगितले हे तुम्हीच सांगा बरे
याला म्हणतात आपलेच दात आणि आपलेच ओठ.
काळा पैसा इतका आहे तितका आहे याचा प्रचार रामदेवबाबा आणि मोदी करत होते. मग त्यांच्याच सरकारने लोकसभेत असे का बोलले. ? इतका ५६ इंची छाती निव्वळ सभेत खोटे बोलण्यासाठी आहे का? कि लोकसभेत खरे बोलताना जीभ अडखळते
जयंत सिन्हा काँग्रेस मधे आहे. हा नविन शोध बेफींच्या कृपेमुळे लागला.
<<< जर निवडणुकित किती काळे धन
<<< जर निवडणुकित किती काळे धन बाहेर आहे याचा आकडा जर जाहीर सभेत सांगू शकत होते तर लोकसभेत का नाही सांगितले हे तुम्हीच सांगा बरे <<<
बेफी काय सांगणार कप्पाळ?
अहो १९६८/६९ पासुनच्या निवडणूक सभेतील "गरीबी हटाव" च्या घोषणा अन प्रत्यक्षात गरीबी कुणाची हटली, हे अजुनही जनता विसरली नाहीये, किंबहुना, त्या गरीबी हटाव घोषणे मुळे तेव्हांपासुन २०१४ पर्यंत व पुढची दोन वर्षे छुपेपणाने, कोणाकोणाची गरीबी हटली ते लोकांपुढे आले ना भाऊ नोटबंदीमुळे.....
ये जो पब्लिक है, सब जानती है... ये पब्लिक है......
बाकी तुम्ही माझी नक्कल करु लागलात हं..... अक्षरे बोल्ड करायची नक्कल म्हण्तोय हो... (म्हणजे आहे, सुधारणा आहे, अन अजुन बराच वाव आहे...
)
गरिबी हटाव ही घोषाणा होती
गरिबी हटाव ही घोषाणा होती लिंबू. गरीब हटवली गेली आहे असा प्रचार आजपर्यंत केला नाही. पण भक्त तर २ वर्षात रामराज्य आले असे बोंबलू लागले आहे त्यांना आवरा आधी
नाही तर वर जसे हसे झाले तसे पदोपदी होते.
>>>> पण भक्त तर २ वर्षात
>>>> पण भक्त तर २ वर्षात रामराज्य आले असे बोंबलू लागले आहे त्यांना आवरा आधी डोळा मारा <<< अस म्हणतात? ते वेडे आहेत.....
अयोध्येत राममंदिर उभे राहिल्याखेरीज रामराज्य कसे येईल? काही मुळी कळतच नाही आमच्या लोकांना....
>>>>२८ नोव्हेबर २०१४ साली
>>>>२८ नोव्हेबर २०१४ साली मोदी सरकार होते. त्यांनीच हे उत्तर दिले आहे.
जरा उत्तर देताना रेफ्रंस वाचत जावा <<<<
होय, तुमचे बरोबर आहे. 'मागच्या सरकारच्या वेळी काय काय केले गेले' ह्याच्या हिशोबाबाबतचा डेटा मी त्या प्रश्नासाठी चुकून वापरला. करेक्ट केल्याबद्दल धन्यवाद!
सहा महिन्यात भाजपला परदेशातील काळा पैसा माहीत व्हायला हवा ही अपेक्षाही गैरच!
पण तुम्हाला अयोध्येत राममंदीर
पण तुम्हाला अयोध्येत राममंदीर उभाच करायचे नाही ते उभे रहिले तर मुद्दा कुठे असणार?
म्हणून तर मुंबईच्या स्टेशनचे नाव बदलून राम मंदीर केले
आयत्या बिळावर नागोबा हे ब्रीदवाक्य भाजप्यांचे असायला हवे शोभून दिसते
ओ बेफी. ६ महिन्याच्या
ओ बेफी. ६ महिन्याच्या निवडणूक प्रचारात जनतेला सांगायला "काळा पैसा किती आहे" हे माहीत असेल तर लोकसभेत का नाही?
म्हनजे जनतेला भुलवू शकतात पण लोकसभेला नाही. असेच ना
२००० ला ३७़ कमी. त्वरा करा.
