"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> झाडू | 18 December, 2016 - 22:47

ही आली दुसरी टांग हसून हसून गडबडा लोळण
<<<<

झाडू,

कृपया नीट भाषा वापरा

मला वाटतं की अ‍फ्ल्यूअन्ट समाजाला काहिही गैरसोय झाली नाही किंवा ज्यांना झाली त्यांना ती असहनीय वगैरे वाटली नाही हे एकदा मान्यच करून टाकूया.
Happy

बाकी मेजॉरिटी जनतेला अडचण झाली असेल तर २०१९ ला दिसेलच.

आता काळा पैसेवाल्या आणि करबुडव्या लोकांचीच मॅज्योरिटी असेल तर पडतील पण मोदी २०१९ला!
पण असला स्वार्थी विचार त्यांनी केलेला नाहीये याबद्दल त्यांचे कौतुक आहेच Happy

ज्या व्यवसायांचे/व्यावसायिकांचे थोडेफार नुकसान झालेले आहे कॅश क्रंच मुळे ते काही दिवसांनी व्यवसाय सुरळीत झाल्यावर विसरुनही जातील.... व्यवसायात उतरणारा माणूस तेव्हढ्या हेलकाव्यांची तयारी ठेवूनच उतरलेला असतो..... २०१९ तर अजुन लांब आहे!

पण ज्यांचा भरपूर काळा पैसा या स्ट्राईकमुळे वाया गेलाय आणि ज्यांच्या करचुकवेगिरीवर चाप बसलाय ते मात्र २०१९ मध्ये विरोधी मतदान करतील!

८ नोव्हेम्बर पासून शरद पवार, फडणीस, कलमाडी, बापट, मल्ल्या, दाउद इब्राहीम , जेटली, अजीत पवार, भ्रष्ट अधिकारी, सगळे नगरसेवक , रांका, अष्टेकर, मुकेश अंबानी , अदानी, सगळी आमदारे, खासदारे, रामभाऊ कदम, अ‍ॅक्सिस बँकेचे अधिकारी आणि ' हे ' यापैकी कोणालाही नोटाबंदीमुळे काहीही अडचण अथवा गैर्सोय झालेली नाही. पूर्वजन्मीचे पुण्य दुसरे काय ! रांगेतल्या लोकाना आणि भाज्या सडवणार्‍या शेतकर्‍याना जोड्याने मारले पाहिजे.

राज, हो. संध्याकाळी नजरचुकीने मी ती जळगाव जिल्हा सहकारी बॅन्क समजले आणि ह्या बॅन्क्स सुरू झाल्याच्या आनंदातच मी त्या सिक्युरिटीला विचारले होते कधी सुरु झाले ATM ते. त्याच आनंदात मी इथे येवून विचारले सुरू झाल्या का ह्या बॅन्का? आज पूर्ण दिवस रक्तदान शिबिरात असल्याने सकाळपासून बातम्या, TV बघितलंच नव्हतं. घरी येता येता पैसे काढून कामं करत घरी यावं म्हणून हे ATM उघडं दिसल्यावर काढले. रोहित ह्यांच्या पोस्टला उत्तर लिहायला सुरुवात केली आणि मधेच ATM slip काढून एकदा चेक केल्यावर ती जनता बॅन्क असल्याचं दिसलं म्हणून ती पोस्ट तशीच पुर्ण केली. असो, माझ्या नजरचुकीमुळे (थापेमुळे नव्हे) तुम्हाला थोडा मनस्ताप झाला. Sorry.

लवकरच सगळं सुरळीत होईल अशी आशा सर्वचजण करू. दिल्ली आणि इतर ठिकाणी परिस्थिती सुधारली का? रांगा कमी झाल्या का? कार्ड रिडर्स घेण्यासाठी आता बरंच वेटिंग तयार झालंय असं आज दोन दुकानदारांकडून ऐकलं.

>>माझ्या नजरचुकीमुळे (थापेमुळे नव्हे) तुम्हाला थोडा मनस्ताप झाला.<<

मी गंमतीत लिहिलं होतं हो, आणि मन:स्ताप कायम ग्राउंड रियॅलिटीवर असणारे आमचे माबोस्नेहि झाडु यांना झाला... Proud

कोण ते ?
मी कुणालाही एक्प्लेनेशन देणं लागत नाही म्हणत वारंवार माझा प्रोफाईल डेटा कॉपी पेस्ट करणारे ? कसला मनुष्य आहे हा ? याने प्रोफाईलला जे नाव लिहीलं आहे त्या नावाचा कुणी मृत अथवा जिवंत डॉक्टर जळगाव मधे आहे का हे कुणी चेक करणार का ? मला आय एम ए कडून लिस्ट मिळाली तर करता येईलच.

जळगाव मधे तर झाडबुके नावाचे डॉक्टर नाहीत पण आसपास म्हणजे धुळे आणि अन्यत्र योगेश झाडबुके आणि सचिन झाडबुके हे दोघे आहेत. यांना संपर्क करून ते मायबोलीवर आहेत का विचारते. किंवा रुद्र झाडबुके म्हणून कुणी या परिसरात दोन दोन हॉस्पिटल्स असणारे कुणी आहेत का हे विचारू शकते.

यांना ऑपरेशनचे दोन लाख मिळतात म्हणे. पेट्रोल पंपावर ऊठ बस असते म्हणे ? अरे डॉक्टरांच्यात ठेवा ना ऊठबस. पेट्रोल पंपावर ऊठबस ठेवायला भेसळीचा धंदा आहे का ? कधी पाहिलंय का डॉक्टर आपले काम धंदे सोडून पेट्रोल पंपावर बसलेले ? आणि अशा डॉक्टरांचा धंदा इतका कि इन्कमटॅक्स वाले मागे लागलेत. एक खाजगी हॉस्पिटल आणि एकात पार्टनरशिप म्हणे. एव्हढ्या फेमस डॉकटरला मायबोलीवर येऊन रासवट भाषेत हल्ले चढवायलाच वेळ मिळत असतो, पेट्रोल पंपावर बसायलाही वेळ मिळत असतो.

सिनीयर ग्रांट यांनी रुबी नावारुपाला आणले. पण त्यांना दुस-या हॉस्पिटलात पार्टनरशिप करण्याएव्हढा वेळ नाही मिळाला. ती काही कंपनी नाही पैसे गुंतवायला. ग्रांटना तेव्हढा वेळही द्यावा लागला असता. त्यांनी संपूर्ण फोकस रुबी वर ठेवला. तेच वाडियांचं. त्यांनी जहांगीरवर फोकस ठेवला.

अपोलो सारखी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स हा वेगळा प्रकार आहे. ते इतका पैसा घालू शकतात कि त्या त्या शहरातले टॉपचे डॉक्टर्स आपल्याच हॉस्पिटलकडे असले पाहीजेत हे आग्रहाने करू शकतात. पण यातल्या कुणालाही मायबोलीवर येऊन झोडपाझोडपी करायला वेळ मिळत असेल का ? मंगेशकरचे धनंजय केळकर कधी कुणाला दिसलेत का सोशल मीडीयावर ?

आणि लाज वाटत नाही का माझ्याकडे येऊन नोटा खपवायला हे पुण्यातल्या मला एखादा डोकं ठिकाणावर असलेला जळगावातला डॉक्टर विचारू शकतो का ? पुण्यात इतके टॉपचे डॉक्टर्स ओळखीचे असताना अशा आडबाजूला जाऊन एका भुक्कड डॉक्टरकडे मी तरी कशाला जाईन ना ? मला परवडत असेल तर प्रगत देशात जाईन पण जळगावला कशाला जाईन ? ते ही नोटा खपवायला ? नाही म्हणजे लॉजिकच लावायचं तर हे प्रश्न उपस्थित होतात ना ? हा विकृत इसम असा एक्स्प्लेनेशन्स मागत फिरणार आणि याला कुणी विचारले की मी स्पष्टीकरण देणं लागत नाही म्हणणार. कोण समजतो हा स्वतःला ? असा स्वभाव असेल तर दोन दोन हॉस्पिटल्स उभे करण्याएव्हढे पेशंट्स तरी येत असतील का ? कि यांना पर्यायच नाही जळगावात ?

https://www.justdial.com/Jalgaon/Private-Hospitals/ct-10390288

ही लिस्ट जळगावातल्या हॉस्पिटल्सची. यातले यांचे कुठले आणि पार्टनरशिप मधले कुठले सांगावे यांनी.
स्वतः काहीही फेका मारायच्या आणि दुस-यांच्या उठाठेवी करत बसायच्या !
तिकडे माशा मारत असाल तर ख-या नावाने आणि चेह-याने पुण्यात या. चांगल्या हॉस्पिटलमधे सीएमओ म्हणून चिकटवून देते. तेव्हढं काम तरी नीट करा आणि तोंड नीट संभाळून जॉब करा. मायबोलीवर वारंवार यायला वेळ मिळणार नाही हे लिहून देते तुम्हाला.