२००० ला ३७़ कमी.
त्वरा करा.
सहा महिन्यात भाजपला परदेशातील
सहा महिन्यात भाजपला परदेशातील काळा पैसा माहीत व्हायला हवा ही अपेक्षाही गैरच!
<<
आजच्या दिवसात २-३दा तरी फेस-पाम झाला. तरीही 'गिरे तो भी टांग उपर' करायची सवय जाईना.
अहो फेमपामवाले, त्या
अहो फेमपामवाले, त्या पन्नासाव्या पानावर काय चर्चा झाली आहे बघा की?
पाच वर्षांत सत्तेत असून किती काळा पैसा निघाला, किती डिटेक्ट झाला, किती असल्याचा नुसता अंदाजच व्यक्त झाला ते सगळे आहे की तिथे? आता गिरे तो भी टांग उपर कोणाला लागू आहे हे तिथे ढळढळीत दिसतंय तरी तुमचं आपलं तेच पालुपद!
आणि दुसर्यअंदा कसलं? अजूनही मला सांगा, मुंबईत किती स्वाईप मशीन असतील? त्या डेटामध्ये काहीतरी कॅच वाटतोय असेही म्हणायचा अधिकार नाही का राहिला आता?
बेफिकिर भौ ..... जाहीर सभा ,
बेफिकिर भौ ..... जाहीर सभा , निवडणुका , डाँकी बात .. अशा ठिकाणी भारतातील व परदेशातील काळे आकडे छातीठोकपणे जनतेला सांगणारे आता संसदेत हे आकडे का जाहीर करत नाहीत, हा मुद्दा आहे, तुमच्या निद्रिस्त बुद्धीला हे समजलेय का?
अनिलचेंबुर, तो मुद्दा आहे हे
अनिलचेंबुर,
तो मुद्दा आहे हे समजलेले आहे ईश्वरकृपेने! पण पाच वर्षांत विशेष काळा पैसा बाहेर काढताच आला नाही ह्याचा डेटा तिथे आहे. अश्या परिस्थितीत सहा महिन्यांत उत्तरे द्यावीत ही अपेक्षा सॉलिडच आहे.
शिवाय, निवडणूका जिंकण्यासाठी काँग्रेस काय खालील घोषणा करायची का?
१. काळा पैसा बाहेर आणणार नाही
२. गरीबी हटवणार नाही
३. भ्रष्टाचार होऊ देऊ
वगैरे?
तेव्हा मधेच चर्चेत पडत आहात तर आजूबाजूचे वाचा असा एक नम्र सल्ला देतो.
पाच वर्षांत विशेष काळा पैसा
पाच वर्षांत विशेष काळा पैसा बाहेर काढताच आला नाही ह्याचा डेटा तिथे आहे.>>>>>>
बर्याच स्किम मधून काळा पैसा लोकांनी घोषीत केला आहे. या डेटाकडे सुध्दा काहीजण मुद्दामून दुर्लक्ष करत आहे.
दुर्लक्ष करण्याइतकाच पैसा आहे
दुर्लक्ष करण्याइतकाच पैसा आहे तो! मेजर पैसा नुसताच डिटेक्ट झाला आहे असे म्हंटलेले आहे.
इथेही तेच! चूक उघडी झाली की आकांडतांडव!
मी कसा, निदान माझी झालेली चूक मान्य तरी केली.
आडवातांडव करू नका हो. शांत
आडवातांडव करू नका हो. शांत व्हा. मुद्दे शोधा . बघा काही सापडते का.
>> अजूनही मला सांगा, मुंबईत
>> अजूनही मला सांगा, मुंबईत किती स्वाईप मशीन असतील?
बृहनमुंबईची (Ambernath, Badalapur, Greater Mumbai, Kalyan and Dombivali, Mira and Bhayander, Navi Mumbai, Thane, and Ulhasnagar) लोकसंख्या 18,394,912 आहे.
http://www.census2011.co.in/census/city/365-mumbai.html
तर मुंबईत ५०-६० लाख मशीन्स म्हणजे दर तीन माणसांमागे १ स्वाईप मशीन आहे असं म्हणायचं आहे का?