पेट्रोल पंप्सवर आता जुन्या नोटा चालत नसल्याने कार्ड पेमेंट साठी लाईन आहेत. शनिवारी संध्याकाळी १५ मिंट लाईन मध्ये उभं राहावं लागलं.

सई कुठल्या पंपावर ?
मला अद्याप लाईनला उभे नाही रहायला लागलेले. सीएनजी साठीही नाही आणि पेट्रोलसाठीही नाही. पेट्रोल भरण्यासाठी ज्या रांगा असतात त्या पूर्वीपासूनच आहेत.

सपना मॅडम,

जळगाव च्या बँके बद्दल मी विचारले होते.
उगाच झाडू यांना मध्ये आणू नका.
रच्याकने, मी झाडू यांना ओळखत नाही Wink

युनिक राऊत

मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुमचे प्रतिसाद वाचलेले नाहीत. मला सल्ले देऊ नका तुम्ही झाडू यांचा किंवा वर्तुळाचा आणखी एक अवतार असाल तर.

घ्या. विचालंय कुणाला आणि खुलासा करतंय कोण !!
ते ही इथे नाही. पुन्हा त्याच बदनाम ठिकाणी..

satiexplain.png

म्हणजे हे झाडबुके काल्पनिक आहेत असे साती म्हणतात. पण यांना खुलासा करण्याचे कारण काय ? हे झाडूजींनी म्हणू देत ना. नाहीतर ते मोकळेच पुन्हा..
आणि जर हे काल्पनिक आहेत हे खरे असेल तर यांना दुस-यांच्या प्रोफाईल च्या चौकशा करायची काय गरज ? कि बिनडोक प्रोफाईल क्रिएट केलंय ?

बरं बनसोडे तरी खरे का ? जळगाव हे ठिकाण नसेल तर मग नेमक्या कुठल्या ठिकाणी माशा मारतात ते तरी कळवा हो !! नाहीतर कुणाचे प्रोफाईल आहे ते सांगून टाका ना !! सिंपल.
आम्ही माफ करू. अपराध पोटार घेऊ.

फायर ब्रिगेड वाले ओळखीचे असतील तर या सो कॉल्ड अँग्री ओल्ड मॅन प्रोफाईलला विझवा. डोकं ताळ्यावर ठेवून प्रतिसाद दिले असते तर आज भिऊन लपून बसायची वेळ आली नसती.

झाली एव्हढी गंमत बस की आणखी पाहीजे ?

मला अद्याप लाईनला उभे नाही रहायला लागलेले. सीएनजी साठीही नाही आणि पेट्रोलसाठीही नाही. पेट्रोल भरण्यासाठी ज्या रांगा असतात त्या पूर्वीपासूनच आहेत.

Proud

मला अद्याप लाईनला उभे नाही रहायला लागलेले. सीएनजी साठीही नाही आणि पेट्रोलसाठीही नाही. पेट्रोल भरण्यासाठी ज्या रांगा असतात त्या पूर्वीपासूनच आहेत.

Proud

MUMBAI: The premium for illegal exchange of old currency notes has collapsed and money changers are proposing to pay interest on old notes provided the owner agrees to lock in the money for a year or more.

Rofl हे जर असे होत असेल, तर नोटबंदी केवळ फ्लॉप नाही, फक्त आणि फक्त गैरसोयीचा कळस आहे.

पेट्रोलच्या लाइन म्हणजे गाडीत बसून जिथे थांबायचं असतं ती एक लाईन.
मी म्हणतीये ती पेट्रोल भरून झाल्यावर आपण आधी खिडकीतून कार्ड द्यायचो आणि तो माणूस मशीन घेऊन यायचा (ज्यासाठी तो उगीच आधी घाई घाई करायचा पेट्रोल मारण्यासाठी आणि त्याला ओरडावे लागायचे) असं सोपं सुलभ आता होत नाहीये. पेट्रोल भरून झाल्यावर पंपाच्या ऑफिसच्या बाहेर पैसे भरायला कार्ड वाल्यांची वेगळी लाईन आहे. इथे माझी गैरसोय होते पण ती तुछ आहे तरी मी सांगते. माझ्या गाडीत मागे नेहमी माझा २ वर्षाचा मुलगा असतो कारसीटमध्ये. त्यामुळे आता मला पेट्रोल भरताना माझी चार चाकी कुठेतरी पार्क करून माझ्या मुलाला बरोबर घेऊन पैशाच्या लाईन मध्ये थांबावे लागते. हे नेहमीच सुलभ नसते. यावर अर्थातच मी उपाय लगेच काढला आहे तो म्हणजे एकटीने न जाता, अहोंना एका लाईनीत उभे करणे आणि आपण एका लाईनीत जाणे. पण यामुळे माझ्या इमानसिपेटेड असण्यावर गदा आली आहे.

ही लाईन मी राजारामपुलाच्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री ७;४० वाजता अनुभवली. आम्हाला तिथून निघायला ८ वाजले लाईनमुळे. पेट्रोल ७;४० लाच भरून झाले होते.

झाडू, साती आणि ज्यांचा नोटबंदी वरून विश्वास उडाला आहे ते सगळे,

प्लिज एकदा धागा नीट वाचा,
त्यात म्हंटले आहे,
>>>>>>>
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
>>>>>>>

अर्थात मध्यम/उच्चमध्यम वर्गास जे सोसावे लागत आहे, त्यास गैरसोय म्हणत नाहीत, त्यांची गैरसोय होत नाही.
बेफिकीर, हरिनामे ताई यांची जेनुइंली गैरसोय होत नसेल कारण ते उपरोक्त वर्गात येतात, तेव्हा त्यांना लोकांची किती गैरसोय होतेय हे सांगणे सोडा,

प्रत्येकजण आपल्या खिडकीतून जग पाहत असते, विना लाईन चे atm पाहून त्यांना सगळी कडे आबादी आबाद वाटते, तुम्हाला atm मध्ये पैसे नसल्याचे किंवा फक्त 2000 असण्याची शंका येते, त्याचे कारण हि खिडकीच आहे.

तेव्हा ज्यांची गैरसोय होत नाहीये त्यांना लोकांची किती गैरसोय होतेय हे पटवण्यात आपली एनर्जी वाया घालवू नका,
त्यांची झालेली सोय पाहून जळू नका,

मात्र प्लिज, पब्लिक फेसिंग रोल करताना तुम्हाला जो समाजाचा अनुभव येतो तो इकडे शेअर करायला विसरू नका,

आणि प्लिज, हा धागा वाहता करायचे सगळे हातखंडा प्रयोग सुरु होतील, आपण आपल्या प्रतिसादांमुळे धागा वाहता न होईल याची काळजी घेऊ.

सिंबा, मी वर लिहीलंच आहे.
अफ्ल्युअंट लोकांना त्रास होत नाही हे मान्य करूनच पुढे जाऊ या.
Happy

सपना यांच्या झाड या आयडी बद्दलच्या प्रत्येक पोस्टला अनुमोदन . कोण आहेत कोण हे डॉकटर २४ तास मायबोलीवर पडीक असतात ते. याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल . रासवट भाषेत धमक्यादे . प्रत्येकावर वैयक्तीक पातळीवर उतरायचं . धमक्या द्यायच्या आखाड्यात बोलवायचं . काय चाललंय काय ? यांनी आणि साती म्याडमने मोदींच्या विरोधात क्लब स्थापन केलाय म्हणे आणि जो कोणी मोदींच्या विरोधात बोलेल त्यांना क्लब मध्ये आमंत्रण देताहेत .. कठीण आहे . झाडू सरांचा आधीच आयडी बंद झालाय . सगळ्यांना माहितीये . जरी वेगळी आयडी घेऊन आलात तरी भाषा बदलत नाही . तीच जुनी भाषा रासवट Angry
ऍडमिन जरा लक्ष द्या

Pages