केलेले अंदाज बिन्डोक आहेत हे ढळढ्ळीत दिसत असताना तसं सांगायचा अधिकार नाही का राहिला आता?
(No subject)
ज्ञानी सत्तेचे भाट
ज्ञानी सत्तेचे भाट बनले
गणपतीपुरतेच पुणे उरले.
पुण्यातील हे दोन दिव्य ज्ञानी लोक बघून रामदास फुटाणे आठवले. पूर्ण चारोळी मिळेल का?
>>>>तर मुंबईत ५०-६० लाख
>>>>तर मुंबईत ५०-६० लाख मशीन्स म्हणजे दर तीन माणसांमागे १ स्वाईप मशीन आहे असं म्हणायचं आहे का?
केलेले अंदाज बिन्डोक आहेत हे ढळढ्ळीत दिसत असताना तसं सांगायचा अधिकार नाही का राहिला आता?<<<<
अगदी अवश्य सांगा की? आम्ही चुकीची विधाने केली तर ती मान्य करतो. तुमच्या सेनेशी प्रतिसादयुद्ध करता करता दोन चुकीचे प्रतिसाद दिले मी! स्वाईप मशीन्सची संख्या आणि परदेशातील काळ्यापैश्याबाबतच्या उत्तराचा संदर्भ!
तर आता फिरे तो भी टांग उपरवाला प्रतिसादही वाचून टाका.
१. देशात फक्त पंधरा लाख स्वाईप मशीन्स आहेत हा डेटा आर बी आय चा आहे पण त्यात काहीतरी गोंधळ आहे असे वाटत आहे. आता मुंबईतील कार्ड स्वाईपची सोय असणारी दुकाने व इतर पॉईंट्सची संख्या किमान दोन लाख असायला हवी असे वाटते. पण नुसत्या वाटण्याला अर्थ नाही म्हणून विचारले की मुंबईत एकुण स्वाईप मशीन्स किती.
२. काळा पैसा नगण्य स्वरुपात बाहेर काढणार्यांनी 'केवळ भाजपने निवडणूक प्रचारात घोषणा केली' म्हणून अपेक्षा व्यक्त करताना इतके तांडव करणे हास्यास्पद नाही का? म्हणजे आपण करायचे नाही, दुसरा म्हणाला करणार त्याला त्रस्त करायचे आणि त्याने काही केले की त्याच्यावरही आक्रोश करायचा.
बाकी चेकचे व्यवहार रामभरोसे असतात, इतर प्रणालींना मर्यादा आहेत, सगळा भार पे टी एम वर आला आहे अशी फॉर्वर्डेड वक्तव्ये इथे चिकटवून मग त्याचे उगीच समर्थन करत बसण्याला काय म्हणावे!!!!
तुमची सेना "आपला कट्ट्यावर"
तुमची सेना "आपला कट्ट्यावर" काय काय लिहिते याचे ईमेल्स येतात.
साती तुमचे दोन्ही प्रतिसाद
साती
तुमचे दोन्ही प्रतिसाद वाचले. दखल घ्यावी किंवा उत्तर द्यावे एव्हढीही पात्रता नाही त्यांची.
मला 70 व्या पानावरचा मुद्दा
मला 70 व्या पानावरचा मुद्दा पूर्णपणे पटलाय, ब्राव्हो
आशूचँम्प अहो जरा डोळे उघडा
आशूचँम्प अहो जरा डोळे उघडा ७०व्या पानावरच्या मुद्द्याला जे उत्तर ७३ व्या पानावर दिले त्याकडे तुम्ही सोईस्कर पणे दुर्लक्ष केले.
असो चालायचेच.
मिलिंद जाधव तुम्ही माझा
मिलिंद जाधव
तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलाय का ? मी कुठलाच निष्कर्ष काढलेला नाही. उलट घाई करू नये असं म्हटलंय. कुठलीच एक बाजू घेतलेली नाही. तरी देखील हा व्हिडीओ पाहून बदल करायला माझी ना नाही. तूम्ही मोदीद्वेष्ट्यांशी प्रतिवाद करता त्या नजरेने माझ्या प्रतिसादांकडे नका पाहू.
आमचा आपला कायम विरोधी पक्ष.
Pages